'सनई चौघडे '( चित्रपट ) एक फसलेला रिऍलीटी शो......

प्रगती's picture
प्रगती in जनातलं, मनातलं
23 Jun 2008 - 1:45 pm

चित्रपट : " सनई चौघडे "( कांदे पोहे )
रविवार लोकसत्ता मधील चांगले परीक्षण ( कुणीही चुकवू नये असा चित्रपट ) वाचून चित्रपट बघायला गेले आणि पदरी घोर निराशा आली
या चित्रपटामध्ये कुठ्ल्या गोष्टीला मेळ्च बसत नाही अशा अतार्किक घटनांची संगती आहे.
या चित्रपटाद्वारे नक्की काय सांगायचं आहे त्यांनाच समजलं नाही त्यामुळे आपल्याला पण काहीच समजत नाही :(
सनई चौघडे या नावामुळे आपल्याला वाटतं की लग्नामधील किंवा लग्नापुर्वी होणार्‍या गमती जमती यावर हा चित्रपट आहे, पण असं नसून
"कांदे पोहे" नावाचं एक वधु - वर सुचक केंद्र असतं आणि ते मुला मुलींच्या ह्जारो अर्जामधून एकमेकांना अनुरूप अशा पाच जोड्या निवडतात, आणि त्यांचा स्वभाव एकमेकांना कळावा म्हणून एका छानशा रिसॉर्ट मधे ठेवतात( त्यांच्या वर लक्ष ठेवायला आई - बाप पण
आहेत बरं का.) :B म्हणजे एकप्रकारे रिऍलीटी शो
मग त्यानंतर त्या पाच जोडयांचे एकमेकावरील आरोप प्रत्यारोप, एकमेकांचे विचार ,मधेच मुख्य हीरॉईन हीचं पूर्व प्रेम प्रकरण,
कुमारी-माता प्रकरण आणि या बाबतीत सगळ्यांचे तसेच त्यांच्या आई-बाबांचे थोर थोर विचार ऐकून आपल्या डोक्याचे उगाचच
कांदे-पोहे होतात ~X(
त्यामुळे ह्या चित्रपटाबद्द्ल मी माझं मत सांगेन की आपापल्या जबाबदारीवर " सनई चौघडे " बघायला जा ;) 8}
चित्रपटभर सुनीधी चौहान यांचे कांदे SSS पोहे SSS हे र्शीषक गीत सारखं सारखं ऐकून आपल्या कानाचे पडदे शाबूत राहील्याबद्द्ल
देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. :)

( वि. सु. आपली कोणाशी दुश्मनी असेल किंवा जुनी खुन्नस काढायची असेल तर त्यांना या चित्रपटाचे फुकट तिकीट द्या.) =))

चित्रपटअनुभव

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

24 Jun 2008 - 2:12 pm | भडकमकर मास्तर

फार त्रोटक परीक्षण...
पण तरी धन्यवाद...
न पाहताच माझा अंदाज याच्या प्रिमाईसबद्दल..... " कुमारी मातांनी लग्न केले तर त्यांचे कल्याण होते."

आता पहायला जावं की नाही या विचारात... :)
... (विचारमग्न) मास्तर
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री's picture

24 Jun 2008 - 2:24 pm | आनंदयात्री

धन्यवाद एका भुक्कड पिक्चर पासुन वाचवल्याबद्दल.

विसोबा खेचर's picture

25 Jun 2008 - 8:12 am | विसोबा खेचर

धन्यवाद एका भुक्कड पिक्चर पासुन वाचवल्याबद्दल.

प्रगतीताई, मीदेखील तुम्हाला हेच म्हणतो. आणि तसेही अलिकडे मी मराठी चित्रपट पाहायचं सोडूनच दिलेलं आहे. एवढे काही खास नसतात.

राजाभाऊ-गदिमा-बाबुजी या त्रयींनी दिलेल्या उतमोत्तम सिनेमांची सर हल्ली कशालाच नाही!

तात्या.

अभिरत भिरभि-या's picture

24 Jun 2008 - 6:00 pm | अभिरत भिरभि-या

मास्तर,
सविस्तर परिक्षण येथे वाचु शकता.
http://www.rediff.com/movies/2008/jun/20sanai.htm

प्रगती ताईंप्रमाणे या परिक्षकाचे मत प्रतिकुल दिसते आहे .
पुण्यातल्या आमच्या सुत्रांनुसार शिनेमा ना ग्रेट ना भिकार असा मध्यमवर्गीय आहे .
One time see.

भडकमकर मास्तर's picture

25 Jun 2008 - 9:37 am | भडकमकर मास्तर

What starts as a simple match-making film gets entangled with social issues.
हे असं वाक्य रेडिफच्या परीक्षणातलं...
हे अगदी आमच्या क्लासमधनं आलेल्या माणसानं लिहिल्यसारखं वाटतंय...
"सामाजिक प्रश्नांत अडकते ही फिल्म" असं म्हणायचं जर सोशल इश्यूजवर काही भाष्य केलं तर आणि तसं काही नसलं तर म्हणायचं, " दिग्दर्शकाला या अनुशंगानं येणार्‍या खूप प्रश्नांवर बोलता आलं असतं पण तो नेहमीचाच गोग्गोड पण उथळ मार्ग पत्करतो"

मला हल्ली परीक्षणंच मोटिव्हेटेड आणि ऍब्सर्ड वाटायला लागलेली आहेत.

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चित्रपटभर सुनीधी चौहान यांचे कांदे SSS पोहे SSS हे र्शीषक गीत सारखं सारखं

जरा अतिच होतंय..

वि. सु. आपली कोणाशी दुश्मनी असेल किंवा जुनी खुन्नस काढायची असेल तर त्यांना या चित्रपटाचे फुकट तिकीट द्या.

त्यापेक्षा आम्ही त्यांना महागुरुंची थोर विवेचने ऐकायला लावू! :)

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."