गुरु...

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
3 Jul 2012 - 2:02 pm

गुरु रे गुरु तो कसा रे असावा...?
न चिडता ओरडता,डबलसीट बसावा
पुढुन वहान येता,मागुन बोंब मारावा
असा गुरु कमी,मित्र जास्ती असावा

धरो कान त्यानी जसा मी चुके रे
रडो तो ही जर कान माझा दुखे रे
उभयता असे प्रेम नसतो दुरावा
डोळे झाकुनी तेथे,प्लस वन भरावा

कसे ओळखावे,गुरु श्रेष्ठ आहे
जरा मी घसरता,करी तो ही - ह्हे...! ह्हे...!
असा दुष्टबुद्धी, गुरुही त्यजावा
मनी त्यासी नेहेमी,मायनस वन मोजावा

गुरु आत्म ज्ञानी,असो मित्र कोणी
जसा आमचा तेंडल्या,किंवा कॅप्टन धोणी
बघोनी शिकावा,शिकोनी बघावा
असा गुरू नेहेमी,हातचा एक धरावा

कधी तो ही मारे,किती ऊंच शॉटं
कधी शिष्य घेई,तयाचाच कॉटं
तरी तो गुरु,नाही कणभर चिडावा
खर्‍या गुरूचा,हाच अस्सल पुरावा..!

मिळाला मिळाला गुरु तो मिळाला
परंपरेत सार्‍या,होता जो तळाला
तयाच्याच रूपी,जणू मित्र आहे
मनीचेच माझ्या,खरे चित्र आहे.
०===०===०===०===०===००===०===०===०===०===००===०===०===०===०===००===०===०===०===०===०

हास्यसंस्कृतीकविताजीवनमानमौजमजा

प्रतिक्रिया

गणपा's picture

3 Jul 2012 - 2:05 pm | गणपा

वाह भटोबा.
झकास !!!

नाना चेंगट's picture

3 Jul 2012 - 2:20 pm | नाना चेंगट

मस्त मस्त !!

बाकी आज गुरु पौर्णिमा आहे.

ज्यांना योग्य गुरु मिळाला नाही अशा अनेकांची आज तडफड होत आहे* ;)

त्यांना योग्य गुरु मिळावा अशी आमच्या गुरुंकडे+ प्रार्थना !!

* इकडे तिकडे पाहिले की दिसेल :)
+ तसे आमचे अनेक गुरु आहेत. आमच्या एकंदर आचरणामुळे त्यांची खिल्ली उडवली जाऊ नये म्हणून त्यांचे नाव सांगणार नाही. (अनेक जण आम्हीच नानाचे गुरु आहोत असे सांगत दक्षिणा मागतील त्यांना थारा देऊ नये)

पियुशा's picture

3 Jul 2012 - 5:07 pm | पियुशा

कविता भारिये :)

अत्रुप्त आत्मा गुरुजी,
कविता सुरेख रचलीय.

तुम्ही लिहून त्रुप्त, आम्ही वाचून त्रुप्त.
आता तरी राहू नका हो तुम्ही अत्रुप्त. :P

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2012 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा

आता तरी राहू नका हो तुम्ही अत्रुप्त.

चौकटराजा's picture

3 Jul 2012 - 6:06 pm | चौकटराजा

अ आ , एकदम झ्याक !

अर्धवटराव's picture

3 Jul 2012 - 6:19 pm | अर्धवटराव

प्लस वन रे मित्रा :)

अर्धवटराव

अमितसांगली's picture

3 Jul 2012 - 9:33 pm | अमितसांगली

+१

गणामास्तर's picture

3 Jul 2012 - 10:02 pm | गणामास्तर

भारीचं हो बुवा..!! झ्याक झालीयं कविता.

सागर's picture

4 Jul 2012 - 12:01 am | सागर

गुरुपौर्णिमेला तुझे हे गुरुस्तवन वाचून मी तरी तृप्त झालो रे अतृप्त आत्म्या ;)

गुरु आत्म ज्ञानी,असो मित्र कोणी
जसा आमचा तेंडल्या,किंवा कॅप्टन धोणी
बघोनी शिकावा,शिकोनी बघावा
असा गुरू नेहेमी,हातचा एक धरावा

कधी तो ही मारे,किती ऊंच शॉटं
कधी शिष्य घेई,तयाचाच कॉटं
तरी तो गुरु,नाही कणभर चिडावा
खर्‍या गुरूचा,हाच अस्सल पुरावा..!

या ओळींना फोटोची ही जोड :)

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jul 2012 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा....! बर्‍याच जणांना आमचा गुरु अवडला की...! चला,सार्थक जाहले रचनेचे...!

आलेल्या सर्वांचे आभार