गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ? (मला समजलेले गांधीजी भाग २ )
गांधी विरुद्ध आंबेडकर - नेमके काय घडले ?
*********************************************************************************
संदर्भ स्पष्टीकरण : धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्राची दहावी आवृत्ती संदर्भ म्हणुन वापरली आहे . खैरमोडे लिखित आंबेडकर चरित्रही संदर्भाला घेतले आहे - ( खैरमोडे ३-६७) हा संदर्भ खैरमोडे लिखित चरित्रातील तिसर्या खंडातील ६ ७ वे पान असा वाचावा . बहिष्कृत भारत या पत्रातले बाबासाहेबांचे लेख उद्धृत केले आहेत त्यापुढे वर्तमान पत्राचा दिनांक दिला आहे. द न गोखले यांचे डॉ आंबेडकरांचे अंतरंग हे हि पुस्तक संदर्भ म्हणून वापरले आहे .
*********************************************************************************
गांधी विरुद्ध आंबेडकर हा संघर्ष अटळ होता . एक दलितांचा नेता आणि दुसरा सवर्ण हिंदुंचा पुढारी यात गुलुगुलु गुलाबी ऐक्य शक्य नव्हते . त्याला सामाजिक कारणे जवाबदार होती . हा संघर्ष कधी निर्माण झाला ? कसा निर्माण झाला ? कसा वाढत गेला ? आणि कधी संपला ? हे आपण प्रस्तुत लेखात पहायचे आहे .
आजच्या दलितांनी गांधिंचा द्वेष करण्याचे कारण नाही आणि सवर्णांनी आंबेडकरांचा किंवा आजच्या दलितांचा राग धरू नये .म्हणुन हि धडपड.
वरची वाक्ये हिंदि किंवा इंग्लिश मध्ये लिहिली असती तर ठीक ! पण मर्हाटि माणसाला मुळात गांधी हा सवर्ण हिंदुंचा नेता होता हेच मुळी मान्य नाही ! म्हणुन सुरवात तिथून करावी लागेल . ज्या पक्षाला १३ % एव्हढी जास्तीत जास्त मते मिळाली तो हिंदु महासभा हा हिंदुंचा पक्ष म्हणणे तत्व म्हणुन ठिक आहे . पण लोकशाहीच्या राजकारणात हा एक जोक ठरत असतो . ज्याला लोक मते देतात तो पक्ष त्या समाजाचा असतो . सवर्ण हिंदुंनि फ़ाळणिपुर्वि आणि फ़ाळणिनंतरहि गांधिबाबाच्या कोग्रेसला मते टाकलि होती. तत्कालीन सवर्ण हिंदुंचा पुढारी - लोकनियुक्त पुढारी गांधी होता . गांधीना त्याकाळच्या सवर्ण हिंदुसमाजाचा पुढारी न मानणे हे मध्यमवर्गाच्या वांझ बुद्धीमातेचे गर्विष्ठ अपत्य आहे .असो . हिंदु संघटक गांधीनी हिंदु जाती पातीत फुटू नयेत म्हणुन केलेले प्रयत्न प्रस्तुत लेखात येणारच आहेत
आंबेडकर गांधिंकडे सवर्ण हिंदुंचा नेता म्हणुनच पहात होते . तत्कालीन हिंदुंच्या हृदयावर गांधीच राज्य करत होते. हे सत्य एकदा मान्य केले कि पुढे जाता येईल . आंबेडकरांचा प्रश्न वेगळा होता. दलित समाजातल्या एका घटकाने त्याकाळी त्यांना पुढारी मानले होते . त्या काळाचा विचार आंबेडकरांनि राजकारणात प्रवेश करण्या आधीपासून केला पाहिजे. आणि त्या आधी परिस्थिती, अनुभव, वाचन आणि विचार करून माणुस सतत बदलत जात असतो हे ध्यानात ठेवले पाहिजे .
महाडचा धर्म संगर : फक्त गांधिजिंचि तसबीर
चवदार तळ्यासाठी केलेला सत्याग्रह हि बाबासाहेबांच्या संघर्षातलि पहिली मोठी लढाई . २५ डिसेंबर १९२७ रोजी ह्या लढ्याला आरंभ झाला. ७ - ८ हजार माणसे जमली होती . मंडपात येताना शिवाजी महाराज कि जय ! आणि गांधीजी कि जय ! अशा घोषणा देण्यात येत होत्या . यावेळी मंडपात फक्त एकाच नेत्याची तसबीर विराजमान होती - गांधीजी ! (खैरमोडे ३ - १५९ )
आपल्या तडाखेबंद भाषणात बाबासाहेब म्हणतात -
" चवदार तळ्याचे पाणि प्याल्याने आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही . आजपर्यंत ते प्यायलो नव्हतो तेंव्हा काही मेलो नव्हतो . इथे आम्ही पाणि पिण्यासाठी जमलेलो नाही . आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्यासाठी जमलो आहोत. हि सभा समतेची आहे ...
हिदू समाज समर्थ करायचा असेल तर चातुर्वण्य व असमता यांचे उच्चाटन करून हिंदु समाजाची रचना एकवर्णत्व व समता या दोन पायावर केली पाहिजे. अस्पृश्यता निवारण्याचा मार्ग हा हिंदु समाज समर्थ करण्याच्या मार्गापासून भिन्न नाही. म्हणुन मी म्हणतो - कि आपले कार्य जितके स्वहिताचे आहे , तितकेच राष्ट्र हिताचे आहे . …. हि सभा हिंदु समाजाचे संघटन करण्यासाठी बोलावली आहे. " (बहिष्कृत भारत ३-२ - २ ७ )
या काळात बाबासाहेब गांधी आणि गांधिविचार दोन्हीही मानत असलेले दिसतात. माहाडच्या धर्म संगराला बाबासाहेबांनी सत्याग्रह म्हटले होते . हे हि ध्यानात ठेवले पाहिजे . " सत्याग्रह हि विचारसरणी आम्ही गीतेतून घेतली असून . गीता हा धर्म ग्रंथ म्हणुन आम्हाला मान्य आहे " - बाबासाहेब (बहिष्कृत भारत - २५ - ११ - २ ७ ). याच परिषदेत बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली .
१९ २ ७ सालीच बाबासाहेबांनी दादरच्या गणेशोत्सवात भाषण केले होते . आणि विरोधकांच्या बंदोबस्तासाठि खिशात पिस्तुल बाळगले होते! (खैरमोडे २ - १ ४ ९ )
हिंदु राहून समता प्राप्त करणे आणि त्यासाठी लढा देणे हे आंबेडकरांचे धोरण १९ २ ७ साल पर्यंत स्पष्ट दिसते आणि हिंदु पुढारी - गांधी हे आपले विरोधक आहेत असे आंबेडकरांना त्याकाळी वाटत नव्हते हे हि स्पष्ट होते .
हिंदु समाज समर्थ आणि संघटित करण्याची मनीषा आंबेडकरांनि या काळात अनेकदा बोलून दाखवली आहे.
काळाराम ते सायमन : ठिणगी पेटली
काळा राम मंदिर प्रवेशासाठी अस्प्रुश्यांचा संघर्ष चालू होता. त्यावेळी आंबेडकरांनि गांधिंना सवाल केला होता - " मंदिर प्रवेशाचा प्रश्न मिटल्या नंतर जेंव्हा अस्पृश्य लोक जातीच्या आणि चातुर्वणाच्या उच्चाटनाचा प्रश्न हाती घेतील . तेंव्हा महात्माजी कोणाच्या बाजूने उभे राहतील ? "
हा सवाल फक्त गांधीना नव्हता. पुर्या हिंदु समाजाला होता.
गांधीजी उत्तरले - " मी मानत असलेल्या हिंदु धर्मात उच्च नीचता नाही पण डॉ आंबेडकरांना वर्णाश्रमाशि झगडा करायचा असल्याने मी त्यांच्या पक्षाला राहू इच्छित नाही. कारण वर्णाश्रम हा हिंदु धर्माचा अभिन्न भाग आहे, अशी माझी श्रद्धा आहे . " (कीर - २ ३ ९ )
गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष इथून सुरु होतो.
(सनातनी हिंदु धर्माला डांबर फासत आहेत . गांधीजी ते कष्टाने पुसू पाहत आहेत आणि आंबेडकर त्याचा पाया असलेल्या वर्ण व्यवस्थेवर हातोड्याने घाव घालत आहेत. ब्रिटीश लांबून मजा बघत आहेत- तत्कालीन व्यंगचित्र )
सायमन आयोग :
हा आयोग भारताला कोणत्या बाबतीत स्वायतत्ता द्यावी याचा विचार करण्यासाठी होता . बहुतेक सर्व राजकीय पक्षांनि त्याला अनेक मर्यादा आहेत म्हणुन विरोध केला . बहिष्कार घातला . आंबेडकरांनि मात्र सायमन आयोगाला सहकार्य केले आणि त्याला एक लांबलचक निवेदन नेउन दिले . का ? हा आंबेडकरांचा स्वातंत्र्याच्या चळवळीशी द्रोह होता का ? काय होते त्या निवेदनात ? या प्रश्नांचि उत्तरे पहाण्या आधी एका घटनेची नोंद केली पाहिजे .
सायमन गो ब्याक ! म्हणत आंदोलन करताना लाला लजपत राय यांच्या छातीवर ब्रिटिश पोलिसी दंडुके बसले. त्याबद्दल ७ डिसेंबर १ ९ २ ८ च्या बहिष्कृत भारत च्या अग्रलेखात श्रद्धांजली वाहताना बाबासाहेब म्हणतात - " लाला लजपत राय यांनी राजकारण आणि समाजकारण यात फारकत करून आपल्या पंगुपणाचे प्रदर्शन कधीच केले नाही .त्याकाळी लालाजिंचा आर्य समाज मुस्लिमांच्या आक्रमणापेक्षा जातीभेदादि हिंदु समाजाच्या अंतर्गत दोषांकडे अधिक लक्ष पुरवत असे . अस्पृश्यांच्या चळवळीबद्दल लालाजिंचि सहानुभूती कळकळीची होती "
१ ९ २ ७ ते ३ ० या काळात बाबासाहेबांच्या विचारात बदल घडू लागलेला दिसतो . त्यांना अजून हिदू समाजाकडून आशा आहे पण गांधिविरुद्ध मत बनू लागले आहे . ठिणगी पेटली आहे .
*********************************************************************************
विभक्त मतदार संघ म्हणजे काय ?
भारातात सध्या जी लोकशाही आहे त्यात संयुक्त भौगोलिक मतदार संघ आहेत . काही जागा मागास उमेदवारांना राखीव आहेत . पण प्रत्येक उमेदवारासाठी सर्व जाती धर्माचे लोक मत देतात . त्यामुळे निवडणुकीतल्या उमेदवाराला सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते.
विभक्त मतदार संघ म्हणजे काही जातीना वेगळे मतदार संघ . आजच्या पदवीधर मतदार संघात ज्याप्रमाणे पदवीधर उमेद्वरांसाठि केवळ पदवीधर च मतदान करतात त्याप्रमाणे - दलित उमेदवारासाठी केवळ दलितांनी मतदान करणे म्हणजे - विभक्त मतदार संघ.
*********************************************************************************
ब्रिटिशांना दिलेल्या सायमन कमिशनच्या निवेदनात बाबासाहेब लिहितात -
" १ ) आज अस्पृश्य समाजाच्या समस्या वेगळ्या असल्याने ते हिंदु समाजापासून वेगळे आहेत
२) मात्र अस्पृश्यांसाठी मागितलेल्या मागितलेल्या सवलती तात्पुरत्या आहेत . सर्व भारत शेवटी एका व्हावा . " (गोखले १ १ ८ )
या काळात आंबेडकरांनि विभक्त मतदार संघाला कडाडून विरोध केलेला आहे. आणि राखीव जागा मागितलेल्या आहेत .
निवेदनात बाबासाहेब म्हणतात - विभक्त मतदार संघ हे लोकशाहीच्या मुळावरच घाव घालतात. विभक्त मतदार संघात निवडुन गेलेले उमेदवार सभागृहात सर्वांसाठीच कायदे करतात . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांबद्दल कायदे करण्याचा हक्क विभक्त मतदार संघातल्या उमेदवारांना मिळतो . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांवर राज्य करणे हि कुठली लोकशाही ? ( Dr Ambedkar Writings and Speeches. Vol 2 pg 344 - 366, 1982)
ह्या निवेदनात बाबासाहेबांचा लोकशाहीवाद आणि राष्ट्रवाद अनेकवार व्यक्त झाला आहे . पण सायमन शी सहकार्य केले म्हणुन त्याकाळी बाबासाहेब देशद्रोही असल्याची चुकीची टिका कोंग्रेसि वर्तमान पत्रांनी केली होती .
गोलमेज परिषद : वणवा पेटला
सायमन आयोगापुढे ३७ दलित संघटना गेल्या होत्या. त्यापैकी ३५ संघटनांनि विभक्त मतदार संघांचि मागणी केली होती . आंबेडकरांनि आपले वैयक्तिक मत बाजूला ठेवत पुढे लोकमताला मान दिला . (खैरमोडे ४ - १ ४ १ . १ ४ २ ) आणि गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी दलितांना विभक्त मतदार संघ मागितले . लोकमताच्या रेट्यात बाबासाहेबांनी बदललेला हा निर्णय आहे .
इथे एक लक्षात ठेवले पाहिजे कि आंबेडकर हे केवळ विचारवंत नाहीत ते एक राजकारणीही आहेत . जे बाबासाहेबांबद्दल खरे आहे ते गांधीबाबा बद्दल हि खरे आहे.
*********************************************************************************
प्रौढ सार्वत्रिक मताधिकार म्हणजे काय ?
ब्रिटिश राजवटीत हि निवडणुका होतच होत्या पण मतदानाचा अधिकार सर्वांना नव्हता. ठराविक जमीन ठराविक शिक्षण असलेलेच लोक मतदान करू शकत . या गाळण्यांमूळे बहुसंख्य दलितांना मतदानाचा हक्क मिळत नव्हता आणि त्यामुळे राखीव जागांवरुन निवडुन जाणारे दलित उमेदवारही सवर्णांचे चमचे असत.
प्रौढ मताधिकार म्हणजे १८ / २१ वर्षे वयाच्या सर्व भारतियांना मतदानाचा अधिकार असणे . प्रौढ माताधीकारात सर्व दलितांनाहि मतदानाचा हक्क मिळतो आणि अस्पृश्य हिताबद्दल जागरूक असणारे उमेदवार निवडुन जाणे सोपे होते , असे आंबेडकरांचे मत होते .
*********************************************************************************
स्वत:चे विभक्त मतदार संघाबद्दलचे प्रतिकूल मत राजकारणी आंबेडकरांनि बदलले . गांधिंमधल्या अट्टल राजकारणी पुरुषा बद्दल तर कोणालाच शंका नाही ! राजकारणात स्वत:च्या लोकांचा अनुनय करावा लागतो . हा लोकशाहीचा साइड इफ़ेक्ट आहे !
गांधीनी सवर्णांच्या भावना बोलून दाखवत दलितांच्या विभक्त मतदार संघाला विरोध केला असे काहिंना वाटते. प्रौढ मतदानाचे नाव सुद्धा नसताना केवळ उच्चशिक्षिताना मतदानाचा अधिकार असताना - आंबेडकरांची नवी मागणी चुकीची होती असे म्हणता येणार नाही. पण जर दलितांना विभक्त मतदार संघ दिले तर उद्या सर्वच जाती स्वत:चे वेगळे मतदार संघ मागतील -प्रत्येक जात स्वत:चे उमेदवार निवडुन देऊ लागली तर - उमेदवारांना सर्वसमावेशक भूमिका घेण्याची काहीच गरज उरत नाही त्यामुळे जातीवादी उमेदवारच निवडुन येतील आणि ते देशाचे तुकडे पाडतील हि गांधिजिंचि भीती हि अनाठाई नव्हती.
गांधी विरुद्ध आंबेडकर संघर्ष पेटु लागला आणि त्यातच उभयतांचि भेट ठरली.
वादळी भेट आणि जळते उद्गार
इथे एका विनोदी गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे . हि भेट संपेस्तवर आंबेडकर हे अस्पृश्य समाजातले आहेत हेच गांधीना माहित नव्हते. (कीर १८०) गांधीजी आंबेडकरांना पुण्याचे पुरोगामी ब्राह्मण समजत असत ! आंबेडकरांच्या शैक्षणिक डिग्र्यांकडे पाहून गांधिंनि हा ग्रह करून घेतला होता कि आंबेडकर या ब्राह्मण आडनावामुळे गांधिंचा तसा ग्रह झाला होता ते सांगता येत नाही . ( आं - बा -व -डे -क - र हे मुळ नाव बदलून त्यांच्या एका प्रेमळ ब्राह्मण गुरुजीने आंबेडकर असे स्वत:चे नाव दफ्तरी लावले होते. आंबेडकरांनि तेच पुढे कायम ठेवले)
पण गांधिंचा समज आंबेडकर हे एक पुरोगामी ब्राह्मण गृहस्थ आहेत असा होता! आणि पुरोगामी ब्राह्मण हा प्राणि राजकारणात फारशी किंमत द्यायच्या लायकीचा नसतो ! कदाचित यामुळेच या भेटीत गांधिंच्या अजब पुर्वग्रहामुळे मोठे नुकसान झाले असे मानायला जागा आहे ! आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांनी गांधी भानावर आले आणि ते अस्पृश्य समाजातले आहेत काय ? अशी सहकार्यांकडे विचारणा केली .
कादाचित हा - पुरोगामी ब्राह्मण कशापाई नसती उठाठेव करतो आहे ? कशासाठी स्वतंत्र मतदारसंघाच्या लष्कराच्या भाकरी भाजतो आहे ? अशा भावनेतून गांधीनी भेटीची सुरवातच थोडी कडक केली. आंबेडकरांचि पार्श्वभूमी माहित नसल्याने - कोणत्या परीस्थित आणि दबावात हा निर्णय घेतला हे गांधिंना कळलेले नसणार . सुरवातीला त्यांनी आंबेडकरांकडे चक्क दुर्लक्ष केले आणि दुसर्याच कोणाशीतरी सुत कताइबद्दल बोलू लागले. थोड्या वेळाने गांधी म्हणाले " आंबेडकर तुमचा जन्म व्हायच्या आधीपासून मी अस्पृश्यांसाठी काम करतो आहे . (तेंव्हा मला शहाणपणा शिकवू नये ! ) कोग्रेसने अस्पृश्यांसाठी विस लाख रुपये खर्च केलेले आहेत.
अशाप्रकारच्या बोलण्याने आंबेडकर चांगलेच व्यथित झाले असणार. त्यांनी चिडून गांधिंना खडे बोल सुनावले शेवटी म्हणाले " ज्या देशात आमच्या समाजाला कुत्र्यापेक्षा वाइट वागणुक मिळते त्या देशाला मी मायभूमी म्हणु शकत नाही , गांधीजी मी पुन्हा सांगतो - मला मायभूमी नाही !"
या वादळी भेटीमुळे - गांधिंच्या दुर्लक्ष करण्यामुळे आणि आंबेडकरांच्या जळत्या उद्गारांमुळे या दोनही महान नेत्यात तयार झालेला व्यक्तिगत दुरावा बराच काळ टिकला.
पुणे करार : कौन जिता … कौन हारा
आंबेडकरांनि विभक्त मतदार संघांचि मागणी सोडुन द्यावी म्हणुन गांधिजिंनि उपोषण सुरु केले. ज्याच्या मागे जवळजवळ सारा सवर्ण समाज आहे त्याचा मृत्यू झाला तर गावोगावच्या अस्पृश्यांना काय झेलावे लागले असते ? आंबेडकरांसमोर पुणे करारावर सही करण्याशिवाय कोणता पर्याय होता ?
ताणलेले दोर
पण त्या आधी एका भानगडिचा वेध घेणे आवश्यक आहे. ती भानगड म्हणजे राजा - मुंजे करार होय . एम सी राजा हे एक अस्पृश्य पुढारी होते . राजा आणि त्याच्या सारख्या इतर अस्पृश्य पुढार्यांच्या दबावामुळेच आंबेडकरांना आपली मुळातली सायमन कमिशन समोरची भूमिका बदलत विभक्त मतदार संघाना पाठिंबा द्यावा लागला होता . हेच राजा आता गटबाजीचे राजकारण खेळले . आणि स्वत:चे महत्व वाढवण्यासाठी त्यांनी डॉ मुंजे या हिंदु महासभेच्या पुढार्याबरोबर एक करार केला. या करानुसार अस्पृश्यांना विभक्त मतदार संघ नको . वाढीव राखीव जागा हव्या अशी मागणी केली !
आता आंबेडकरांसमोर मोठा पेचप्रसंग होता . महाराष्ट्रातल्या महार समाजाचा पुर्ण पाठिंबा आणि मराठि दलीतात बर्यापैकी वजन या आंबेडकरांच्या जमेच्या बाजू असल्या तरी अखिल भारतीय पातळीवर त्या क्षणापर्यंत तरी आबेडकर हे सर्व दलितांचे एकमुखी नेते नव्हते . अखिल भारतीय पातळीवर दलितांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना राजा सारख्या अंतर्गत गटबाजांबरोबर हि राजकाराण भोगावे लागत होते . पंचाइत अशी कि राजा मुंजे करार मान्य केला तर आंबेडकरांनि राजाचे नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर मान्य केलेले आहे आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व अधिकार राजा कडे आहेत असा सरळ अर्थ निघत होता . राजा आणि मुंजेंचि तीच राजकीय चाल होती . आता आबेडकरांना चटकन विभक्त मतदार संघाची मागणी सोडणे अशक्य झाले . राजा सारख्या गटबाज व्यक्ती च्या हाती राष्ट्रीय दलित चळवळीची सूत्रे देण्याचा गलथान पणा आंबेडकर करणे शक्य नव्हते.
त्यामुळे आंबेडकरांनिहि विभक्त मतदार संघाचा मुद्दा ताणून धरला आणि गांधिंना प्राणांतिक उपोषण करण्या पर्यंत परिस्थिती ताणावी लागली.
तुटलेले बंध
परिस्थिती विकोपाला जाऊ लागली . गांधिजिंना कोणत्याहि परीस्थित जातीय तत्वावर विभक्त मतदार संघ नको होते . आणि आंबेडकर एका विचित्र राजकीय परिस्थितीमुळे झटकन निर्णय फिरवू शकत नव्हते. गांधिंचि तब्येत खालावू लागली . परिस्थिती स्फोटक बनू लागली. गांधिंचा मृत्यू ओढवला असता तर गावोगाव सवर्ण दलित दंगली पेटल्या असत्या . बाबासाहेबांसारख्या लोकशाहीवादी नेत्याला दंगली होणे कदापि मंजुर नव्हते त्यामुळे त्यांनी पुणे करारावर सही केली .
व्यथित होऊन आंबेडकर म्हणाले होते " हे कोंग्रेस वाले माझे राजकीय जीवन संपुष्टात आणतील आणि मग तेच दलितांचे पुढारी होतील " ( खैरमोडे ५ - ३१ )
पुणे करारावर सही - हा आंबेडकरांचा राजकीय पराभव होता काय ? त्यांच्या सहकार्यांना तेंव्हा तसेच वाटले आजही आंबेडकर वाद्यांच्या हृदयातली ती एक भळभळति जखम आहे . त्यामुळे मने तुटली आहेत . पण सत्य काय आहे ?
अंतिम विजय कोणाचा ?
पुणे करारामुळे विभक्त मतदार संघ रद्द झाले आणि संयुक्त मतदार संघ आले असा बर्याच लोकांचा भ्रम असतो . ते खरे नाही . पुणे करारा मुळे संयुक्त आणि विभक्त मतदार संघाचे एक आगळेच फ्युजन जन्माला आले . त्यानुसार -
१) दोन स्तरीय निवडणुक पद्धती आली . अस्पृश्यांनी स्वत:चे चार उमेदवार निवडायचे (विभक्तपणे) आणि त्यानंतर सर्व जाती धर्माच्या लोकांनी या चारपैकी एक उमेदवार (संयुक्तपणे ) निवडायचा. या कलमामुळे सवर्णांचे चमचे निवडुन जाण्याचा धोका आंबेडकरांनि टाळला. आणि खरे पाहता आंबेडकरांचा मुलभुत विचार गांधिंनि मान्य केला.
२) या करानुसार अस्पृश्यांना १ ८ टक्के राखीव जागा मिळाल्या . (त्या पूर्वीच्या मेकडोनल्ड निवाड्यापेक्षा खूपच जास्त होत्या )
३) अस्पृश्यांच्या शिक्षणासाठि वेगळी काढुन ठेवायची रक्कम ठरली यातही आंबेडकरांनि ठरवलेला आकडा ग्राह्य धरण्यात आला .
डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच दलितांचे एकमेव राष्ट्रीय नेते आहेत आणि दलितांच्या वतीने करार मदार करण्याचे सर्व हक्क एकट्या आंबेडकरांना आहेत हि गोष्ट सिद्ध झाली . पुणे करारा नंतर आंबेडकर हे एकमेव राष्ट्रीय दलित नेते असून एम सी राजा सारखे लोक केवळ उपट्सुंभ आहेत हे सिद्ध झाले.
पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर सार्वत्रिक प्रौढ मतदानाचा हक्क दलितांसकट सर्वांना मिळाला . शीक्षण , जमीन इत्यादी चाळण्या गेल्या . त्यामुळे घटना परिषदेचे सदस्य असलेल्या आंबेडकरांनि स्वतंत्र भारतात एकदाही विभक्त मतदार संघ मागितले नाही . प्रौढ सार्वत्रिक मतदान आल्याने विभक्त कि संयुक्त हा मुद्दाच उरला नाही .
गांधिंना जे साध्य करायचे होते ते हि घडलेच - द्विस्तरीय गुंतागुंतीची निवडणुक प्रक्रिया झाल्याने इतर जाती विभक्त मतदार संघ मागाण्याचा धोका टळला . कारण इतकी गुंता गुंतिचि प्रक्रिया सर्व जातींसाठी लागू करणे अशक्यच होते . त्यातून जातीय फायद्याची गणिते बांधणेहि दुरापास्त होते .
थोडक्यात पुणे करार बरोबरीत सुटला किंवा थोड्या प्रमाणात आंबेडकरांच्याच बाजूला झुकला असे म्हणावे लागते. स्वातंत्र्यानंतर तर तो प्रश्न पुर्णपणेच आउट डेट बनलेला आहे . कारण सार्वत्रिक प्रौढ मतदान !
सम्यक पणे विचार बदलणारा - झपाटलेला अभ्यासक : डॉ आंबेडकर
बाबासाहेब आंबेडकर हे एक अभ्यासू आणि विद्वान गृहस्थ होते . राजकारण - समाजकारण - धर्म कारण याबद्दल ते सतत अभ्यास करत आणि नव्या अभ्यासानुसार - मते बदलत असत . उदाहरण घायचे झाले तर भगवत गीता या हिंदु धर्म ग्रंथाबद्दल लिहिता येईल .
१) १९ २ ७ सालच्या महाडच्या संगरात त्यांनी मनुस्मृती जाळली पण गीता हा धर्मग्रंथ स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन्ही लोकांना मान्य आहे असे ते त्याकाळी म्हणत असत .
२) पुढे धर्मांतराच्या घोषणे नंतर गिता हा पुर्णपणे मूर्खपणे आणि बाष्कळ पणे लिहिलेला ग्रंथ आहे असे ते म्हणत .
३) धर्मांतरानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बाबासाहेब म्हणाले - गीतेत ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या बुद्ध धर्मातून उसन्या घेतल्या आहेत . (म्हणजे गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत !)
एकाच ग्रंथाबद्दल व्यक्त केलेली हि मते आहेत . प्रा शेषराव मोरे यांनी त्यांच्या आंबेडकरांवरिल ग्रंथात राजकारण , समाजकारण , इतिहास मिमांसा या सर्वच बाबतीतल्या बदलत जाणार्या मतांचा आढावा घेतला आहे .
अभ्यासक नवीन माहितीनुसार मते बदलत जातोच . पण आंबेडकरांचे सामाजिक धोरणही त्यांची धर्म मिमांसा आणि इतिहास मिमांसा बदलते. जोपर्यंत हिंदु राहून समता आणता येईल असे त्यांना वाटत होते तोपर्यंत ते गीतेला पुज्य मानत होते. हा हिंदु समाजावरचा विश्वास उडाल्यावर ते गीतेला मुर्ख ग्रंथ म्हणु लागले . पुढे घटना परिषदेत दाखल झाल्यावर ....जेंव्हा त्यांना हिंदु कोड बिल पास करून हिंदु स्त्रियांचे भले करायचे होते तेंव्हा........ ते बिल पास करायला त्यांना सवर्ण हिंदुंचा पाठिंबा हवा होता....... आणि त्यावेळी त्यांनी गीतेत काही चांगल्या गोष्टी आहेत पण ........त्या बुद्धाकडुन उधार घेतलेल्या आहेत असे मत व्यक्त केले .
समता आणणे आणि लोकशाही रुजवणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय होते . त्यासाठी त्यांनी धर्म मिमांसा आणि इतिहास मीमांसा लिहिली , त्यात वेळोवेळी बदल केले , कारण त्यांना इतिहास केवळ लिहायचा नव्हता तर घडवायचाहि होता .
स्वत:ची मते बदलण्याचे स्वातंत्र्य जर आंबेडकरांना आहे तर गांधिंना का नाही ?
परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी
परिस्थितीशी जुळवण्यासाठी विचार बदलत जाणारा देशभक्त राजकारणी : मोहनदास गांधी
गांधीजी हे आंबेडकरांप्रमाणे विद्वान , अभ्यासक किंवा संशोधक निश्चितच नव्हते . पण त्यांना उभ्या देशाबद्दल कळकळ प्रेम आणि जिव्हाळा होता . दलितांचे भले करणे हा गांधिंसमोरचा एकमेव कार्यक्रम कधीच नव्हता पण उच्च निचतेला आणि मुख्यत: अस्पृश्यतेला त्यांचा विरोध पहिल्या पासून होता . त्याला गांधिंनि कमी महत्व दिल- हा आरोप खोटा म्हणता येणार नाही . पण गांधी म्हणजे अस्पृश्यांच्या जिवावर उठलेला सैतान निश्चितच नव्हे.
गांधीही स्वत:ची मते अगणित वेळा बदलत आलेले आहेत . मी हिमालया एव्हढ्या चुका केल्या आहेत असे गांधिंनि अनेकदा म्हटले आहे .
कधीकाळचा चातुर्वणाचा समर्थक गांधी । यापुढे मी फक्त आंतरजातीय विवाहांनाच हजार राहीन अशी अट ठेवतो .। आणि राउंड टेबलाची नीती पुढे घटनाकारांना सन्मान देण्यापर्यंतही बदलते । बाकी गांधिंचि मते बदलत गेली आणि बाबासाहेब कायदामंत्रि (पहिल्या) मंत्रिमंडळात होण्यामागे गांधी होते । पहिल्या घटनेपरिषदेवर बाबासाहेब लीग च्या पाठिंब्यावर गेले होते । ती परिषद पुढे रद्द झाली आणि फ़ाळणिनंतर जी नवी घटनापरिषद आली त्यावर बाबासाहेब जाताना गांधिंनि पाठिंबाच दिला होता . कोग्रेसच्या पाठिंब्या शिवाय घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होणे शक्य नव्हते … आणि आंबेडकरांसरखा विद्वान कायदा पंडित हातचा घालवायला गांधिजिहि मूर्ख नव्हते .
सुरवातीला गांधी सनातनी आणि चातुर्वणाचे समर्थक आहेत असा अर्थ निघू शकेल अशी पुष्कळ वचने गांधिंच्याच साहित्यातून काढुन दाखवता येतील . पुढे मात्र . गांधिंनि त्यांचे विचार बदलले आणि हिंदु धर्माच्या सर्व स्मृतींचे आणि धर्म ग्रंथांचे पुनर्लेखन करावे आणि स्त्रिया आणि शुद्र यांवर अन्याय करणारा भाग त्यातून काढुन टाकावा असे स्पष्ट मत गांधिंनि व्यक्त केले . ( म. गांधी आणि समाजसुधारणा - आकलन . नरहर कुरुंदकर)
हिंदु राहून समता प्राप्त करण्याचा हा विचार आहे . हा विचार १ ९ २ ७ सालच्या आंबेडकरांच्या विचारासारखाच आहे.
गांधीच्या अर्धनग्न धार्मिक फ़किरिपेक्षा आंबेडकरांचे सुटा बुटात राहणे आणि त्यांचा आधुनिक विचार मला अधिक भावतो पण ....
सुस्पष्ट , लोजिकल , तर्कशुद्ध विचार करणारा माणुस उभ्या भारताचा नेता बनणे अशक्यच होते. या देशाची विविधता समस्यांची गुंतागुंत व आकांक्षांचा अनेकपदरिपणा जितका संकिर्ण (Complex ) होता तितकेच गांधिंचे व्यक्तिमत्व हि संकिर्ण होते.
भारतासारख्या अनेकपदरी देशात राजकारण करायचे झाले तर मायावतिलाहि शेवटी सर्वजन हिताय अशी घोषणा द्यावी लागते हे विसरून चालणार नाही . गांधीना सर्वोदय हवा होता . पण अंत्योदय हे त्याचे सूत्र होते . सर्वांच्याच डोळ्यातले अश्रू पुसण्याची गांधिंचि महत्वकांक्षा आहे . पण अंत्यजाच्या डोळ्यातले अश्रू पुसणे हि त्याची पहिली पायरी आहे . गांधी हे मुख्यत: राजकीय नेते आहेत पण त्यांनी समाजकारण झटकून टाकलेले नाही . त्यांची धर्माची परिभाषा , हरिजन वगैरे संकल्पना माझ्यासारख्या नास्तिकाला पचणार्या नाहीत पण गांधिंचा उदारमत वाद भारताला थोड्या बहुत प्रमाणात का होईना जोडू शकला हे नाकारता येत नाही .
समारोप
घटनेचा साचा बनवून बाबासाहेबांनी ह्या देशाचा मनु पालटला . गांधिच्या पाठिंब्या शिवाय हे शक्य नव्हते . देशाचे भविष्य कसे चालावे याचा ढाचा आंबेडकर तयार करतात आणि त्यांच्या नियुक्तीला गांधिंचा पाठिंबा असतो . तेंव्हा मुख्य वाद मिटलेला असतो. हा देश सनातनी विचारांनी चालणार नाही … आधुनिक राज्यघटनेनुसार चालेल अशी ग्वाही मिळालेली असते . . बाकी थोडेबहुत मतभेद सगळ्याच माणसात असणार आणि ते नैसर्गीकही आहे .
गांधी आंबेडकर मुख्य वाद आणि संघर्ष इथे संपतो .
तरीही या दोन महान भारतीय नेत्यांत कधीही मनोमिलन झाले नाही हि भारतीय राजकारणाची शोकांतिका आहे .
गांधी सवर्ण हिंदुचे नेते होते पण अस्पृश्यांचे दुश्मन नाही . आंबेडकर दलित समाजाचे नेतृत्व करत असले तरी त्यांचे घटना परिषदेतील काम , हिंदु कोड बिल , कायदा मंत्रि म्हणुन केलेले काम हे सर्व देशासाठी होते . एक अर्थशास्त्री म्हणुन आंबेडकरांचा रिझर्व बेंक ऑफ इंडिया च्या पायाभरणीत मोठा वाटा आहे . हे काम सर्वच देशासाठी आहे . त्या अर्थाने आंबेडकर हे राष्ट्रीय नेते आहेत .
स्पृश्य - अस्प्रुश्यांचा संघर्ष जटिल होता . अस्पृश्यांची अस्मिता जागी करणे - अन्याया विरुद्ध लढणे - स्वत:चे न्याय्य हक्क मागणे आवश्यक होते. हे काम आंबेडकरांनी केले . त्याचवेळी अस्पृश्यांना त्यांचे हक्क देऊन टाकण्यासाठी सवर्णांचि मानसिकता तयार करणे आवश्यक होते . गांधिंनि तेच काम टप्प्या टप्प्याने केले . हे कामही अतिशय अवघड होते आणि आवश्यकही होते .
त्या दोघात एकमत दुर्दैवाने झाले नाही म्हणुन आजही तो भांडण वारसा चालू ठेवणे वेडेपणाचे आहे .
प्रतिक्रिया
14 Oct 2013 - 12:49 am | राजघराणं
मला समजलेले गांधीजी (भाग - १ ) - गांधीहत्या आणि मी
http://misalpav.com/node/23802
14 Oct 2013 - 1:21 am | आशु जोग
एवढं सगळं आम्हाला वाचून समजणे अवघड आहे. त्यापेक्षा भाषण का देत नाही या विषयावर आम्ही ऐकू ...
14 Oct 2013 - 4:47 am | अर्धवटराव
पण तत्कालीन आणि सद्यःकाकीन समाज परिस्थिती राजकारणाला कसं वळण देते याचा उहापोह करत राहणं आवश्यक आहे. या पठडीतले तुमचे लेख म्हणुनच वाचनीय, मननीय असतात.
हिंदु धर्माच्या दुरावस्थेला सवर्ण समाज जबाबदार आहे हे सत्य आहेच. अखील मानवीय कल्याणाची क्षमता असलेला हा धर्म वर्ण दुराभिनाच्या जोखडातुन मुक्त होईल तो सुदीन... आणि तो दिन लवकर येवो... पुढील आव्हाने फार बिकट आणि भयावह आहेत.
14 Oct 2013 - 2:34 pm | मुक्त विहारि
+१
14 Oct 2013 - 10:53 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
14 Oct 2013 - 6:44 am | ग्रेटथिन्कर
छान लेख.
हिंदू महासभा सावरकरादी फॅसिस्ट लोक भारतात पुन्हा चार्तुवर्ण आणू पाहत होते... याविरोधात बाबासाहेब, गांधिजीनी प्रबोधनाच्या माध्यमांतून चांगले काम करत या धर्मांध लोकांना अलगद बाजूला काढले.
गांधी आणि आंबेडकर दोघेही आधुनिक बुद्धच होते, ज्यांनी मानवतेला मोठे करण्याचे काम केले.
14 Oct 2013 - 8:16 am | अर्धवटराव
पण जेंव्हा एखादी चांगली चर्चा सुरु असेल आणि आपल्याला त्यात मुल्यवर्धन करता येत नसेल तर किमान तिथे हागुन तरी ठेऊ नये.
14 Oct 2013 - 2:44 pm | ग्रेटथिन्कर
याप्रतिसादाने आपण चर्चेचे काय मुल्यवर्धन केले ते पण लिवा :-P
14 Oct 2013 - 3:50 pm | धन्या
यासाठी संदर्भ देऊ शकाल का?
सावरकरांसारख्या विज्ञानवादी आणि सुधारणावादी व्यक्तीला "पुन्हा चातुर्वर्ण आणू पाहणारा फॅसिस्ट" म्हणणं जरा अती वाटतंय.
14 Oct 2013 - 3:10 pm | इष्टुर फाकडा
मनातलं बोललात :)
15 Oct 2013 - 10:25 pm | आबा
या निमित्ताने, बाकी सर्व महापुरुषांच्या मागे उभी असते तशी एक ब्रिगेड गांधीजींच्याही मागे उभी राहिली हे ही नसे थोडके.
आता हे विधान आशिष नंदी छाप वाटू शकेल, पण त्याला उपाय नाही (अरूण जोशी, ऐकताय ना? :) )
16 Oct 2013 - 2:13 pm | arunjoshi123
आपले नाव ऐकले नाही, पण वेगळ्या स्थानी, वेगळ्या काळी नंदींनी केलेल्या ध्वनींचे पडसाद कोठवर पडताहेत ते पाहून चाट पडलो आहे. आता आपली प्रतिभा वापरून नंदीच्याबद्दलच एक नंदीवाक्य करून टाका.
14 Oct 2013 - 2:03 pm | उद्दाम
अगदी सहमत.
14 Oct 2013 - 2:33 pm | बॅटमॅन
सावरकर चातुर्वर्ण्य आणू पाहत होते याला पुरावा द्या.
आणि त्याआधी जरा निकेलोडिऑन पाहा.
14 Oct 2013 - 2:42 pm | ग्रेटथिन्कर
रत्नांग्रिच्या पतितपावन मंदीरप्रवेशाचा प्रश्न तूमाला माहीत नाही काय....
दलितांनी तिथे प्रवेश मागितला तेव्हा हेच स्वातंत्रवीर दलितांना म्हणाले' आम्ही तूम्हाला वेगळे मंदिर बांधुन देतो, मुळ मंदीरात मात्र तूमी येऊ नका'
हा काय प्रकार आहे ???अश्या वागण्याने चार्तुवर्णाला खतपाणी मिळेल कि तो नष्ट होईल?
14 Oct 2013 - 2:51 pm | अनिरुद्ध प
हा काय प्रकार आहे? कारण प्रत्यक्षात आम्हाला ज्ञात अस्लेल्या माहितीच्या बरोबर विरुद्ध आपण सान्गत आहत.
14 Oct 2013 - 2:57 pm | मुक्त विहारि
व्य.नि. केला आहे...
14 Oct 2013 - 3:03 pm | बॅटमॅन
आणि त्यांनी त्याच रत्नांग्रीत सहभोजने आयोजित केली होती ती वर्णव्यवस्था टिकविण्यासाठीच, नैका? सिलेक्टिव्ह रीडिंग केले की असेच होते.
14 Oct 2013 - 3:35 pm | ग्रेटथिन्कर
दलितांबरोबर सहभोजन केले, विहीरीतील पाणी दिले की लगेच जातियवाद संपतो हे अजब तर्कट आपण कुठे शिकलात ?हिंदूमध्ये
आंतरजातीय विवाह ,रोटीबेटी व्यवहार व्हावेत यासाठी तात्यांनी त्यांच रत्न्ग्रीत काय प्रयत्न केलेत ते तरी सांगा.
हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व अशी व्याख्या करणार्याने जातीअंतासाठी एकदाही प्रयत्न करु नयेत यातून काय सुचीत होते?
सहा की सात सोनेरी पाने यात पुष्यमित्र शुंगाची स्तुती करणे, की ज्याने मनुस्मृती लिहीली व धर्माची वाट लावली त्याला अख्खे पान वाहणार्या माणसाने जातिअंतासाठी प्रयत्न केले असे सांगायचे म्हणजे त्यासाठी गोबेल्सचेच जीगर पाहीजे :-P
14 Oct 2013 - 3:41 pm | बॅटमॅन
पुष्यमित्र शुंगाने मनुस्मृती लिहिली असे धडधडीत खोटारडे वाक्य खरे म्हणून खपवायला ग्रेटथिंकरचे काळीज पाहिजे =))
14 Oct 2013 - 3:44 pm | मुक्त विहारि
जाने वो कैसे लोग थे जिन को
खोपडी में मेंदू मिला..
हमने तो बस ब्रेन ही मांगा तो
हमको ग्रेन मिला...
14 Oct 2013 - 3:51 pm | विटेकर
मुवि , ब्याट्मन साहेब .
जाने देव .. पीयेला आदमी हय.
14 Oct 2013 - 4:02 pm | मुक्त विहारि
पण मी तर काहीच म्हणालो नाही आहे, मी आज फक्त गाणीच लिहीली आहेत...
कुछ तो लोग कहेंगे
लोगों का काम है कहना
छोडो बेकार की बातों में कहीं बीत ना जाये रैना...
(स्मॉल पेगर)
14 Oct 2013 - 3:49 pm | ग्रेटथिन्कर
सुमती भार्गवकडून मनुस्मृती याच शुंगाने लिहुन घेतली होती !जरा वटवाघुळी मेंदुला ताण द्या :-P
14 Oct 2013 - 4:00 pm | बॅटमॅन
नुसत्या गफ्फांना इतिहास म्हणून शिकवणार्या शाळेत तुम्ही शिकला असाल, आम्ही नाही. पुष्यमित्र शुंगानेच ती कमिशन केली होती असे म्हणण्याला काय आधार आहे तेही सांगा. सेपरेशन ऑफ चर्च अँड स्टेट हे आमच्या भारतात आधीपासूनच होते, तुमच्या युरोपात अलीकडे झाल्यामुळे तुम्हाला असेल बॉ त्याचे कौतुक.
तुमच्या वागण्यावरून डाव्यांचे लाल रंगाबरोबर इतके गहिरे नाते का आहे ते समजले बाकी. शाब्दिक रक्तपात करायचा तो करायचाच, शिवाय आपलीच लाल करायची. माईका लाल हा शब्दप्रयोगही तुमच्यामुळेच रूढ झालाय असेच वाट्टे =))
14 Oct 2013 - 7:58 pm | क्लिंटन
मानले रे बाबा तुला बॅटमॅना.एका मागोमाग एक बेजबाबदार विधाने करून स्वतःला मोठा थिंकर म्हणणवणार्या मनुष्याच्या तोंडी लागणे म्हणजे भयंकर संयमाचेच काम आहे.
14 Oct 2013 - 3:52 pm | धन्या
सावरकरांना जातीयवादी म्हणवणार्यांना सावरकर कळलेच नाहीत. पुर्णविराम.
14 Oct 2013 - 3:56 pm | मुक्त विहारि
+१
18 Oct 2013 - 9:49 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
जातियवाद संपवायसाठीचं एक पाऊल म्हणु शकतो आपण त्याला.
जर सहभोजनानी जातियवाद संपत नसेल तर वरच्या उपायांनी संपेल? आजपर्यंतचा इतिहास पाहीला तर आंतरजातीय रोटी-बेटी चा अवलंब करणार्यांना किती त्रास सहन करावा लागला आणि लागतोय ते पाहा आसपास. त्यासाठी कठोर कायद्याचं संरक्षणचं पाहीजे.
24 Oct 2013 - 12:30 pm | चिगो
रोटीबेटी व्यवहार व्हावेत यासाठी तात्यांनी त्यांच रत्न्ग्रीत काय प्रयत्न केलेत ते तरी सांगा.
आपल्या ह्या दोन वाक्यांमधला विरोधाभास आपल्याला कळतोय का? वेगळ्या जाती-वर्णाच्या व्यक्तीच्या हातून शिजवलेले किंवा वाढलेले खाणे, ह्यालाच "रोटी" व्यवहार म्हणतात. ह्याला विरोध करण्यापासूनच जातीव्यवस्था विरोधाची सुरुवात झाली होती..
24 Oct 2013 - 1:27 pm | ग्रेटथिन्कर
कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी त्यांची चूलत बहीण होळकर या धनगर राजघराण्यात दिली होती... तुमच्या तात्यारावांनी कुणा ब्राह्मणेत्तराची मुलगी घरात सून म्हणून आणली का ????वा त्यांची मुलगी कुणा ब्राह्मणेत्तराच्या घरात दिली का?
त्यांच्या कुणा कार्यकर्त्याने आंतरजातिय विवाह केल्याचे उदाहरण दाखवा आणि हजार रुपये बक्षिस मिळवा.वरवरचा कोडगा रोटीव्यवहार करणारे जातिअंतासाठी काम करत होते म्हणे..कैच्याकै
24 Oct 2013 - 2:12 pm | अत्रुप्त आत्मा
ग्रेटथिंकर,
नावा प्रमाणे वागण्यास तयार असाल तर ,खालिल पुस्तक(मुद्दाम विकत घेउन) वाचा. आणि त्याचा सप्रमाण प्रतिवादही करुन दाखवा! :)
24 Oct 2013 - 11:15 pm | विद्युत् बालक
ह्या न्यायाने "पेटा" (P. E. T. A. )च्या प्रत्येक सदस्याने कुत्रा, मांजर,गाढव अश्या प्राण्याशी लग्न करणे आवश्यक असेल नै ?
26 Oct 2013 - 12:48 am | ग्रेटथिन्कर
अरे अकलेच्या कांद्या, पेटाचे म्हणणे इतकेच आहे की प्राण्यांना एथिकल ट्रीटमेंट द्यावी...तशी पेटासदस्य देतात.
हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व अशी धेडगुजरी व्याख्या करणार्याने जातीअंतासाठी काय केलं ते सांग..
26 Oct 2013 - 9:54 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
धर्मनिरपेक्ष म्हणजे राष्ट्रियत्व कसं काय होतं हो? गोळिची वेळ चुकली वाटतं.
26 Oct 2013 - 10:15 am | ग्रेटथिन्कर
मग अमेरीकेत स्थायिक हिंदू कोण?
भारतीय का अमेरिकन.
24 Oct 2013 - 11:41 pm | मुक्त विहारि
फार लागले नाहे ना तुला?
बाळ किती वेळा तू असे तोंडघशी पडणार?
जा बरे तुझी पथ्याची आणि औषध घ्यायची वेळ झाली आहे..
आणि हो ते पथ्याचे विसरू नको बरे....
आणि हो जातांना जरा मुद्दामच सांगतो, ती आंबट चिंच पण जास्त खावू नकोस.
25 Oct 2013 - 10:51 am | मृत्युन्जय
कोल्हापूरच्या शाहू महराजांनी अजुन बरेच काही केले आहे म्हणतात.
बादवे त्यांनी एखाद्या ब्राह्मण मुलीशी लग्न केले होते का?
25 Oct 2013 - 4:15 pm | मालोजीराव
25 Oct 2013 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा
+१ टू मालोजी :)
आणी या विषयावरील "सत्य" (जे असेल ते!) ऐकण्यास उत्सुक! :)
26 Oct 2013 - 9:25 am | उद्दाम
कोल्हापूरच्या शाहू म्हाराजांनी बरेच काही केले आहे.
राधानगरीचे धरण त्या काळात त्यानीच बांधले. इंग्रजी काळातील संस्थानिकाने बांधलेले त्या काळातील ते सर्वात मोठे धरण होते.
त्या धरणाच्या उजेडात आजही महाराष्ट्र नांदतो.
तुमच्या मेंदूत प्रकाश त्याचा पडला का ते पहा आणि त्या प्रकाशात म्हाराजांनी केलेली इतर कामे दिसतात का ते पहा.
26 Oct 2013 - 10:26 am | ग्रेटथिन्कर
जाऊद्या हो उद्दामाण्णा,पेशवाईतल्या सुग्रास भोजनाच्या पंगतीवर चर्चा करणारे हे लोक, यांच्या मेंदूच्या गोट्या झाल्या आहेत .यांना समाजाभिमूख, विधायक गोष्टी दिसणार नाहीत.
*सावरकरांनी पण इंग्लंडात आणि रत्नांग्रित बरेच काही केल्याचे म्हण्टले जाते,मी तर त्यांना हे समजत होतो, आपलं काय म्हणतात ते क्रांतिकारक.. क्रांतिकारक..*
26 Oct 2013 - 10:55 am | मृत्युन्जय
जाऊद्या हो उद्दामाण्णा,पेशवाईतल्या सुग्रास भोजनाच्या पंगतीवर चर्चा करणारे हे लोक, यांच्या मेंदूच्या गोट्या झाल्या आहेत
.
अँ? पेशवाईतल्या सुग्रास जेवणांबद्दल नाके मोरडुन त्यांच्यावर चर्चा करणारे वेगळेच लोक असतात. आम्ही त्यातले नव्हे.
बाकी तुमच्या गोट्यांचाच मेंदु झाला असल्याने तुम्हाला कळायचेही नाही म्हणा. त्यामुळे जाउ द्यात
यांना समाजाभिमूख, विधायक गोष्टी दिसणार नाहीत.
आम्हाला खुप समाजाभिमुख, productive गोष्टींबद्दल माहिती आहे म्हणुनच तर वरील वक्तव्य केले. महाराज महान पुरुष होते तर मी तसे वक्तव्य का बरे करु नये म्हणे? त्यांच्याबद्दल माहिती नसलेल्या एका गोष्टीबद्दल मी केवळ पृच्छा केली ज्ञानतृष्णा भागवण्यासाठी तर तुमच्यासारखे समाजकंटक धाउन आले. जौद्यात. काय बोलणार.
*सावरकरांनी पण इंग्लंडात आणि रत्नांग्रित बरेच काही केल्याचे म्हण्टले जाते,मी तर त्यांना हे समजत होतो, आपलं काय म्हणतात ते क्रांतिकारक.. क्रांतिकारक..*
तर हो. क्रांतिकारक तर ते होतेच. नव्हते का? आणि त्यांनी देशकल्याणकारक बरीच कामे इंग्लंडात आणि संपुर्ण भारतात केली (केवळा रत्नाग्रित नाही काही)
26 Oct 2013 - 10:49 am | मृत्युन्जय
मला तर त्यांनी अजुन बरीच समाजसुधारणेची कामे केल्याची आठवतात. तुम्ही हे एकच का सांगितले? आणि या एका गोष्टीने मेंदुत काय प्रकाश पडायचा? तुमच्या मेंदुत काहीच नसल्यासारखी वक्त्यव्ये काय करता आहात? तुम्हाला महाराजांनी केलेली इतकी महान कामे दिसत नसतील तर मी काय करणार म्हणा?
18 Oct 2013 - 9:44 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
+ ६६६
14 Oct 2013 - 6:52 pm | पैसा
आधी रत्नागिरीला जाऊन तिथे पतितपावनाच्या मंदिरासमोर भागोजीशेट कीरांचा पुतळा बघा, तिथे काय काय लिहिले आहे ते वाचून या आणि मग वाटेल ते बोला.
14 Oct 2013 - 7:11 pm | ग्रेटथिन्कर
भागोजीशेट किर !
एवढ्या थोर आणि जगप्रसिद्ध माणसाविषयी मी काय बोलावे.
14 Oct 2013 - 7:17 pm | पैसा
http://www.patitpavanmandir.org/Pages/Bhagojisheth/bhagoji.html
20 Oct 2013 - 10:18 pm | पिशी अबोली
ग्रेटथिंकर काका किती हसवता हो तुम्ही...जाम आवडतं तुमचं लिखाण...लगे रहो...कुणी प्रतिसाद देवो न देवो, तुम्ही लिहीत रहा... इतकं हल्कफुल्कं असंबद्ध लिहिणं नाहीतर कुणाला जमायचं?
20 Oct 2013 - 10:42 pm | ग्रेटथिन्कर
धन्यवाद! आभारी आहे.
25 Oct 2013 - 1:05 pm | सुहासदवन
त्या काय बोलल्या ते कळलं का आधी?
14 Oct 2013 - 7:18 am | अत्रुप्त आत्मा
असे लेखन अगत्याचे! :)
अवांतर- तुंम्ही सुट्टि लय घेता राव,१लेख लिहीला कि! ;-)
14 Oct 2013 - 2:44 pm | अग्निकोल्हा
.
14 Oct 2013 - 2:59 pm | विटेकर
लेख आवडला ! सगळीच मते पट्ली नसली तरिही !
अवांतर : जातियता संपूर्ण नष्ट झाली असती ( सतीच्या प्रथेमाणे ) असा माझा दावा आहे पण राजकारण्यांनी ( विशेषतः कॉग्रेस ने ) ते घोंगडे भिजतच ठेवले केवळ राजकीय स्वार्थापोटी ! अस्पृश्यता नष्ट झालीच की !काही चीड आणणारे अपवाद सोडले तर अस्पृश्यता निवारणाला आता मर्यादित यश आले आहेच !
कालानुरुप नवे बदल स्वीकारण्याइतका हिंदूधर्म नक्किच लवचिक आहे. यज्ञांसारख्या गैर लागू गोष्टी सुद्धा बाहेर काढून टाकल्या जातातच. असेच जातियता नष्ट होइइल असा मला विश्वास आहे. सोशल ईम्जिनिअरिंगच्या नावाने केवळ मतांचे राजकारण सुरु आहे.ते जेव्हा थांबेल तेव्हाच खरा विकास होऊ शकेल. कॉग्रेस्ने सुरु केलेले हे राजकारण अन्य पक्षांनी साळ्सूद पणे सुरु ठेवले ही खरी शोकांतिका आहे. बाकीचे सारे पक्ष कानामागून येऊन तिखट झाले आणि आता राजकारण म्हण्जे समाजकारणाचा बळी देऊनच करायचे असते असा समज दृढ झाला आहे.
आजच्या काळात मूल्यमापन करायचे झाल्यास डो. आंबेड्करांचे हिंदूच्यावरिल सर्वात मोठे उपकार म्हणजे त्यांनी मुस्लिम अथवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही. अन्यथा काय परिस्थिती झाली असती याचे कल्पना ही करवत नाही !
14 Oct 2013 - 3:41 pm | मुक्त विहारि
+१
14 Oct 2013 - 3:57 pm | धन्या
असे वाचले आहे की धर्मांतरापूर्वी बाबासाहेब गाडगेबाबांना भेटायला गेले होते. गाडगेबाबा म्हणाले "तुम्ही शिकले सवरलेले. मला अडाण्याला काय कळतं त्यातलं. जो काही निर्णय घ्याल तो विचारपुर्वक घ्या".
14 Oct 2013 - 4:07 pm | विटेकर
नाझ्या स्मरणाप्रमाणे हे बरोबर आहे. पण त्याच बरोबर अनेक मौलवि आणि पाद्री देखील त्याना सल्ला देतच होते.
पू.बाबासाहेबांनी ढेबूजींचा सल्ला मानला.
नाठाळ कार्ट्याला आईने एक ठेऊन द्यावी,त्याप्रमाणे बाबांसाहेबांनी हिंदू धर्माला चपराक दिली आणि हे योग्यच केले. त्यांना पक्की जाणीव होती की अन्य धर्मात प्रवेश म्हणजे भारतीयत्वाचा लोप !
14 Oct 2013 - 4:12 pm | मदनबाण
छान माहिती...
गांधीजींनी अस्पृश्य लोकांसाठी हरिजन हा शब्द प्रयोग वापरण्यास सुरु केला होता.
बाकी लेखात बर्याच ठिकाणी गांधीजींचा एकेरी उल्लेख वाचला आणि तो योग्य वाटला नाही.
14 Oct 2013 - 4:28 pm | मुक्त विहारि
लगता अगर तीर हमारे शरीर पर तो अच्छा होता
शायद हमारी जान अगर जाती तो भी अच्छा था.
घाव देखके हकीम भी कछ कर सकता था.
लेकीन ये जालीम दोस्त तुमने तीर तो ऐसी जगह मारा है
की घाव तो दिखता ही नहीं
और दर्द तो ऐसे होते है की जनमभर सहने ही पडेंगे...
14 Oct 2013 - 5:00 pm | आशु जोग
अस्पृश्यता निर्मूलन झाले असेल तर आंबेडकर जयंतीला लोक्सचे उलट्सुलट प्रतिसाद का येतात मिसळीवर...
14 Oct 2013 - 6:53 pm | पैसा
अतिशय अभ्यासपूर्ण लेख. सगळीच मते पटतील असे नाही. पण तुमचा त्यामागे केवढा अभ्यास आहे हे जाणवतं आहे.
14 Oct 2013 - 7:45 pm | अवतार
काही अतिरिक्त मुद्दे
गांधी आणि आंबेडकर हा संघर्ष केवळ दोन नेत्यांचा नसून दोन विचारधारांचा संघर्ष होता. समता प्रस्थापित करणे हे अंतिम ध्येय असले तरी त्यासाठी मार्ग कोणता निवडावा हा मतभेदाचा मुद्दा होता. शिवाय गांधीजींना ज्याप्रमाणे काँग्रेससारखी समाजातील विविध विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना सांभाळायची होती तसे काही दडपण आंबेडकर यांच्यावर नव्हते. त्यामुळेच गांधीजींची भाषा ही काहीशी संदिग्ध आणि आडवळणाची तर आंबेडकर यांची भाषा ही थेट आणि रोखठोक असल्याचे दिसते.
ज्या वेळी दुसऱ्या गोलमेज परिषदेत आंबेडकर दलितांसाठी स्वतंत्र मतदार संघ मागत होते तेव्हा गांधीजींनी मुस्लिम प्रतिनिधींची स्वतंत्र भेट घेऊन आंबेडकरांच्या मागण्यांना विरोध करण्यासाठी मुस्लिमांच्या मागण्या मान्य करण्याची तयारी दाखवली होती. "मुस्लिम आणि ख्रिश्चन यांना विभक्त मतदार संघ दिले तर ठीक पण दलितांना मात्र देऊ नयेत", ही गांधीजींची भूमिका होती. तसेच या परिषदेत गांधीजी हे कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नव्हे तर भारताचे प्रतिनिधी या नात्याने उपस्थित राहिल्याचा दावा करत होते.
सुरुवातीला आंबेडकर स्वत:ला प्रोटेस्टंट हिंदू म्हणवून घेत होते. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा १९३५ मध्ये केली. त्यानंतर तब्बल २१ वर्षे ते वाट पाहत होते. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अंतिम निर्णय घेतला. सद्य परिस्थितीत होणाऱ्या धर्मांतरांकडे पाहतांना हा मुद्दा उपयुक्त ठरावा.
14 Oct 2013 - 7:49 pm | धन्या
खुप काही बोलून जातं हे वाक्य.
15 Oct 2013 - 12:19 am | प्यारे१
गांधीजींची भूमिका कायमच स्वतःशीच झगडा सुरु असल्यासारखी होती का?
त्यांना संत बनायचं होतं पण राजकारणी झाले किंवा राजकारणात राहून संत व्हायचं होतं का आणखी काही ह्याचा खरंच प्रश्न पडतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका त्यांना नि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना आलेल्या अनुभवांना अनुसरुनच असावी.
दुर्दैवानं समाजाला एकूणच समाजाला त्यांचीही भूमिका झेपलेली दिसत नाही. एक रेषा लहान करुन दुसरी रेषा मोठी होत नाही. दुसरीनं पहिल्या रेघेपेक्षा मोठं व्हावं. असो.
15 Oct 2013 - 11:47 am | विटेकर
गांधीजींची भूमिका कायमच स्वतःशीच झगडा सुरु असल्यासारखी होती का?
बहुधा हो , राजकारण ही त्यांची प्रकृतीच नव्हती त्याच नेहरू आदीनी मस्त गैरफायदा घेतला.एखाद्या प्राचीन ऋषीमुनींसारखे त्यांचे व्यक्तिमत्व होते आणि त्याच पद्धतीने त्यांनी राजकारण करण्याचा क्षीण प्रयत्न केला.त्यांचे सारे जीवन हिंदू मान्यतेप्रमाणे होते आणि म्हणूनच त्यांना भारतात प्रचंड लोकप्रियता मिळाली. साधु-संतांच्या मागे जाणे हीच आमची परंपरा होती. धर्म सत्तेने राजसत्तेवर अंकुश ठेवायचा हाच इथला परिपाठ होता. पण म्हणून वसिष्ठांनी शस्त्र हातात घेतले नाही , तसेच विद्यारण्य स्वामीनी अथवा समर्थांनीही ! आपली पोलिसी मेकेर ची भूमीका सोडून गांधीजी ओपेरेशन मधे उतरले आनि घोळ झाला त्यांच्या आदर्शवादी विचारसरणीचा व्यवहारात शून्य उपयोग होता ! आपली लढाई तत्वाबरोबर नसून अमानुषतेबरोबर आहे याचे भानच त्यांना राहीले नाही ! इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले! मुस्लिमांचा अनुनय हा तर शूद्ध भाबडेपणा होता. आणि त्यांच्या चुकलेल्या राजनीतीने जेव्हा रौद्ररुप धारण केले तेव्हा ते हताश आणि असहाय झाले ! त्यांनी गेल्या चारशे वर्षांच्या इतिहासाचा नीट अभ्यास केला असता तर मुस्लिमांच्यावर विश्वास टाकण्याची चूक त्यांनी केली नसती !
अस्तु, या जर-तर च्या गोष्टी आहेत, तरिही गांधीजी महानच होते, ज्या विशुढ्ध जीवन शैलीचा त्यांनी अंगिकार केला होता ती हिंदू संन्याश्याची जीवनशैली होती.निश्चित आदरणीय होती !
वाईट याचे वाटते की स्वार्थी काँग्रेसी राजकारण्यांनी गांधीच्या नावाने आपली पोळी भाजून घेतली आणि खराखुरा गांधीजींचा ( त्यांच्या तत्वज्ञानाचा) खून केला. अजूनही करताहेत !
15 Oct 2013 - 12:06 pm | मदनबाण
मुस्लिमांचा अनुनय हा तर शूद्ध भाबडेपणा होता.
भाबडेपणा ???
15 Oct 2013 - 12:11 pm | विटेकर
अशा अर्थाने की , मुस्लिम देखील हिंदूप्रमाणे सहिष्णु होतील, त्यांच्या मनात बंधुत्व जागृत होईल .. हा भाबडा आशावाद !
15 Oct 2013 - 12:31 pm | ग्रेटथिन्कर
अनुनय केला म्हणजे काय?
15 Oct 2013 - 2:37 pm | मुक्त विहारि
एक साधा सोपा प्रश्र्न
विचार करून लिहावे की विचार न करता लिहावे?
"ह्याचे उत्तर आपणच द्यायचे आहे" हे सांगणे न लगे....
माझ्या वरील प्रश्र्नाचे उत्तर विचार पुर्वक दिलेत की मग मी तुमच्या प्रश्र्नाचे उत्तर नक्की देईन.
त्याचे काय आहे, तुमचे प्रश्र्न कधीच संपत नाहीत आणि इत्रांच्या शंकांचे समाधान तुमच्याकडून होत पण नाही.
बरे खरडवही तर आपण बघत पण नाही.
कळावे,
आपला "स्मॉल पेगर"
16 Oct 2013 - 10:55 am | डॉ सुहास म्हात्रे
ग्रेट थिंकर साहेबांना "मिपावरील डिग्गीराजा" * ही पदवी कशीकाय वाटते?... त्यांची असंबद्ध आणि बेजबाबदार विधाने करून विनोदी कोलांट्याउड्या मारण्याची शक्ती त्या महामानवाइतकीच प्वॉवरफूल्ल हाय असं आमाला वाटू लागलयं. मुख्य मुद्दा सोडून भलतीकडे भरकटण्याची अचाट शक्ती हेही त्यांचं एक खास वैशिष्ट्य सांगता येईल.
याशिवाय, मिपावर स्वतःचं हसं करून घेऊन इतरांची इतकी निखळ करमणूक करण्याची कामगिरी इतर कोणी गेलाबाजार दोन आठवडे तरी केली नाही असा आमचा दावा हाय. क म्हंताव?
16 Oct 2013 - 2:31 pm | मुक्त विहारि
माझे अनुमोदन आहे...
15 Oct 2013 - 2:26 pm | मुक्त विहारि
त्यातही खालील २ वाक्ये तर जबराच...
"आपली लढाई तत्वाबरोबर नसून अमानुषतेबरोबर आहे याचे भानच त्यांना राहीले नाही!"
आणि
"इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले!"
16 Oct 2013 - 10:58 am | डॉ सुहास म्हात्रे
"इट इज अनवाईज टू बी वाईज विथ अनवाईज हे साधे तत्व ते विसरले!"
मला वाटतं हे तत्व या धाग्यावरच्या काही चर्चेतही सिद्ध होत आहे म्हणा !16 Oct 2013 - 8:04 pm | मुक्त विहारि
+ १
16 Oct 2013 - 11:47 am | उद्दाम
गांधीजींनी मुस्लिमांचा अनुनय केला वगैरे रडगाणे गाइल्याशिवाय काही लोकान्ना अन्न गोड लागत नाही.
१. मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. ते आले, तेच मुळी राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे. मुघल गांधीजी|ंच्या आधीपासूनच या देशाचे राज्यकर्ते होते. मुस्लिम लीगही १९०६ साली स्थापन झाली, तेंव्हा गांधीजी राजकारणातही नव्हते. मधल्या काळात त्यांची संख्याही ४० % झालेली होती. ४० % जनता एकगठ्ठा असेल तर तिला स्वतःचा आवाज, स्वतःची इच्छाशक्ती निर्माण होणारच.
२. गांधीजीदेखील स्वतःच्या विचारसरणीने मोठे झाले.
गंमत म्हणजे एकाच वेळी हे दोघेही स्वतंत्रपणे मोठे झाले आणि इथल्या तथाकथित 'सनातन धार्मिक' गटांना ते मोठे झाले हे पचवणं आजही जमलेलं नाही. मग ते जिथे तिथे अमूक धर्माचे लोक विश्वासघातकी असतात म्हणे आणि गांधीजींनी त्यान्ना मोठं केलं की त्यान्नी यान्ना मोठं केलं याच्या रडकहाण्या ऐकवत फिरत असतात.
16 Oct 2013 - 8:33 pm | अर्धवटराव
>>मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत. ते आले, तेच मुळी राज्य करण्याच्या महत्वाकांक्षेमुळे. मुघल गांधीजी|ंच्या आधीपासूनच या देशाचे राज्यकर्ते होते.
-- अॅब्सोल्युटली. भारतात मुस्लीम राज्यकर्ते त्यांच्या मनगटातले बळ आणि आणि निष्णात राजकारणात यांच्या भरोशावर स्थिरावले.
>>४० % जनता एकगठ्ठा असेल तर तिला स्वतःचा आवाज, स्वतःची इच्छाशक्ती निर्माण होणारच.
-- १००% सहमत.
17 Oct 2013 - 1:29 pm | उद्दाम
१. गांधीजी ग्रेट थिंकर होते.
२. मुघल उद्दाम होते.
म्हणूनच दोघेही महान ठरले.
18 Oct 2013 - 10:06 am | अर्धवटराव
कुर्हाडीच्या दांड्यांनी गोतास काळ आणला व कावळा मशिदीच्या मिनारावर बसुन मौलवी बनला.
18 Oct 2013 - 10:41 am | उद्दाम
मंडनमिश्रा बौध्ह धर्म सोडून तुमच्याकडे आला तर एका रात्रीत शंकराचार्य झाला.
कावळा मौलवी बनला तर तुमच्या पोटात कावळे का ओरडताहेत?
18 Oct 2013 - 6:52 pm | अर्धवटराव
मण्डनमिश्राने आपला अधिकार सिद्ध करुन आचार्य पदाला शोभा आणली तर कावळ्याने फक्त कावकाव करत मौलवीपद खुजे केले.
18 Oct 2013 - 6:59 pm | बॅटमॅन
हरे राम...आपलं ते हे हेर मार्क्स!!!! मण्डनमिश्राने बौद्ध धर्म कधीच स्वीकारला नव्हता. मतपिंका टाकायलासुद्धा एक शिस्त लागते हे विसरलात बहुतेक.
20 Oct 2013 - 6:50 pm | चौकटराजा
१. मुस्लिम भारतात १६०० व्या शतकापासून आहेत.
उद्दाम साहेब हे तुम्ही मुद्दाम लिहिलय का ? आताशी २१ वे शतक चालू झाले आहे.
20 Oct 2013 - 7:00 pm | मुक्त विहारि
हे राम!!!!!
उलटी गिनती....
15 Oct 2013 - 12:47 am | मुक्त विहारि
+१
15 Oct 2013 - 8:06 am | विनायक प्रभू
ग्रेट विचार करण्याकरिता लागणारा मेंदू नेमका कुठे असतो? कवटीत का ..त.?
15 Oct 2013 - 10:10 am | मुक्त विहारि
आधी विचार चांगले
विचाराने वर्तन चांगले
वर्तनाने व्यक्तिमत्व ते भले
असे व्यक्तिमत्व जगी गाजले
(मुवि)
15 Oct 2013 - 11:26 am | अनिरुद्ध प
+१ सहमत
15 Oct 2013 - 12:52 pm | चिगो
"जर.. तर.."च्या जाळ्यात न अडकता केलेले, इतिहासाचे समर्पक विश्लेषण.. लेख आवडला..
15 Oct 2013 - 2:19 pm | मृत्युन्जय
१. सावरकर फॅसिस्ट होते, २. पुष्यमित्र शुंगाने मनुस्मृती लिहिली, ३. गांधीना त्याकाळच्या सवर्ण हिंदुसमाजाचा पुढारी न मानणे हे मध्यमवर्गाच्या वांझ बुद्धीमातेचे गर्विष्ठ अपत्य आहे. ही ३ वक्तव्ये ऐकली.
आता :
१. शिवाजी महाराज कर्मट मुसलमान होते,
२. राजकारणात येण्यासाठी आंबेडकर नावाच्या ब्राह्मणाने अस्पृश्यता निवारन चळवळीचा वसा स्वीकारल्याचे ढोंग स्वीकारले आणी
३. सावरकरांना पोहता येत नव्हते
ही ३ वक्तव्य वाचली की मी डोळे मिटायला मोकळा. बाकी चालु देत.
15 Oct 2013 - 2:39 pm | अनिरुद्ध प
असत एखाद्याचे 'ग्रेट थिंकींग' त्याला आपण काय करायचे? तर वरती विटेकर काकांनी सान्गीतल्या प्रमाणे 'पीयेला हय' असे म्हणुन सोडुन द्यावे कसे?