पावसा!

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
5 Jul 2008 - 4:41 pm

कोरड्या हृदयात माझ्या बरसून जा रे पावसा
एकट्या वाटेत माझ्या हरवून जा रे पावसा

वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी
अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा

नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी
पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा

हासतो फसवा अन मी मनातच रडतो किती
शुष्क या वैराण नयना भिजवून जा रे पावसा

हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी
बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा

वाटतो तु मित्र कोणा, कोणास तुची देव रे
सार्‍यांस सारे देउनीही कमवून जा रे पावसा

चिंब हे करसी असे प्रत्येक तु या मानसी
भिजण्यास परतूनी यायचे ठरवून जा रे पावसा

-ऋषिकेश

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

धनंजय's picture

5 Jul 2008 - 5:36 pm | धनंजय

सुपीक काफिया आहे - प्रत्येक शेरातली कल्पना मस्त आहे.

विसोबा खेचर's picture

5 Jul 2008 - 6:11 pm | विसोबा खेचर

अतिशय सुंदर कविता रे हृषिकेशा!

एकेक ओळ आवडली! :)

औरभी लिख्खो...जियो...!

तात्या.

अभिज्ञ's picture

5 Jul 2008 - 6:12 pm | अभिज्ञ

अगदि हेच म्हणतो.

पुलेशु.

अभिज्ञ.

मदनबाण's picture

5 Jul 2008 - 8:21 pm | मदनबाण

फारच सुंदर कविता..

वाटतो विश्वास सार्‍या निश्चयाचा मेरू मी
अंतरीच्या बालकाला रडवून जा रे पावसा

हे फार आवडल..

(ये रे ये रे पावसा )हे गाण गुणगुणारा..
मदनबाण.....

प्राजु's picture

7 Jul 2008 - 1:09 am | प्राजु

हृषिकेश,
खूप दिवसांनी तुझी गझल वाचली. अप्रतिम झाली आहे.
खास करून शेवटचा शेर खूप आवडला.... अभिनंदन!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

पद्मश्री चित्रे's picture

6 Jul 2008 - 4:12 pm | पद्मश्री चित्रे

चिंब भिजवणारी कविता....

ऋषिकेश's picture

6 Jul 2008 - 10:33 pm | ऋषिकेश

धनंजय, तात्या, अभिज्ञ, मदनबाण आणि फुलवा,
सार्‍यांचे प्रोत्साहनाबद्दल अन प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार! :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग's picture

8 Jul 2008 - 1:40 am | चतुरंग

चतुरंग

बेसनलाडू's picture

8 Jul 2008 - 1:45 am | बेसनलाडू

नांदतो रुसवा जसा की डाग तो चंद्रावरी
पाहण्या गाली खळी हसवून जा रे पावसा

हाकतो होडी कुणी, भिजवतो-भिजतो कुणी
बाळगोपाळांस सार्‍या जमवून जा रे पावसा

वावावावा! फार आवडले.

(बालक)बेसनलाडू

चित्रा's picture

8 Jul 2008 - 8:27 pm | चित्रा

सुरेख कविता.

शितल's picture

8 Jul 2008 - 9:22 pm | शितल

छान झाली आहे रे काव्य रचना.

कौस्तुभ's picture

9 Jul 2008 - 4:14 pm | कौस्तुभ

हृषिकेश,

केवळ अप्रतीम गझल!

ऋषिकेश's picture

9 Jul 2008 - 6:47 pm | ऋषिकेश

प्राजु, बेला, चतुरंग, चित्रा, शितल आणि कौस्तुभ सार्‍यांचे आभार! :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश