माझी शाळा

निश's picture
निश in जे न देखे रवी...
12 Nov 2012 - 12:22 pm

जुन्या आठवणीत रमता रमता
माझी शाळा अजुनही पुन्हा पुन्हा आठवते
डोळ्यातील आसवांवाटे परत ती पाझरते.

शाळेचा तो पहिला दिवस आठवणीतुन काही जात नाहीत.
बाईंचे ते प्रेमळ शब्द आता काही ऐकु येत नाहीत.

ईवल्याश्या पिटुकल्याला शाळेत सोडणारे ते आई वडिलांचे आनंदी चेहरे.
ऐकटे अनोळखी ठी़काणी रहावे लागणार
म्हणुन आईशी बिलगुन रडणार्‍या त्या पिटुकल्याचे ते निरागस डोळे.

तिथेच भेटलेल्या मित्रांचा प्रेमळ सहवास.
मस्ती केली तर मिळणार्‍या गुरुजींच्या माराचा धाक.
मित्रांच्या नकळत खाल्लेले त्यांचे डबे.
अभ्यास केला नाही म्हणुन परिक्षेत काय लिहावे?
ह्याचे दणाणलेले धाबे.

गुरुजींची नक्कल केली म्हणुन झालेली शिक्षा.
नेहमीच दुसर्‍यांना मदत करावी ही मिळालेली दिक्षा.

शाळेचा व मित्रांचा निरोप घेताना आलेले रडु
पाठीवर प्रेमळ हात फिरवत मित्रांचे ते सांगणे
"आपण परत परत भेटणार , असा रडु नकोस रे जाडु."

शाळा सोडताना हेलावलेल मन ,जडावलेले पाय,
क्षिक्षकांशी असलेल आपुल़कीच अतुट नात
मनात अजुनही जिवंत आहे.
शाळा आता नसली तरी,
माझ मन अजुनही व्यापुन आहे.

शाळा आता नसली तरी,
माझ मन अजुनही व्यापुन आहे.

कविता

प्रतिक्रिया

ह भ प's picture

12 Nov 2012 - 12:32 pm | ह भ प

शाळा आता नसली तरी,
माझ मन अजुनही व्यापुन आहे..

कितीही आनंदी असलो बाहेरुन,
तरी शाळा सोडल्याचं दु:ख ह्रुदयात मी झाकुन आहे..

ह भ प साहेब, १००% खर बोललात.

कितीही आनंदी असलो बाहेरुन,
तरी शाळा सोडल्याचं दु:ख ह्रुदयात मी झाकुन आहे..

ह्या तुमच्या ओळी खरच १००% खर्‍या आहेत. शाळा नसण्याचे दु:ख अजुनही आहे.

चौकटराजा's picture

12 Nov 2012 - 1:02 pm | चौकटराजा

शाळेत पहिल्याच दिवशी माझा जीव गुंतला
गुर्जीच्या माराने मात्र महादू चड्डीतच मुतला

इसवी सन १९६१ मी पहिलीत - स्थळ शिरवळ येथील " खालची शाळा"
सर- श्री मांडके गुर्जी - मार खाउन मुतणारा कलावंत - चि. बालके महादू सोनार

निशा- होती का अशी तुझी दिव्य शाळा ?

चौकटराजा साहेब, लय भारी अनुभव तुमचा.
माझी शाळा डॉ.बेडेकर विद्यामंदिर ,ठाणे.
आमच्या नशिबाने आम्हाला मारकुटे क्षिक्षक कधी भेटलेच नाहीत.
आम्हाला क्षिक्षकांचा आदर युक्त धाक असे पण मार कधीच मिळाला नाही.

शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या ,
देवाच्या क्रूपेने आम्ही शाळेत पुढल्या महिन्यात एकत्र येणार आहोत.. री-युनियन मिटींग आहे आमची

ह भ प's picture

12 Nov 2012 - 1:12 pm | ह भ प

लय मार खाल्ला राव शाळेत..इतका की त्या त्या मास्तरांचा तास असला की पोटदुखीचं कारण सांगुन तास बुडवायचो..
जवळ जवळ प्रत्येक सर न म्याडम चा मार खाल्लाय मी..
पण साला.. शाळेसारखे मित्र अन शिक्षक मात्र तेच..तसे परत कधी भेटले नाहीत.. छे.. त्यांची तुलनाच नाही होउ शकत..

जय - गणेश's picture

12 Nov 2012 - 3:48 pm | जय - गणेश

आमच्या शाळेत बाविस्कर गुरुजी होते, आज हि कघी कधी दिसतात. मधल्या सुटटीत ते वर्गात सरळ आडवे होत आसत. आणि चार एक पोरांना पाळ्त टेवायला सांगत आसत. आसेच एकदा मि माझ्या मित्राला त्याच्या वर्गात बोलवायला गेलो आसतांना, गुरुजी झोपले होते. मि बाहेरुनच मित्राला जोरात हाक मारली, गुरुजी जागे झाले आणी त्यांनी त्या चार पोरांना मझ्यावर ''छु'' केंल. त्यावेळी मुलांनी मला पकडुन वर्गात नेंल, गुरुजीनी मग स्वताची मुठ आवळुन मधली बोट पुढे काढुन जो ''गुद्दा'' मारला, तो आज परत आठवला.

शर्वरी नेने's picture

12 Nov 2012 - 8:32 pm | शर्वरी नेने

शाळेचा व मित्रांचा निरोप घेताना आलेले रडु
पाठीवर प्रेमळ हात फिरवत मित्रांचे ते सांगणे
"आपण परत परत भेटणार , असा रडु नकोस रे जाडु."

किती छान लिहिलंय हे. शाळेतल्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.
कविता अगदी मनापासून आवडली.

ह भ प साहेब, चौकटराजा साहेब, ज्ञानराम साहेब, तुम्हाला कविता वाचल्याबद्दल धन्यवाद.

जय - गणेश साहेब, शर्वरी नेने madam, तुम्हाला कविता वाचल्याबद्दल धन्यवाद.