बावीस जून!

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
22 Jun 2008 - 7:32 pm

आज बावीस जून! काही महत्वाच्या ऐतिहासिक घटना ह्या दिवशी घडल्या आहेत, त्या॑चा हा धा॑डोळा..
१) २२ जून १८९७ ह्या दिवशी रात्री पुण्यात गणेशखि॑डीजवळ चाफेकर ब॑धूनी जुलमी 'रॅ॑ड' साहेबावर भर रस्त्यात गोळ्या झाडून त्याला ठार केला. सार्वभौम ब्रिटीश सत्तेवर प्रहार झाला. भारतीय स्वात॑त्र्यलढ्यातील एक महत्वाचे पान उलगडले गेले..
२) २२ जून १९४० रोजी फ्रान्सने (दुसर्‍या महायुद्धात) हिटलरपुढे गुढगे टेकले, बिनशर्त शरणागती पत्करली. हिटलरने पहिल्या महायुद्धातल्या पराजयाचा सूड उगवला.
३) २२ जून १९४१ रोजी हिटलरने रशियावर स्वारी केली (ऑपरेशन बार्बारोसा). ही त्याची लष्करी घोडचूक ठरली. न॑तर जगाच्या नकाशावर याचा मोठाच परिणाम झाला

इतिहासविचार

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

22 Jun 2008 - 8:39 pm | भडकमकर मास्तर

आणि ते चाफेकर बंधू आमच्या चिंचवडचे होते...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

ईश्वरी's picture

22 Jun 2008 - 11:43 pm | ईश्वरी

>>२२ जून १८९७ ह्या दिवशी रात्री पुण्यात गणेशखि॑डीजवळ चाफेकर ब॑धूनी जुलमी 'रॅ॑ड' साहेबावर भर रस्त्यात गोळ्या झाडून त्याला ठार केला.

पुण्याच्या इतिहासातील ही एक महत्वाची घटना आहे. चापेकर बंधू प्रखर देशभक्तीने भारलेले सच्चे क्रांतिकारक होते.
ह्याच घटनेवर बनलेला '२२ जून १८९७ ' ह्या लहानपणी पाहीलेल्या सिनेमाची आठवण झाली. अतिशय सुंदर सिनेमा होता. हा सिनेमा आठवला की 'गोंद्या आला रे आला ' ही आरोळी हमखास आठवतेच. '२२ जून १८९७ ' ला २ राष्ट्रीय आणि २ राज्यस्तरीय पारितोषिकं मिळाली होती.
अवांतरः सिनेमाचे संवाद विजय तेंडुलकरांचे होते. दिग्दर्शन नचिकेत व जयू पटवर्धन ह्या जोडप्याचे होते. त्यांचे दिग्दर्शनातील हे पहिले पाऊल होते.

ईश्वरी

१९८० साली बघितलेल्या ह्या सिनेमातली 'गोंद्या आला रे!' ही आरोळी आजही आठवते. अत्यंत थोडक्या बजेटमधे, परिणामकारक सिनेमा कसा बनवता येतो ह्याचे हे उत्तम उदाहरण होते.
रवींद्र मंकणीचे मी पाहिलेले हे पहिलेच काम आणि मला ते फार आवडले होते. चापेकरांचे चरित्र इतक्या प्रेरकपणे ह्या सिनेमातून मांडले आहे की बस. फितुरीमुळे पकडले जाऊन त्यांना शेवटी फासावर जावे लागते ते बघून जीव गलबलला होता रक्त उसळलं होतं!
ह्याचे संवाद बहुदा शंकर नाग आणि नचिकेत पटवर्धन ह्यांनी लिहिले होते. तेंडुलकरांनी नव्हे. (चुभूदेघे).

चतुरंग

ईश्वरी's picture

23 Jun 2008 - 3:19 am | ईश्वरी

>>ह्याचे संवाद बहुदा शंकर नाग आणि नचिकेत पटवर्धन ह्यांनी लिहिले होते. तेंडुलकरांनी नव्हे. (चुभूदेघे).
माझ्या माहितीप्रमाणे कथा - पटकथा शंकर नाग व संवाद तेंडुलकर यांचे होते. पटवर्धनांचे दिग्दर्शन होते. त्यांचा कथा वा संवाद लेखनात सहभाग होता की नाही हे माहीत नाही.
ईश्वरी

विसोबा खेचर's picture

23 Jun 2008 - 6:20 am | विसोबा खेचर

चाफेकरबंधुंच्या पवित्र स्मृतीला प्रणाम..!

तात्या.

प्राजु's picture

23 Jun 2008 - 10:01 am | प्राजु

२२ जून : वर्षातला सगळ्यात मोठा दिवस. सुर्यास्त सगळ्यांत उशिरा होतो.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋचा's picture

23 Jun 2008 - 10:16 am | ऋचा

नाही.

२१ जुन हा सगळ्यात मोठा दिवस असतो.

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

विदुषक's picture

23 Jun 2008 - 2:36 pm | विदुषक

एकाच घरातल्या ३ भाउ देशासाठी बलिदान देतात हे अजोड उदाहरण आहे
धन्य ती चाफेकर माता !!!
मजेदार विदुषक

ब्रिटिश टिंग्या's picture

23 Jun 2008 - 4:15 pm | ब्रिटिश टिंग्या

चाफेकरबंधुंच्या पवित्र स्मृतीला प्रणाम..!

- टिंग्या

अवांतर - थोडेसे स्पेनच्या फुटबॉल टीमविषयी! :)

१. दिनांक - २२ जुन १९८६
प्रतिस्पर्धी - बेल्जियम
स्थळ - वर्ल्डकप (मेक्सिको)
सामना - क्वार्टर फायनल
निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये स्पेन बाद!

२. दिनांक - २२ जुन १९९६
प्रतिस्पर्धी - इंग्लंड
स्थळ - युरोकप (इंग्लंड)
सामना - क्वार्टर फायनल
निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये स्पेन बाद!

३. दिनांक - २२ जुन २००२
प्रतिस्पर्धी - साऊथ कोरिया
स्थळ - वर्ल्डकप (जपान/कोरिया)
सामना - क्वार्टर फायनल
निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये स्पेन बाद!

४. दिनांक - २२ जुन २००८
प्रतिस्पर्धी - इटली
स्थळ - युरोकप (ऑस्ट्रिआ/स्विस)
सामना - क्वार्टर फायनल
निकाल - पेनल्टी शुटआऊटमध्ये (अखेर) स्पेन विजयी! #:S हुश्श!

भडकमकर मास्तर's picture

23 Jun 2008 - 5:55 pm | भडकमकर मास्तर

जिंकले एकदाचे...
भारी योगायोग आहे....
.. रेन रेन गो टू स्पेन...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

संजय अभ्यंकर's picture

23 Jun 2008 - 7:48 pm | संजय अभ्यंकर

टिंग्या भाऊ,

भन्नाट!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Jun 2008 - 6:55 pm | डॉ.प्रसाद दाढे

वा वा टि॑गीसाहेब, चा॑गली माहिती दिलीत.. अजब योगायोग आहे..

स्वाती दिनेश's picture

23 Jun 2008 - 7:59 pm | स्वाती दिनेश

चाफेकर बंधूंवरचा तो सिनेमा पहायला शाळाशाळातून मुले नेली होती,आणि आम्ही सगळ्या मित्रमंडळींनी शाळेतर्फे तो सिनेमा एकत्र पाहिला आणि एकत्रच भारावलो होतो,त्याची आठवण झाली.
चाफेकरबंधूंच्या स्मृतीला प्रणाम!
स्वाती

भाग्यश्री's picture

23 Jun 2008 - 10:44 pm | भाग्यश्री

एकत्रच भारावलो होतो!! हेहे !!

मला पण तो सिनेमा आठवतोय.. खरंच भारावून जायचे मी..
स्पेनची माहीती मस्त आहे!! हेहे जिंकले एकदाचे !

http://bhagyashreee.blogspot.com/