( हे चिकन मस्त आहे )

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
21 Jul 2008 - 1:08 pm

इथे दिलेली चिकनची पा.कृ. पाहिली आणि हे गाणे सुचले.

चालः 'चौकर राजा" मधील गाणे "हे जीवन सुंदर आहे."
-----------------------------------------------------------------------
हे चिकन सुंदर आहे !! धृ !!

निसर्ग धाबा हायवेवरचा अन् मित्रांची पार्टी !
रसात बुडल्या तंगड्यांना चापायाची घाई !!

(अहो विसरा हे सगळ. एथं सगळेच विचित्र. वर कोंबड्या चिकनगुनियाने त्रस्त. सोबतीला ही प्रचंड महागाई !!!)

पापलेट, बोंबील , वडे , खिमा हेही मस्त आहे !
हे चिकन सुंदर आहे !! १!!

तांबडा रस्सा कोल्हापुरचा अन तंदुरी रोटी !
ग्लासातल्या फेसासंग जेवण मस्त होई !!

कांदा मिरची, सॅलेड, लोणचे साथ साथ आहे. ! हे चिकन सुंदर आहे !! २!!
-----------------------------------------------------------------------

विडंबनप्रकटन

प्रतिक्रिया

पक्या's picture

21 Jul 2008 - 1:16 pm | पक्या

चागलं विडंबन केलंत्...लगे रहो.
सुंदर च्या ऐवजी 'रूचकर' शब्द वापरलात तर?

मंदार वाईकर's picture

21 Jul 2008 - 8:05 pm | मंदार वाईकर

ग्लासातला फेस कशाचा ....?