काही वर्षांपूर्वी राजसाहेब ठाकरे सेनेतून बाहेर पडले .. त्यांनी मराठी आणि विकास हे मुद्दे उचलून धरले. तेव्हा महाराष्ट्राला नवनिर्माणाच्या काही आशा निर्माण झाल्या होत्या. त्याचं प्रतिबिंब मतांमधेही दिसून आलं... पण काही प्रश्न निर्माण होतातच.
राज यांनी बांगलादेशींच्या हिंसाचाराचा निषेध करणारा मोर्चा आझाद मैदानावर नेला त्यावेळी "आता यापुढे आपण हिंदुत्त्ववाचा मुद्दा उचलून धरणार का ? " असं विचारल्यावर त्यांनी हिदुत्त्व झटकून टाकलं. "छे छे हिंदुत्त्व वगैरे मला चिकटवू नका" असं उत्तर होतं. हिंदुत्त्वाचा इतका तिटकारा का असावा ...
राष्ट्रवादी पासून काँग्रेस पर्यंतच्या अनेक नेत्यांवर ते उघडपणे टीका करतात पण आतून सगळ्यांशी सगळीकडे घरोबा करतात. याबाबत सेनेनी टीका केल्यावर म्हणतात "सेनेनी तरी सुरुवातीच्या काळात दुसरं काय केलं ? "
राष्ट्रवादी पासून काँग्रेस पर्यंतच्या अनेक नेत्यांवर ते टीका करतात. अपवाद फक्त - शरद पवार. त्यांचा उल्लेख ते पवारसाहेब असाच करतात.
मधे टोलविरोधी आंदोलन हाती घेतले. ते पुढे का बंद पडले ?
मोदींच्या गुजरातचं त्यांना केवढं कौतुक पण मोदींचे हात बळकट करावेसे मात्र वाटत नाहीत. मागच्या २००९ च्या विधानसभा निवडणूकीत सेना-भाजप युतीचे जवळपास ४४ उमेदवार मतविभागणीमुळे पडले. पुणे लोकसभेचे उदाहरण सर्वांसमोर आहे.
काँग्रेसला भाजपपेक्षा २८००० मते अधिक मिळाली. मनसेने मते मिळवली ७६०००. ही मतविभागणी झाली नसती तर ! बरं याचा फायदा उठवून पुण्यात कोण विजयी झाले ? सुरेश कलमाडी. म्हणजे नेमका फायदा कुणाला होतोय.
विचारावसं वाटतं...
"आता गप्प बसायला काय घ्याल(टोलबद्दल) ? तसं आता निवडणूकीत हरायला काय घ्याल"
त्यामुळे मनसेची नेमकी भूमिका काय ? आणि कुणाचा फायदा करून देणार ? याबाबत उत्सुकता आहे.
प्रतिक्रिया
24 Oct 2016 - 5:54 pm | हृषीकेश पालोदकर
काय राव मनसे ला काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही काय ? "सबको बाटते और मनसे को हि दाटते" अस्स झालंय. करू द्या त्यांना पण थोडा अर्थसंचय.
24 Oct 2016 - 8:18 pm | कैलासवासी सोन्याबापु
आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरताना दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी तुम्हाला मान्य आहे का हृषीकेश भाऊ? शिवाय मनसेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य ह्या मुद्द्याला आवरायला खुद्द मुख्यमंत्र्याला मांडवली करावी लागली हा मुद्दा ग्राह्य धरला जाईल का नाही?? अशी कधी अन किती उदाहरणे झाली आहेत ह्या अगोदर महाराष्ट्रात ??
24 Oct 2016 - 8:27 pm | मोदक
बापू.. कुठे मनसे वर वेळ घालवताय..? नवीन लिहा काहीतरी..
24 Oct 2016 - 9:01 pm | कैलासवासी सोन्याबापु
लिहून पोचतं केलंय दिवाळी अंकाकरता, तुम्हाला आवडेल असाच फॉरमॅट आहे ;) , बस कुछ दिन और, बघा खरडलंय काहीतरी गोड़ मानून घ्याल!, बाकी मनसे महत्वाची नाही पण असल्या भिकार लोकांमुळे माझ्या युद्धक परंपरा असलेल्या महाराष्ट्राचा घाऊक अपमान होतो, हा तोच महाराष्ट्र आहे ज्याच्या आराध्य दैवताचा पुतळा म्हणजे थोरल्या महाराजांचा पुतळा, अरुणाचल प्रदेशात बॉर्डर जवळ बीजिंगच्या दिशेने चीनच्या छाताडात भवानी खुपसत तीनताड उभा आहे , चीन विरुद्धच्या युद्धात मराठा लाईट इनफंट्रीने केलेल्या अतुलनीय कामगिरीची आठवण अरूणाचली लोकांनी लक्षात ठेऊन तिथे पोस्टिंग असलेल्या एका मराठमोळ्या आयएएस अधिकारी प्रशांत लोखंडे सर ह्यांच्या मदतीने लोकवर्गणी अन राज्यपाल फंडातून उस्फुर्त बांधला आहे, त्यांना कोणी खळ्ळफटॅकची धमकी दिली नव्हती रे भावा, आजही तो पुतळा नुसता डोळ्यापुढे आला की अंगाला कापरे भरते, एकदम जाणवते, ह्या सीमेवर मी परीक्षा वगैरे पास होऊन आलो असेलही पण तो आदेश थोरल्या राजांचा आहे मला आलेला, ती इज्जत जपणे परम कर्तव्य आहे माझे, माझ्या सारखे लाखो बापूसाहेब एकीकडे तो शब्द एकीकडे अरे तो देव आहे रे देव , ह्यांनी इकडे मागव्या वाटेल तितक्या खंडण्या रे त्याला फौज प्रेमाचे मुलामे देऊ नयेत, सालं 72 72 तास जागं राहून राखली आहेत ठाणी मी माझी , प्रांताच्या विचारात संकुचित न होता सर्वप्रांतीय जवानांना पोटच्या पोरांप्रमाणे जपले आहे ते का ? असल्या येडझव्या लोकांनी माझ्या प्याऱ्या अन जबाबदार महाराष्ट्राची असली बेइज्जती करायला ? सालं महाराष्ट्राचं रेप्युटेशन म्हणजे भारताचे मसाच्युसेट्स किंवा फिलाडेल्फिया असावे तसे आहे रे, सामाजिक चळवळीत अग्रणी, शिक्षण नवे विचार नवे जग ह्यात एक पाऊल पूढे देशासाठी सर्वाधिक मेहनत करणारा, राडा म्हणजे माझा महाराष्ट्र नाही, जीव तुटतो अन लेखणी मोकाट सुटते ती फक्त तितक्यासाठीच भावड्या, सांभाळा लेको सांभाळा नका खाली पडू देऊ हे वैभव
*भावनावेगात बोललोय, कोणाच्या भावना दुखवल्यास माफी मागतो अगोदरच, पण बाहेर राहून हे ताल पाहणे म्हणजे एक यातना आहे :'(
24 Oct 2016 - 10:33 pm | अर्धवटराव
सलाम बापुसाहेब.
24 Oct 2016 - 10:32 pm | गामा पैलवान
सोन्याबापु,
करण जोहरमुळे महाराष्ट्राची शान वाढलीये का? मनसेच्या नावाने शिमगा का?
आ.न.,
-गा.पै.
वि.सू. : मी मनसे वा राज ठाकऱ्यांचा चाहता नाही
24 Oct 2016 - 10:37 pm | कैलासवासी सोन्याबापु
करण जोहर ने कुठला लिखित कायदा मोडला आहे/ मोडायची धमकी दिली आहे का भारताचा/महाराष्ट्राचा?? त्याने तो तोडू द्या त्याच्याही नावाने ओरडू,
बाकी एक विनंती आहे शब्दसंयोजन थोडे जपून करा, मिपावर आधीच एक अपमान पचवलाय, अजून हलाहल पचवायला मी शिवशंभो नाही, माझ्याही मर्यादा आहेत, त्या ताणून न तपासणे तुमच्या अन माझ्या हिताचेच आहे, बघा विचार करून शांतपणे...
ह्याला धमकी समजलात तरी हरकत नाही!
25 Oct 2016 - 10:19 am | आशु जोग
करणने कायदे मोडले नाहीत
पण
राज ठाकरेनी जी हवा केली
त्याप्रमाणे करायला हवे होते
25 Oct 2016 - 3:05 am | गामा पैलवान
सोन्याबापु,
पहिल्याप्रथम अपमान पचवल्याबद्दल अभिनंदन. असेच सहनशील व्हा. चांगली सवय आहे. तुम्ही माझ्यासारखे होऊ लागलात हे पाहून मला अतीव आनंद झाला आहे. इतर कोणी केलेल्या अपमानांचा खुन्नस तुम्ही माझ्यावर काढंत नाही हे माझं अहोभाग्यच होय. असे भाग्यानंदवृद्धीचे प्रसंग माझ्या आयुष्यात वारंवार येवोत.
असो. आता विषयावर येऊया. शोभा डे या बाईंनीही कुठलेही कायदे मोडले नाहीयेत. मग त्यांच्या नावाने लोकं बोटं का मोडतात? करण जोहरला पाकिस्तानी कलाकार घ्यायचे लांडे कारभार कोणी करायला सांगितले होते? तेव्हा नाही का महाराष्ट्राचा अपमान झाला? पाकिस्तान हा शत्रू आहे हे माहित नव्हतं का?
आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. म्हणूनच आत्महत्या करतांना पकडले न जाण्याची खबरदारी घ्यायची असते. ती घ्यायची नसेल तर आत्महत्येचा विचार सोडून द्यायला पाहिजे. (खुलासा : आत्महत्या म्हणजे पाकी कलाकारांना चित्रपटात घेणे.)
आ.न.,
-गा.पै.
25 Oct 2016 - 11:10 am | माईसाहेब कुरसूंदीकर
तुझ्या त्या ट्वीटर,फेसबूकावर बोटे मोडणे व थिएटरमध्ये येऊन खुर्च्या मोडणे..ह्यात फरक आहे की नाही रे गाम्या?
व्हिसा द्यायचा की नाही हे कोण ठरवते? जुहु-तारा लेनमधे राहणारे लोक की दिल्लीत नॉर्थ-ब्लॉक्मध्ये बसणारे मंत्री व अधिकारी? देश्प्रेमाचे भरते आलेले लोक दिल्लीत जंतरमंतर् वर उपोषणाला का नाही बसत? असा ह्याण्चा सवाल.
25 Oct 2016 - 11:56 am | गामा पैलवान
माईसाहेब कुरसूंदीकर,
१.
काहीही हं माई. थेटरात खुर्च्या कोण मोडतंय? त्यापेक्षा थेटराबाहेरच्या काचा फोडणं अधिक समर्पक नाही का?
२.
करण जोहरने खुशाल जावं की उत्तरेच्या ठोकळ्यात आपलं रडगाणं गायला.
आ.न.,
-गा.पै..