उशीर

डॉ अशोक कुलकर्णी's picture
डॉ अशोक कुलकर्णी in जे न देखे रवी...
17 Jun 2012 - 8:33 pm

उशीर

ती ही समीप होती, पुनवेस चांद राती
अन बात छेडण्याची फक्त देर होती

नक्षत्र पाहतांना थोडीच रेलली ती
आधार द्यावयाची फक्त देर होती

ठावे मलाही होते, अनभिदन्य ती ही नव्हती
शब्दात सांगण्याची फक्त देर होती

आतूर भावनाही येऊन दाविते ती
डोळ्यात वाचण्याची फक्त देर होती

तीसरे कुणीही नव्हते, दोघात रात्र होती
वाटून घ्यावयाची फक्त देर होती

गेल्या अशाच रात्री, कां दूर राहते ती
सर्वांस कारणे ही, फक्त देर होती

--अशोक

शृंगारकरुणकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

17 Jun 2012 - 9:02 pm | प्रचेतस

डॉ. साहेब मिपावर स्वागत.
कविता आवडली.
लिहित रहा.

शैलेन्द्र's picture

18 Jun 2012 - 11:46 pm | शैलेन्द्र

+१
असेच म्हणतो..

जाई.'s picture

17 Jun 2012 - 9:13 pm | जाई.

छानच
कविता आवडली

स्पंदना's picture

18 Jun 2012 - 8:09 am | स्पंदना

सर्वांस कारणे ही, फक्त देर होती...
डॉक्टर्...देर ठिकाय्...अंधेर नही होना मंगताय।

डॉ अशोक कुलकर्णी's picture

18 Jun 2012 - 11:08 am | डॉ अशोक कुलकर्णी

वल्ली, जाई आणि अपर्णा.... धन्यवाद !!
अपर्णा:
"छोटी सी बात" मधल्या अमोल पालेकरनं रंगवलेलं क्यारेक्टर समोर ठेवून लिहिलेली ही कविता आहे. बास्स इतकंच !!

तीसरे कुणीही नव्हते, दोघात रात्र होती
वाटून घ्यावयाची फक्त देर होती

आवडले .

खुप दिवसांनी ?

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jun 2012 - 11:23 pm | अत्रुप्त आत्मा

तीसरे कुणीही नव्हते, दोघात रात्र होती
वाटून घ्यावयाची फक्त देर होती
वाह... वा वा वा...! ये एकदम बढिया है...