तुझ्या विना

आनंद भातखंडे's picture
आनंद भातखंडे in जे न देखे रवी...
23 Jul 2012 - 11:23 am

तुझ्या विना ही रात्र माझी सरते काळी काळी
तुझ्या विना मी लावून आलो संसाराची होळी ||

तुझ्या विना हा अल्लड वारा रुंजी घालत नाही
तुझ्या विना या पाउसधारा रुसून गेल्या काही ||

तुझ्या विना हा कुंद मोगरा गंध सांगत नाही
तुझ्या विना या मैफलीचा रंग रंगत नाही ||

तुझ्या विना बघ उडून गेले रांगोळीचे रंग
तुझ्या विना मी करत बसतो आठवणींशी संग ||

तुझ्या विना मी शोधात आहे जगण्याची आशा
तुझ्या विना मज अवगत नाही प्रेमाची भाषा ||

तुझ्या विना हे सुटतच नाही विरहाचे कोडे
तुझ्या विना हे मन म्हणते ‘श्वास उरले थोडे’ ||

करुणप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

23 Jul 2012 - 11:51 am | संजय क्षीरसागर

पहिली ओळ

तुझ्या विना ही रात्रनं सरते माझी काळी काळी

अशी हवं हो, आणि

तुझ्या विना मी लावून आलो संसाराची होळी||

अशी चालू संसारची होळी लावली तर रोजच्या पोळी-भाजीचे वांदे होतात... असं मी नाही, अनुभवी लोक सांगतात!

मंदार दिलीप जोशी's picture

24 Jul 2012 - 10:00 am | मंदार दिलीप जोशी

विरहभावना छान उमटल्या आहेत.