सखे मला सांग,
तू कधी विचार केलायसं?
जेव्हा शरीरं थकलेली असतील,
डोक्यावर चांदी अन् डोळ्यात मोती असतील,
पायांना भराभर चला सांगितले तरी
ते ऐकतीलच असं काही होणार नाही
सग्गळं बोलून-सांगून झाले असेल,
रुसून-फुगून झाले असेल
भांडून-बिंडून झाले असेल,
कष्ट वगैरेही करुन झाले असतील,
शब्दांशिवायच काय नजरेशिवायही
तुला माझे अन् मला तुझे
म्हणणे नीट समजायला लागले असेल,
अश्या त्या वेळेला जेव्हा मी तुला
तुझ्या सुरकुतलेल्या गालांवरून
हलकेच माझे थरथरणारे ओठ ठेवून
तुझ्या सैल पडलेल्या कानात
हळूच कुजबुजीन
'तु मला खुप आवडतेस'
तेव्हाही तु अश्शीच लाजून,
डोळे मोठ्ठे करुन 'चुप्प!' म्हणशील?
प्रतिक्रिया
4 Jan 2013 - 8:59 am | ह भ प
अगोदर शेवट वाचला मग वर वर असं उलटं वाचत गेलो..
मस्त वाटलं वाचून..
4 Jan 2013 - 9:43 am | बहुगुणी
मिका: ही अप्रतिम प्रेमकविता तुमच्या नावासकट आप्त-मित्रांना फॉरवर्ड करतो आहे, तुमची परवानगी गृहीत धरून, आशा आहे तुम्हाला चालेल.
(का कुणास ठाऊक, पण वाचता वाचता Fiddler on the roof मधला हा प्रसंग आठवला):
4 Jan 2013 - 9:48 am | इन्दुसुता
लईच रोम्यान्टिक हो....
फार आवडली...
आता लवकरच तिचंही उत्तर लिहा.
4 Jan 2013 - 9:57 am | स्पा
सुपर लाईक
4 Jan 2013 - 12:00 pm | गवि
आहा...
4 Jan 2013 - 12:01 pm | चाणक्य
साधासाच प्रश्न पण सुरेख गुंफलाय कवितेत
4 Jan 2013 - 12:19 pm | बॅटमॅन
अय हय.....मजा़ आ गया..आता वरती इंदुसुता म्हणताहेत तसं याचं उत्तरदेखील लौकरच लिहून टाका बरं!
4 Jan 2013 - 12:21 pm | आर्णव
आवडली आपल्याला. सोपे शब्द सुन्दर वर्णन.
4 Jan 2013 - 3:05 pm | सूड
छान !!
4 Jan 2013 - 3:16 pm | निश
मिका साहेब अतिशय सुंदर कविता.
4 Jan 2013 - 4:35 pm | अत्रुप्त आत्मा
मिका, नॉन स्टॉप शिक्सर मारताय हल्ली! जबय्राच एकदम :-)
4 Jan 2013 - 4:56 pm | प्रीत-मोहर
मस्त आवडेश.
4 Jan 2013 - 5:32 pm | michmadhura
अतिशय सुंदर कविता
4 Jan 2013 - 8:16 pm | तिमा
त्या 'सैल पडलेल्या' ओळीशी चुकून रेंगाळलो आणि कानांनी आश्वस्त झालो.
5 Jan 2013 - 4:43 pm | अनिल तापकीर
छानच
5 Jan 2013 - 4:46 pm | पैसा
कविता मस्तच आहे!
5 Jan 2013 - 7:44 pm | मितभाषी
मिका,
कविता आवडली
5 Jan 2013 - 7:51 pm | अनन्न्या
आणि लगेच ही कविता वाचली. मस्त.
6 Jan 2013 - 1:04 am | संजय क्षीरसागर
काही सजेशन्स :
पायांना भराभर चला सांगितले तरी
ते ऐकतीलच असं नाही
सग्गळं बोलून-सांगून झालं असेल,
रुसून-फुगून झालं असेल
भांडून-बिंडून झालं असेल,
कष्ट वगैरेही करुन झाले असतील,
शब्दांशिवायच काय नजरेशिवायही
तुला माझं अन् मला तुझं
म्हणणं नीट समजायला लागलं असेल
अश्या त्या वेळेला जेव्हा मी
तुझ्या सुरकुतलेल्या गालांवर हलकेच
माझे थरथरणारे ओठ ठेवून
तुझ्या सैल पडलेल्या कानात ____ (हे जरा नजाकतदार हवं)
हळूच कुजबुजीन..
बाकी कवितेची मांडणी आणि आशय उत्तम!
7 Jan 2013 - 11:40 am | मिसळलेला काव्यप्रेमी
आपल्या सुचनांबद्दल धन्यवाद. :)
8 Jan 2013 - 12:04 am | संजय क्षीरसागर
इतक्या सुरेख कवितेवर प्रतिसाद देण्याऐवजी व्य. नि. करायला हवा होता. सं.मं.ला प्रतिसाद काढण्याची विनंती केली आहे.
या ओळी मात्रः
अश्या सहज वाटतील
अश्या त्या वेळेला जेव्हा मी
तुझ्या सुरकुतलेल्या गालांवर हलकेच
माझे थरथरणारे ओठ ठेवून
तुझ्या कानात हळूच कुजबुजीन..
6 Jan 2013 - 4:19 pm | पाषाणभेद
वेगळाच विषय.
आशयही छान.
6 Jan 2013 - 4:24 pm | किसन शिंदे
वाह!!
6 Jan 2013 - 9:09 pm | सस्नेह
आवडली.
7 Jan 2013 - 2:06 pm | ५० फक्त
मस्त, पण या अवस्थेत पोहोचेन की नाही याची शंका असलेला. कवितेबद्दल धन्यवाद.
7 Jan 2013 - 3:10 pm | वपाडाव
एक नंबर रे मिक्या...
7 Jan 2013 - 11:05 pm | नाना चेंगट
मस्त !
10 Jan 2013 - 4:42 pm | इनिगोय
तुमच्या 'येशील' मुळे इथे आले.. एक मस्त कविता हुकली असती!
क्यु॑ट आहेत भावी आजोबा ;)
10 Jan 2013 - 5:13 pm | शैलेन्द्र
खुपचं छान.. आवडली