रविवारचा दिवस आणि सकाळी ७ ची वेळ ..एरवी capacity पेक्षा हि जास्त लोकांना सामावून घेणारा रेल्वे चा डबा आज तेवढाच रिकामा होता..दररोज २ इंच सुद्धा पाय मागे पुढे करता न येणाऱ्या ठिकाणी आज चक्क कुणीही उभे नव्हते ..एरवी reservation च्या डब्यात ही Illegally चढणारे तर नाहीच पण चक्क काही seats ही रिकामे होते . दररोज up -down करणार्यांच्या सुट्टी मुळे त्या निर्जीव entity ला ही थोडा relief मिळाला असावा .. मोठ्या अथक प्रयत्नानंतर execute होणाऱ्या मुंबई प्लान चा entry point - सुटता सुटता पकडलेली Deccan Queen .. :-)
ट्रेनच्या प्रवासात काही गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने करता येतात हा अनुभव ह्या वेळी मला आला .. जसे कि २० पानांचा newspaper आपण संपूर्ण पणे वाचून काढू शकतो अगदी worldwide news पासून तर छोट्या छोट्या sales /services च्या जाहिरातींपर्यंत ..दुसरं म्हणजे आजू बाजूच्या लोकांचं निरीक्षण ..आणि तिसरं असं कि headphones कानात टाकून निवांत झोपू शकतो ..पण सुदैवाने (for a change) तिसरा option ह्या वेळी माझ्या वाटयास आला नाही ..
Train सुरु होताच पुढच्या दहा मिनिटांत breakfast चा मेनू ओरडत , हातात कागद पेन घेऊन एक माणूस आला . समोरच्या seats वर बसलेल्या २ पुणेरी बायकांनी अगदी मेनूत असलेले सगळे options order केलेत Toast ,Bread omelet, वडा पाव etc .. ट्रेन मधील food न खायचं ठरवल्याने आम्ही काही order केली नाही .. गप्पांसोबत च newspaper वाचणं चालू होत .. अर्ध्या बातम्या तर rape cases आणि crimes वर होत्या ..पेपर बाजूला ठेवावं म्हटलं तेवढ्यात, कानातले आणि इतर बायकी छोट सामान विकणारा आला ..ताई सोबत असल्याने त्यात मला ही डोक घालणं साहजिक होतं आणि depressing news वाचण्यापेक्षा तो time pass फार better होता .."कोणताही जोड घ्या १० रुपये.." तो आम्ही किंमत न विचारताच, स्वत:हून म्हणाला .. ३-४ pair खरेदी केल्यानंतर सहजंच मी rates च comparison केलं म्हणजे same type ची कानातली मी जळगावला ५ रु जोड आणि FC रोडला २५-३५ रु जोड प्रमाणे पहिली होती .. तो salesman पुढे जाऊ लागल्यावर समोरच्या बाईंपैकी एकीने त्याला "शुक शुक.." शब्द नाही तर आवाज काढत त्याला हाक मारली ..बाहेरून सुशिक्षित आणि सभ्य वाटणाऱ्या लोकांच्या अशा 'असभ्य ' हरकती बघितल्या वर कळून चुकतं कि 'का आपला देश manners /etiquette ह्या बाबतीत मागे असावा ? ' , 'का 'समानते' सारख्या terms फक्त पुस्तकीच वाटतात?' ..प्रसंग छोटासाच पण जसा "One cause of many problems " statement, satisfy करणारा .असो .
एक विशेष गोष्ट म्हणजे मी स्वत:हून माझं cell phone switched off केलं आणि पुन्हा पेपर वाचायला घेतला ..काही चांगले लेख हि होते.. Govt वर्षाकाठी Indian Rail वर हजारो कोटी खर्च करणार ह्या वर editorial होतं .. त्यात इंग्रजांच्या काळात अगदी राजेशाही पद्धतीने food service उपलब्ध असलेल्या Calcutta Mail आणि Deccan Queen चं फार कौतुक केलेलं होतं .आणि त्याच सोबत सध्याची परिस्थिती compare केलेली होती..महत्वाचा मुद्दा असा होता कि , जर सरकार एवढा खर्च रेल्वे वर करणार आहे तर त्याचं proper utilization व्हावं आणि प्रवाश्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दयाव्यात . त्यावर लगेच टिपणी होती की ,फक्त पैसा खर्च करून उपयोग नाही तर Administration ,Check and Quality Control असावा; अन्यथा पैसा वाया जाणार . खरंय ,According to wikipedia content दररोज जवळपास १०,००० रेल्वे देशभरात धावतात, २४ दशलक्ष लोक रोज रेल्वेचा प्रवास करतात आणि २.८ दशलक्ष टन्स मालवाहतूक होते ती वेगळी ..एवढ्या सगळ्या गोष्टीं fluently चालण्यासाठी १.४ दशलक्ष लोक Indian Railway Services मध्ये काम करतात . एवढा मोठा पसारा शिस्तीत manage करण्यासाठी कडक Administration हवंच ..
दरवर्षी हजारो candidates , MBA च्या degree सोबत लोखोंची packages घेऊन private सेक्टर मध्ये किंवा देशाबाहेर नोकरीस जातात . Indian Railway Services मध्ये उच्च पदावर नोकरी पत्करली आणि त्यांना ज्ञात असलेले Classic Management Fundas इथे apply केलेत तर आपण २४ दशलक्ष लोकांना World Class Services provide करण्यापासून वंचित राहणार नाही .जसे की Pantry प्रमाणे एक डबा shops चा असेल .. म्हणजे पुढील station ची वाट न बघता गरजेच्या वस्तू Passengers ना railway तच मिळतील . Medical Services देखील long journey च्या trains मध्ये उपलब्ध असतील.
आपल्या देशात कोणतंही Administration आणि Development क्षेत्र घेतलं तरी पहिला मुद्दा "problem " च्या रुपात येतो तो-- "Population" चा! आणि Govt. ची नोकरी रटाळ आणि पैसा कमी म्हणून 'bright students' इकडे वळत नाहीत , पण त्यांनी ह्यात शिरून तेच काम challenging आणि innovative पद्धतीने केलं तर personal आणि social दोन्ही फायदे होतील .पुढे जाऊन system मध्ये बदल आणून ते पुढील पिढी साठी हे jobs well paid आणि Interesting बनवता येतील. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे...असो,
विषय भरकटण्याच्या आत पुढे सरकते ..
थोड्या वेळाने परत एक salesman मोठ -मोठ्याने ओरडत आला ; "१० रु.मे २ , देखने के लिये पैसे नही .." . त्याचं बोलणं लक्ष वेधाण्यासारखं होतं ( पोटाची गरज भागवण्यासाठी जेव्हा एखादा 'अशिक्षित ' कोणतही छोटं - मोठं साधन अवलंबवतो तेव्हा असली वाक्य 'आतून' च येत असावी , त्यासाठी MBA च्या degree ची आवश्यकता नाही ..) तरीही मी विशेष attention दिलं नाही पण समोरची बाई माझ्यासाठी 'model under observation' बनली होती .. ह्या वेळी देखील तिने त्याला त्याच पद्धतीने हाक मारली आणि वस्तू खरेदी केली .. बायका आणि shopping वरून उगीचच नाही लिहिलं जातं .. :-D
पुढे दादर ला उतरल्यावर कांदिवली पर्यंत local चा प्रवास adventurous होता . रविवार असल्याने तशी गर्दी कमी होती . काही कारण नसताना मुंबई ची craze असणाऱ्या मला local नि pass होणारं एक एक स्टेशनचं
नाव ही fascinating वाटत होतं .. आत जागा असतांनाही hero गिरी करत मुलं दारात उभे राहतात हे थोडं वेडपट वाटलं.
'गोराई'.वरून Essel World साठी बोटी सुटतात . रस्त्यापासून बोट board करण्यासाठी १०० एक मीटर चा pathway आहे . दोन्ही बाजूंना मासे , खेकडे विकणारे बसलेले असतात . माश्यांच्या वासाने स्वत:च्या नाकाचा बचाव करत पटपट चालत असताना देखील पाण्याबाहेर वळवळ करणारा जिवंत खेकडा बघण्याचा chance मी सोडला नाही . बोटीतून जात असताना संथ पाण्यात अचानक च वर येउन परत पाण्यात शिरणाऱ्या माशांकडे लक्ष गेल्यावाचून राहत नाही.
पुढे आत गेल्यावर भन्नाट मजा आली ...३६० degree फिरणारा पाळणा जेव्हा १८० ला जाऊन काही सेकंद थांबतो तेव्हा 'आपल्याला आपला जीव किती प्यारा आहे ', जाणीव होते .
परतीच्या वेळी pathway वरचे सगळे मच्छीवाले निघून गेले होते .. खराब किंवा उरलेले garbage रस्त्याच्या कडेला कुठे कुठे फेकलेले होते .प्रचंड नाका -डोक्यात जाणारा वास त्याची साक्ष होता .
दिवसाच्या शेवटी परत निघतांना marine drive ला जाणं possible न झाल्याने थोडा मूड off होता ,fast local असल्याने अगदी लिमिटेड stations ना train थांबत होती ; तेवढ्यात मागून "परदेसी परदेसी जाना नही .." गाण्याचा आवाज आला ; आवाजावरून कुणी मुलगी असावी, कळून येत होतं., उत्सुकतेने मी वळून मागे पाहिलं तर एक १०-१२ वर्ष वयाची मुलगी होती..चेहऱ्याने दिसायला ठीक-ठाक पण ,पण केस विस्कटलेले ; अंगावर फाटके कपडे आणि हातात बरंच काही सामान..तिच्या एकंदरीत पेहराव ती भिकारी असल्याची कबुली देत होता . संगीताच्या कोणत्याही criteria satisfy न करणाऱ्या तिच्या गाण्यात "हीच माझी duty आहे आणि ती केल्यावर माझं काम पैसे गोळा करणं असं आहे ", हा attitude मात्र स्पष्टपणे दिसून येत होता . समोर कोण लोकं आहेत वगैरे गोष्टी तिच्या खिजगिणतीत हि नसाव्यात ..गाणं संपल्यावर तिने पैश्यांसाठी हात पुढे केला , मी विचारांत असल्याने हातात आलेले सुट्टेच फक्त ठेवले,त्या कोवळ्या हातावर ..! आजूबाजूच्या सर्वच लोकांनी तिला झिडकारलं .पुढच्या स्टेशनला ती उतरली तेव्हा " बड़ा है कोई छोटा, नहीं मायूस लौटा । अमीरों का सहारा, गरीबो का गुजारा ।" हे तिचे बोल कानावर आले ..त्याच station ला उतरायचं हे तिला कुणी शिकवलं होतं कि, मग इतरांच्या अशा वागणुकीमुळे ती उतरली असणार ...? ती तश्या अवस्थेत खुश होती की, इतरांचा हेवा वाटत असावा तिला..? 'चांगल्याच्या' definition पासून अगदीच अज्ञात असावी की, माहित असावं आपण काय आहोत ते...? मनात आलं , आपण नशीबवान आहोत चांगले पालक , चांगली नोकरी , चांगले कपडे , अत्याधुनिक सूखसिविधा ही हाकेच्या अंतरावर ..पण मग त्या मुलीसारख्या अनेकांचं काय ..? एवढयाशा जीवाला काय काळात असावी -- दुनियादारी..,श्रीमंती आणि गरिबी ..?? अनेक प्रश्न निरुत्तरित राहिलेत..अजूनही आहेत ..
अशा वेळी पैशाचं महत्व फार प्रकर्षाने जाणवतं. भ्रष्टाचारात गुंतलेल्या १०% रकमेत ही संपूर्ण देशातल्या भिकार्यांची पोटं भरतील आजच्या स्थितीला..हे गणित समजण्यास कठीण नाही .
"Population आणि Awareness " मुद्द्यावर येउन विचारांची गाडी थांबली आणि लोकल देखील ..!!!
दादर ला उतरल्यावर शिवनेरीचं स्थानक शोधून १ तास वेळ रिकामा होता , स्टेशन वर बूट पॉलिश करण्यासाठी लोक पायातून तो काढून का देत नाही ..? कुणी आपल्या हातासमोर पाय धरून उभा आहे ,किती छोटेपणाची feeling येत असावी ..? पण लगेचच बूट पॉलिश करणाऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून बरं वाटलं . तरीही उच्च-नीच भेद मिटवण्यासाठी आपण हून अशा लोकांना आदराने वागवणं मला अधिक महत्वाचं वाटतं ..
पुढे दादर ला करोडो किंमती असलेल्या flats पैकी आपला हि एक असावा असा हेवा वाटला ..street food पुण्यापेक्षा छान वाटलं आणि स्वस्त पण . " कोणतंही काम छोटं नसतं ", हे मुंबई च्या छोट्या व्यवसायिकांकडून शिकण्यासारखं आहे ., पुण्यातल्या लोकांप्रमाणे त्यांच्यात so-called " माज / extra चा अभिमान " दिसून येत नाही ..
शिवनेरी स्थानकावरची वातानुकुलित प्रतीक्षा घर मुंबई च्या गरमीत फार आरामदायी वाटलं ..परतीचा प्रवास सुरु झाला.. पुढील वेळी marine drive for sure म्हणत .. कानात headphones टाकले आणि "Gunjasa hai koi iktara" ऐकत बाहेरची रोषणाई बघण्यात मन गुंग झालं .. एव्हाना फोन on झालं होतं ....!
-प्राजक्ता...
प्रतिक्रिया
18 Mar 2013 - 6:42 pm | पिलीयन रायडर
आता काही खरं नाही....
लेख चाळला.. मुंबई पुणे.. आणि खुप सारे इंग्रजी वर्डस...
मिपावर असं काही आलं की खुप फन येते..यु नो..
18 Mar 2013 - 11:07 pm | सानिकास्वप्निल
सहमत
21 Mar 2013 - 3:43 pm | प्राजक्ता..
असे 'इंग्रजी' शब्द 'मराठी'त लिहिलेले चालतात वाटते.
21 Mar 2013 - 4:38 pm | पिलीयन रायडर
ताई तुम्ही फार "सरला पित्रे - इनोसंट मन.. " आहात हो...
24 Mar 2013 - 12:47 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तपशीलात चूक आहे.
शांता शांता - इनोसंट मन । सरला पित्रे पर्मनण्ट पण ।।
असे आहे ते :-)
25 Mar 2013 - 1:39 pm | पिलीयन रायडर
आँ... असं काय हो.. तुम्ही माझ्या फिलिंग्स अंडरस्टँड करा ना.. हे असं तपशिल बिपशिल डाऊनमार्केट गोष्टींमध्ये शिरु नका..
25 Mar 2013 - 2:21 pm | प्यारे१
व्हॉट द हेल इज धिस 'तपशिल'?
25 Mar 2013 - 9:32 pm | आदूबाळ
"तप" आणि "शील" :)
18 Mar 2013 - 9:25 pm | निमिष ध.
दक्खन ची राणी आणि काही न खाणे ठरवले होते ... हे वाचले आणि पुढे काही वाचलेच नाही. ज्या गाडीसाठी रेल्वे नी खास खानपान सेवा ठेवली आहे तिचा असा सरळ अपमान! पुणे - मुम्बै प्रवासाचे सुख कशात आहे हे तुम्हाला कळलेच नाही.
18 Mar 2013 - 9:30 pm | मोदक
ऐसेच बोलताय.
त्या चेअरकार च्या लाकडी खुर्च्यांवर बसून कटलेट / ऑम्लेट आणि गाडीची लय सांभाळत मधूनच चहा / कॉफीचा एक सिप... सोबत लोणावळा खंडाळ्याचा निसर्ग,
इट्स हेवन ऑन द व्हील्स, यू नो.. ;-)
18 Mar 2013 - 11:57 pm | जेनी...
बरं झाल पाजुबाई तुमी इतके वींग्रजी शब्द दीलेत मंजी लिवलेत ..
इथं .. मिपावर येवडं विंग्रजी कुण्णा कुण्णाला येत नै बगा :-/
21 Mar 2013 - 3:47 pm | प्राजक्ता..
फक्त इंग्रजी शब्द मराठीत उच्चारता येतात अस दिसतंय.."यु नो / फन" हे बरे वापरायला येतात ..
21 Mar 2013 - 4:07 pm | बॅटमॅन
हे बाकी खरं हो पूजातै. मिपाकर अंमळ बुद्दूच म्हणायचे, युरोपआम्रिकेत जौनपण मराठीच बोलतात, इंग्रजी येतच नै ना म्हणून.डौन्मार्केट मेले ;) पण प्राजक्तातैंनी इतके इंग्रजी शब्द वापरून मिपाकरांना मोफत इंग्रजी शिकवलेय म्हणून बरं, नैतर कुणाचं खरं न्हवतं =))
21 Mar 2013 - 5:09 pm | प्राजक्ता..
♥ "Some say love is a feeling that lasts till death do us part. but I disagree. my love for you will
last beyond death, beyond earth, beyond the universe" ♥
23 Mar 2013 - 9:10 pm | जेनी...
=))
अय्या , पाजुबै ... कस्सं ओळ्खलं :)
अवो ते माझ्या एका मित्राने लिवुन दिलय बगा मला ...
म्हन्ला इथं सगळ्यांच्या सैत विंग्रेजी लिवलय :( तुला आडाणी , गंड भोप्ळा म्हण्तिल :-/
म्हुन दीलं त्यानं लिवुन :)
पण पाजुबै तुमच्या प्रतिक्रिया वाचुन तर वाटतय तुमाला येतंवो चांगलं मराठी ... म्ग कावुन मराठी संकेत स्थळाव विंग्रजी लिवताय :-/
19 Mar 2013 - 12:29 am | कपिलमुनी
छान आहे ..ओघवता आहे ...तारे जमीन पर मधे तो मुलगा एक दिवस भटकत घालवतो..तसा कहीतरी फील आला :)
बाकी
असणारच ...आमचं ओरीजीनल आहे ..
21 Mar 2013 - 3:50 pm | प्राजक्ता..
संपूर्ण लेख वाचून, भाषेवर टीका करणारा प्रतिसाद "न" दिल्याबद्दल..!
21 Mar 2013 - 3:56 pm | श्री गावसेना प्रमुख
आपल्याला सोयीचे ते वेचावे,
23 Mar 2013 - 9:30 pm | कपिलमुनी
भाषा हे फक्त माध्यम आहे .. विचार लेखाद्वारे लोकांपर्यंत पोचवण्याचे ..
लेखावर टीका योग्य आहे पण आशयाची चर्चा न करता फक्त भाषा वाचणार्याना 'फाट्यावर' मारा
19 Mar 2013 - 10:52 am | मनीषा
विचारांचा प्राजक्त बहरला आहे, आणि त्याच्या फुलांचा सडा पडला आहे असं काहीसं वाटलं.
छान आहे मुक्तचिंतन.
बाकी तुम्ही लकी बरं का, तुमच्याकडे सुट्टे पैसे होते त्या मुलीला देण्यासाठी....
अवांतर चौकशी : तुमचं सासर पुण्याचं का हो?
19 Mar 2013 - 1:13 pm | आदूबाळ
थोडी फुलं प्लॅस्टिकची वाटली...
21 Mar 2013 - 3:52 pm | प्राजक्ता..
पुढील वेळी फुले "नैसर्गिक" वाटण्यासाठी प्रयत्न केला जाईल..!
21 Mar 2013 - 6:01 pm | सूड
म्हणजे मिक्सरऐवजी पाटा वरवंटा का? बाकी तुमची भाषा म्हणजे काय वर्णावी.
30 Mar 2013 - 10:05 pm | नावातकायआहे
_/\_
21 Mar 2013 - 3:39 pm | प्राजक्ता..
भाषा नव्हे तर "संदेशावर/विचारांवर "अधिक लक्ष घातलंत..धन्यवाद!
=>अवांतर चौकशीचे उत्तर : नाही.
19 Mar 2013 - 11:43 am | मैत्र
OMG! Calling परा!
दुर्दैवाने मी इतका witty नाहीये या article वर perfect comment लिहिण्यासाठी!! ;)
19 Mar 2013 - 2:51 pm | अभ्या..
प्राजक्ताताइ तुमच्या पीए ला जरा मराठी शिकवा जरासे.
कसं होतं की तुम्ही आपलं सगळे व्याप सांभाळून सांगत जाता, पीएचे कीती हाल? त्याला हे कुठे प्रसिध्द करायचेय हे पण माहित नसणार. :(
21 Mar 2013 - 5:13 pm | प्राजक्ता..
पुढील वेळी तुमच्या कडे च देईन रुपांतराकरीता ..काळजी नसावी :)
21 Mar 2013 - 5:28 pm | अभ्या..
पीएच्या हालाची काळजी केली तर तुम्ही माझेच हाल करायला निघालात.
असो. तुमच्या व्य्स्त दिनक्रमातून वेळ मिळाला तर पाठवा. करुन देऊ रुपांतर, भांषातर जे काही असेल ते. :)
19 Mar 2013 - 3:23 pm | मृत्युन्जय
1. capacity
2. reservation
3. Illegally
4. seats
5. up -down
6. entity
7. relief
8. execute
9. entry point
10. Deccan Queen
11. newspaper
12. worldwide news
13. sales /services
14. headphones
15. (for a change)
16. option
17. Train
18. breakfast
19. seats
20. options order
21. Toast ,Bread omelet,
22. etc ..
23. food
24. order
25. newspaper
26. rape cases
27. crimes
28. depressing news
29. time pass
30. better
31. pair
32. rates
33. comparison
34. same type
35. FC रोडला
36. salesman
37. manners /etiquette
38. terms
39. statement, satisfy
40. cell phone switched off
41. Govt
42. Indian Rail
43. editorial
44. food service
45. Calcutta Mail
46. Deccan Queen
47. compare
48. proper utilization
49. Administration ,
50. Check and
51. Quality Control
52. According to wikipedia content
53. fluently
54. Indian Railway Services
55. manage
56. Administration
57. candidates ,
58. degree
59. packages
60. private
61. Indian Railway Services
62. Classic Management Fundas
63. apply
64. World Class Services provide
65. Pantry
66. shops
67. station
68. Passengers
69. railway
70. Medical Services
71. long journey
72. trains
73. Administration
74. Development
75. "problem "
76. "Population"
77. Govt.
78. 'bright students'
79. challenging
80. innovative
81. personal
82. social
83. system
84. jobs well paid
85. Interesting
86. salesman
87. degree
88. attention
89. 'model under observation'
90. shopping
91. local
92. adventurous
93. craze
94. local
95. pass
96. fascinating
97. board
98. pathway
99. chance
100. degree
101. pathway
102. garbage
103. possible
104. off
105. fast local
106. लिमिटेड
107. stations
108. train
109. criteria satisfy
110. duty
111. attitude
112. station
113. definition
114. "Population
115. Awareness "
116. feeling
117. flats
118. street food
119. so-called "
120. extra
121. for sure
122. headphones
123. on
स्त्रियांवर बलात्कार झाला तर त्या पोलिस चौकीत जाउन तक्रार नोंदवु शकतात. मराठीचा बलात्कार झाला तर काय करायचे कोणी सांगेल काय? मायमराठीच्या वतीने मीच तक्रार नोंदवुन येइन म्हणतो.
तद्दन टाकाऊ, भंगार, रद्दी लेख. मुद्दाम खोडसाळपणा केल्याचा जाणवतो आहे. संपादकांना हे कळत नाही आहे की कळूनही दुर्लक्ष करायचे आहे हे माहिती नाही. पण असले धागे वरचेवर येणार असतील तर मिपा हे प्रगल्भ संस्थळ नाही असे लोक म्हणायला लागले तर आश्चर्य वाटायला नको.
19 Mar 2013 - 3:30 pm | मैत्र
123 words शोधून टाईप करण्याच्या पेशन्स ला सलाम ;)
19 Mar 2013 - 4:31 pm | प्यारे१
शीर्षक र्हायलं मृत्यो! :)
21 Mar 2013 - 4:11 pm | दादा कोंडके
:)) :))
21 Mar 2013 - 4:59 pm | प्राजक्ता..
फार तसदी झाली नाही तुम्हाला शब्द शोधून काढायला .. फार जास्तीचा वेळ मोकळा दिसतो तुमच्याकडे . असो , धन्यवाद !
एक विशेष सल्ला : भाषेपेक्षा थोडं (अगदी थोडं बरं का जास्तं अपेक्षा नाहीच)..,"मुद्द्यावर" लक्ष घातलंत तर जरा बरं राहील --अर्थातच "तुमच्याकरीता " :-) !
21 Mar 2013 - 5:12 pm | मोदक
"मुद्द्यावर" लक्ष घातलंत तर जरा बरं राहील
मला खरच तुमचा मुद्दा कळाला नाही.
कृपया एका वाक्यात / थोडक्यात सांगता का..?
22 Mar 2013 - 10:47 pm | मोदक
....
23 Mar 2013 - 9:14 pm | यशोधरा
ओह! बट प्राज्क्ता, (हे चुकून लिहिलेलं नाहीये हां, म्हणजे मराठीत टायपो म्हणत्यात त्ये हे नव्हं. ह्ये म्हंजी कसं येकदम विंग्रजी उच्चार म्हन्त्येत ह्येला) ,व्हेर इज द मुद्दा?
संपादक मंडळ यांस - हे असले लेख आणि कदाचित त्याबरोबर अवतीर्ण झालेल्या आयड्या ह्यांचं एकदा लोणचं घाला की आता! वैताग येतो नाहीतर.. अति झालं असं व्हायला लागलं आहे पुन्हा एकदा. कृपया लक्ष घाला, ही नम्र विनंती.
25 Mar 2013 - 2:52 pm | मोदक
आपण दोघेही मुद्दा शोधत आहोत आणि या काकूंना लॉगीन करायला फुरसत् नाहीये..
आजचा रिमाईंडर मी देतो.. उद्याचा तुम्ही द्या. १०० झाल्यानंतर कदाचित या काकू उगवतील ;-)
24 Mar 2013 - 10:32 am | पैसा
आणि मुद्दाम शोधून पाहिले, यातल्या प्रत्येक इंग्रजी शब्दाला सुगम मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहे. अगदीच "अग्निरथगमनागमननिदर्शनपट्टिका" लिहायची गरज नाही. शिवाय अन्य कोणीतरी लिहिलंय तेही पहिल्या फटक्यात मनात आलं. मी गुगल क्रोम वापरते. त्यात एका एका शब्दासाठी भाषा बदल करणे भयंकर कठीण आहे. मुद्दाम त्रास घेऊन लिहिल्याचे जाणवत आहे.
24 Mar 2013 - 3:28 pm | ज्ञानोबाचे पैजार
1. capacity - क्षमता,
2. reservation - आरक्षण
3. Illegally - बेकायदेशीर
4. seats - आसने
5. up -down - ये जा, वर खाली,
6. entity - वस्तु
7. relief - विसावा, उसंत
8. execute - सफल, परिणीत, पुर्णत्वास गेलेला, कार्यान्वीत झालेला
9. entry point - प्रवेश व्दार, प्रवेश बिंदु,
10. Deccan Queen - दख्ख्न राणी
11. newspaper :- वर्तमानपत्र
12. worldwide news - जागतिक बातम्या
13. sales /services- विक्री/ सेवा
14. headphones - दुरवाणी - हेडफोन
15. (for a change) - कधी नव्हे तेव्हा , कधी नव्हे ते
16. option - पर्याय
17. Train - आगगाडी, झुकझुक गाडी, लोहपथयान,
18. breakfast - न्यहारी
19. seats - आसने
20. options order - पर्यायांची निवड केली, मागवले,order = आज्ञा
21. Toast ,Bread omelet, - टोस्ट, पाव, अंड्याची पोळी
22. etc .. इत्यादी
23. food - खाद्यपदार्थ, जेवण, खाणे
24. order - आज्ञा करणे, मागणी करणे
25. newspaper - वर्तमानपत्र
26. rape cases - बलात्काराच्या घटना
27. crimes - गुन्हे
28. depressing news - नकारात्मक बातमी, मनविषण्ण करणारी बातमी, क्लेशकारक बातमी
29. time pass - वेळ घालवणे
30. better - चांगला / चांगली / चांगले, सरस, श्रेष्ठ
31. pair - जोडी, युगल
32. rates - भाव, किंम्मत, दर
33. comparison - तुलना, तौलनीक आभ्यास
34. same type - सारख्या, समान, समसमान
35. FC रोडला - फ. कॉ. रस्त्याला, फ. म. रस्त्याला, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता
36. salesman - विक्रेता
37. manners /etiquette - शिष्टाचार, सभ्य वर्तणुक
38. terms - व्याख्या
39. statement, satisfy - वचन, वक्तव्य- सार्थ करणे
40. cell phone switched off - चलभाष बंद करणे
41. Govt - सरकार
42. Indian Rail - भारतीय रेल
43. editorial - संपादकिय
44. food service - खानपान सेवा, खाद्यसेवा
45. Calcutta Mail :- कलकत्ता मेल
46. Deccan Queen - दक्खन राणी
47. compare तुलना
48. proper utilization - योग्य उपयोग, सुयोग्य विनियोग
49. Administration , व्यवस्थापन
50. Check and तपासणी आणि
51. Quality Control - गुणवत्ता चाचणी,
52. According to wikipedia content विकीपिडियानुसार
53. fluently - सहजपणे, सुलभतेने
54. Indian Railway Services भारतीय रेल सेवा
55. manage - व्यवस्थापन, निर्वहन
56. Administration प्रशासन
57. candidates ,- उमेदवार
58. degree - पदवी
59. packages - पगार, वेष्टन
60. private - खाजगी
61. Indian Railway Services भारतीय रेल सेवा
62. Classic Management Fundas व्यवस्थापन शास्त्रांचे सर्वश्रेष्ठ नियम
63. apply - वापर करणे, आमलात आणणे
64. World Class Services provide जागतीक दर्जाचा सेवापुरवठादार
65. Pantry - मुदपाकखाना, स्वयंपाकघर
66. shops दुकाने
67. station स्थानक
68. Passengers प्रवासी
69. railway लोहपथ, रेल्वे
70. Medical Services - वैद्यकीय सेवा
71. long journey - लांबचा प्रवास
72. trains आगगाडी, झुकझुक गाडी, लोहपथयान
73. Administration प्रशासन
74. Development विस्तार, प्रगती
75. "problem " समस्या
76. "Population" लोकसंख्या
77. Govt. सरकार, प्रशासन, शासन
78. 'bright students' -तेजस्वी विद्यार्थी, हुशार विद्यार्थी
79. challenging - आवहानात्मक
80. innovative - नविन, नवे शोधकार्य, चाकोरीबाहेरचे, वेगळे
81. personal - वैयक्तीक
82. social सामाजिक
83. system - व्यवस्था
84. jobs well paid - चांगले उत्पन्न मिळवुन देणारी कामे
85. Interesting - कुतुहल,
86. salesman विक्रेता
87. degree पदवी
88. attention लक्ष
89. 'model under observation' - निरिक्षणाखाली असलेले प्रतिरुप
90. shopping - खरेदी
91. local स्थानीक
92. adventurous साहसी, प्रगल्भ
93. craze वेड
94. local स्थानीक
95. pass गमन, मागे टाकणे
96. fascinating - लुब्ध, संमोहीत,
97. board - पकडणे, चढणे, (फळीवर उभे रहाणे)
98. pathway रस्ता
99. chance मोका
100. degree अंश
101. pathway रस्ता
102. garbage - कचरा
103. possible शक्य
104. off - बंद
105. fast local जलद लोकल
106. लिमिटेड मर्यादीत
107. stations स्थानके
108. train आगगाडी, झुकझुक गाडी, लोहपथयान
109. criteria satisfy - निकषांवर उतरणे
110. duty - कर्तव्य
111. attitude दॄष्टीकोन
112. station स्थानक
113. definition व्याख्या
114. "Population लोकसंख्या
115. Awareness " जाणिव, ज्ञान, आत्मबोध
116. feeling भावना
117. flats - सदनीका
118. street food - रस्त्यावरचे खाद्यपदार्थ
119. so-called " तथाकथीत
120. extra जास्तीचे
121. for sure निश्र्चीत
122. headphones दुरवाणी - हेडफोन
123. on चालु
24 Mar 2013 - 4:03 pm | कवितानागेश
हेय्य शाब्बास! :)
24 Mar 2013 - 4:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार आणि उद्योग आवडेश. :)
-दिलीप बिरुटे
-
24 Mar 2013 - 6:40 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मिपाकरांना पार धन्द्यालाच लावले बाईंनी ;-)
24 Mar 2013 - 6:47 pm | श्री गावसेना प्रमुख
धंद्याला का वाटेला?त्या बहुतेक सुड उगवत आहेत
25 Mar 2013 - 2:29 pm | मनराव
आयला, शेकंड टाईम पण तेवढेच शब्द....
याला म्हणतात परफेकशन..(विंग्रजीत) ककाय ते.....
25 Mar 2013 - 3:11 pm | मृत्युन्जय
भले शाब्बास.
19 Mar 2013 - 4:27 pm | चावटमेला
अगागागा..
येवडं विंग्रजी म्हटल्यावर म्या अडान्याचा पास..
(अतर्क्यआंग्लभाषाअज्ञानशिरोमणि) चावटमेला
21 Mar 2013 - 4:32 pm | प्राजक्ता..
खरंय त्याशिवाय का हे अहिराणी"त आहे..!
तरीच म्हटलं तुमचा हा पत्ता "अंतर जाला" वर उघडतो कसा ??
21 Mar 2013 - 4:27 pm | प्राजक्ता..
येथील लोक "विचार" नाही तर भाषेला जास्त महत्व देतात ह्या शिवाय दुसरा काही प्रतिसाद असू शकत नाही . असो !
21 Mar 2013 - 4:31 pm | प्यारे१
पूर्ण वाक्य मराठीत लिहीता आलं ना काकू?
हेच्च वर लेखात देखील अपेक्षित होतं. सोप्पं आहे ना?
अवांतरः आपला खरा आयडी काय हो? ;)
21 Mar 2013 - 4:35 pm | मृत्युन्जय
आयला प्यारे त्यापेक्षा तुमचा पुढचा आयडी काय असेल ते विचार की.
25 Mar 2013 - 3:12 pm | नानबा
अहो प्राजक्ता बाई, मिसळपावचं धोरणच मुळात "मराठी अंतरंग, मराठी अभिव्यक्ती" असं आहे. मग लोकांनी मराठीला जास्त महत्व दिलं तर यात त्यांचं काय चुकलं? की आता सगळ्यांनी मिपाला सुद्धा इंग्रजाळलेल्या मराठीने नासवून टाकायचं?
21 Mar 2013 - 4:47 pm | पिलीयन रायडर
ए आता बस ना राव.. मजा गेली..
आणि नसेल तर..
ताई / दादा (आजकाल काळजी घ्यावी लगते फार...) तुम्ही मराठी आहात.. म्हणजे जेवढे इंग्रजी शब्द तुम्ही वापरले आहेत त्याचे बहुतांश मराठी प्रतिशब्द तुम्हाला माहिती असणार.. मग तुम्ही ते का नाही वापरत? मराठी माणुस असे करु लागला तर मग मराठी भाषेला काय किंमत राहणारे? तुम्ही अशुद्ध.. चुकीचे व्याकरण असलेले पण लिहिलं असतं ना तरी लोकांनी कौतुकच केलं असतं.. पण मराठी संस्थळावर येऊन इतकं इंग्रजाळलेलं लिहीता आणि वर तिकडे दुर्लक्ष करुन लोकांनी तुमच्या "विचारांचे" कौतुक करावे अशी अपेक्षा ठेवता? तुम्हाला तरी हे योग्य वाटते का?
अशी भाषा दुर्लक्षुन चालत नसतं.. तिच्या मुळेच तुम्ही तुमचे "विचार" मांडु शकलात ना?
21 Mar 2013 - 5:12 pm | तुषार काळभोर
हा लेख वाचल्यावर माझ्याही कपाळावर आठ्या उमटल्या होत्या.
पण नंतर जेव्हा त्याविषयी विचार करत होतो, तेव्हा उगाच असे वाटले की, लेखिकेने मुद्दाम पात्रांमधील व स्वतःमधील सामाजिक अंतर अधोरेखित करण्यासाठी अशी भाषा वापरली असावी.
म्हणजे लेखिकेला भेटणारी सर्व पात्रं ही समाजाच्या सर्वात खालच्या थरातीला आहेत.
उदा. रेल्वेतला विक्रेता, मासेविक्रेते आणि शेवटी ती गाणी गाऊन पैसे मागणारी मुलगी.
तर लेखिका ही उच्चभ्रू, इंग्रजीवर प्रभुत्व असणारी (किंवा इंग्रजीचं तिच्यावर प्रभुत्व असणारी), एक्सेल वर्ल्ड वगैरे मध्ये जाणारी, डेक्कन क्वीनच्या खानपान सेवेला नाकं मुरडणारी, विविध क्षेत्रांमध्ये (उदा. रेल्वे)कशा सुधारणा व्हायला हव्यात हे सुचवणारी, इत्यादी आहे.
हा जीवनशैलीतील परस्परविरोध अधोरेखित करण्यासाठी लेखिकेने अशी भाषा वापरली असावी.
बाकी चालू द्या...
21 Mar 2013 - 5:14 pm | बॅटमॅन
तत्वतः असे म्हण्ण्यात अडचण दिसत नसली तरी लेखिकेस स्वतःला तसे म्हणायचे होते काय याबद्दल खुद्द लेखिकेकडूनच काही स्पष्टीकरण आल्यास आवडेल. अन्यथा बेनेफिट ऑफ डौट अनाठायी तर जाणार नै ना अशी आपली एक शंका आली ;)
21 Mar 2013 - 5:19 pm | अभ्या..
पैलवानबुवा, एस्सेल वर्ल्ड म्हणा नायतर एक्सेल वर्ड तरी म्हणा. ;)
प्राजक्तातैना सगळे म्हाईत आहेत. :)
21 Mar 2013 - 5:36 pm | तुषार काळभोर
त्याचं काये नं ...
आताच मोदकबुआंचं एक्सेल वाचून आलो होतो...म्हणुन जरा माझी tongue slip झाली.
रच्याकने..
एक शब्द इंग्लिश आन् एक मराठीत टाईपनं लई औघड है..
21 Mar 2013 - 6:39 pm | अधिराज
सुरेख रीतीने भावना व्यक्त केल्या आहेत या लेखात. By the Way, तुमची mother tongue कोणती हो ताई?
21 Mar 2013 - 7:26 pm | नाना चेंगट
हम्म.. कोणतीही भाषा वापरली तरी संपादक लक्ष देत नाहीत हेच खरं
23 Mar 2013 - 9:06 pm | पैसा
म्हणजे हे article तुम्ही लिहिलंत की काय?
22 Mar 2013 - 10:13 pm | jaypal
फिकर नाट. आमच्या सोकाजीरावांकडे त्याच औशध आहे. ३० मिनीटात फाडफाड ईंग्रजी. :-)
24 Mar 2013 - 7:22 am | धमाल मुलगा
आयशपथ सांगतो, आख्खा लेख वाचला. हो हो..आख्खा! मग मला प्रश्न पडला की च्यायला मी नेमका मिपावरच आलोय ना? कारण मिपाचं ब्रिदवाक्य काय? तर "मराठी अंतरंग - मराठी अभिव्यक्ती" ..
मिसळपाव डॉट कॉम हे मराठी माणसाच्या अभिव्यक्तीचे मुक्त व्यासपीठ आहे. सदरहू लेख वाचताना नक्की कळेना की मी मराठी अभिव्यक्तीसाठी जन्माला आलेल्या अस्सल मराठी संकेतस्थळावर आलोय की की फेसबुक/ऑरकुटाच्या कुठल्या तद्दत धेडगुजरी चिंधोट्या पानावर आलोय. अरे, मराठीत लिहायचंय, मत्/विचार मांडांयचेत तर मिपावर यावं, एव्हढं इंग्रजी फिस्कटायचंय तर अनादर सबकॉन्टिनेट पडलंय की उताणं.
बरं, सदरहू लेखाची लेखिकेचं म्हणणं काय तर म्हणे, "लब्जों में क्या रख्खा है, भावनाओं को समझो"
आयला, लेख वाचल्यानंतर डोक्यात उभी राहिलेली पहिली प्रतिक्रिया म्हणजे, ह्या लेखाची लेखिका "सेंट अॅन्ड्यु'ज किंवा सेंट हेलिना'ज" सारख्या तत्सम मिशनरी शाळेतली यत्ता सहावी मध्ये शिकत असावी, अन नुकतीच तिच्या शाळेची सहल एस्सेल वर्ल्डला जाऊन आली असावी. त्याचसंबंधीचा हा निबंध, "यु नो, विथ राज ठाकरे, इव्हन आय ऑल्सो सपोर्ट्स मराठी' पठडीतून चुकून माकून मायमराठीत लिहिण्याच्या प्रयत्न असावा असं वाटायला लागलंय. (वाटायला काय जातंय हो, ना पाटा माझ्या मालकीचा, ना वरवंटा!)
बाकी, प्राजक्ताबाईंचा भाषेविषयीचा अ-लवचिकतापुर्ण नूर पाहता त्यांच्याआधी मिपाचे सदस्य झालेले एकूणएक २२०१२ (अक्षरी:बावीस हजार बारा ) सदस्य एक नंबरचे बिनडोक असावेत म्हणून ते फेसबुक, ट्विटर, ऑरकुट आणि तत्सम काय काय 'ग्लोबल एक्सपोजर' असणार्या सायटी सोडून इथं मराठीत आपली मतं मांडायला झक मारत आलं असं वाटायला लागलंय.
असो! कालाय तस्मै नमः!
एकतर माझे माझेच विचार चुकतायत, किंवा मी आता पक्का म्हातारा तरी झालोय. :D
24 Mar 2013 - 9:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> एकतर माझे माझेच विचार चुकतायत,
आपले विचार चुकत आहेत. आपण खंडोबाच्या यात्रेत भेटलो होतो तेव्हा आपलं काय ठरलं होतं की लिहिणार्याला प्रोत्साहान द्यायचं आणि एखादा चूकत असेल तर थेट टीका न करता व्य.नि.किंवा खरड करायची, विसरला वाटतं.
>>> किंवा मी आता पक्का म्हातारा तरी झालोय.
माणूस तरुण तरी किती वर्ष राहू शकतो. ;) (पळा आता)
-दिलीप बिरुटे
24 Mar 2013 - 10:08 am | धमाल मुलगा
मेलो तिच्यायला!
आय माय स्वारी गुर्जी! बरं झालं आठवण करुन दिलीत. बेलभंडारा उचललेला त्याची यादच नाही राहिली. ;)
पण आपण सहिष्णू आहेत हे जरी खरं असलं तरी सहनशक्तीची काही सीमा तरी असली पाहिजे की नाही? भाचुत, आपण सगळ्यांनी 'मोकलाया दाहि दिशा' स्विकारलं...अगदी जिंदादिलीनं स्विकारलं! पण इथं मुजोरपणा नडतोय हो. म्हणोन. बाकी, अजवर आपण कुण्या नवख्याला कधी टोचलंय? :)
म्हातारपणाविषयी नि:संशय सहमत! अमरपट्टा घेऊन आलंयच कोण? :) आमचे गुर्देव दादा कोंडके म्हणायचे, : हैस तरुन तोवर घ्ये करुन" तोच प्रयत्न चाललाय म्हना की. आजून गडबड उडतिय खरं, पण घिऊ की सांभाळून. :)
24 Mar 2013 - 10:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> आपण सहिष्णू आहेत हे जरी खरं असलं तरी सहनशक्तीची काही सीमा तरी असली पाहिजे की नाही? भाचुत, आपण सगळ्यांनी 'मोकलाया दाहि दिशा' स्विकारलं...अगदी जिंदादिलीनं स्विकारलं! पण इथं मुजोरपणा नडतोय हो. म्हणोन. बाकी, अजवर आपण कुण्या नवख्याला कधी टोचलंय?
स्सही रे स्सही.
-दिलीप बिरुटे
(धमाल मुलाच्या जिंदादिलीचा फ्यान असलेला )
25 Mar 2013 - 9:11 am | इरसाल
हिंदु धर्म तर राहीला नाही वर नव्या* सदस्याला चार शांत क्षण जगु देवु नका तुम्ही .......काय्य ?
24 Mar 2013 - 9:43 am | नानबा
लेखापेक्षा त्यावरच्या प्रतिक्रिया वाचून ह.ह.पु. :)) :))
लेख उत्तम, पण प्रांजळ(इंग्रजीत फ्रँकली कि काय ते) मत, की इंग्रजी शब्दांच्या ऐवजी मराठी शब्द वापरले असते तर जास्त मजा आली असती.. असो.. लेखिका बॉम्बे स्कॉटिश किंवा तत्सम फाडफाड इंग्लिश फाडणार्या शाळेत शिकलेल्या असाव्यात...
24 Mar 2013 - 5:37 pm | तिमा
कवियत्री प्राजुताई वायल्या का ? क्षणभर गोंधळ झाला.
24 Mar 2013 - 5:41 pm | यशोधरा
हो, हो प्राजू वेगळी.
24 Mar 2013 - 6:44 pm | तुमचा अभिषेक
जर ईंग्लिश शब्द रोमन लिपित न लिहिता देवनागरी लिपित लिहिले असते तर कदाचित तितकेसे जाणवलेही नसते.
मुंबईकरांना तरी नक्कीच नाही.
25 Mar 2013 - 9:02 am | ५० फक्त
असले लेख यायला लागले तर मिपाचं मुक्तपीठ व्हायला वेळ लागणार नाही, मा. संपादक मंडळ ' म्हातारी मेल्याचं दुखः नाही, काळ सोकावतो आह' थोडं लक्ष घालावं ही नम्र विनंती
लुनावाले ब्रम्हे....
25 Mar 2013 - 1:44 pm | दादा कोंडके
मुक्तपीठ नाही हो. मुतपीठ. :)
-भटासी भट
25 Mar 2013 - 2:51 pm | प्रसाद गोडबोले
हेच म्हणतो !
वैसे लेख मैने वाच्याच नै , और वाचता तोभी प्रतिसाद हाच देत्या.
25 Mar 2013 - 1:38 pm | अद्द्या
च्यामारी
आम्ही इथे मराठी चांगलं नाही म्हणून लिहित नाही
आणि हे . .
असो . .
काही विषय नवता .
वाटलं तरी नाही
बाकी
गाणं चांगलं आहे ते
25 Mar 2013 - 2:20 pm | छोटा डॉन
लेख खरोखर ओके ओके (ठिकठाक हा पर्यायी शब्द आहे पण तो थोडासा अतिरंजित वाटतो, म्हणजे असं की मोजपट्टीवर ठिकठाकपेक्षा थोडासा वारचाच आहे, अगदी अचूक पर्यायी मराठी शब्द तूर्तास सुचत नाही, असो) आहे.
बहुसंख्य प्रतिसाद हे इंग्रजीच्या अतिवापराबद्दल आहेत, बहुसंख्य वेळी आपण ज्या भाषेत विचार करतो तीच भाषा कागदावर किंवा बोलण्यातुन अगदी सुलभतेने येते, त्यात अपराधी वाटण्यासारखे खास सिरियस असे काही नाही, चलता है. मात्र हे प्रतिसाद आपण सकारात्मक दृष्टीने घेऊन पुढील लेखात योग्य तो बदल दाखवल्यास परस्पर फिट्टंफाट होईल, कसे !
पुलेशु ...
- छोटा डॉन
25 Mar 2013 - 10:37 pm | शिल्पा ब
यापेक्षा त्या कंजुष आजोबांच्या भटकंतीचे लेख बरे !
28 Mar 2013 - 6:42 pm | निनाद मुक्काम प...
असाच उचक पाचक करत असतांना राज कुमारांच्या खरड वहीत पोहोचलो
तेथे एका धाग्यावर त्यांना आमंत्रण धाडण्यात आले होते , व लिंक दिली होती.
मी पूर्वाश्रमीच्या अनुभवाने ह्या धाग्यापेक्षा प्रतिसाद वाचणे मस्ट म्हणजे must आहे
अशी खात्री झाली , व धागा न वाचता पहिले प्रतिसाद वाचले ,
अपेक्षा भंग झाला नाही ,
मिपाकरांच्या मिपावर लेखन करतांना असणार्या अपेक्षा रास्तच आहेत ,
लेखिकेने त्यावर निर्णय घेऊन आपले लिखाण करण्याचा तिचा हक्क सुद्धा रास्तच आहे ,
लक्षवेधी पदार्पण
एवढेच ह्या लेखा विषयी मी मत व्यक्त करतो
लेखिकेने तिच्या लेखनाच्या शैलीचा तिचा खास चाहता वर्ग निर्माण केला आहे ,
आता त्यांचे प्रतिसाद तिच्या लेखनावर तिने जर तिची लेखनाची शैली बदलली नाही तर गृहीत धरावेत ,
29 Mar 2013 - 12:47 am | कवितानागेश
कॉलिन्ग प्यारे१. :)