जय महाराष्ट्र ढाबा बठींडा..

केदारविदिवेकर's picture
केदारविदिवेकर in जनातलं, मनातलं
23 Feb 2013 - 5:49 pm

छान, सुंदर हलका फुलका चित्रपट... "जय महाराष्ट्र ढाबा बठींडा".......

अभिजित खांडेकर, प्रार्थना बेहेरे... ही नवीन जोडगोळी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल.

नवीन फ्रेश लुक ही या अवधूत गुप्ते निर्मित चित्रपटाची मेन यु.एस. पी....

चित्रपटाची सुरुवातच आपल्या मराठमोळ्या पद्धतीने नामावलीने होते (नावं इंग्रजीत होती.. ती खटकली). पण त्याचबरोबर मराठमोळी पद्धतीच्या डिशेश दाखवल्यात, हे छान वाटलं.

पहिला सीन अभिजित खांडेकरचा फ्रेश लुक पंजाबी स्टाईलमध्ये .... (दाढी ठेवलीये ना थोडी म्हणून..). पंजाब मध्ये मराठी ढाब्याला त्याच्या एक वर्ष झालेलय.. सगळे पंजाबी चकित होतात, अर्रे वा एक मराठमोळा माणूस इथे येउन समर्थपणे ढाबा चालवून दाखवतो, तेही मराठमोळ्या पद्धतीने.. छान.. पण नेहमी प्रमाणे खार खाणारे असणारच ना या यशावर, नाहीतर माणूस तो कसला.. पण इथे पंजाबी खार खायला लागतात...

अभिजितची म्हणजे 'सयाजी निंबाळकर' ची भेट योगाने सहज एका सुंदर मुलीशी होते... प्रार्थना बेहेरे म्हणजे जसपिन्दर कौर--जस...(दिल गार्डन गार्डन झाला हो इथे...तिला पाहून.. :-*).. प्रेमाची पहिली ती नजर... घायाळ झाला 'सया'.. म्हणजे सयाजी हो आपला 'जस' ला पाहून..... :-D

तर असा घायाळ झालेला आपला मर्द मराठा शेर 'सया', 'जस'चा पिच्छा काही सोडायला तयार नाही. दिलं सरळ आपलं 'दिल' काढून, आय मीन 'विसिटिंग कार्ड'.... आणि दिलं आमंत्रण दुस-या दिवशी भेटण्याच आपल्या मराठी ढाब्यात, आणि 'जस' येतेही... (चित्रपटात 'प्रथम' खटकलेली गोष्ट). नंतर जाता जाता आपला मराठी पठ्ठ्या तिला फोन करतो (चित्रपटात 'दुसरी' खटकलेली गोष्ट), आता तिने फोन केला असता तर समजू शकतो.... आठवतंय का त्याने तिला विसिटिंग कार्ड दिलेलं असतं... हा... ). पण छान सीन आहे.. असो आपण पुढे सरकूया...

'जस' इथे पंजाबात आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी आलेली असते, आणि नेमका त्या मैत्रिणीच्या बाबांनी आपल्या 'सया'ला कंत्राट दिलं कि ओ राव सरळ.., जेवणाची व्यवस्था बघण्याचं...आहात कुठे... जय महाराष्ट्र मराठी ढाब्याची मराठमोळी चव ती. जसजस चित्रपट इथून पुढे जात राहतो, तसं चित्रपटातील 'तिसरी' खटकणारी गोष्ट बोचत राहते हो.... कि अनोळखी माणसे एकदम एकमेकांशी एवढ्या मोकळेपणाने, प्रेममय भाषेत कशी बोलत राहतात ?.... (आधी वाटलं कि चित्रपट आहे हो राव.... होत असेल इथे असं काही, जे इतर चित्रपट नेहमी होत राहत.... पण नाही चित्रपटाच्या सरतेशेवटी त्याचा उलगडा होत जातो..... त्यामुळे तूर्तास सस्पेन्स म्हणा हवं तर)

सुंदर चित्रीकरण... पंजाबचा ब्याकग्राउंड मागे....(DDLG ची आठवण झाली... मलातरी...) तीच ती नयनरम्य शेतं.. पिवळीशार फुलं....छान.. सोबत अप्रतिम संगीत....लाजवाब.. "अवखळसे स्पर्श ते हरवले का असे", "न कळे कधी मन गुंतले", 'दिल हारेया ओय" अशी कर्णमधुर संगीताची गाणी, स्वप्नील बांदोडकर, जान्हवी प्रभू-अरोरा, वैशाली सामंत, राहुल वैद्य यांचा आवाज, निलेश मोहरीर याचं संगीत दिग्दर्शन आणि इतर सोबत.. आहाहा... कानाला पर्वणी होती यांची...

पुढे या दोघा 'जस' आणि 'सया' च प्रेम वाढीस लागायला लागतं.... ....... थांबा......... पण इथे 'जस'चं लग्न झालेलं असतं, असं ती त्याला सांगतेही [चित्रपटात 'चौथी' खटकलेली गोष्ट). पण 'प्रेम' आंधळे असते ना म्हणे..:-P. 'जस' ने सांगून सुद्धा 'सया' आशा धरून, भूतकाळ विसर असं तिला सांगताना त्याच्या मनाला कसं कळलं कि हिने घटस्फोटासाठी अर्ज केला असेल किंवा तिच्या नव-यासोबत सुखी नसेल ? (एक अंदाज अहो.. असं काही म्हटलेला किंवा दाखवलेलं नाहीये...). (पुन्हा वरील वाक्याचा उल्लेख इथे करीन..... :-D.. आधी वाटलं कि चित्रपट आहे हो राव.... होत असेल इथे असं काही, जे इतर चित्रपट नेहमी होत राहत.... पण नाही चित्रपटाच्या सरतेशेवटी त्याचा उलगडा होत जातो..... त्यामुळे तूर्तास सस्पेन्स म्हणा हवं तर)

मैत्रिणीच्या लग्नाचा पूर्व सोहळा चालू असताना..... (संगीत अहो असतं ना त्यांच्यात), मैत्रिणीच्या बाबांना 'जस' बद्दल कळत कि ती घरातून म्हणे पळून आली आहे. ते घेऊन जातात मग तिला आणि डांबून ठेवतात एका खोलीत..... आपला हिरो 'सया' जातो तिच्या घरी जोशात... आणि घेऊन येतो तिला... ढीश्याव..ढीश्याव... हर हर महादेव..

चित्रपटाच्या क्लायम्याक्स कडे आपण येताना सर्व वर नमूद केलेल्या खटकणा-या गोष्टींचा हळुवार अलगद उलगडा होत जातो आणि आनंद होतो कि वाह.. क्या बात आहे... सुंदर मांडणी... एडिटिंग...

अवधूत स्टाईल ने त्यालाच म्हणावसं वाटत..'व्वा मित्र तोडलस'.... मी तर म्हणेन 'तारलंस' या चित्रपटाला.... कुठे तरी पकड जातेय चित्रपटावरील असं वाटायला लागलं होतं शेवटी शेवटी.... पण नाही...... और वो लगा सिक्सर.....खटकणा-या गोष्टींचा उलगडा होत जातो ना म्हणून.....

सामान्य प्रेक्षक उठूनच गेला असता मध्येच.... (शेवट पर्यंत खिळवायला मात्र जमलं नाही या चित्रपटाला, ही एक उणेची बाजू, म्हणून असेल कदाचित, असं मला वाटतंय). पण ज्याने संयम ठेवून जर चित्रपट संपूर्ण पाहिला तर, त्या शेवटच्या काही सिन्स मधून, नव्हे मी म्हणीन त्या शेवटच्या उलगडपटातून, संपूर्ण चित्रपटाबद्दलचा निदान माझा दृष्टीकोन तरी बदलला, असं मी तुम्हा माय बाप प्रेक्षकांस आवर्जून उल्लेख करून सांगीन.... बाकी तुम्ही सुज्ञ आहातच...

साढ्ढआ मराठी चित्रपट ओ पाजी.. आवडला... एकदा तरी जरूर पहा.. ३ स्टार ***

माझ्यातर्फे. १/२ स्टार * एक्स्ट्रा... नवीन नायिकेसाठी...प्रार्थना बेहेरे.... मुआह ...... :-*

नमस्कार --

कळावे लोभ असावा,

आपला के.डी
केदार दिवेकर
+९९२०५७७८०२

चित्रपटप्रकटन

प्रतिक्रिया

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Feb 2013 - 6:34 pm | श्री गावसेना प्रमुख

नवीन नायिकेसाठी...प्रार्थना बेहेरे.... मुआह ......
1
हीच का ती

ओक्के. चित्रपट पहायला हरकत नाही, अर्थात जालावर उपल्ब्ध असेल तेंव्हा!
ईतर निर्मात्यांपेक्षा हा अवधूत गुप्ते जरा धाडसी असावा असे वरवर पाहता वाटते.

श्रीनिवास टिळक's picture

23 Feb 2013 - 7:37 pm | श्रीनिवास टिळक

अभिप्राय वाचल्यामुळे आता हा चित्रपट पाहणे आले. कालच वाचत होतो कि पानिपतच्या आसपासच्या खेडयांत सहा ते सात लाख वस्ती असलेला रोड समाज राहत आहे ज्याची उत्पत्ती पानिपतच्या संग्रामातून वाचलेल्या सुमारे ५०० सैनिकाङ्कडे जाते (पहा “Maratha Spirit in Haryana,” by Uday Mahurkar, India Today January23, 2012). आज त्यांची भाषा आणि संस्कृती पंजाबी असली तरी काही मराठी बाणा अजून दिसतो (पुरण पोळी, भाऊबीज, कानातील भिकबाळी इत्यादी; पहा Vasant More and Virender Verma The History of Rod Marathas of Panipat Battle (Shivsangram Prakashan, Kolhapur). तेव्हा अवधूत गुप्तेना म्हणावं कि हा चित्रपट हरयाणात पण लावा. चांगला प्रतिसाद मिळेल.

आदूबाळ's picture

23 Feb 2013 - 9:10 pm | आदूबाळ

श्रीनिवासजी

Vasant More and Virender Verma The History of Rod Marathas of Panipat Battle (Shivsangram Prakashan, Kolhapur)

हे पुस्तक खूप दिवस शोधतो आहे. कुठे मिळेल तुम्हाला माहीत आहे का? प्रकाशकाचा पत्ता आहे का आपणांजवळ?

पैसा's picture

23 Feb 2013 - 9:31 pm | पैसा

एकदा बघायला हरकत नाही. येईल केबलवर कधीतरी तेव्हा.

चित्रपटाचा लुक खरंच छान आहे. लेखक म्हणतो त्याप्रमाणे गाणी श्रवणीय असतील पण अवधुतच्याच झेंडा आणि मोरयातील गाण्याप्रमाणे यातील एकही गाणे लक्षात राहत नाही.

मी मराठी चित्रपट त्यांचा नावीन्यापुर्ण कथेसाठी आणि कालाकारांच्या अभिनयासाठी पाहतो या चित्रपटाने मात्र माझी घोर निराशा केली कारण हा चित्रपट मला तरी दिलवाले.... ची भ्रष्ट नक्कल वाटला. एक चांगला विषय वाया घालवला.

श्रीनिवास टिळक's picture

26 Feb 2013 - 7:13 pm | श्रीनिवास टिळक

नमस्ते: शिवसंग्राम प्रकाशन कोल्हापूर चा पत्ता मी पण जालावर शोधला. नाही मिळाला. कदाचित सदस्यांपैकी कोणी कोल्हापूरचे असतील तर ते ही माहिती देतील.