जोरात उठते कळ....

अधिराज's picture
अधिराज in जे न देखे रवी...
13 Feb 2013 - 1:19 pm

आतल्या आत ढवळतं
आणि ज्जोरात उठते कळ
पण तिच्या मते आजकाल
मला लागलाय कवी चळ..

मग, ती समोर असली की
करतो थोडी वळवळ
आतली वेदना लपविण्यासाठी
आणतो उसनं बळ..

पण, ती ही अशी चलाख
गाठतेच माझ्या मनाचा तळ
म्हणते, बस्स झालं तुझं नाटक
नाहीतर मी काढीन इथून पळ..

माझे उर्मी दाबून ठेवण्याचे
प्रयत्न होतात निष्फळ
तिच्या ओरडण्याने भानावर येतो
पण जखम वाहत राहते भळभळ..

अरे, कविता म्हणजे नसते
प्रत्येकाच्या हातचा मळ
उगाच लिहावसं वाटलं म्हणून
सोडायचे शब्दांचे नळ..

काही कामधंदा करू नको
नुसत्याच भावना दळ
हा रोग जडलाय तुला
पण होतोय माझा छळ..

पण मी आता कोडगा होतोय
ऐकून सोडून देतो सरळ
पुन्हा आतमध्ये ढवळलं की
शब्दांचीच ओकतो गरळ..

मुक्तकसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

श्रिया's picture

13 Feb 2013 - 4:41 pm | श्रिया

ओह गॉड! चांगलं चाललयं. आमच्याकडून सहानुभूती आणि लगे रहो.

श्रियाजी तुम्ही दाखवलेल्या सहानुभूतीबद्दल धन्यवाद! ती तशी मनानी चांगली आहे हो, पण तिला माझ्या कविताच आवडत नाहित.

नाना चेंगट's picture

13 Feb 2013 - 4:42 pm | नाना चेंगट

जोरात लागते पळ असं विडंबन करा रे कुणीतरी

परिकथेतील राजकुमार's picture

13 Feb 2013 - 5:14 pm | परिकथेतील राजकुमार

अरे मला आधी ते 'पोटात उठते कळ....' असेच वाटले.

राजकुमार सर ,त्या,निमित्ताने का होइना, तुम्ही आमच्या यातना वाचल्या, हे आमचे अहोभाग्यच!

अधिराज's picture

13 Feb 2013 - 8:49 pm | अधिराज

आवं चेंगटांचे नाना, आधी लोकांना आमची वेदना तर कळू द्या, मग बघता येइल इडंबनाचं.

इरसाल's picture

13 Feb 2013 - 6:08 pm | इरसाल

मॅमनो की मॅमोग्राफी का काय ते करुन घ्या उगाच कळ उथते म्हणुन सोडुन नका देवु

अहो, नवकवीला येणार्‍या कळा वेगळ्याच असतात हो, कुठून सुरु होतात तेच कळत नाही कधीकधी.

बॅटमॅन's picture

13 Feb 2013 - 6:20 pm | बॅटमॅन

ढगाला लागली कळ आठवले!!!

सर एकदम बरोबर, ढगाला कळ लागली कि ढग बरसतात, आम्हाला कळ लागली कि शब्द बरसतात.

अविनाशकुलकर्णी's picture

13 Feb 2013 - 8:45 pm | अविनाशकुलकर्णी

'पोटात उठते कळ....'
रांग मोठी असे
नंबर हि बक्कळ
सुरु होते चुळबुळ

सूड's picture

13 Feb 2013 - 8:59 pm | सूड

तुमच्या 'सर' म्हणण्यावरुन मिपावरचे एक जुने 'स्नेही' आठवले.

सूड सर, वडिलधार्‍या माणसांचा एकेरी उल्लेख करण्याची रीत नाही हो माझी. म्हणून सर म्हणतो इतकेच.

मिपावरचे एक जुने 'स्नेही' आठवले.

कोण हो कोण? आता कुठे असतात ते.

खबो जाप's picture

13 Feb 2013 - 9:16 pm | खबो जाप

जोरात लागते कळ ,
तर मग परसाकडे पळ
नंतर ओक ती शब्दांची गरळ
नाहीतर भलतेच मिळेल फळ......

खबो शेट जावा तिकडे, परसाकडे गरळ ओकायला नसतं जायचं काही.
आणि शब्दांची गरळ रसिकांवरच टाकायची असते बाबा.

आहो तुमचे म्हणणे बरोबर आहे हो
पण निसर्गाच्या हाकेची कळ पहिला शांत करा (खळखळून)
मग शब्दांची गरळ(भडभडून) रसिकांवर टाकताना तुम्हाला आणि रसिकांना ज्यास्त मजा येईल...