प्रेरणा : स्नेहश्रीताईंची सुंदर कविता तर हे अस आहे कॉरपोरेट जग तुमच...!!!!
खरा कुणाचा कोणाला पत्ता नाही
कोण कुठे हे माहीत नाही
आज या नावे तर उद्या त्या नावे
लाईन लागते प्रतिसाद मिळेल तिथे
नसते वाद घेतो मी ओढून
प्रतिसाद नाहीत जातो मी सोडून
कोणाची कोणाला पडलेली नसते
अभासी जगात हे असेच असते
खोटा राग खोटी माया
आणि त्यातच जातय आयुष्य वाया
खोटे निषेध , वाहवा खोटे
यावर झडतात वाद मोठे
कोणाला नाही चिंता श्रधास्थानांची
अजिबात नाही पर्वा थोरांमोठ्यांची
=================
कंदीलसुमार -----------१८-०७-२००८
प्रतिक्रिया
18 Jul 2008 - 7:36 pm | केशवसुमार
अंबोळीशेठ,
:O काय चलंय काय?
एका मागोमाग एक
आणि कंदिलसुमार :O
उत्तम चालू आहे.. चालू द्या..
(आभासी)केशवसुमार
स्वगतः केश्या दुकान बंद करायची वेळ आली रे :SS .. आधी तो रंग्या अता हा कंदिलसुमार @) .. तू अपला कंदिल विकायचा धंदा सुरू कर अता ~X( ..कंदिल लावा आणि कवितेची तिरडी बांधा L) )
18 Jul 2008 - 7:41 pm | विजुभाऊ
खोटा राग खोटी माया
आणि त्यातच जातय आयुष्य वाया
खोटे मान खोटेच अपमान
मोठे होती छोटे न मिळता येथे पान
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
18 Jul 2008 - 7:56 pm | वरदा
आंबोळी मानलं तुला..दोन्ही विडंबनं एकदम पर्फेक्ट्....
स्वगतः ही खोटी वाहवा तर नाही ना वाटणार याला अरे खरच मस्त आहे विडंबन
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
18 Jul 2008 - 8:02 pm | मदनबाण
आंबोळी मस्तच रे... तुलाही विडंबनाचा चस्का लागला तर!!!
मदनबाण.....
18 Jul 2008 - 8:30 pm | टारझन
अवांतर : ट्राफिक का वाढतंय याची कारणे लक्षात येवू लागली आहेत. जिलब्या/भज्या/बुंदी पडाव्यात तशा कविता+प्रतिकविता(याला विडंबन का काय म्हणतात काय ते ...) पडू लागलंय.
ओरिजिनल कविता करण्यापेक्षा विडंबन करणे केंव्हाही सोपे ... आणि ते चांगले आहे म्हणून प्रतिसाद देवून एकमेकांची (पाठ) खाजवने हे त्याहून सोपे
कुबड्या खेचर
(आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. )
नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
18 Jul 2008 - 11:03 pm | बेसनलाडू
तुम्ही बहुतेक गंभीर विडंबनांची (?!?!?!?!) परंपरा चालू करणार. देवा,वाचव रे;पोराला सद्बुद्धी दे ;)
(गंभीर)बेसनलाडू
18 Jul 2008 - 11:26 pm | सर्किट (not verified)
खोटा राग खोटी माया
आणि त्यातच जातय आयुष्य वाया
खोटे निषेध , वाहवा खोटे
यावर झडतात वाद मोठे
सेटल होण्या आधीच पैल्या ओव्हर मध्येच षट्कार ?
मस्त !
- सर्किट
19 Jul 2008 - 8:44 am | विसोबा खेचर
कंदिलराव,
अतिशय सुंदर विडंबन...
जियो...!
तात्या.
19 Jul 2008 - 1:39 pm | स्नेहश्री
मी पण आता विडंबनच लिहीणार........!!!! 8} ओरिजनल कविता बंद.!!!!! :D
मज्जा आली वाचताना...!!!!!! =D>
स्वगतः- आता सगळ्यनी विडंबन लिहीणार अस म्हटल्यावर ओरिजनल कविता कोण लिहीणार????? :SS
म्हणजे आता विडंबनवर विडंबन लिहाव लागणार तर...... 8}
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
19 Jul 2008 - 2:10 pm | बिपिन कार्यकर्ते
आंबोळी भाऊ, काय मस्त लिहिलंय हो... आहे विडंबन पण सत्याच्या खूपच जवळ आहे.
खोटा राग खोटी माया
आणि त्यातच जातय आयुष्य वाया
बिपिन.
24 Jul 2008 - 7:42 am | चतुरंग
आत्ताच वाचलं! मस्त रे कंदिला!
जोर लगाके हैय्या, और आने दो! ;)
चतुरंग
24 Jul 2008 - 8:44 am | भडकमकर मास्तर
चांगलं झालंय रे विडंबन..... :)
नसते वाद घेतो मी ओढून
प्रतिसाद नाहीत जातो मी सोडून
हाहाहाहा
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
24 Jul 2008 - 9:07 am | अनिल हटेला
कन्दील राव !!
जोरात कारखाना चालू आहे!!
येउ दे असाच ब्रॅन्डेड माल येउ देत !!!
( बैल ब्रॅन्ड वाला)
-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~