चार विनोद

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
17 Nov 2013 - 8:48 pm

विनोद:
लेखक- निमिष सोनार
1) एक सरदार कामासाठी बँकेत जातो.
काम झाल्यावर तो एक सूचना वाचतो,
"आपल्याला बँकेबद्दल तक्रार असल्यास या पेटीत टाका "
तो हे वाचून एक नवी वही विकत आणतो, एक पान फाडतो त्यावर लिहीतो,
"मला या बँकेबद्दल काही तक्रार नाही "
पेटीत टाकतो आणि निघून जातो.
2) बागेत बाकड्या जवळ एक सूचना लावली होती,
"रंग ओला आहे. हात लावू नका. बसू नका.
खात्री नसली तर हात लावाच.
रंग निघाल्यास बाकड्याखाली ब्रश आणि रंग ठेवले आहे. रंग द्या आणि जा. "
3) एका रेडीओ वर एकदा घोषणा करतात,
"आपण पहात आहात आकाशवाणी "
4) विज महामंडळ प्रायोजीत मालीका,
"कटौती बीजली की "
प्रसारण समय— लोड शेडींग सुरू झाल्यावर

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

17 Nov 2013 - 8:56 pm | विजुभाऊ

अरे बापरे.........
असले विनोद पूर्वी" स्वराज्य"नावाचे साप्ताहीक यायचे त्यात असायचे.
हे विनोद वाचणार्‍यांचे मानसीक वय काय अपेक्षीत आहे?

निमिष'जी.. आपले या आधीचे उच्च दर्जाचे लिखाण आम्ही वाचले आहे.... आता अचानक काय झाले?...

जेपी's picture

17 Nov 2013 - 9:01 pm | जेपी

चेपुवरचे स्वत:चे स्टेटस इथे टंकले का?

टुकार ज्योक्स .

विद्युत् बालक's picture

17 Nov 2013 - 9:02 pm | विद्युत् बालक

हे विनोद वाचणार्‍यांचे मानसीक वय

तुमचे जेवढे स्वराज्य मासिक वाचताना होते तेवढेच ! =))

अग्निकोल्हा's picture

17 Nov 2013 - 11:34 pm | अग्निकोल्हा

पटाक करुंन आपले सदस्यनाव चुकुन अनेकदा विद्या बालन असे वाचले जाते.

विद्युत् बालक's picture

17 Nov 2013 - 11:39 pm | विद्युत् बालक

खी खी खी !

आम्ही दोघेही शॉक देण्यास समर्थ आहोत

जेपी's picture

17 Nov 2013 - 9:04 pm | जेपी

चहा आणी मारी

पहिला प्रतिसाद माझा वाटला , टंकेपर्यत नंबर घसरला .

प्रचेतस's picture

17 Nov 2013 - 9:46 pm | प्रचेतस

माफ करा, पण जोक अत्यंत सुमार आणि फालतू आहेत.

मी-सौरभ's picture

18 Nov 2013 - 1:20 pm | मी-सौरभ

ते काय माफ करनार??
माफ करणारा एकच 'आकाशातला बाप'
त्यांना पण आणि तुला पण...

अत्रुप्त आत्मा's picture

17 Nov 2013 - 11:13 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/sleep/yawn.gif

अश्याच धाग्यावर ... चंपक मासिक.. हसू नका बरे हे त्यातलं सदर... ठकठक..

यासम आठवण आणि प्रतिक्रिया असं देजावू फीलिंग का येतंय.. ?

हा धागा आधी आलाय का ?

चाणक्य's picture

17 Nov 2013 - 11:29 pm | चाणक्य

१. विनोद खन्ना
२. विनोद कांबळी

विद्युत् बालक's picture

17 Nov 2013 - 11:36 pm | विद्युत् बालक

१. सनी देओल
२. सनी लिओने

चिगो's picture

7 Dec 2013 - 8:57 pm | चिगो

सनी लिओने ?

अहो, हा काय विनोदाचा विषय आहे? हा घ्या..

एकदा सनी लिऑने एका कपड्यांच्या दुकानात जाते. कपडे निवडल्यावर ती सेल्समॅनला विचारते, " ट्रायल रुम कुठेय?" सेल्समॅन म्हणतो, "मॅडम, घ्या की इथंच.. आपण पाहीलंय सगळं तसंही..." ;-)

आम्ही एक दुसरा विनोद ऐकला होता.

सन्नी लिओने ने बॉलीवुड पिच्चरमध्ये अंगप्रदर्शनवाले शीन देणे म्हणजे आयायटीच्या परीक्षेत टॉप करून म्हाराष्ट्र सीईटीला पुन्हा बसण्यापैकी आहे.

शक्य असल्यास यात आपले अजुन जोक्स टाकुन हां धागा अपडेट करा.

विजुभाऊ's picture

17 Nov 2013 - 11:45 pm | विजुभाऊ

शक्य असल्यास यात आपले अजुन जोक्स टाकुन हां धागा अपडेट करा.

एकवेळ "ओन्जलीतील सूर ते निसतेले.ते मल कुन्वीत आहे " सारखी कविता लिहायची शिक्षा द्या. पण इथल्या स्टायलीचे विनोद लिहायला सांगु नका

एक होता 'ट'. तो एकदा रसत्याने चालला होत. मागून एक PMT आली, आणि 'ट' ला उडवून गेली . तर 'ट' चं काय हॊइल ?

ऊ : टमरेल

अग्निकोल्हा's picture

18 Nov 2013 - 1:24 am | अग्निकोल्हा

तुमचाही एक स्वतंत्र धागा का सुरु करत नाही?

sagarpdy's picture

18 Nov 2013 - 9:42 am | sagarpdy

:D :P

अक्शु's picture

19 Nov 2013 - 9:48 am | अक्शु

भारी.....खुपच मस्त..........भारीच हसु आलय

बाहुली's picture

19 Nov 2013 - 2:11 pm | बाहुली

लय भारी !!!!!

बॅटमॅन's picture

19 Nov 2013 - 2:30 pm | बॅटमॅन

अगागागागागागा =)) =))

अरे विनोद मेहरा., एजन्ट विनोद ,
हे राहीलेच की.
इतके विनोदु नका हो ;)

sagarpdy's picture

17 Nov 2013 - 11:47 pm | sagarpdy

महिला विभाग आणि पुरुष विभाग राहूदेत. आधी बालक विभाग सुरु करावा हि विनंती.

आदूबाळ's picture

18 Nov 2013 - 12:10 am | आदूबाळ

सरदार नवी वही विकत का आणतो?

निमिष सोनार's picture

18 Nov 2013 - 11:31 am | निमिष सोनार

बघा . विनोदांवर आलेल्या प्रतिक्रियेमुळे मनोरंजन झालेच ना सगळ्यांचे?

सरदार नवीन वही विकत आणतो कारण -
त्याला मिसळपाव वरचे माझे जोक घरी जावून त्या वहीत लिहायचे असतात ...

अग्निकोल्हा's picture

18 Nov 2013 - 9:48 pm | अग्निकोल्हा

बघा . विनोदांवर आलेल्या प्रतिक्रियेमुळे मनोरंजन झालेच
ना सगळ्यांचे?

'इट इज वेरी ऑप्टिमिस्टिक ऑफ यू.'

बॅटमॅन's picture

19 Nov 2013 - 2:32 pm | बॅटमॅन

कार्लूचा ड्वायलॉक!

बापरे! म्हंजे अजून येणारेत का?

मिनेश's picture

18 Nov 2013 - 1:21 pm | मिनेश

चावरेपणाचा कळस......

दिपक.कुवेत's picture

18 Nov 2013 - 1:22 pm | दिपक.कुवेत

सॉलीड जोक (गडाबडा लोळणारी स्मायली)

श्रीगुरुजी's picture

18 Nov 2013 - 7:26 pm | श्रीगुरुजी

"चार विनोद" हे शीर्षक वाचल्यावर मला वाटले की 'चार विनोद' म्हणजे विनोद खन्ना, विनोद मेहरा, विनोद कांबळी आणि विनोद तावडे. पण इथे भलतेच विनोदी विनोद आहेत.

सुनील's picture

19 Nov 2013 - 8:55 am | सुनील

क्रमश: असे टंकायचे राहिले वाट्टं? ;)

अक्शु's picture

19 Nov 2013 - 10:07 am | अक्शु

मला का माहिती नाही पण असे लहानपणिचे विनोद अगदी माहिति असले तरी ऐकायला आवडतात.
त्यातली मजा इन्नोसण्ट असते आणि एखाद लहान मुल जर सान्गत असेल तर विनोदापेक्शा त्यान्च्या बोलण्याच जास्त हसु येत.

सदासुखि's picture

19 Nov 2013 - 1:39 pm | सदासुखि

१>(कपड्यांच्या दुकानात)
महिला- मला गाऊन दाखवा.
दुकानदार - पण मला गाता नाहि येत.

२>(मेडिकल दुकानात)
मुलगा - मुझे डोले मे डालने कि दवा दिजिये.
दुकानदार - बेटा डोले मे नही आँख मे कहते हे.
मुलगा - वही तो वो मेरे तोंड मे गलतिसे डोले आ गया.

यसवायजी's picture

19 Nov 2013 - 4:20 pm | यसवायजी

अजुन १
पहायला आलेला मुलगः- गाउन दाखव
मुलगी: वाळत घातलाय
मुलगा:- (चिडुन)अस्स काय? वाळू दे, वाळू दे..
मुलगी:- (हातात वाळू देत) हि घे वाळू.
मुलगी रोक्स.. मुलगा शॉक्स..
:D

ऐकला होता हा जोक. भन्नाट आहे. याची अजून एक खंग्री व्हर्जनही आहे ;)

यसवायजी's picture

19 Nov 2013 - 4:42 pm | यसवायजी

व्यनी प्लेअसे.

बॅटमॅन's picture

19 Nov 2013 - 2:32 pm | बॅटमॅन

आमचाही एक विनोद.

एक प्रेग्नंट बै दवाखान्यात जाते. डॉक्टर विचारतो कितवा महिना. बै म्हणते आठवा.

बराच वेळ डोके खाजवून खाजवून डॉक्टर म्हणतो, आठवत नै बॉ.

सव्यसाची's picture

19 Nov 2013 - 4:43 pm | सव्यसाची

जमलय :)

ब़जरबट्टू's picture

9 Dec 2013 - 1:43 pm | ब़जरबट्टू

:)

पप्पु अंकल's picture

19 Nov 2013 - 2:46 pm | पप्पु अंकल

वाट आन आईडिया सरजी...
एका गुगली वर एव्हढ्या विकेट्स

परिंदा's picture

19 Nov 2013 - 2:49 pm | परिंदा

हे काय आहे? इतके प्रतिसाद?

बॅटमॅन's picture

19 Nov 2013 - 2:52 pm | बॅटमॅन

वाट आन आईडिया सरजी...
एका मजकुरावर वर एव्हढे प्रतिसाद

एका समारंभात नवरा बक्षीस घेतांना त्याचा सदरा मळलेला असतो.
त्याचे वरिष्ठ म्हणतात : " आजच्या दिवशी एवढा मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ? "
संतापून नवरा समोरच्या खुर्चीवर बसलेल्या बायकोकडे बघतो.
बायको म्हणते : " एक वेळ बदलून टाकेल मी नवऱ्याला, पण ... माझी धुण्याची साबण वडी नाही बदलणार! "

(पाहिलंत? आमच्या साबण वडीवर किती विश्वास आहे महिलांना!
आजच, आताच घ्या आमची वडी...)

निमिष सोनार's picture

19 Nov 2013 - 3:57 pm | निमिष सोनार

नाटीका शांपू
एक बारा तेरा वर्षाची मुलगी एका तरंगणाऱ्या हिरव्यागार पानावर मोकळे केस सोडून उभी राहून म्हणते :
" माझे जहाज, आहे ना छान? .... कोठून आणले विचारता? ... सांगू ? भाड्याचे आहे!

मग ती पांढरे स्वच्छ केस दाखवते :

" माझे केस! आहे ना पांढरे शुभ्र! ... कसे काय पांढरे झाले विचारता? .... सांगू? ...
आं .... मी नाही सांगणार ! "

( बघितलंत.. ती जरी नसेल सांगत तरी, आम्ही सांगतो ना!
ही कमाल आहे आमच्या शांपूची...
वापरा आमचा शांपू.. केस करा शुभ्र ... शुभ्रतेची चमक ! पुन्हा पुन्हा! )

निमिष सोनार's picture

19 Nov 2013 - 4:03 pm | निमिष सोनार

एका पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेली सूचना:

या पुस्तकातल्या कथेत लेखकाने व्यक्त केलेल्या मतांशी स्वतः लेखक तसेच प्रकाशक, मुद्रक आणि विक्रेते हे सर्व सहमत असतीलच असे नाही. वाचकांनीही सहमत असावे असे नाही.

तसेच या पुस्तकातील पात्रे, घटना, व्यक्ती हे सर्व सत्य आहेत. ते वाचकास खोटे वाटत असतील तर तो दोष वाचकाचा आहे आणि हा योगायोग मानू नये. कारण, माझा योगायोगावर विश्वास नाही.

तुमचा असल्यास तो एक योगायोग मानावा.

हे पुस्तक खालील अटींसह विकले गेले आहे :

या पुस्तकाचे सर्व हक्क प्रकाशकाधीन आहेत. या पुस्तकाचे इतरांसमोर वाचन, मनन, पठण, चिंतन करू नये. तसेच याची मनातल्या मनात झेरोक्स काढू नये. तसे कुणी करतांना आढळल्यास वाचकाचा मनाला लगाम घालण्यात येईल. हे पुस्तक फक्त आणि फक्त एकट्याने वाचावे. दुसऱ्या कुणाला वाचायला देवू नये. नाहितर ते जप्त करण्यात येईल. त्याऐवजी त्याला विकत घ्यायला उद्युक्त करावे.

पुस्तक : योग आणि योगायोग (एका विनोदी आत्म्याचे चारित्र्यहीन आत्मचरीत्र)

लेखक : श्री. सत्यव्रत सत्यवचने

प्रकाशक : श्री. सत्यव्रत सत्यवचने

मुद्रक : श्री. सत्यव्रत सत्यवचने

विक्रेते : श्री. सत्यव्रत सत्यवचने

प्यारे१'s picture

19 Nov 2013 - 4:47 pm | प्यारे१

का पण?

शिल्पा ब's picture

20 Nov 2013 - 9:50 am | शिल्पा ब

लोल अगदी मोठ्ठ्याने लोल !

प्यारे१'s picture

20 Nov 2013 - 1:21 pm | प्यारे१

:)

प्रचंड कष्टून देखील हसायला जमेना!

शिल्पा ब's picture

20 Nov 2013 - 1:24 pm | शिल्पा ब

हो!! पझ्न आम्हाला तुमचा निरागस प्रश्न वाचुनच हसु आलं..

पियुशा's picture

19 Nov 2013 - 4:52 pm | पियुशा

ए माझे पण माझे पण ...
१ एकदा हत्ती लोकांची बास्केटबॉलची मॅच चाललेली असते. एक मुंगी मधेच उभी असते. असे का...?
उत्तर: कारण ती रेफरी असते.
२ एकदा एक मुंगी झाडावर बसलेली असते आणि हत्ती खालच्या तलावात पोहत असतो. तर ते त्यांच्या पोसिशन्स कश्या इंटरचेंज करतील...?
उत्तर: मुंगी पाण्यात उडी मारेल आणि त्यामुळे जोरदार पाणी उडून हत्ती त्या पाण्याबरोबर उडून झाडावर जाऊन पोहोचेल.

( बस्स का अजुन बोरे म्रु ? ;) )

नानबा's picture

19 Nov 2013 - 5:01 pm | नानबा

एका माणसाच्या घरी अचानक पाहुणे येतात. तो आपल्या बायकोला पाहुण्यांसाठी लिंबू सरबत बनवायला सांगतो. पण बायको सांगते, "घरातली लिंबं संपलीयेत"
नवरा म्हणतो, "अगं, तो भांडी घासायचं व्हिम लिक्वीड आहे की. त्यात आहे १०० लिंबांची शक्ती. टाक दोन थेंब"
;)

आदूबाळ's picture

20 Nov 2013 - 5:17 am | आदूबाळ

:))

(स्वाक्षरीसाठी +१)

आमच्या अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षी सुतारकाम कार्यशाळेत घडलेला खरा विनोद.
२१-४० रोल नंबर्सची बॅच होती.
मास्तरने हजेरी चालु केली.
ट्वेंट्वी वन, ट्वेंट्वी टु, ट्वेंट्वी थ्री... 'ट्वेंट्व' ऐकुनच आम्ही पुढे होतो ते हळुहळु मागे जाउन टेबलखाली वाकुन भरपुर हसलो. हजेरी चालुच होती.
ट्वेंट्वी एट, ट्वेंट्वी नाईन आणि नंतर कहर ट्वेंट्वी टेन म्हटल्यावर जो हास्याचा स्फोट झाला..टर्म्-वर्कला वाट लावली मास्तरने बरोबर..

आम्ही इंजिनियरींगच्या तिसर्‍या वर्षात असताना घडलेला किस्सा -
५ सप्टेंबरला, शिक्षक दिन म्हणून कॉलेजच्या मेन गेटवर उभे राहून येणार्‍या प्रत्येक शिक्षकाला एक गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होता. आमचेच मेकॅनिकलचे एक सर आले. एका विद्यार्थ्याने त्यांना गुलाब दिला आणि म्हणाला, "हॅप्पी टीचर्स डे सर".
त्यावर सर उत्तरले, "सेम टू यू".

पोरं खिदळून खिदळून पागल. :))

ब़जरबट्टू's picture

9 Dec 2013 - 2:00 pm | ब़जरबट्टू

अभियांत्रिकीच्या वर्षाच्या व्हायवा मधील अगदी खरा किस्सा…

मास्तरले विचारले - पेन मध्ये कोणत्या टाईपचा स्प्रिंग असतो ?

आमचे टापर… - सर, आय थिंक इट्स लिफ स्प्रिंग …

यानन्तर मास्तरले परत कधीच स्प्रिंगचा विषय काढला नाही.. :))

टिप :- ज्योक टेकनिकल हाये… :)

निमिष सोनार's picture

19 Nov 2013 - 5:50 pm | निमिष सोनार

:-)

आदूबाळ's picture

20 Nov 2013 - 5:19 am | आदूबाळ

आमचाबी एकः

एक चिमणी आकाशातून उडत असताना शी करते. पण ती जमिनीवर पडत नाही. का?
.
.
.
कारण चिमणीने चड्डी घातलेली असते...

एक चिमणी आकाशातून उडत असताना शी करते. ती शी एका माणसाच्या डोक्यावर पडते. माणूस वैतागून चिमणीवर ओरडतो. "चिमणे, तुला चड्डी घालायला काय होते?"

चिमणी: "गधड्या, तू तरी चड्डी घालून शी करतोस का?"

sagarpdy's picture

20 Nov 2013 - 5:32 pm | sagarpdy

आवडेश!

आदूबाळ's picture

22 Nov 2013 - 12:54 pm | आदूबाळ

:))

ज्ञानव's picture

8 Dec 2013 - 2:31 pm | ज्ञानव

शी-शु वर्गातला किस्सा (खर्रा खुर्रा )नाव बदलून हं पण .....

बंड्या : टीचर....(करंगळी वर करून दाखवतो )
टीचर : जा जाऊन ये
थोड्या वेळाने बंड्या परत आला
बंड्या : टीचर सापडत नाहीये
टीचर : अरे सरळ जाऊन लेफ्टला कोर्नरलातर आहे टोयलेट जा लवकर जाऊन ये
बंड्या परत येतो
बंड्या : बाई सापडत नाही ये दाखवा ना घाई आहे....
टीचर : गंपू जारे दाखव ह्याला टोयलेट कुठे आहे ते...
थोड्या वेळाने
गंपू : टीचर,झाली एकदाची.....त्याने चड्डी उलटी घातली होती ना म्हणून सापडत नव्हते.

एकदा एक साप आणि एक नाग जोरजोरात भांडत असतात. भांडण्याच्या नादात
नाग : ए, सापड्या !
साप (लगेच): ए, नागड्या !

:D :P

योगी९००'s picture

22 Nov 2013 - 2:43 pm | योगी९००

एकदा एक साप आणि एक नाग जोरजोरात भांडत असतात. भांडण्याच्या नादात
नाग : ए, सापड्या !
साप (लगेच): ए, नागड्या !

हॅ हॅ हॅ...
हाच जोक मी जरा वेगळ्या वर्जन मध्ये ऐकला होता. साप आणि नाग याऐवजी (प्रसिद्ध) जुळ्या मुलांची नावे होती.

शिद's picture

22 Nov 2013 - 4:25 pm | शिद

=)) =)) =))

परिंदा's picture

22 Nov 2013 - 5:26 pm | परिंदा

काय नाव होती ती?

प्रभाकर पेठकर's picture

8 Dec 2013 - 2:57 pm | प्रभाकर पेठकर

लव-कुश.

ब़जरबट्टू's picture

9 Dec 2013 - 1:50 pm | ब़जरबट्टू

हसून हसुन मरतय आज.... =))

सरल मान's picture

1 Nov 2014 - 5:42 pm | सरल मान

जुळ्या मुलांची नावे...लय भारी

वाह्यात कार्ट's picture

20 Nov 2013 - 12:42 pm | वाह्यात कार्ट

एक सापाचं पिल्लू पळत पळत आई कडे जातं आणि म्हणतं "आई आई, आपण विषारी कि बिन-विषारी "
आई म्हणते "बिन- विषारी"
तर ते पिल्लू हुश्श!! म्हणतं.
आई म्हणते "का रे की झालं ?"
तर पिल्लू म्हणतं "अगं मी माझी जीभ चावली ..!!!"

अजून एक सापाचं पिल्लू पळत पळत आई कडे जातं आणि म्हणतं "आई आई, आपण विषारी कि बिन-विषारी "
आई म्हणते "विषारी"
तर ते पिल्लू "अॅक !!" करून मरतं !!!

प्रभाकर पेठकर's picture

20 Nov 2013 - 1:43 pm | प्रभाकर पेठकर

आईवरील 'अंधश्रद्धा'.

नानबा's picture

20 Nov 2013 - 5:09 pm | नानबा

सापाला लहानपणी पाय असतात?? :))

सापाचे पाय बिळात दिसतात ते असेच काय =))

यसवायजी's picture

20 Nov 2013 - 6:20 pm | यसवायजी

२ झुरळ ICU मधे बेडवर..
पहिला दुसर्‍याला विचारतो:- काय 'बेगॉन' का?
दुसरा:- नाही राव, 'पॅरेगॉन'..
:D

बॅटमॅन's picture

21 Nov 2013 - 5:08 pm | बॅटमॅन

जुना पण चांगला आहे.

निमिष सोनार's picture

20 Nov 2013 - 6:34 pm | निमिष सोनार

खुप छान ..

देशपांडे विनायक's picture

20 Nov 2013 - 7:05 pm | देशपांडे विनायक

CHEMISRY LAB मध्ये DEMONSRATER मागील आठवड्यात आणलेला बर्फ सापडत नाही म्हणून इतका पेटला होता की आम्ही सारे थिजून उभे राहिलो होतो

देशपांडे विनायक's picture

20 Nov 2013 - 7:09 pm | देशपांडे विनायक

T पाहिजे तेथे घ्यावा हि नम्र विनंती

T पाहिजे तेथे घ्यावा हि नम्र विनंती

:))

जय - गणेश's picture

21 Nov 2013 - 11:37 am | जय - गणेश

मि. केळकरांन कडे एक कुत्रा असतो त्याच नाव टॉमी. हा टॉमी त्याचा लाडका कुत्रा आसतो. एकदा मि. केळकरांन कडे मि. पाटील चहाला जातात. तेव्हा मि. केळकर आपल्या टॉमी ची स्तुती करतात. आमच्या टॉमीला हे येत, ते येत वैगरे वैगरे.
मि. पाटील : काय सागंता.
मि. केळकर : मग काय, अहो हे तर काहीच नाही, आमच्या टॉमीला इंग्रजी पण समजते. तुम्ही बोला त्याच्याशी आणी खात्री करा.
मि. पाटील टॉमीला एक बिस्कीट हातात घेवुन : टॉमी टेक.
टॉमी जातो आणी भींतीला जावुन टेकतो.

एकदा धर्मेंद्र बसलेला असतो असाच, जवळ बरीच बिस्किटे असतात. एक कुत्रे येते आणि बकाणा भरून बिस्किटे नेऊ लागते तेवढ्यात धर्मेंद्र काहीतरी बोलतो आणि ते कुत्रे बिचारे सगळी बिस्किटे टाकून एकच बिस्किट नेते.

धर्मेंद्र असा काय बोलला असेल????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कुत्ते....कमी ने!!!!!!!!

टवाळ कार्टा's picture

21 Nov 2013 - 6:25 pm | टवाळ कार्टा

रावणाच्या लंकेला सोन्याची लंका का म्हणतात?
कारण रावणाला त्याच्या लहानपणी सगळे सोन्या म्हणायचे =))

sagarpdy's picture

21 Nov 2013 - 8:04 pm | sagarpdy

:D

जय - गणेश's picture

22 Nov 2013 - 10:12 am | जय - गणेश

रावण दाढी कसा करीत असेल ??

नानबा's picture

22 Nov 2013 - 10:34 am | नानबा

रावण दाढी कसा करीत असेल ??

ते राहीलं... तो रथात कसा बसत असेल?? आणि कधी ड्रायव्हर सीट वर बसायची वेळ आली म्हणजे??

रावणाचा पासपोर्ट साईज फोटो कसा असेल त्याची खुप उत्सुकता आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहात रावण !!! हसून पुरेवाट झाली कल्पना करूनच :D =))

जय - गणेश's picture

22 Nov 2013 - 11:32 am | जय - गणेश

दहा रुम ची एक चाळच बांधली असेल, चाळीच्या बरोबर मध्यभागी एक कमोड बसवला असेल, पण त्याला जेव्हा अजीर्ण होत असेल, आणी संडासला जेव्हा भयंकर असा दर्प येत असेल, तेव्हा तो दहा पैकी कोणत नाक दाबुन धरीत असेल ? - या प्रश्ना मुळे हल्ली मला वामकुक्शी सुध्धा घेता येत नाही.