सबूर

धनंजय's picture
धनंजय in जे न देखे रवी...
11 Aug 2012 - 12:58 am

सबूर
---
अवचित वाटेवर जुडलेले साथीदार--
काय त्यांच्या गाठोड्यांत?
काय खपल्यांच्या आड, कोण घाव काळजात
चिघळले काळ फार?
.
चिंधी जखमेची सोडू, सोडू पोतडीची गाठ
सारे उघड उघड…
तरी लपलेले जणू गोंधळात गडबड!
शोधू काळजीने वाट...
.
आशा-भीती एकसाथ, निरखून बघू आत
भांबावून खूप वेळ...
बोचू, खोचू, कधी क्लांत, कधी शांत, लावू मेळ,
सबूरीची आहे बात.
---
---
Slow Going
---
What all is crammed in sailors' chests
Of bunkmates met by chance?
What wounds we bear within our breasts
What abscesses to lance?
.
Undress the wound, unlock the lid,
And all is there, laid bare.
But jumbled, tumbled, open's hid:
Unless we sort with care.
.
We look within, with fear and hope -
But long we'll take to know...
We'll hurt, we'll heal, we'll feel, we'll grope:
And trust will come; but slow.
---

शृंगारकरुणशांतरसप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

चित्रा's picture

11 Aug 2012 - 4:53 pm | चित्रा

दोन्ही कविता आवडल्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Aug 2012 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्ही कविता आवड्ल्या.

फक्त ''अवचित वाटेवर जुडलेले साथीदार'' या ओळीतले हा जो 'जुडलेले' शब्द आहे ना तो तितका सहजपणे येत नाही राव. 'अवचित वाटेवर भेटलेले' म्हणा किंवा 'अवचित वाटेवर जोडले गेलेले' असं काही तरी पाहिजे होतं असं वाटलं.

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

12 Aug 2012 - 8:52 pm | अत्रुप्त आत्मा

जे काही आहे,ते बरे आहे... व मुख्य म्हणजे कळणारे आहे... धन्यवाद :)

धनंजय's picture

13 Aug 2012 - 10:08 pm | धनंजय

सर्वांचे आभार.

बिरुटेसर - होय "जुडणे" शब्दाचा अर्थ "जोडले जाणे" असा जवळजवळ आहे. "जुडणे" तसा कमी वापरातला शब्द आहे, पण अर्थछटा जरा वेगळी येते. ... म्हणजे "तुटलेले संबंध/तोडले गेलेले संबंध" दोहोंचा अर्थ तसा जवळजवळ सारखाच आहे. पण "तोडले" म्हटले की "कोणी तोडले" असा विचार अस्पष्टपणे मनात येतो. "तुटले" म्हटले की "कोणी?" असा प्रश्न मनात थेट येत नाही. त्याच्याच सारखे (पण संबंध सुरू होतानाच्या वेळी) "जुडलेले/जोडले गेलेले" यांच्यात अर्थछटेचा फरक येतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2012 - 11:08 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हम्म ठीक आहे, धन्स.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

13 Aug 2012 - 10:42 pm | पैसा

बरेच दिवस चाललेला मिपावरचा चांगल्या कवितांचा दुष्काळ संपला म्हणायचा!

मेघवेडा's picture

16 Aug 2012 - 3:16 pm | मेघवेडा

सुरेख कविता.