अर्थक्षेत्र भाग - ६ - सर्च, रिसर्च, "इम्प्रोव्हाझेशन"

Primary tabs

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
6 Jan 2014 - 1:32 pm

गुंतवणूक हि व्यक्तीसापेक्ष असते. एखाद्या व्यक्तीची आवक - जावक - शिल्लक ह्यानुसार तो कशी गुंतवणूक करावी हा विचार करत असतो. एखादा गायक जसा एखाद्या घराण्याला, गुरूच्या गायनपद्धतीला आपल्या गाण्यातून प्रतिबिम्बित करतो तसेच गुंतवणूकदार हा त्याची मानसिकता आपल्या गुंतवणुकीतून प्रतिबिंबित करतो. एखादा खूप चिकित्सकपणे बाजाराचा अभ्यास वगैरे करून, एखादा कॅलक्यूलेटेड रिस्क घेऊन, एखादा अजिबात विचार न करता अशी गुंतवणूक करतो पण मग त्याला मिळणारे रिटर्न्स देखील तेच प्रतिबिंबित करतात. म्हणजे खूप चिकित्सक जो आहे तो सुरक्षिततेला महत्व देतो त्यामुळे रिटर्न्स लिमिटेड, जो कॅलक्यूलेटेड रिस्क घेतो त्याची मानसिकता रिटर्न्स म्हणजे कमीत कमी "तोटा" कसा होईल हे असते आणि अजिबात विचार न करता गुंतवणूक म्हणजे हर हर महादेव! तिथे हार जीत हि मानसिकता असते. पण रिस्क आणि रिटर्न हे हातात हात घालूनच फिरत असतात. तेव्हा आपण कुठे आहोत हे ज्याने त्याने ठरवणे भाग आहे. पण जर पहिल्या दोन प्रकारात म्हणजे चिकित्सक आणि कॅलक्यूलेटेड रिस्क घेऊन थोडे "इम्प्रोव्हायझेशन" केले म्हणजे दोन्ही प्रकार एकत्र करून थोडे प्रयोगशील झालेतर ? अर्थात आधी कागदावर...

म्युचुअल फंड्स इंडिया हे एक असे सुंदर संस्थळ आहे, जिथे तुम्हाला म्युचुअल फंड्स ह्या विषयाची संपूर्ण माहिती मिळते. ह्या माहितीच्या आधारे बरेच तज्ञ योग्य-अयोग्य सल्ला देत असतात. पण म्युचुअल फंड्स म्हणजे दही आहे आणि शेअर्स म्हणजे दुध असा विचार केला तर मुळात जर दूधच बिघडले तर दही काय कप्पाळ चांगले लागणार? (मग दोष दुधवाल्या भय्याला !!!) आणि ढीगभर योजना बाजारात आहेत त्यातली कुठली चांगली? हा वेगळा विषय होईल. पण ह्या संस्थळावर योजनांनी कुठे पैसे गुंतवले? त्याची एन ए व्ही किती ? ऐतिहासिक एन ए व्ही किती ? लाभांश केव्हा मिळणार ? त्याच्या रेकॉर्ड डेट्स वगैरे माहिती उपलब्ध असते. पण कोणती माहिती माझ्या फायद्याची आहे आणि तिचे "इम्प्रोव्हायझेशन" कसे करायचे पाहू.

१) ह्या संस्थळावर कुठल्या योजनांनी कुठले शेअर्स किती प्रमाणात घेतले आहेत ते समजते.
उदाहरणार्थ आयसीआयसीआय ह्या बँकेत १३३ योजनांनी पैसे गुंतवले आहेत आणि त्यापैकी ९९ योजनांनी ५% पेक्षा जास्त पैसे गुंतवले आहेत. ओएनजीसी ह्या कंपनीत ११३ योजनांनी पैसे गुंतवले आणि त्यापैकी १९ व ४ योजनांनी अनुक्रमे ५% आणि १०% पेक्षा जास्त पैसे गुंतवले आहेत. हे % त्या योजनाचे पूर्ण भांडवल जितके आहे त्याच्यापैकी इतके % असे आहे. म्हणजे १००००० जर भांडवल असेल तर ५०००+ आयसी आयसी आय मध्ये गुंतवले गेले आहे.

२)आय सी आय सी आय (१३३) - इन्फोसिस (१२१) - रिलायंस (१२०) - एच डी एफ सी बँक (११४) - ओ एन जी सी(११३) - लार्सन टुब्रो(११३) - आयटीसी(१००) - एस बी आय(११३) टाटा मोटर्स (९९) -एच डी एफ सी (९७)
ह्या पद्धतीने भारतातल्या म्युचुअल फंड हौसेसनी पैसे गुंतवले आहेत अशा पॉप्युलर १० कंपन्या ह्या संकेत स्थळावर वेळोवेळी (सतत नव्हे ) बदलत असतात. त्या कंपन्या घेण्याआधी त्यांचे निधी व्यवस्थापक त्याची पूर्ण शहानिशा करत असतात. (मग मला काय गरज अभ्यासाची ?...कोण म्हणले रे कोण म्हणले ?)
३)आता तुम्हाला एक दिशा मिळाली की म्युचुअल फंड्स कोणत्या शेअर्समध्ये गुंतले आहेत किंवा कोणते शेअर्स म्युचुअल फंड्समध्ये जास्त पॉप्युलर आहेत.
४) आता प्रत्येक शेअर्सचा अभ्यास कसा करावा ? किती घ्यावेत केव्हा घ्यावेत हे ठरवणे हे पुन्हा व्यक्ती सापेक्ष आहे.

पण बाजारात, निरीक्षण - नियोजन आणि निर्णय हे तीन अत्यंत महत्वाचे भाग आहेत. मग तो शेतकी माल असो की शेअर बाजार म्हणजे बाजारात टोमेटो कधीतरी इतके दिसतात की सगळा बाजार लालेलाल होऊन जातो किंवा मटार - पाले भाज्या इतके येतात की सगळी मंडइ हिरवीगार "दिसते" पण जो निरीक्षण करतो त्यालाच ती दिसते. तसाच दुसरा नियम जे शेअर्स जोरजोरात ओरडून विकले जातात ते कधीही घेऊ नये कारण जर ते चांगले आहेत तर तो विकतोय का ?आणि त्यासाठी त्याला वेगवेगळ्या माध्यमातून इतका घसा का खरडावा का लागतोय? आणि जे विका विका अशी बोंब उठूनहि धडाधड घेतले जाताहेत ते कोण घेताय जर मार्केटमध्ये विकण्याची बोंब आहे. म्हणजे मार्केटमध्ये ज्याचा आरडाओरडा चालू आहे ते शेअर्स संपूर्णपणे दुर्लक्ष केले तर ? हे बरोबर आहे का ? तर कसोटी घ्या किती म्युचुअल फंड्सचे किती टक्के त्या शेअर्स मध्ये गुंतले आहेत? हे % नगण्य असेल.
आणि जर माझा सल्लागार मला एखाद्या योजनेत पैसे गुंतवा सांगत असेल आणि जर ती योजना उत्तम असेल म्हणजे ग्रोथ, लाभांश, कर वगैरे लक्षात घेऊन तर त्या योजनेचा पोर्ट फ़ोलिओ काय हे पाहून माझे अर्धे भांडवल मी त्या योजनेत गुंतवल आणि अर्धे भांडवल मी त्या पोर्ट फोलीओत गुंतवले तर ? कोणती गुंतवणूक मला जास्त परतावा मिळवून देईल? माझा शेतकरी मित्र त्याच्या एकूण जमिनीपैकी छोट्याशा तुकड्यावर जी प्रयोगशीलता दाखवतो तशी हि प्रयोगशीलता थोडी आपणही दाखवली तर ?

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

7 Jan 2014 - 5:13 pm | कपिलमुनी

इम्प्रोव्हाझेशन !

सुरवातीच्या धक्क्यानंतर रीसर्च करून इम्प्रोव्हाझेशन केले तरच ऑट्पुट मिळतात ..
बरेच जण जिम लावल्याप्रमाणे २-३ महिने करून "छ्या.. काय होत नाय" म्हणून सोडून देतात ..

ज्ञानव's picture

7 Jan 2014 - 6:00 pm | ज्ञानव

मर्म उत्तम सांगितलेत
धन्यवाद

राघवेंद्र's picture

8 Jan 2014 - 2:23 am | राघवेंद्र

म्युचुअल फंड्स साठी मी हे संस्थळ वापरतो. लाभांशाची माहिती व स्किम बद्दल माहिती चांगली असते.

बर्फाळलांडगा's picture

9 Jan 2014 - 10:42 am | बर्फाळलांडगा

आवडत आहे