फ्लोरा,फोटो, फोकस- भाग १- देवपुष्प - कमल

चौकटराजा's picture
चौकटराजा in कलादालन
26 May 2012 - 9:05 pm

१९७६ च्या सुमारास पुणे येथे भुरके यांचेकडे ठेव ठेवून व्याजाच्या बदल्यात आयसोली वन हा
कॅमेरा मिळवला. त्यात एक तिसांश सेकंद व बी अशी दोनच सेटिंग एक्सपोजर साठी होती व तीन सेमी बाय तीन सेमी या आकाराचे ३६ फोटो रोलमधे येत असत. सगळेच्या सगळे ३६ फोटो छपाईस पात्र होणे म्हणजे सीईटीत मोठे यश मिळविण्यासारखे असे. तरीही आपल्याकडे
कॅमेरा आहे इतरांकडे तेवढाही नाही याचा सुखद अभिमान असे.

काळ पुढे सरकला. माझा एक श्रीमंत मित्र त्यावेळी रंगीत फोटो घरीच तयार करण्याचा नादाला लागला होता. सारी आवश्यक सामग्री पेपर्स, रसायने त्याने पैदा केली होती. अंधारात आम्ही बारीक लाल दिव्यात काम करीत असू. टायमर म्हणून मी गीतेच्या पंधराव्या अध्यायातील श्लोक म्हणत असे. पण कधी फोटोत हिरवा कधी तांबडा कास्ट येत असे. " जो पर्यंत माणसाची कातडी कातडीच्या रंगासारखी दिसत नाही तोपर्यंत फोटो बिघडला असे समजायचे असे माझा मित्र कोठल्यातरी पुस्तकातून पाठ करून आला होता. बरेच कागद वाया गेले. त्यावेळी याशिका हा ब्रॅन्ड फार लोकप्रिय होता. पेंटेक्स ची ही चलती होती. -------
या भागात कमळ फूल ही थीम निवडून काही मी काढलेले फोटो टाकत आहे. कॅनन पॉवरशॉट ५२० चा उपयोग केला आहे.







वरील सर्व फोटू हे लाल बाग बंगळूरू येथील आहेत.
पुढील आकर्षणे-
१ फ्लोरा,फोटो,फोकस- भाग २ - पुष्पराज गुलाब
२फ्लोरा, फोटो, फोकस- भाग ३ - नाजुक फुलांची दुनिया
३.फ्लोरा, फोटो, फोकस, भाग ४- फुलला वनी बसंत बहार !

मुक्तकतंत्रछायाचित्रण

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

26 May 2012 - 9:47 pm | शैलेन्द्र

दुसरा आणी शेवटुन तिसरा आवडला..

अत्रुप्त आत्मा's picture

26 May 2012 - 10:55 pm | अत्रुप्त आत्मा

व्वा... मस्त मस्त एकदम :-)

पु.भा.प्र...

संजय क्षीरसागर's picture

26 May 2012 - 11:40 pm | संजय क्षीरसागर

अत्यंत सुरेख फोटो आलेत. घरी कॅमेरा आहेच, आता फोटोग्राफी शिकावीशी वाटते आहे, धन्यवाद!

प्रचेतस's picture

27 May 2012 - 10:05 am | प्रचेतस

फोटो मस्तच

१,३ आणि ७ क्रमांकाच्या फोटोतली कमळे आउट ऑफ फोकस वाटत आहेत.
४था, ५वा आणि ६ वा तर अप्रतिमच आहेत. विशेषतः कमळपर्णावर बसलेला पक्षी एकदम सुरेख.

कमळांचे हे आम्ही काढलेले काही फोटू.

१.

२.

३.

४.

वरील सर्व फोटोंवर एडिटींगची कुठलीही प्रक्रिया केलेली नाही.

सूड's picture

27 May 2012 - 1:23 pm | सूड

मस्तच रे वल्ली !!

चौकटराजा's picture

27 May 2012 - 1:30 pm | चौकटराजा

यातील कमळे जवळ जवळ १५ ते २० फुटावरून चित्रित केली आहेत. २००७ म्हणजे ५ वर्षापूर्वी
चे फोटो आहेत . कदाचित आज काढले तर अधिक चांगले येतील.
वल्ली , तुझे चारही फोटो मस्त आलेयत ! क्लास !

वा! वल्ली खूपच सुरेख आहेत तुमची प्रकाशचित्रे!

पयसा कमलं कमलेन पय: पयसा कमलेन विभाति सरः

पिंगू's picture

27 May 2012 - 3:32 pm | पिंगू

चौकटकाका, एकच शब्द अप्रतिम..

- पिंगू

चौकटराजा साहेब, खरच लाजवाब.

वल्ली साहेब, तुमचेही फोटो खरच मस्त

परिकथेतील राजकुमार's picture

28 May 2012 - 2:30 pm | परिकथेतील राजकुमार

अतिशय सुरेख आणि अवर्णनीय फटू आहेत. ह्या आधी असली सुंदर चित्रे कधी बघण्यातच आली नव्हती.

तुम्ही खरे तर तुमच्या चित्रांचे प्रदर्शन वैग्रेच भरवायला हवे.

तुमची ही दैवी कलेने रंगलेली चित्रे पाहून ह्या आंतरजालावरच्या काही भिकार आणि 'केले क्लिक की आणून चिकटीव' अशा वृत्तीच्या स्वयंघोषीत फोटोग्राफर्सना काही अक्कल येईल अशी आशा करतो.

प्यारे१'s picture

28 May 2012 - 2:45 pm | प्यारे१

अरेरे, काय हे!

एवढी छान छायाचित्रे आणि मला एकही दिसू नये...
काय हा दैवदुर्विलास? हे ईश्वरा! काहीतरी कर रे बाबा आणि मला दिव्य दृष्टी दे. मला छायाचित्रे पाहायची आहेत रे!

अरे खरंच एकही छा चि दिसलं नाही चौरांच्या धाग्यांमधलं .

शेर्पा तेनसिंग नोर्गे एव्हरेस्ट चढून गेला. म्हणजे मग इतरांनी हनुमान टेकडीही चढू नये की काय?

मनिम्याऊ's picture

29 May 2012 - 1:28 pm | मनिम्याऊ

मी माझ्या बागेतील कमळांची प्रकाशचित्रे येथे टाकु शकते का?

परिकथेतील राजकुमार's picture

29 May 2012 - 1:49 pm | परिकथेतील राजकुमार

अहो ह्या मानस सरोवरातल्या दैवी कमलपुष्पांपुढे तुमच्या बागेतल्या कमळांचे काय कौतुक ?

चौकटराजा's picture

29 May 2012 - 4:00 pm | चौकटराजा

ओपन फोरमचा हाच मूळ हेतू आहे की एकाच विषयावर सर्व बाजूनी विचार व्हावा ! ज्याना हा हेतू पसंत नाही त्यांच्या कारवायांबद्द्ल न बोलणे बरे !
आपली प्रकाश चित्र आवश्य टाका. अर्थात संपादक मंडळाचा मान ठेवून.

मनिम्याऊ's picture

29 May 2012 - 4:01 pm | मनिम्याऊ

ह्म्म्म..(मज पामराचे डोळे उघडल्याबद्दल) पराकाकांचे धन्यवाद...

मनिम्याऊ's picture

2 Jun 2012 - 6:07 pm | मनिम्याऊ

१. कमलिनी

२. कृष्णकमळ

३. कमळ कळी

४.
५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.
१४.

१५.

१६.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jun 2012 - 12:38 pm | अत्रुप्त आत्मा

म्याऊ म्याऊ... मनिम्याऊ ... फोटुग्रफीला सलाम आपला :-)

चौकटराजा's picture

4 Jun 2012 - 8:57 am | चौकटराजा

कृष्णकमळाचा फोटू व पिवळ्या पराग कोषाचा फोटू जास्त करून आवडले.