या आसवांस माझ्या... तू साहतेस का गं?
अन आठवांत माझ्या... तू राहतेस का गं?
हरवले सूर माझे... सांजवेळी तरीही
या मैफ़लीत माझ्या... तू नाहतेस का गं?
होतेस का पुजारी... अन फूल ही कधी तू
तुज मंदिरात माझ्या... तू वाहतेस का गं?
आता उरात झरती... या वेदना सदाच्या
या वेदनेस माझ्या... तू चाहतेस का गं?
तू दूर दूर जाता... बघ निखळले सहारे
पडक्या घरास माझ्या... तू पाहतेस का गं?
--शब्द्सखा!
प्रतिक्रिया
1 Jul 2008 - 12:22 am | विसोबा खेचर
तू दूर दूर जाता... बघ निखळले सहारे
पडक्या घरास माझ्या... तू पाहतेस का गं?
वा!
1 Jul 2008 - 11:22 am | अरुण मनोहर
तू दूर दूर जाता... बघ निखळले सहारे
पडक्या घरास माझ्या... तू पाहतेस का गं?
असे सुंदर काव्यमय विचार असणाऱ्याची हवेली सोडून, त्या हवेलीचे पडके घर करून ती का गेली? अऩ स्वतः दुरून (मजा) पहात आहे! How cruel!
अऩ इकडे त्याला बिचाऱ्याला प्रश्न पडलाय!
अन आठवांत माझ्या... तू राहतेस का गं?
कविता खूप छान आहे.
suralesandip जी दुसरी एखादी कलासक्त मैत्रीण शोधा! (ह.घ्या.)