"ह्या बेहोशितचं जगणं असतं"

रसायन's picture
रसायन in जे न देखे रवी...
19 Nov 2012 - 4:41 pm

खूप दिवसांनंतर मी,
पुन्हा तुझ्यासाठीच लिहिणार आहे
माझ्याच नकळत मी
आज तुझ्याशी बोलणार आहे

तु कोण आहेस?कशी आहेस?...माहित नाही
ह्यां शबदांत तुला पाहण्याचा प्रयत्न मी करणार आहे

असशील तु हसरी,थोडी लाजरी
स्वप्नांमध्ये रमणारी
असशील तु ही माझ्यासारखीच
भावविश्वात जगणारी

तुझ्याशी भेट होईल की नाही..?
हे मलासुद्धा ठाऊक नाही
ह्या मनःपटलावरचे चित्र
पुसता पुसल्या जात नाही

तुला आठवुण तुझ्यावर लिहिणं
हेच तर कवितेचं कारण असतं !

खरं सांगु,
तु नसताना तुला अनुभवणं

"ह्या बेहोशितचं जगणं असतं"

कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

ह भ प's picture

19 Nov 2012 - 4:44 pm | ह भ प

प्रेमात पाडणारी कविता..
लिहित रहा..

रसायन's picture

19 Nov 2012 - 4:45 pm | रसायन

:)

नक्कीच

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Nov 2012 - 4:47 pm | श्री गावसेना प्रमुख

अजब रसायन आहे हे
तु नसताना तुला अनुभवणं

"ह्या बेहोशितचं जगणं असतं"

चेतन माने's picture

20 Nov 2012 - 12:44 pm | चेतन माने

+१ :)

रसायन's picture

20 Nov 2012 - 1:36 pm | रसायन

धन्स :)

माम्लेदारचा पन्खा's picture

20 Nov 2012 - 3:59 pm | माम्लेदारचा पन्खा

शेवट मनाला स्पर्शून गेला.......

रसायन's picture

20 Nov 2012 - 4:17 pm | रसायन

:):)