कचेरीत आलो की, सुरुवातीला कामाच्या मेल्स पहायच्या, जरूर त्यांना उत्तरे द्यायची. काही पेंडींग कामे उरकायची आणि मग काही मीटींग वगैरे नसेल तर, एक कडक कॉफीचा कप घेऊन थोडा वेळ इंटरनेट-इंटरनेट खेळायचे. हा नेहेमीचा शिरस्ता!
आजही तसेच झाले.
काहीतरी हुडकण्यासाठी गूगलवर गेलो. गूगलची मुखपृष्ठे नेहेमीच कल्पक असतात. निरनिराळ्या गॅजेट्सचे मुखपृष्ठ पाहून उत्सुकता चाळवली. पाहतो तर, अॅडा लवलेसचा १९७ वा जन्मदिवस!
चार्ल्स बॅबेज ह्या इंग्रजाने १८३७ साली अॅनालिटिकल इंजिनची संकल्पना मांडली. नेमून दिलेली कामे करणारी इंजिने त्यापूर्वीदेखिल बनवली जायची. पण ह्या मशिनचे वैशिष्ठ्य असे की, हे मशिन प्रोगामेबल असणार होते. काय करायचे याच्या सुचना मिळाल्यावर, त्याबरहुकुम काम करणार होते. थोडक्यात म्हणजे, आजच्या आमच्या पीसी/लॅपटॉपचा पणजोबा!
बॅबेजची ही संकल्पना बरीचशी कागदोपत्रीच राहिली. प्रत्यक्षात मशिन अवतरले ते १९४० साली!
ह्या अॅनालिटिकल इंजिनचला द्यावयाच्या सुचनांचा संच कसा असावा, याचा तपशिलवार आराखडा तयार केला होता तो ह्याच अॅडा लवलेसने.
म्हणूनच बॅबेजला आधुनिक काँप्युटरचा पितामह तर अॅडाला जगातील पहिली प्रोग्रामर मानले जाते.
आता अॅडाची आठवण आली तर, तिच्या वडिलांची, लॉर्ड बायरनची आठवण आली नाही, असे कसे होईल?
अॅडा हे बायरनचे एकमेव औरस अपत्य! (अनौरस अपत्यांची संख्या बायरनलादेखिल सांगता आली नसती!!) प्रतिभावान कवी अन् रंगेल गडी.
वारुणी-तरुणींच्या संगतीत दिवस्-रात्र घालविणारा हा माणूस एक दिवस उठतो आणि इंग्लंडला कायमचा रामराम ठोकून ग्रीसमध्ये येतो. तुर्की (ऑटोमन) साम्राज्यातील परतंत्र ग्रीस पाहून कळवळ्तो. त्याच्याकडे शस्त्र असते ते फक्त लेखणीचे.
The isles of Greece, the isles of Greece!
Where burning Sappho loved and sung,
Where grew the arts of war and peace,
Where Delos rose, and Phoebus sprung!
Eternal summer gilds them yet,
But all, except their sun, is set...
ही आणि यासारख्या असंख्य कविता रचतो. ग्रीक तरुणांना स्फुर्ती देतो. स्वतंत्र ग्रीस बायरनचे ऋण विसरत नाही. जागोजागी त्याची स्मारके उभारली जातात.
मायदेशाने नाकारलेला एक रंगेल कवी, दुसर्या देशाच्या गळ्यातील ताईत बनतो!
सगळेच विलक्षण.
प्रतिक्रिया
11 Dec 2012 - 1:38 am | जेनी...
अतिशय ' विलक्षणच सारं ! ' म्हणायला भाग पाडणारा लेख .
सुनिल पंत धन्यवाद . छानच लेख आहे .
11 Dec 2012 - 1:42 am | हारुन शेख
ज्या अॅडा लवलेसमुळे आपल्याला मनोरंजनाची आणि रोजच्या जगण्यात उपयोगाची इतकी साधने मिळाली तिच्याबद्दल कृतज्ञता.
11 Dec 2012 - 2:05 am | विकास
लेख आणि माहिती आवडली! धन्यवाद!
11 Dec 2012 - 2:10 am | जेनी...
धन्यवाद विकास .
मी हि हे डुडल इथे पेस्टवायचा प्रयत्न करत होती पण मला जमलच नाहि :(
बट नॉव एम हेप्पि :)
11 Dec 2012 - 2:27 am | श्रीरंग_जोशी
स्व.अॅडा ही माझ्यासारख्या अनेकांसाठी देवतेसमान आहे.
ज्या व्यवसायामुळे दोन वेळच्या भाकरीची सोय होते त्याची मुहूर्तमेढ तिने केली आहे.
11 Dec 2012 - 4:51 am | निखिल - प्राजक्ता
सुन्दर लिहिलय...
11 Dec 2012 - 6:38 am | चित्रा
अॅडा लवलेसबद्दलची माहिती उत्तम आणि धन्यवाद.
11 Dec 2012 - 10:52 am | सस्नेह
धन्यवाद अॅडा लवलेसला अन धागाकर्ते यांना.
11 Dec 2012 - 7:39 am | ५० फक्त
मस्त ओ,काल मला नक्की संदर्भ लागलाच नाही याचा. धन्यवाद.
11 Dec 2012 - 11:21 am | पियुशा
+ १ टु ५० फक्त
ह्या माहीतीपासुन खुप दुर होते धन्स :)
11 Dec 2012 - 11:53 am | रामदास
ह्या माहीतीपासुन खुप दुर होतो असेच म्हणावेसे वाटते.
11 Dec 2012 - 2:27 pm | गणपा
माहितीपुर्ण लेख.
धन्यवाद सुनीलराव.
11 Dec 2012 - 6:31 pm | प्यारे१
आज इथं ज्याच्या मुळं लिहीतोय त्याचे आभार मानायलाच हवेत...
हे पोचवणाराचे त्याहून जास्त आभारी आहोत. :)
11 Dec 2012 - 6:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
अॅडा, बबेज व बायरनबद्दल माहिती होती. पण अॅडा बायरनची मुलगी हे महित नव्हतं.
आमच्या सामान्यज्ञानात भर घातल्याबद्दल धन्यवाद !
12 Dec 2012 - 12:01 pm | बॅटमॅन
अॅडाबद्दल अंधुक वाचल्याचं आठवतं. पण ती बायरनची मुलगी हे अज्जीच विसरून गेलो होतो. ग्रेट बाई होती हे निर्विवाद.
अवांतरः अशा कथांपासून प्रेरणा घेतल्यामुळे जर इंजिनिअरिंग/सायन्स क्षेत्रात, त्यातही रिसर्चमध्ये जर हिरवळ वाढली, तर तो उभयपक्षी होणारा सर्वांत मोठा फायदा असेल :)