पाऊल माझे चालले रस्ता जिथे जाई तसे
शोधायला येऊ नका माझ्या इराद्यांचे ठसे
नाही दिली जन्मात या कोणासही मी सावली
आयुष्यभर जपलेत मी माझ्या उन्हाचे वारसे
विश्वास या दुनियेवरी ठेवायचा कोणी कसा
एकाच खाणीच्या उरी यावे हिरे अन् कोळसे
वाटेवरी माझ्या जिथे अंधार होता दाटला
पेरीत मी गेलो तिथे माझ्या विजांचे कवडसे
आयुष्य येथे भेटते प्रत्येक वळणावर नवे
ताजी पुन्हा होते गझल धरते नव्याने बाळसे
-- उपटसुंभ
प्रतिक्रिया
21 Dec 2013 - 9:35 pm | कवितानागेश
छान रचना. आवडली.
22 Dec 2013 - 1:22 pm | चाणक्य
सुरेख. आवडली गजल
23 Dec 2013 - 5:54 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त रे...
सुंदर!
24 Dec 2013 - 12:45 am | अत्रुप्त आत्मा
:)
24 Dec 2013 - 4:54 pm | पैसा
आवडली!