(--हात नका लावुं कोणी फंडाला )
सध्याच्या शेअर मार्केटला अर्पण
चालः रेशमाच्या रेघांनी, लालकाळ्या धाग्यांनी
-------------------------------------------------------------------------
मार्केटच्या सेन्सेक्सनी , बाजारातल्या शेअर्सनी, घेतली उडी रसातळाला
हात नका लावुं कोणी फंडाला !!!
नवी कोरी स्क्रिफ्ट लाख मोलाची ! आपटुनी जाई चार दिवसांनी !!
गुंतियले सारे सर्व, नुकसान अफाट ! मोकळे झाले आता दलालस्ट्रिट !!
करत होते इनव्हेसमेंट मी ऐटीत ! बोनस ही होत होता एकावरती एक !
कंपनीचा अहवाल का हो नाही अभ्यासला? हात नका लावुं आपल्या फंडाला !!!
आयटी , स्टिल, प्रोजेक्टस होते भावात ! कोसळले ते ही सर्व जोरात, बाई जोरात !
काय म्हणू बाई, उतरत्या डॉलरला ! ठेवु सुरक्षित आपल्या पैशाला !!
प्रतिक्रिया
10 Jul 2008 - 10:45 am | II राजे II (not verified)
मार्केटच्या सेन्सेक्सनी , बाजारातल्या शेअर्सनी, घेतली उडी रसातळाला
हात नका लावुं कोणी फंडाला !!!
जबरा ! :D
राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
10 Jul 2008 - 11:57 am | कौस्तुभ
:D :)) मस्तच जमलय !
10 Jul 2008 - 2:14 pm | अभिरत भिरभि-या
हे घाटी लोक आजकाल मार्किट मंदी येते साला मार्किटची पन कविता करुन टाकते. हु साला चोब्बीस वरस दलाल स्ट्रीटमा छु पन कवा कविता नाय सुचले ...
अमोल भाय, बहु सरस छे तारो कविता ..
11 Jul 2008 - 4:13 pm | विसोबा खेचर
केळकरशेठ,
लै भारी विडंबन..! :)
येऊ द्या अजूनही....
आपला,
(मंदीवाला) तात्या.