(छंदात छंद तो प्रवासछंद --)

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in जे न देखे रवी...
3 Jul 2008 - 10:29 am

(छंदात छंद तो प्रवासछंद, फिरण्या मन हे उल्हासिते ! )

चालः राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
--------------------------------------------------

छंदात छंद तो प्रवासछंद, फिरण्या मन हे उल्हासिते !
घेऊन बॅग, विसरुनी काम, ही वर्षा सहल सजते !
त्या सहलीच्या या आठवणींची गुंजी सतत राही !
आम्ही हो प्रवासी, सृष्टिचे आम्ही हो प्रवासी !!

पावसाचा हा शिडकावा सकाळी लवकर निघताना !
ओल्या चिंब कपडयानी गाडीमध्ये बसताना !!
हा दरवळणारा गंध मैत्रिचा मस्ती भरपुर होई !
विनोद, गाणी, गप्पा-गोष्टी रंजक सारे होई !!
त्या सहलीच्या या आठवणींची गुंजी सतत राही !आम्ही हो प्रवासी, सृष्टिचे आम्ही हो प्रवासी !!

खंडाळ्याच्या माथ्याची दर्‍या शिखरे ही खुणावती !
माळशेजवरुनी जाताना उगा पाऊले घुटमळती !
हा सुखावणारा मुरुड जंजिरा ओढ जिवाला लावी !
हे ढग असे की धुके म्हणावे निसर्ग नवलाई !
घाटातल्या त्या वाटेवरती भिजुनी चिंब होई !आम्ही हो प्रवासी, सृष्टिचे आम्ही हो प्रवासी !!
--------------------------------------------------------------------
मुळ गाणे-
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहवरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनास बिलगून जाई
हा उनाड वारा गुज प्रितीचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई -
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

आज इथे या तरुतळी सूर वेणूचे खुणावती
तुजसामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनि साद ऐकुनी होई
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !
राधा ही बावरी, हरीची राधा ही बावरी !

विडंबनप्रकटन