नमस्कार मंडळी..
हि कथा आहे एका सेल्समनची. कदाचित एखाद्या डेली सोप प्रमाणे.. कदाचित.. असो.
**************************************************************************************
माई : ए बाळा उठ ना...
राहुलः हो गं माई.. थोडा वेळ झोपु दे ना..
माई : अरे आज तुझा रिझल्ट आहे ना.
राहुल फटकन उठतो. १५ मिनिटात तयार.. माई नास्त्याचं विचारेपर्यंत राहुल स्कुटरला किक मारुन पसार..
आज राहुलचा विंजीनीरींगच्या दुसर्या वर्षाचा निकाल.. राहुल तसा हुशार.. पण आज त्याच्या काळजात भितीची लहर उठत होती..
आज काय होणार? हा प्रश्न राहुलला तसाच त्याच्या आई-वडिलांना सतावत होता.. ११ वाजता रिझल्ट लागणार होता. गेलं एक वर्ष राहुलने कॉलेज अॅटेंड केलं नव्हतं. कसंबसं परीक्षेला बसता येईल इथपर्यंत काळजी घेतली होती. पण भिती कायम होती, कारण अभ्यासाच्या नावाखाली केलेली टंगळमंगळ आज दिवे लावणार होती.
आज राहुलने त्याचा लकी शर्ट घातला होता. जो तो प्रतिक्षेत..
अमितः ए रावल्या.. काय रे.. तुला काय वाटतं.. काय व्हईन रे आप्लं?
राहुलः माझी आधीच फाटलीये यार.. थांब जरा.. ११ वाजता कळेलच कुणाची किती फाटलीये ते.
दोघे खळखळून हसतात.. मग मंग्या, सुन्या, केतकी, जाड्या, पंक्या त्यांना जॉइन होतात...
मागचं एक वर्ष क्रिकेट आणि फुटबॉल खेळुन आपण काय दिवे लावलेत हे आज त्याना कळणार होतं.
राहुलः आपल्याला तर कोंफिडेंस हाय राव.. हे बघ.. तुला, सुन्याला, केतकीला मी मॅथस शिकवलं, एक पेपर स्क्रॅच केला.. म्हंजे ए.टी.के.टी पक्की.. बाकी राहिलं ते म्हन्जे १-२ विषय.. त्यात एखाद्या मधे तरी मटका लागलंच.
अमितः हा राव. तुझं बराय. आमचं काय? आमी तर सगळीकडंच दिवे लावलेत..)
राहुल: अरे टेंशन नको घेऊ. सगळे पास होतील.
केतकी: "आपण सगळे एकत्र पास नाही झाले तर मग आपण भेटणार नाही ना.." असं म्हणून केतकी मुसमुसायला लागली.. आणि सगळे चुप झाले..
शेवटी सगळे कँटीन मधून एचओडी च्या डिपार्टमेंट कडे निघाले.. कुणाचे हात घामेजलेले तर कुणाचे कपाळ..
क्रमशः (भाग छोटा आहे.. पण क्षमस्वः, पुढचा भाग नक्कीच मोठा लिहिन तुम्हाला आवडला तर)
प्रतिक्रिया
26 May 2012 - 7:08 pm | नाना चेंगट
लिहा लिहा
पण जरा मोठा भाग लिहा... :)
26 May 2012 - 7:31 pm | कान्होबा
अहो पण आवडावे असे काय आहे या भागात?
26 May 2012 - 7:37 pm | निवेदिता-ताई
छान लिहिलय
27 May 2012 - 4:26 am | शिल्पा ब
मोठे भाग टाका की जरा!! एवढ्याश्या सँपलवर कसं काय सांगणार?
27 May 2012 - 4:04 pm | जोशी 'ले'
डेली सोप चे भाग एवढेच असतात.. :-)
30 May 2012 - 11:12 pm | किचेन
प्रत्येक ओळीनंतर कॅमेरा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाऊन झूम इन आणि झूम ओउत होतोय अशी कल्पना करा.आणि पाठीमागे धडाम धाम धडाम असा आवाज हि आहे अशीही कल्पना करा.डेली सोपच्या दोन भागात न्हाहून निघाल.
27 May 2012 - 4:12 pm | खटासि खट
मधे मधे तिप्पट आकाराच्या साबणाच्या जाहिराती टाकल्या एक पूर्ण भागाचा एपिसोड होईल.. मग वाटेल ब्वॉ डेली सोप
27 May 2012 - 4:56 pm | पैसा
म मो, नेहमीच छान लिहिता, आज थोडक्यात का आटपला हा भाग?
28 May 2012 - 8:40 am | चांगभलं
टुकार
इतकेच म्हणेन
दुनियादारि वाच्ल्त काय इत्क्यात?
28 May 2012 - 11:53 am | वपाडाव
ममो, निराश केलंय इतकंच म्हणेन...
28 May 2012 - 11:55 am | स्पा
ह्म्म
30 May 2012 - 2:54 pm | स्पंदना
ये तो सिर्फ ट्रेलर है । पिक्चर अभी बाकि है । उगा निराश बिराश व्हायच काम नाही.
ममो लिहा. मेरी तरफसे एक कोंबडी (पकायी हुइ ) लागु.
30 May 2012 - 2:55 pm | स्पंदना
एको??