विनोद:
लेखक- निमिष सोनार
1) एक सरदार कामासाठी बँकेत जातो.
काम झाल्यावर तो एक सूचना वाचतो,
"आपल्याला बँकेबद्दल तक्रार असल्यास या पेटीत टाका "
तो हे वाचून एक नवी वही विकत आणतो, एक पान फाडतो त्यावर लिहीतो,
"मला या बँकेबद्दल काही तक्रार नाही "
पेटीत टाकतो आणि निघून जातो.
2) बागेत बाकड्या जवळ एक सूचना लावली होती,
"रंग ओला आहे. हात लावू नका. बसू नका.
खात्री नसली तर हात लावाच.
रंग निघाल्यास बाकड्याखाली ब्रश आणि रंग ठेवले आहे. रंग द्या आणि जा. "
3) एका रेडीओ वर एकदा घोषणा करतात,
"आपण पहात आहात आकाशवाणी "
4) विज महामंडळ प्रायोजीत मालीका,
"कटौती बीजली की "
प्रसारण समय— लोड शेडींग सुरू झाल्यावर
प्रतिक्रिया
23 Nov 2013 - 2:09 pm | परिंदा
एक नाक हाताने दाबून ठेवत असेल, उरलेली ९ नाक कपडे वाळवताना ज्या क्लिपा वापरतात ना त्यांनी!
22 Nov 2013 - 7:16 pm | टवाळ कार्टा
हाताने....रेझरने...न्हावी असेलच ना??
22 Nov 2013 - 11:50 am | सुहास..
मालकांनी 'अनाहिता' सारखा एक ' बाल-विभाग' सुरु करायच हे मनावर घ्यावे... हि नम्र विनंती !!
एक विनोद ...
.
.
.
.
.
. नको च ...काही मृदु बाल मनावर परिणाम होतील .
22 Nov 2013 - 4:34 pm | शिद
तो: जिना सिर्फ मेरे लिये... जिना सिर्फ मेरे लिये...
ती: ठीक आहे, मी लिफ्ट ने जाते… तू ये जिन्याने...
---------------
मास्तर: अमेरिकेने चंद्रावर पाणी व बर्फाचा शोध लावला… आता सांगा तुम्ही यातून काय शिकलात?
गण्या: आता आपल्याला फक्त दारु आणि चखना घेवून जावे लागेल.
1 Nov 2014 - 5:47 pm | सरल मान
Lol
7 Dec 2013 - 7:39 pm | काळा पहाड
एका मठावर गेलो होतो .सात साधू सात चटयांवर बसले होते,मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले बाबा पोरी भाव देत नाहीत काय करु? . . . . ... बाबा हासले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले . . . . . . . . . .गोमटेश्वरा आणखी एक चटई टाक बाबा...
7 Dec 2013 - 7:45 pm | काळा पहाड
बाळू जोशी काकूंच्या दारावर टकटक करतो.
जोशी काकू : कोण आहे ?
बाळू : मी आहे ?
जोशी काकू : मी कोण ?
बाळू : तुम्ही जोशी काकू!
7 Dec 2013 - 7:45 pm | काळा पहाड
घटस्फोटाचा खटला चालू होता. न्यायाधीशांनी पत्नीला विचारलं , ' तुम्हाला घटस्फोट कशासाठी हवा आहे ?'
पत्नी : ते , माझा मानसिक छळ करतात.
न्यायाधीश : कसा काय ?
पत्नी : आधी ते मला वाटेल तसं टाकून बोलतात आणि मी उत्तर देऊ लागले , की श्रवणयंत्र बंद करून ठेवतात!
1 Nov 2014 - 4:38 pm | विजुभाऊ
प्रतिसादातले विनोद वाचून पुन्हा एकदा मस्त हसलो........
1 Nov 2014 - 8:36 pm | मारवा
एक विनोद माझा हजार प्रतिसादाच्या ताकदिचा परी अल्प प्रतिसाद पाहता मला वेगळीच शंका येते.