दुल्हेराजा....

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
16 Mar 2013 - 2:43 pm

गोविंदाचा दुल्हेराजा मी नक्की किती वेळेस पाहिला असेल ह्याचीही नोंद ठेवणं सोडून दिलय. हा चित्रपट म्हणजे जितेंद्रचा कसा "हिम्मतवाला" हा आयकॉनिक चित्रपट होता; "ब्रँड-जितेंद्र" हा दृढमूल कलडरणारा आणि ती क्याटेगरी ठसठशीत मांडणारा होता; तसाच "ब्रँड गोविंदा" स्पष्ट, लख्ख मांडणारा म्हणजे दुल्हेराजा.
.
दुल्हेराजा म्हणजे गोविंदा -रविना नायक - नायिका असा लक्षात राहण्यापेक्षाही चटकन आठवेल तो कादर खान- गोविंदा ह्यांची जुगलबंदी म्हणूनच. "अक्खियों से गोली मारे" हे हिट्ट गाणं असेलही; पण सोबतीलाच चित्रपटात धमाल येते "सुनो ससुरजी..." गाण्याच्या आधी आणि आसपासच्या वेळात ज्या काही उचापती आणि चढाओढ कादर खान - गोविंदा ह्यांच्यात चालते ;त्यावरून.
.
आख्ख्या चित्रपटात फारसे "पाहून अंगावर काटा आला", किंवा "विचार करायला लावणारा प्रसंग आहे" असे म्हणायला लावतील असे प्रसंग जवळपास नाहितच. पण "फुटलो", "हैट आहे साली." ,"ह्ही ह्ही ह्ही ....ओ ह्हो ह्हो ह्हो..ह्ये ह्ये ह्ये" असे करुन ठो ठो हसवणारे प्रसंग मात्र चिकार. किंबहुना अशा धमाल गोष्टींची मालिका म्हणजेच दोन अडिच तासाचा हा चित्रपट. विनोदाचं "टायमिंग" हा शब्द शिकायचा असेल तर हे अडीच तास तुमच्यासाठी वस्तुपाठ असतील.

.
दिवसभर फार काम झालय; आता बराच थकवा आलाय. डोक्याला फार ताण नकोय; चार घटका थोड्या हसत्या खेळत्या वातावरणात जाव्यात म्हणून वेळ घालवण्यासाठीचं औषध म्हणून टी व्ही वर "ये ढाबा गिरा के रहूंगा" म्हणणारा कादर खान दिसला तर च्यानल बदलू नकाच. पहाच्.दोन चार तासानी थकवा कुठल्याकुठं गेल्यासारखा वाटेल. एकदम हल्क्या फुलक्या मूडमध्ये तुम्ही आलेले असाल.
.
चित्रपटात दे दणादण अशी मारामारी नाही. जी आहे तीसुद्धा विनोदी बाजानच घेतलेली; एकूणात सगळ्या मूडला साजेशी. रिक्षावाल्याशी व्हिलन मोहनिश बहलचे भांडण झाल्यावर मोहनिशचे कौतुक करत करत त्याचा गेम घेणारा गोविंदा क्लास; तो प्रसंग लिहिणारा कादर खान सुप्पर क्लास.
.
कुठल्याही क्लायमॅक्सला हिरोइन्-पळ्वणं; किडनॅप वगैरे प्रथेनुसार ह्यातही आहे; पण इथे त्यानंतरची अपेक्षित दण्णादण्णी हिरो करीत बसत नाही. तो पुन्हा डोक्यानंच काम घेतो. लोकप्रिय होण्यासाठी अजून काय हवं? पिक्चर हिट्त आहेच. पण एरव्ही गोविंदा आणि गँगवर होनारा थिल्लरपणाचा किंवा ओंगळवाणेपणाचा आरोप इथे तितका प्रखर रहात नाही."सरकायल्यो खटिया जाडा लगे" गाण्याचा आणि शक्तीकपूरच्या गेंगाण्या आवाजातला "राजाबाबू आ गये" हया विचित्र सवयीच्या राजाबाबू किंवा तत्सम इतर चित्रपटांइतकं ह्यात ओंगळ्वाणेपणा नाही.आहे तो वेळ छान जाण्यासाथी निव्वळ विनोद.
ह्याला कुणी थिल्लर, बाष्कळ म्हणतही असेल. किंवा "उच्च दर्जा नसलेलं" असं म्हणतही असेल. पण भेळ खाताना आपण "मस्त लागतिये आंबट गोड, तिखट जाळ " म्हणत खातोच की. भेळेमध्ये पोषणमूल्यं आपण शोधत नाही.
.
कित्येक कलांमध्ये "अभिजात सादरीकरण", किंवा "अभिजात कला" असा काहीतरी प्रकार असतो. पण तसाच "लोककला " हाही प्रकार असतो. तो बहुसंख्यांशी घट्ट नाळ जोडून असतो.त्याच धर्तीवर कधी "अभिजात चित्रपट" अशी कधी यादी पुन्हा बनवायची झालिच तर त्यात दुल्हेराजा येणार नाहिच; तो "लोकचित्रपट" ह्या प्रकारात नक्कीच येइल लोककलांत सारच कसं रांगडं; ठसठशीत, ठाशीव असतं; सूचक,सौम्य असा बाज त्यात नसतो. तसाच मोकळेपणा अगदि कॅरेक्टारायझेशनपासून ते चित्रीकरणापर्यंत तुम्हाला ह्यात सापडेल.
.
गोविंदा डान्सर म्हणूनही चित्रपटात मानला जातो. पण रूढार्थानं त्याचं नृत्यकौशल्य,चापल्या,लवचिकता हृतिक-प्रभुदेवा ह्यांच्या जवळपासही जात नाही. तितकी चपळता त्याच्या नृत्यात दिसत नाही. मग तो काय किंवा "मेरे पिया गये रंगून " मध्ये रमून जाणारे मास्टर भगवान काय किंवा "छोरा गंगा किनारेवाला" मध्ये नाचणारा अमिताभ काय ह्यांचा पडद्यावरचा गाण्यातला वावर इतका जनप्रिय का ठरतो. कारण तेच :- ते जे करतात त्यात समरसून करताना दिसतात. गोविंदा ड्यान्स करताना स्वतः अगदि कम्फर्टेबल असतो. नृत्याचा तो आनंद घेतो. त्यामुळे ही मंडाळी फारशा शारिरिक कवायती नृत्यात करताना दिसली नाहित तरी ते पाहताना छान वाटते. ते गाण्याच्या लयीत जणू सामावून जातात. आम पब्लिकला त्यांच्या ह्याच गोष्टी जवळच्या वाटत असाव्यात.
प्रभुदेवा किम्वा हृतिक किम्वा हल्लीच्या DID मध्ये येणार्‍या पब्लिकच्या मानानं त्याच्या शारिरीक कवायती तितक्या दिसत नाहित. असे आम्ही म्हणतो तेव्हा गोविंदाला ड्यान्स येत नाही असे आमचे म्हणणे नाही. लय आणि ताल त्याच्या अंगात चांगल्यापैकी भिनले आहेत हे मान्य आहे. उलट त्यामुळेच ड्यान्स करताना त्यात तो शोभून दिसतो; विजोड्,बोजड विचित्र वाटत नाही.(विजोड बोजड ड्यान्स चा नमुना पहायचे असल्यास अभिषेक बच्चन, राज बब्बर ह्यांची काही गाणी पहावीत. ताल भिनला नसल्याने ते त्यात अवघडल्यासारखे वाटतात. )
.
तुम्ही अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल तर आवर्जून पहा. एकदा पाहिला असेल; तर पुन्हा एकदा पहा आणि मूड मस्त हल्का फुल्का करुन घ्या.

टिप :- दुल्हेराजा आणि राजाबाबू हे वेगळे चित्रपट आहेत. दुल्हेराजा गोविंदा- रवीनाचा तर गोविम्दा-करिश्माचा जोडिचा राजाबाबू.
असेच फुल टू धमाल अजून काही चित्रपट म्हणजे दीवाना मस्ताना, साजन चले ससुराल , हिरो नं १ वगैरे.
पण फारसा ओम्गळवाणेपणा नसलेले दोनच सध्या आठवताहेत :- दीवाना मस्ताना व दुल्हेराजा. त्यामुळे इतरांची नावं घेतली नाहित.

--मनोबा

चित्रपटप्रकटन

प्रतिक्रिया

तुमचा अभिषेक's picture

16 Mar 2013 - 2:51 pm | तुमचा अभिषेक

गोविंदाबद्दल लिहिले त्याबद्दल सर्वप्रथम अभिनंदन.
विनोदाचे जबरद्स्त टायमिंग म्हणून ओळखला जाणारा हा नट मात्र....
एकेकाळचा माझा आवडता रोमॆंटीक हिरो.

त्याचे आवडलेले चित्रपट किंवा असे म्हणूया ज्या चित्रपटात तो आवडला असे चित्रपट - हत्या, खुदगर्ज, इल्जाम, मरते दम तक, जैसी करणी वैसी भरणी... वगैरे वगैरे...

आणि त्याची ती गाणी - मै आया तेरे लिये....... मै से मीना से ना साकी से...... मै प्यार का पुजारी.... चलो चले कही दूर चले प्यार के लिये ये जगह ठिक नही.... वो कहते है हम से ये उमर नही है प्यार की नादान है वो क्या जाने, कब कली खिली बहार की... वगैरे वगैरे...

मन१'s picture

16 Mar 2013 - 2:56 pm | मन१

गॅम्बलर आणि हम मधल्या त्याच्या भूमिकाही मला आवडल्या. खुदगर्ज आठवत नाहिये नीटसा.

तुमचा अभिषेक's picture

16 Mar 2013 - 3:09 pm | तुमचा अभिषेक

मी वर सांगितलेले चित्रपट हम आणि गँबलर वगैरेच्या बरेच आधीचे.. मी तेव्हा खूप लहान होतो, इतका की मला मिथुन आणि गोविंदामधील फरक नाही कळायचा आणि दोघेही आवडायचे... नंतर त्याचे वयही वाढले आणि तो ढोल्या ही झाला..

खुदगर्ज हा खरे तर जितेंद्र आणि शत्रूचा चित्रपट - दुनिया मे लोगो सबकुछ है मिलता, मिलती नही है दोस्ती, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी... कधी लागला टीव्हीवर तर चुकवू नका.. चांगला चित्रपट आहे.. आपला चॉकलेट हिरो गोविंदा यात बराच नंतर म्हणजे जितेंद्रचा मुलगा म्हणून दाखवलाय..

तुषार काळभोर's picture

22 Mar 2013 - 4:34 pm | तुषार काळभोर

स्वर्ग, शोला और शबनम
गाणी: तू पागल प्रेमी आवारा, नीलमबरोबरची गाणी

तुमचा अभिषेक's picture

25 Mar 2013 - 10:01 pm | तुमचा अभिषेक

शोला और शबनम क्लासच... त्यातला अनुपम खेर सुद्धा खास लक्षात राहतो.. आणि तो गर्ल्स होस्टेल मधील सीन.. गालावर किसचे निशाण वाला.. आणि गोविंदाचा डायलॉग.. अपनी चोरी पकडी गयी है डार्लिंगवाला.. विनोदाचा टायमिंग बाप आहे या माणसाचा..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2013 - 4:55 am | निनाद मुक्काम प...

भी
मनातले बोलला
गोविंदा ,चंकी आणि मिथुन मधील फरक कळायचा नाही ,
गोविंदा व नीलम हे खरे कॉम्बिनेशन्स
पुढे दिव्या मग करिश्मा , व मग रवीना अश्या जोड्या झाल्या
पण नीलम ची सार नाही ,
दिव्या सोबत पहिलाच सिनेमा हिट होता ,
नीलम सोबत चे सिनेमे व गाणी जी अभी ने उल्लेख केला ८६ ते ८९ मधील
तो काळ बॉलीवूड च्या इतिहासातील सर्वात भिकार काळ होता ,

दाउद च्या पैशावर समांतर बॉलीवूड निर्माण झाले त्यातील बिनीचा शिलेदार गोविंदा
दुबई मध्ये नियमित येणे जाणे
मराठी ,हिंदी ,पंजाबी , सिंधी ,गुजराती भाषेवर कमालीचे प्रभुत्व
माझ्याशी तो नेहमी मराठीतून बोलायचा
म्हणजे सन एंड संड मध्ये जेव्हा इंटर शिप करत होतो तेव्हा अर्धे बॉलीवूड तेथे काम किंवा शुटींग नसेल तर पडले असायचे तेव्हा त्यांची नियमित सरबराई करणे वयाच्या १९ व्या वर्षी आमच्या नशिबी होते .
तो जेकी श्रॉफ हे मराठीतून बोलायचे
जेकी चे मराठी धेडगुजरे म्हणजे माझ्या मराठी शुद्ध लेखनासारखंच
मात्र ह्याचे अस्स्खलित होते.
आमच्याशी एवढा आपुलकीने संवाद साधायचा कि सगळ्यांचा तो आवडता होता ,
मात्र पक्का बेरका
तुमच्याकडून एखादी गोष्ट हॉटेल च्या नियमात बसत नसेल तर गोड बोलून करून घेणारा होता.
ह्यावर एका पत्रकाराने फार सुंदर वाक्य आम्हाला सांगितले
जेव्हा हे बॉलीवूड वाले तुमच्याशी फार प्रेमाने ,अगत्याने वागतात , तेव्हा समजा तुम्हारी शामत आई हे. ,
माझा आवडता सिनेमा हत्या
त्या लहान मुलासाठी , सिनेमाच्या कथेसाठी व गोविंदा व नीलम साठी कधीही पाहिलं .

अप्पा जोगळेकर's picture

16 Mar 2013 - 2:55 pm | अप्पा जोगळेकर

दुल्हे राजा आणि दिवाना-मस्ताना हे काही सर्वोत्तम विनोदी चित्रपटांपैकी आहेत.
गोविंदा हा जबरदस्त एन्टरटेनर आहे यात वाद नाही.

अभ्या..'s picture

16 Mar 2013 - 3:37 pm | अभ्या..

मनराव काय पिक्चर आठवला हो. लैच जबरा. टोटल एंटरटेन्मेन्ट =)) =))
चार चार गॉगल बदलत बोलणारा गोंद्या, गलत मिसालवाला जॉनी लिव्हर, नंगा नहायेगा क्या वाला प्रेमचोप्रा आन खानदानी गवय्या कादरखान ही गँग लैच भारी.
पोली अधिकारी अजगरसिंगच्या बायकोला बुरखा घालून भेटायला आणि हाताने सापाचा फणा दाखवून 'वो है क्या जी' विचारणारा गोविंदा. =)) =))
कितीही वेळा बघितला तरी अजून मिळेल तेंव्हा बघणारच दुल्हेराजा.

पैसा's picture

16 Mar 2013 - 10:08 pm | पैसा

माझा पण भयंकर आवडता सिनेमा. अभ्याने म्हटलेल्या सगळ्या गोष्टी तर आहेतच. पण कादरखान आणि गोविंदाची जुगलबंदी अफलातून आहे!!

यसवायजी's picture

16 Mar 2013 - 10:39 pm | यसवायजी

'कहां राजा भोज' मस्त आहे.

मै शक्कर की बोरी, तू है गुड की बेली.... किंवा, छचुंदर के सरपे ना भाए चमेली.. :)
लै टैम्पास मुवी हाय..

मन१'s picture

20 Mar 2013 - 10:04 pm | मन१

सर्व वाचकांचे आभार

वेळ मिळाला की सिनेमा बघण्यात येईल. काहीतरी टाईमपास असणार असं दिसतय. गोविंदाचा एकही सिनेमा पाहिल्याचं आठवत नाहीये किंवा एखादा पाहिला होता......एका सिनेमात दोन बायका की काहीतरी असतं. जाऊ द्या! हा शिनेमा पाहते आता.

तुषार काळभोर's picture

22 Mar 2013 - 4:45 pm | तुषार काळभोर

o_O o_0
>:O
>:O

रेवती's picture

22 Mar 2013 - 7:31 pm | रेवती

काय हो काय झालं?

तुषार काळभोर's picture

22 Mar 2013 - 8:02 pm | तुषार काळभोर

ऑ!!!
"वेळ मिळाला की सिनेमा बघण्यात येईल. काहीतरी टाईमपास असणार असं दिसतय. गोविंदाचा एकही सिनेमा पाहिल्याचं आठवत नाहीये किंवा एखादा पाहिला होता......एका सिनेमात दोन बायका की काहीतरी असतं. जाऊ द्या! हा शिनेमा पाहते आता."
o_O

पैलवानसाहेब, त्यावाचून माझं काही अडलंही नाही. ;)
आणि म्हटलय ना बहुतेक मी पाहिलाही असेल एखादा!
आता अनेक गोष्टी आपण नाही पहात, त्यात काय एवढं?

साजन चले ससुराल या चित्रपटात गोविंदा ह्या अभिनेत्याने एका गायकाची भूमिका केली असून त्यामध्ये त्याच्या पत्नींच्या भूमिका करिष्मा कपूर ही एक व तब्बू ही दुसरी अशा दोन अभिनेत्रींनी केल्या आहेत.

नितांतसुंदर अभिनयाने हा चित्रपट संग्रही ठेवण्यासारखा आहे. ;)

शेवटच्या वाक्यात 'नटलेला' हा शब्द राहिला.

अभ्या..'s picture

23 Mar 2013 - 1:12 am | अभ्या..

गोविंदाचा दोन बायकाचा अजून एक पिच्चर हाय. सॅन्डविच. त्यात महिमा चौधरी आणी रवीना टंडन हायेत. प्रत्येकीला एकेक लेकरु पण दाखवलेलं आहे.

प्यारे१'s picture

23 Mar 2013 - 1:15 am | प्यारे१

अभ्या, रेवती 'आज्जी' आहे रे ;)

ती २००० नंतरचे पिच्चर नाय बघणार. ती म्हणते तो सा स स च. ;)

- पळून गेलेला प्यारे.

पण मी काय म्हणते प्यारेलालजी१, त्यातली एक नटी नेहमीच्या बघण्यातली होती आणि दुसरी साऊथ इंडीयन असावी अशी होती. (जाऊ दे, माझा गोंधळ वाढला, असेना का कोणीही!)

नेहमीच्या बघण्यातली म्हणजे अशी उंच नि लांब चेहर्‍याची वगैरे होती??? बर्‍यापैकी अभिनय वगैरे करत होती? तोंडाचा आ वासून हसते किंवा रडते देखील!
दुसरी साऊथ इंडियन असावी अशी शंका शारीरिक कारणांनी आली असल्यास ती गोल मटोल असणारच. गोल चेहर्‍याची नि नृत्य निपुण किमान प्रयत्न करणारी अशी ती 'अप्सरानामधारी' आहे का????

आणखी एक त्यामध्ये बर्‍याच कर्कश्श नि कधीकधी उत्तम अभिनय करणारा एक टकलू नि एक ओंगळवाणा जाड्या आहे का? एक लाकूडकाठी जी उर्दू बोलून काव आणते असं काही आहे का?

वरील प्रश्नांची आधी उत्तरे द्या. :)

तुषार काळभोर's picture

23 Mar 2013 - 3:22 pm | तुषार काळभोर

मी पण ह्याच पिच्चरचा विचार करत होतो.
लायर लायर

दीवाना मस्ताना म्हणजे तर माझा जीव की प्राण :)

गोविंदाचा "हत्या" हा पिक्चर माझा all time fav आहे, पण गोविंदा जास्त आवडतो ते त्याच्या नाचामुळे, डान्स मुव बरोबर हावभाव आणि मानेला एका विशिष्ट प्रकारे झटके देण्याची लकब यावरच मी फिदा झाले होते. तसेच त्याचा मीनाक्षी आणि अनिल बरोबरचा आवारगी हा सिनेमा पण सुरेख आहे, त्यात त्याने गायकाची भूमिका केली आहे आणि बाली उमर ने मेरा हाल वो किया हे गीत खूप गाजले आहे त्या सिनेमाचे.

तुमचा अभिषेक's picture

25 Mar 2013 - 9:55 pm | तुमचा अभिषेक

याईय्या.. याईय्या...
माझ्या दुर्दैवी बायकोने जे काही चांगले चित्रपट पाहिले नाहीयेत आणि जे मी तिला दाखवणार आहे अश्यांच्या लिस्टमध्ये हा देखील आहे.. :)

अर्धवटराव's picture

26 Mar 2013 - 1:29 am | अर्धवटराव

:)))))) =)))))))))))
स्वतःबद्दल इतकं परखड स्पष्ट मत मिपासारख्या संस्थळावर जाहीररित्या टंकण्याची प्रामाणीकपणाची सर्वोच्च कसोटी पार केलेले महात्मे बघुन मला स्वतःच्या निर्लज्जपणाची शरम वाटली :P

अर्धवटराव

मी-सौरभ's picture

22 Mar 2013 - 7:24 pm | मी-सौरभ

या पिच्चर सारखाच त्याचा 'अखियोण्से गोली मारे' पण माका आवडतो.
हिरोइन कुणि का असेना; गोविंदा अन कादर खान हे कॉम्बिनेशन सुपरहीट आहे :)

प्रचेतस's picture

23 Mar 2013 - 8:39 am | प्रचेतस

गोविंदा-कादर खान अफलातून कॉम्बिनेशन आहे आणि त्यात मध्ये मध्ये तडका मारायला शक्ती कपूर.

धमाल मुलगा's picture

24 Mar 2013 - 9:01 am | धमाल मुलगा

चांडाळ चौकडी आहे ती... (हिरो)गोंविंदा+(पटकथा+अभिनय) कादरखान+(बोलट)जॉनी लिव्हर्+ (दिग्दर्शक)डेव्हिड धवन!

मी असं ऐकलंय की गोंविंदा आणि डेव्हिड धवन दोघेही दादा कोंडकेंच्या 'परफॉर्मन्स'ने इतके येडे झाले होते की दादांचं रेकॉर्ड तोडायचा त्यांनी पण केला होता.

अवांतर - नशीब, गोंविंदा+संजुबाबाचे सिनेमा नाहेस पाहिलेस तू. :)

प्रचेतस's picture

24 Mar 2013 - 9:06 am | प्रचेतस

पाहिलेत पाहिलेत.
हसीना मान जायेगी, जोडी नं १.
जोडी नं. १ मध्ये तर कुख्यात डॉन असलेल्या आशिष विद्यार्थीचा उडवलेला बाजार तर लै भारी. जय पाजी, वीरू पाजी...हॅSSSSSS

धमाल मुलगा's picture

24 Mar 2013 - 9:31 am | धमाल मुलगा

विसरु म्हणता न विसरता येण्याजोगा अस्खलित जातिंवत भिकारचोट प्रकार आहे तो =))

एकतर ते "मै कहेयाँ, कंट्रोल प्राजी..." आणि गोविंदाचे ते अरुणा इराणीसोबतचे अशक्य रोम्यांटिक सिन्स! =))

प्रचेतस's picture

24 Mar 2013 - 9:37 am | प्रचेतस

अगग्गागगागाअगा.
नको राव आता आठवण काढू त्याची हहपुवा व्हायला लागलीय इथे आज हापिसात बसून.

त्यात हसीना मान जायेगी मध्ये गोविंदाला अरूण इराणी दिलीय तर इथे जोडी.. मध्ये संजूबाबाला सुप्रिया कर्णिक.
कंट्रोल पाजी ओये कंट्रोल यार.. साला गोविंदा किती सहज अभिनय करून जातो. संजूबाबा मात्र त्याबाबतीत मठ्ठच.

धमाल मुलगा's picture

24 Mar 2013 - 9:47 am | धमाल मुलगा

बाबा एकनंबरचा ढक्कन आहे हे कन्फर्म आहेच राव.
पण खरा मझा आणतो तो कादरखान! समोरचा नरडं खरवडून काय काय बोलतो आणि हा पठ्ठ्या एका "अच्छाऽऽ?" मध्ये त्याची माती करुन मोकळा. मला वाटतं गोविंदाच्या इनोदी पर्वामध्ये कादरखानचे संवादलेखन+अभिनय आणि जोडीला जॉनी लिव्हरचा भिकारचोटपणा ह्यांनी चारचाँद लगावलेत :)

अवांतरः ह्या निमित्ताने "हद कर दी आपने" मधले गोविंदाचे जगातभारी काय काय वेडगळ संवाद आठवले. :) अशक्य खुळचट सिनेमा होता तोही! डोकं काढून फ्रीजमध्ये ठेवायचं अन हा सिनेमा लावायचा......माणूस खाप्पकन रिल्याक्स झालाच पाहिजे :)

प्रचेतस's picture

24 Mar 2013 - 9:52 am | प्रचेतस

अगदी अगदी.
कादरखान अशक्य प्राणी आहे. भोळसट चेहरा करून बोलायची स्टाईल तर लैच भारी.
आंटी नं. १ मधला स्त्रीवेषातला गोविंदा आणि त्याच्या मागोमाग लाळघोटेपणा करत फिरणारा कादरखान आणि त्यांची तिथली डायलोगबाजी म्हणजे अशक्य प्रकरण आहे राव.

धमाल मुलगा's picture

24 Mar 2013 - 10:14 am | धमाल मुलगा

कदाचित विजयरावांचं मोरुची मावशी फार आधी पाहिलं, आणि काही प्रयोगात काम केलं असल्यामुळं असेल कदाचित, पण आंटी नं.१ अत्यंत बटबटीत आणि ओंगळ वाटला. पण तरीही, कादरखान आणि (बहुतेक) सईद जाफरी ह्यांनीच गोविंदासोबग्त हा सिनेमा (जो काहे चालला तो ) चालवला. :)

प्रचेतस's picture

24 Mar 2013 - 10:39 am | प्रचेतस

ते बाकी खरंय. हा सिनेमा तसा बटबटीतच आहे.
पण मायला मोरूची मावशी मध्ये कसलं काम केलंयस म्हणे. जरा त्यावर एक खुसखुशित लेख येऊ दे की.

धमाल मुलगा's picture

24 Mar 2013 - 11:06 am | धमाल मुलगा

आन्ना.. हौशी रंगभूमीची गणितं आम्ही तुम्हाला सांगायची का बॉ?
तबियत जुळत नव्हती म्हणून मावशीचा रोल करायला जमलं नाही गा. :९

अद्द्या's picture

24 Dec 2013 - 4:36 pm | अद्द्या

आई आई ग . .

कैच्या कैच्या काय दंगा घातलाय नुसता त्यात . .

एखादा रविवार दुपार जेवण करून सहज टीवी लावावा . आणि

यापैकी एखादा सिनेमा असावा तिथे .

पोट , गाल घसा दुखे पर्यंत नुसतं हसत वेळ जातो . =))

चिर्कुट's picture

22 Mar 2013 - 8:29 pm | चिर्कुट

आम्च्या लाडक्या गोविंदाचे इतके पंखे मिपावर आहेत हे पाहून आनंद झाला.

गोविंदाचे शिनुमे म्हणजे डोक्याला ताप न देता हसत खेळत मूड मस्त करुन जाणारे असत..

हे आणि हे माझं फेव्हरेट.. :)

अर्धवटराव's picture

23 Mar 2013 - 5:15 am | अर्धवटराव

गोविंदा आपलाही वन ऑफ द मोस्ट फॅव्हरेट अ‍ॅक्टर आहे.

अंदाज अपना अपना मधे गोविंदाचा गेस्ट अपिअरन्स आहे. पण तेव्हढ्यातही "आ... गले लग जा" म्हणुन तो जो भाव खातो... एक नंबर.

अर्धवटराव

हा शिनेमा बघायचा प्रयत्न केला राव! खूप ताणले तरी ५१ मिनिटे झाल्यावर जे गाणे लागते तिथपर्यंत एकदाही हसू आले नाही (हो, हो, मला हिंदी समजते) व शिनेमा बंद केला. मला विनोदाची जाण नाही असे म्हणू शकता हवे तर. त्यातल्यात्यात गोविंदा गावाकडे गेल्यावर त्या अजगर सिंव्हाला ट्रिक करून बदली करवतो आणि एखादा प्रसंग बरे वाटले. सॉरी, तुमचा गोविंदा न आवडल्याबद्दल.

मन१'s picture

26 Mar 2013 - 8:18 am | मन१

आवड आपली आपली.

बादवे,तुमचे आवडते शिनुमे कोणते? कोणते विनोदी शिनुमे तुम्हाला आवडतात?

योगी९००'s picture

24 Mar 2013 - 6:58 am | योगी९००

दुल्हे राजा, दिवाना मस्ताना हे माझेही आवडते चित्रपट. दुल्हेराजाचा शेवटचा सिन तर एकदम सुरेख. कधीच चुकवत नाही तो..

असाच मला खेल (अनील कपूर्, माधूरी, अनुपम खेर व माला सिन्हा) हा चित्रपट ही खुप आवडला होता. तो ही कधी लागला तर बघतोच.

मालोजीराव's picture

25 Mar 2013 - 9:48 pm | मालोजीराव

जिम कॅरी च्या लायर लायर चा तेव्हडाच झक्कास 'रिमेक क्योंकी में झूठ नही बोलता' मध्ये झालाय...त्यातला गोविंदा तर अफलातूनच ...विशेषतः कोर्टातल्या सीन मध्ये

अभ्या..'s picture

25 Mar 2013 - 10:00 pm | अभ्या..

जर्रा कमी बावर्ची चा रिमेक 'हिरो नं १" पन भारी हाय.
परेश रावल आणि कादरखान दोघंपण अस्ल्यामुळं, शक्तीकपूरला लै मोकळं न सोडल्यामुळं बघायला मज्जा येतीय.
गोविंदा पन टिपीकल दादा कोंडके ड्रेसात. :)

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2013 - 9:52 pm | श्रीरंग_जोशी

जॉनी लिव्हरला दुरध्वनी तारांच्या खांबावर बसवून फोन रिसिव्ह करायला लावायची क्लृप्तीतर भारीच.

याखेरीज मला गोविंदाचा अनाडी क्र. १ खूप आवडला होता.

शशिकांत ओक's picture

24 Dec 2013 - 2:27 pm | शशिकांत ओक

आज पुन्हा एखादा गोविंदा व कादरखानच्या कव्वालीपासून पहायला सुरवात झाली. त्यातील गायक व गीतकार कोण असावेत असा पेच पडला. मिपावरील धाग्यावर धाव घेतली. मित्रांनो आपणाकडून समजले तर छानच...

माणिकमोति's picture

24 Dec 2013 - 3:03 pm | माणिकमोति

विसरु म्हणता न विसरता येण्याजोगा अस्खलित जातिंवत भिकारचोट प्रकार आहे तो : सहमत !!!

इतक्या लोकाना गोविंदा आवडतो????????????? मला स्वप्नात देखील वाटले नव्हते.....

मला बाई 'रणबीर कपूर' आवडतो.......