1

( ढोस देशीही तू, हर दिवशी तू)

Primary tabs

नाना चेंगट's picture
नाना चेंगट in जे न देखे रवी...
31 Jul 2012 - 6:30 pm

प्रेरणा - http://misalpav.com/node/22392

ढोस देशीही तू, हर दिवशी तू
गुत्त्यात हरेक, असशी परी तू
तुझी रंगभूमी, ही सृष्टी जरी
बारमधे तू, बारीतही तू

ढोसून उठशी, गुत्यातूनी तू
तर्राट होशी, लाल होऊन तू
मग जोकर विदुषक होशी
प्रकार अनेक, डोलकर तू

पडता गटारीत, तोल जात
रूप रम्य सृष्टीचे, दाखव तू
चालत कधी, धप्कन पडून तू
कौतूक तुझे, सत्‌ एकची तू

दाविशी दिव्य, जरी हे तू
दुसरे दिवशी, विसरशी तू
नानुडी सांगे, परका न कुणी
एकच सगळे जण, मी आणि तू

(आमचे परममित्र ... हो तेच ते .. त्यांना समर्पित ;) )

आणि हो, छंद यमक मात्रा आणि त्यांचे गुणगान गाणारे सर्व काही फाट्यावर आधीच मारलेले आहे.

बिभत्ससंस्कृती

प्रतिक्रिया

पैसा's picture

31 Jul 2012 - 10:30 pm | पैसा

नानुडीचे परममित्र गटारात पडू लागले?

अत्रुप्त आत्मा's picture

31 Jul 2012 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा

हे काही कवितेचं विडंबन नाही,तर विडंबनासाठी निवडलेली कविता आहे. ;-)

अता कुणाच्या...?
हे मात्र आंम्ही विचारत नाही हो. :-D

sneharani's picture

1 Aug 2012 - 9:57 am | sneharani

=)) =)) =))

कविता करण्याचा क्षीण प्रयत्न करणार्‍या नान्याचे अभिनन्दन .

परिकथेतील राजकुमार's picture

1 Aug 2012 - 11:39 am | परिकथेतील राजकुमार

लै भारी रे नानबा.

खालती "हे विद्वत्तापूर्ण भाषांतर जरी माझे असले, तरी खरी रचना ओळखा बरे" अशी ओळ का नाही ? ;)

आणि हो,

ढोसून उठशी, गुत्यातूनी तू
तर्राट होशी, लाल होऊन तू
मग जोकर विदुषक होशी
प्रकार अनेक, डोलकर तू

हे दोन्ही शब्द कवितेत येऊन देखील ती न उडाल्याबद्दल डब्बल अभिनंदन बरे.