'नवी मुंबई' दर्शन

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जनातलं, मनातलं
14 Jul 2008 - 4:40 pm

नवी मुंबई दर्शन -

आधुनिक शतकातील सुनियोजीत शहर म्हणुन उदयास येत असलेली 'नवी मुंबई '. जुन्या मुंबईतील अनेक प्रेक्षणीय ठिकानांना आपण नेहमीच भेट देतो. मात्र नवी मुंबईतील ठिकाणे आपल्याला फारशी माहित नाहीत. यातील काही ठिकाणांची चित्रमय माहिती.
------------------------------------------------------------------------
मुंबईहुन नवी मुंबईत यायचे झाल्यास सायन - पनवेल महामार्गावरुन , मानखुर्द नंतर येणारा खाडी पुल ओलांडुन आपण नवी मुंबईच्या आर्थिक राजधानी 'वाशीत' प्रवेश करतो ( तस मुलुंड - ऐरोली खाडीपुलावरुन ही नवी मुंबईत येता येते. अहो ! हो ! तोच तो ' कहो ना प्यार हे 'मधला पुल जेथे पहिल्या हॄतिक रोशना जलसमाधी मिळते. )


-------------------------------------------------------------------------
वाशी रेल्वे स्टेशन - आधुनिक रेल्वे स्थानक. दोन्ही बाजुला प्लॅटफॉर्म हे नवी मुंबईतील सर्व स्टेशानांचे वैशिष्ठ. तसेच मुंबईतील अन्य स्टेशनांपेक्षा स्वच्छ स्टेशन्स आहेत. ( प्लॅटफॉर्म वर हॉटेल नसल्याने) . नवी मुंबई महानगर पालिकेची स्वतःची परिवहनसेवा अजुनही बाल्यावस्थेतच आहे. ( एकाच ठिकाणी जाणार्‍या एन एन एम टी . आणि बेस्ट च्या एक्दम बसेस आल्या तर लोक बेस्ट ला प्राधान्य देतात. तरी पी.म्.टी पेक्षा सर्वीस बरी आहे )


------------------------------------------------------------------------
वाशी -बेलापुर पाम बिच मार्ग - मरिन ड्राईव्ह ऑफ नवी मुंबई असे ज्याचे वर्णन करता येईल तो हा पाम बिच मार्ग. दुर्दैवाने वहान चालकांच्या बेजबाबदार वृत्तीमुळे अपघाताचे प्रमाण खुप आहे. एका बाजुला उंचच्या उंच टॉवर्स आणी दुसर्‍या बाजुला तिवराची जंगले असे येथील द्रुश्य असते.


---------------------------------------------------------------------

डी. वाय. पाटिल स्टेडिअम
- नेरुळ मधे असलेले हे स्टेडिअम सायन -पनवेल हायवेला लागुनच आहे आय.पी.ल मॅचेस मुळे माहित झालेले हे एक नवीन स्टेडिअम . धावपट्टी करण्यासाठी खास अफ्रिकेतुन माती आणली होती.


------------------------------------------------------------------------
नेरुळचे बालाजी मंदीर : तिरुपती बालाजी संस्थानाचे हे एक प्रसिध्द झालेले मंदिर. नेरुळ स्टेशनापासुन अगदी जवळ आहे. थोड्या उंचावर असणार्‍या या मंदिरातुन अजुबाजुचा परिसर छान दिसतो.

------------------------------------------------------------------------

पारसिक हिल बेलापुर - डोंगराच्या कुशीत वसलेले बेलापुर/ कोकण भवन / सि. बी.डी. या सर्व नावानी ओळखळे जाते. महानगरपालिका, कोकण रेले, सिडको, रायगड भवन इ अनेक प्रशासकीय ऑफिसेस येथे आहेत. बेलापुर किल्ला, पार्सिक हिल ही प्रसिध्द ठिकाणे.
पार्सिक हिल वरुन दिसणारे खाडीचे द्रुश्य.

--------------------------------------------------------------------------

खारघर - नवी मुंबईतील सगळ्यात सुनियोजीत शहर. स्वच्छ , रुंद रस्ते, टोलेजंग इमारती निसर्गाचे सानिध्य हे येथिल वैशिष्ठ. उत्सव चौक, शिल्प चौक, पांडवकडा ही येथील काही प्रसिध्द पावत असलेली ठिकाणे. नवी मुंबईचा होणारा विमानतळ येथुन जवळच होत असल्याने जागेचे भाव गगनाला भिडलेले आहेत.
खारघर

शिल्प चौक

उत्सव चौक


पांडव कडा

मुंबई पेक्षा जरा थोडासा निवांतपणा , निसर्गाचे सानिध्य, मोठे रस्ते, कमी वाहतुक कोंडी यामुळे या भागात येणार्‍यांची संख्या वाढु लागली आहे ( आणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी टक्का ही जाणवण्याइतपत चांगला आहे ).

तेंव्हा आता अगामी काळात मुंबई बरोबरच नवी मुबई दर्शन ही येणार्‍या पाहुण्यांसाठी आवश्यक गोष्ट ठरणार आहे.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

14 Jul 2008 - 4:45 pm | मनस्वी

अमोल, सर्वच छायाचित्रे सुंदर.
शिल्पचौक, रोषणाईतील उत्सवचौक आणि पांडवकडा विशेष आवडले.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

मदनबाण's picture

14 Jul 2008 - 5:23 pm | मदनबाण

व्वा सर्वच फोटो छान आहेत...
या मुलुंड - ऐरोली खाडीपुलावरुन मी नेहमीच माझी दुचाकी अगदी जोमाने पळवतो,,स्पीडचा काटा ८० -८५ वर सहज पोहचतो..अगदी जबरदस्त वाटत..

मदनबाण.....

रामदास's picture

14 Jul 2008 - 6:12 pm | रामदास

कधी कधी संध्याकाळी बाजूला बराच वेळ पार्क केलेली असते का? ह.घ्या.

वेदश्री's picture

14 Jul 2008 - 5:41 pm | वेदश्री

"वाशी मेरी काशी है|" ह्या माझ्या लव्हली डायलॉगची आठवण झाली. फोटो एकदम आवड्या !

आंबोळी's picture

14 Jul 2008 - 5:43 pm | आंबोळी

नवी मुंबईतील नेरूळ मधील राजीव गान्धी पूलावरुन पामबीच रोडकडे जाताना उजव्या हाताला आसलेले आंबोळीच्या घरचा कंदील खूप म्हण्जे खूपच प्रेक्षणीय आहे.

(धारी)आंबोळी

आनंदयात्री's picture

14 Jul 2008 - 6:26 pm | आनंदयात्री

मस्त भो आंबोळ्या !!

आशिष सुर्वे's picture

14 Jul 2008 - 6:17 pm | आशिष सुर्वे

मित्रहो, धन्यवाद... मला माझ्या घराकडे घेउन गेल्याबद्दल.
माझे घर 'नवी मुंबई'त आहे. आणि गेले एक वर्ष मी कामानिमित्त देशाबाहेर आहे.
आज ही छायाचित्रे पाहताना घरची आठवण आली.

छान!

विसोबा खेचर's picture

15 Jul 2008 - 12:06 pm | विसोबा खेचर

धन्यवाद केळकरसाहेब. सर्वच फोटू सुंदर.

वरून दुसरा फोटू तर मस्तच. या मार्गावरून मी अनेकदा प्रवास केला आहे. मजा येते! :)

आपला,
(मुंबईकर) तात्या.