हर देशीही तू, हर वेशीही तू

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
31 Jul 2012 - 6:12 pm

हर देशीही तू, हर वेशीही तू
रूपात हरेक, असशी परी तू
तुझी रंगभूमी, ही सृष्टी जरी
खेळांतही तू, मेळांतही तू

सागरी उठशी, मेघांतूनी तू
पर्जन्य होशी, जल होऊन तू
मग निर्झर, ओढा, नदी होशी
प्रकार अनेक, जलाशय तू

घडला मातीतुनी, अणुरेणू
रूप जीवसृष्टीचे, शाश्वत तू
पर्वत कधी, विशाल तरूही तू
कौतूक तुझे, सत्‌ एकची तू

दाविशी दिव्य, जरी हे तू
गुरूदेव दयाघन, प्रसन्न तू
तुकड्या सांगे, परका न कुणी
एकच सगळे जण, मी आणि तू

शांतरसकलाकविताधर्म

प्रतिक्रिया

छान भाषांतर, व्हर्जिनल गाणं कोणतं म्हणे ?