अख्रेर सचिन रमेश तेंडुलकर याना " भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मानाचा किताब जाहीर झाला आहे. हा सन्मान खरे तर क्रिडापटूना द्यावा का असा प्रथम प्रश्न होता. नंतर त्यात सांघिक खेळातील एखाद्याच खेळाडूला द्यावा की नाही असाही वाद होता. सचिन बरोबरच डॉ. राव यानाही ही हा सन्मान मिळत आहे. आपण दोघांचेही त्रिवार अभिनंदन करू या.
बाकी सचिनच्या बाबतीत एक विशेष गोष्ट अशी की जे खेळ तो खेळत होता तो बारकाव्यांचा ( प्रिसिजनचा) खेळ आहे. १४० किमी ने येणार्या चेंडूला चार इंच रूंदीच्या बॅटने सुमारे ९ इंच रूंदीचा यष्टी पट सुरक्षित ठेवायचा.म्हणजे दरवेळी चार इंचाची वाट चेंडूला मिळण्याची शक्यता जवळ जवळ १०० टक्के. अशा खेळात बुद्धीबळाप्रमाणे विचार करायला वेळच नाही. सिनेमा च्या
शुटींग सारखे वा गाण्याच्या रेकॉर्डिंग सारखे रिटेकची सोय नाही. या साठी नजर व स्नायूंची अगदी झटकन वा संयमित करावी
लागणारी हालचाल याची सतत २५ वर्षे जाणीव ठेवत " फिट" रहाणे यात सचिन चा अलौकिक पणा आहे.
रिकामपणी सुचलेली काही गंमत शीर माहिती खाली देत आहे ज्यात सचिन रमेश तेंडूलकर व ग्रेट अमिताभ हरिवंशराय बच्चन यांच्यातील साम्य व भेद .
१) दोन्ही व्यक्ती आपापल्या क्षेत्रातील बाप माणसे आहेत.
२) सचिन यांचे नाव व आडनाव एस टी ही लागोपाठ अक्षरे तर अमिताभ यांचे ए बी .
३)सचिन यांचे आईचे नावात जे हे अक्षर (रजनी) तर बच्च्नन यांच्या आईचे नावातजी जे ( तेजी)
४)सचिन यांचे वडिलांचे नावात एच व आर ही अक्षरे ( रमेश) तर बच्च्नन यांचे वडिलांचे नावातही तेच ( हरिवंशराय)
५)सचिन यांचे पत्नीचे नावात पुन्हा जे ( अंजली) बच्च्नन यांचे पत्नीचे नावातही जे ( जया)
६) सचिन यांची सासुरवाडी तीन अक्षरी ( मेहता) व बच्च्च्नन यांचे ही तसेच ( भादुरी)
७)सचिन यांचे भावाचे नावात ए जे आय टी तर बच्चन यांचे भावाचे नावाची पहिली चार अक्षरे तीच (अजिताभ)
८)सचिन यांचे मुलाचे नावाचे अद्याक्षर ए ( अर्जुन) तर बच्चन यांचे मुलाचे नावाचे अद्याक्षर पण ए ने सुरू (अभिषेक)
९)सचिन यांचे मुलीचे नाव एस ने सुरू ( सारा) तर बच्च्नन यांच्या मुलीची ही तीच कथा ( श्वेता)
१०) दोघांचेही वडील अध्यापक व कवि.
११)दोघांच्याही माता वर्किग विमेन .
१२) दोघे ही कधी दुखापतीने त्रस्त.
१३) दोघांच्याही करियर मधे काही काळ काळजीचा.
१४) दोघेही काही काळ कोणत्या तरी प्रकारचे खासदार .
१५) दोघेही निर्सर्गतः डावखोरे.
१६)सचिन यानी कसोटी व वन डे गाजविली तर अमिताभनी मोठा व छोटा पडदा.
फरक-
बच्चन यांचा आवाज पुरूषी घनगंभीर सचिनचा बायकी व उथळ.
सचिन बुटके तर बच्च्चन लंबू.
सचिन काहीसे अबोल तर बच्चन बोलंण्यात वाकबगार.
प्रतिक्रिया
16 Nov 2013 - 7:58 pm | यसवायजी
काय ओ काका.. फरक फक्त तीनच? का म्हणुन हा अन्याव?
लिहा की बच्चन मधे ३ अक्षरे, तेंडुलकर मध्ये ५.
सचीन मधे किती, अमिताभ मधे किती?
:)
16 Nov 2013 - 8:01 pm | सुहासदवन
अजून एक
अमिताभच "हाएन"
आणि सचिनच "आई ग"
16 Nov 2013 - 8:04 pm | प्यारे१
>>>दोन्ही व्यक्ती आपापल्या क्षेत्रातील बाप माणसे आहेत.
पुढचं वाच(व)लं नाही.
धन्यवाद.
16 Nov 2013 - 9:10 pm | बाहुली
या लेखाचे नक्की प्रयोजन काय ?? उगाच काहीही !!!!
16 Nov 2013 - 10:57 pm | साळसकर
बिग बी आणि टिंगू टी असे नाव हवे होते लेखाचे, पण साम्य वाचताना जाम हसायला आले.
फरक वाढवता येतील नक्कीच, एक मी जोडतो,
सचिन पेप्सी या शीतपेयाची जाहिरात करतो तर अमिताभ .. ते जोर का झटका धीरे से लगे कोणते??
अवांतर - प्रथमदर्शेनी वाटले अमिताभ बच्चन यांना पण भारतरत्न पुरस्कार घोषित झाला की काय.. ;)
16 Nov 2013 - 11:53 pm | अग्निकोल्हा
आपल्या कल्पकतेला व् निरिक्षण शक्तिला कोटि कोटि सलाम.
17 Nov 2013 - 9:28 am | चिरोटा
साम्य
दोघांचाही लोकसभा मतदार संघ एकच.
फरक
एकजण पूर्व(वांद्रे पूर्व) तर एक जण पश्चिम(विलेपार्ले पश्चिम)
17 Nov 2013 - 9:59 am | चौकटराजा
ही एक जिलबी आहे ही व नाहीही .
17 Nov 2013 - 10:33 am | शैलेन्द्र
जिलेबी नाही म्हणता येणार, कारण पीठ आंबवण्याची मेहनत घेतलीये?
17 Nov 2013 - 12:53 pm | दुश्यन्त
अजुन एक साम्य :
दोघांच्या पिताजींनी दोन लग्नं केली होती आणि हे दोघेही आपापल्या पिताजींच्या द्वितीय पत्नीचे सुपुत्र आहेत!
17 Nov 2013 - 2:27 pm | टवाळ कार्टा
हे माहित नव्हते
17 Nov 2013 - 4:34 pm | दुश्यन्त
नितीन,अजित आणि सविता ही सचिनची सावत्र भावंडे होत(आणि मावस सुद्धा!.रमेश तेंडुलकर यांनी पहिली पत्नी निधन पावल्यानंतर आपल्या मुलांच्या मावशीबरोबरच (रजनी) लग्न केले आणि मग सचिन जन्मला असे मागे वाचले होते.
तेजी बच्चन यांना अमिताभ आणि अजिताभ ही मुले झाली. अमिताभ येॅना सावत्र भावंडे होती किंवा काय हे माहीत नाही.
17 Nov 2013 - 8:27 pm | तिमा
प्रथम अशी तुलना पटली नाही. पण चर्चा चालूच आहे तर एक फरक म्हणजे अमिताभ एका नटीच्या लफड्यात गुंतला होता. पण सचिनचे चारित्र्य वादातीत आहे.
17 Nov 2013 - 8:52 pm | जेपी
आणखीन एक साम्य
दोघेही काँग्रेसमुळे खासदार झाले .
17 Nov 2013 - 9:03 pm | विजुभाऊ
काय कशाचे साम्य आनि कशाचा फरक?
साम्य म्हणायचे तर
दोघांच्या वंशाची नाळ थेट अॅडम आणि ईव्ह पर्यन्त जाते.
दोघेही भारतात जन्मले.
दोघेही पुरुष आहेत.
दोघेही चहा पितात.
दोघेही सकाळी दात घासतात.
भांग पाडतात. (अमिताभ ला हल्ली विग वापरत असल्यामुळे हे शक्य होत नसेल)
दोघे शर्ट प्यान्ट घालतात.
दोघानाही रेखा आवडते.
दोघेही श्वास घेतात, पाणी पितात, भात खातात.
असे कायच्या काय वाट्टेल ते लिहीता येईल......... ( बघा अजून कोणाला सुचताहेत साम्ये)
अवांतरः दोघेही सकाळी ***ला जातात.
.
18 Nov 2013 - 9:11 am | चौकटराजा
विजुभौ ....माझ्या पेक्षाही तुमच्याकडे येळ रिकामा अधिक दिसतोया ! काय निरिक्षण आहे !!!!! वा वा !!!!
दोघांच्याही यशाची नाळ अॅडम इव्ह पेक्षाही दूर म्हणजे बिग बँग पर्यत्न जाते. ( ही ख्या ख्या करीत दुरूस्ती ! )
17 Nov 2013 - 9:04 pm | विद्युत् बालक
दोघेही आख्या भारताला काही कालावधी साठी निष्क्रिय बनवणारे !
18 Nov 2013 - 10:19 am | मी-सौरभ
व्हॉट्स अॅप बाधलेल दिस्तय...
काही दिवस फोन / इंटरनेट संन्यास घ्या. बघा काही फरक पडतोय का??
18 Nov 2013 - 11:08 am | मृत्युन्जय
एक मिनिट. तुम्ही क्रिकेट आणि बुद्धीबळाची जी तुलना केली ती अमान्य आहे. बुद्धीबळाच्या एका पटावर जी लाखो व्हेरियेशन्स होतात ती लक्षात ठेवुन त्याप्रमाणे चाली करणे हे केवळ अशक्य आहे. त्यामुळे त्यासाठी जो जास्त वेळ मिळतो तो योग्यच आहे.
18 Nov 2013 - 1:11 pm | मारकुटे
दोघेही मिसळपाव वाचत नाहीत
18 Nov 2013 - 1:13 pm | उद्दाम
दोघेही मायबोलीदेखील वचत नाहीत.
दोघे नवाकाळ देखील वाचत नसावेत.