ऑपरेशन एंटेबी

अमृत's picture
अमृत in जनातलं, मनातलं
23 Apr 2012 - 11:22 am

२७ जुन १९७६, दुपारी साडेबाराला 'एअर फ्रांसचे' उड्डाण संख्या A १३९ हे एअरबस ३०० विमान ग्रीस मधिल अथेन्स विमानतळाहून पॅरीसला जाण्याकरीता उडाले. इज्राइल मधिल 'तेल अवीव' येथून निघालेल्या या विमानात २४८ प्रवासी व १२ हवाई कर्मचारी होते. विमानात मुख्यतः इज्राईल, फ्रांस, ग्रीक, अमेरीका, इंग्लंड तसेच इतर देशातील नागरीक प्रवास करीत होते. विमान अवकाशात झेपावताच अवघ्या काही वेळातच विमानाला २ पॅलेस्तीनी आणि २ जर्मन अतिरेक्यांनी अपह्रुत केले. पैकी २ अतिरेकी 'Popular Front for the Liberation of Palestine – External Operations' आणि उर्वरीत २ 'German Revolutionary Cells' या संघटनांशी संबंधीत होते. अपह्रुत विमानाला लिबिया मधे बांगझेईला(अवांतर -बांगझेइ काही महिन्यांपूर्वी गद्दाफीमूळे बाताम्यांत होते.) उतरविण्यात आले. तिथे विमानात इंधन भरून तब्बल ७ तासांनी म्हणजे पहाटे ३ला विमान युगांडामधे एंटेबी विमानतळावर उतरविण्यात आले. दरम्यान बांगझेइला एका महिला प्रवाश्याला तिने गर्भपात झाल्याचे सांगितल्याने(बतावणी केल्याने) सोडून देण्यात आले होते. एंटेबीला या ४ अतिरेक्यांना आणखी ४ अतेरेकी येऊन मिळाले. त्यांना युगांडचे तत्कालीन राष्ट्र्पती इदी अमीन यांचा पूर्ण पाठींबा होता.

विमानाला सोडण्यासाठी अतिरेक्यांनी इज्राइअलमधे बंदी असलेले ४० व इतर देशांतील १३ असे एकूण त्रेपन्न पॅलेस्तीनी जणांच्या सुटकेची मागणी ठेवली तसे न केल्यास १ जुलै पासून सर्व बंधकांना मारण्याची धमकी दिली. अतिरेक्यांनी बंधकांना इज्राईली नागरीक व ईतर अशा दोन गटात विभागले. पुढील एक आठवडा या सर्व बंधकांना विमानतळातील एका खोलीत ठेवण्यात आले होते. दरम्यान परत काही बंधकांना सोडण्यात आले पण तरी तब्बल १०६ बंधक अजुनही अतिरेक्यांच्या ताब्यात होते. अतिरेक्यांनी त्यांचा मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास उर्वरीत बंधकांना मारण्याची परत धमकी दिली. त्याचबरोबर फ्रांसहून आलेल्या विशेष विमानानी विमानातील कर्मचारी व ज्यू लोकांव्यतिरीक्त इतर बंधकांना जाण्याची मुभा देण्यात आली. ही घोषणा ऐकताच मुख्य वैमानीक मायकेल बाकोस याने 'विमानासकट सर्व प्रवासी हे माझी जबाबदारी असल्याने' विमान सोडण्यास तीव्र निषेध केला. इतर कर्मचार्‍यांनी सुद्धा त्याला अनुमोदन दिले. या कर्मचार्‍यांव्यतिरीक्त एक फ्रेंच धर्मोपदेशीकेनीपण विमान सोडण्यास नकार दिला पण तीला बळजबरीने एअर फ्रांसच्या विमानात चढविण्यात आले. आता विमानात ८५ ज्यू आणि २० इतर असे एकूण कर्मचारी मिळून १०५ जण शिल्लक राहिलेत. या मुक्त केलेल्या बंधकात एक 'फ्रेंच ज्यु' प्रवासीपण चुकून मुक्त झाला होता. हा प्रवासी सैनिकी प्रशिक्षण घेतलेला असल्याने त्याने अतिशय महत्वपूर्ण व नेमकी माहिती मोसादला पुरविली.

वाटाघाटी

मधिल एक आठवड्यात इज्राइलनी राजकीय पातळीवरून वाटाघाटी सुरू केल्या होत्या. सोबतच सैनिकी कारवाईचीपण तयारी चालविली होती. पण ही अतिशय धाडसी आणि महत्वाकांक्षी सैनिकी कारवाई जर अयशस्वी झालीच तर अतिरेक्यांची मागणी पूर्ण करण्याची मानसिक तयारीपण ठेवली होती. इज्राइल सेनेतून निवृत्त झालेल्या एक बड्या अधिकार्‍याचे इदी अमीन बरोबर असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेऊन त्यालापण अमीनसोबत बोलणी करायला लावले पण प्रयत्न निष्फळ झाला. तसेच अमेरीकेकरवी इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अन्वर सादत यांचीसुद्धा अमीनशी बोलणी करण्याबद्दल विनवणी केली गेली.

या सर्व निष्फळ प्रयत्नात १जुलै उजाडला. इज्राइललने अतिरेक्यांना वाटाघाटी करण्यासाठी मुदत ४ जुलै पर्यंत वाढवण्याची विनंती केली जिला इदी अमीन यांनीसुद्धा धूर्त पाठींबा दर्शविला. पण या पाठींब्याचे कारण पात्र वेगळे होते. या मुदतीत अमीनचा मॉरीशसला जाउन 'Organisation of African Unity' या संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रं सिवसागर रामगुलाम यांना सोपविण्याचा मनसुबा होता. हे तीन दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरलेत. ३ जुलैला इज्राइली मंत्रीमंडळानी सैनिकी कारवाईला परवानगी दिली . या मिशनची मुख्य जबाबदारी मेजर जनरल येकुतीएल कुती अ‍ॅडम व मातान विलनाई यांचेवर तर ब्रिगेडीयर जनरल डान शोमरोन यांना खर्‍या कारवाईची कमान सोपविण्यात आली. हे सगळं घडत असताना सुद्धा राजकीय पातळीवरून प्रयत्न सुरूच होते. इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांची शिष्टाईपण मदत करू शकली नाही.

अभियानाची तयारी व आखणी

मोसाद या इज्राइली शासकीय गुप्तहेर संस्थेने एंटेबी विमानतळाची हुबेहूब प्रतीकृती बनविण्याची तयारी चालविली होती. हे करताना मुक्त केल्या गेलेल्या बंधकांचीपण मदत घेतली गेली. त्याचबरोबर या विमानतळच्या बांधकामात ज्या इज्रायली कंपनीने मदत केली होती त्यांनापण पाचारण करण्यात आले. या बांधकामात ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता त्यांना बोलावून एक गोष्ट सांगितली गेली ती ही की प्रतिकृती पूर्ण झाल्यावर त्यांना जोपर्यंत अभियान पूर्ण होणार नाही तो पर्यंत राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव तिथेच राहावे लागेल.

अभियानाची योजना करताना एक गोष्ट निश्चीत झाली की बहुतांश आफ्रिकन देशांची सहानुभूती इज्राइली बंधकांसोबत असली तरी प्रत्यक्षात इदी अमीनच्या विरोधात इज्राइलच्या संभावित कारवाईत मदत करायाला कोणाताही देश धजावणार नव्हता. आता पंचाइत अशी होती की इज्राइलने या अभियानाकरीता निवडलेल्या लोकहीड सी १३० हर्क्युलीस विमानाला इतका लांबचा पल्ला पुन्हा इंधन भरल्याखेरीज साधणे कठीण होते. सोबतच इतक्या दुरवर हवेतच ५-६ विमानांना इंधन पूरविणे शक्य नव्हते. प्रतिकूल गोष्टींची यादी बरीच लांब होती. इतकी सगळी शस्त्रास्त्रे विमानातून घेऊन जाताना ज्या देशाची सीमा ओलांडायची होती त्या- त्या देशांची संमती आवश्यक होती अन्यथा या कृतीकडे चिथवणी समजून संबंधीत देशांकडून प्रत्युत्तर मिळण्याची दाट शक्यता होती. याशिवाय एकातरी पूर्व आफ्रिकन देशाची सीमा ओलांडल्याखेरीज एंटेबीला पोचणे शक्य नव्हते. त्यातल्या त्यात केनिया थोडा अधिक सौम्य असल्याने केनियातील एका बड्या इज्राइली हॉटेल उद्योजकाने केनियन सरकारची मनधरणी करून इज्राइलला केनियाची सीमा वापरण्याची परवानगी मिळवून दिली सोबतीलाच 'Jomo Kenyata International Airport' या विमानातळावर इंधन भरण्याची अनुमती पण मिळवली. ही सर्व सज्जता करून ३ जुलैच्या मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत ४ लोकहीड सी १३० हर्क्युलीस विमानांनी एंटेबीच्या दिशेनी कूच केले.

गटांची विभागणी
१०० इज्राइली कमांडो हे ३ गटात विभागल गेले होते.
१.भूदल नियंत्रण तुकडी
या छोटेखानी तुकडीत ब्रि. ज. शोम्रोन, प्रसारण व सहाय्यक सैनिकांच ताफा होता.
२. हल्लाबोल गट
ले.क. योनातन नेतनयाहु यांच्या नेतृत्वात 'सियेरात मत्कल' या इज्राइल्च्या २९ ब्लॅक कमांडोंचा गट. याची मुख्य जबाबदारी म्हणजे जुन्या विमानतळाला उध्वस्त करणे आणि बंधकांची सुखरूप सुटका. यांची परत दोन गटांमधे विभागणी केल्या गेली होती. मेजर बेत्सर व मतन विलनाइ हे त्या गटांचे प्रमुख.
३. 'रिएंफोर्समेंट टीम'
अ. जागा सुरक्षित करणे, इज्राइली विमानांना शत्रुपासुन सुरक्षित ठेवणे व सुटका कीलेल्या बंधकांना विमानात चढविणे.
ब. युगांडा वायु सेनेच्या मिग फायटर विमानांना नष्ट करणे जेणेकरून ते परतीला पाठलाग करण्यास असमर्थ होतील.
क. विमानात इंधन भरण्यात मदत करणे.

परिक्षेचा दिवस

एंटेबीचा मार्ग शर्म - अल - शेख वरून अंतरराष्ट्रीय हवाई मार्गानी लाल समुद्रावरून जार्णारा होता. या मार्गावरून जाताना उडाणाची उंची अवघ्या १०० फुटांवर ठेवण्यात आली होती जेणेकरून इजिप्त, सुदान आणि सौदी अरेबीयाला याचा सुगावा लागणार नाही. लाल समुद्राच्या दक्षिण निकासावर हा ताफा परत दक्षिणेकडे वळून डिजबोटी मार्गे ईशान्येकडे नैरोबीकडे मार्गक्रमण करू लागला. या मार्गात सोमालीया, इथिओपीआ ओलांडून आफ्रिकन रिफ्ट दरी व विक्टोरीया तलावावरून उडाला.

दोन बोइंग ७०७ विमाने मालवाहू विमानांच्या मागोमाग उडडत होती. पैकी वैद्यकीय सुविधा असलेलं पहीलं बोइंग नैरोबी विमानतळावर उतरलं. तर दुसरं बोइंग (जन. येकुतीएल अ‍ॅडम असलेलं) कारवाई सुरू असताना एंटेबी विमानतळावर घिरट्या घालत राहीलं. रात्री ११ वाजता इज्राइली फौजा एंटेबी विमानतळावर उतरल्या. उतरण्यापूर्वीच विमानाचे कार्गो दरवाजे हवेतच उघडण्यात आले होते. विमान उतरताच त्यामधून काळी मर्सीडीज व सोबतीला लॅड रोव्हर्सचा ताफा चपळाइनी बाहेर आला व मुख्य ईमारतीकडे मार्गक्रमण करू लागला. ही खेळी युगांडन फौजांना गुंगारा देण्यासाठी होती. जणू युगांडन राष्ट्राध्यक्ष अमीन परदेशी दौरा करून परत आलेत व इतर उच्च अधिकारी सोबत आहेत असे भसवण्यासाठी. या गाड्यांमधून हल्लाबोल गट वेगानी ईमार्तीकडे झेपावला. पण एक चूक झाली काही दिवसापूर्वीच अमीन यानी काळी मर्सीडीज सोडुन पांढरी मर्सीडीज ताफ्यात सामील केली होती व याची कल्पना तेथिल सुरक्षा रक्षकांना असल्याने त्यांनी हा काफीला थांबवण्यास सांगताच त्यांना 'सायलेंसर' बसविलेल्या बंदूकीने फैरी झाडण्यात आल्या. जसे ते पुढे जऊ लागले लँड रोव्हर मधील कमांडोंना ते रक्षक मेलेले नसुन जिवंत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ रायफलनी गोळ्या झाडून त्यांना मारले पण या रायफलला सायलेंसर न्हवता. त्यामूळे या जोराच्या आवाजानी मिशन फसू नये म्हणून कमांडोंनी लगेच मोटारीबाहेर उड्या घेतल्या.

बंधक सुटका
सर्व बंधक धावपाट्टीलगतच्या ईमारतीच्या मुख्य खोलीत होते, कमांडो आत शिरताच हिब्रू व इंग्रजीतून ओरडू लागले " खाली बसा आम्ही इज्रायली सैनीक आहोत" एक बंधक उभा राहाताच त्याला चुकून अतिरेकी समजून मारण्यात आले. कारवाई सुरू होतच बंधकांच्या खोलीत शिरलेला अतिरेक्याने बंधकांना शौचालयात आश्रय घेण्यास सांगीतले. "बाकीचे अतिरेकी कुठे आहेत?"कमांडो ओरडले त्यासरशी बंधकांनी दुसर्‍या खोलीकडे बोट दाखविले कमांडोनी लगेच तिकडे काही ग्रेनेड भिरकावले व क्षणाता आत घुसून इतर ३ अतिरेक्यांना कंठस्नान घातले. अशाप्रकारे मुख्य हल्ला संपला होता. याच दरम्यान उर्वरीत ३ मिग विमानातून बंधकांना विमानांपर्यंत नेण्यासाठी चिलखती गाड्या उतरल्या. या गाड्यांचा उपयोग इंधन भरताना बचावासाठी व युगांडन वायु दलाच्या विमानांना नष्ट करण्यासाठीपण झाला.

परतीची वाट
सुटका केलेल्या बंधकांना विमानात चढ्विताना युगांडन सैनिकांनी प्रतिहल्ला चढविला. याला सडेतोड प्रत्यत्तर देण्यात आले पण असे करताना योनातन नेतन्याहू यांच्या छतीत गोळी घुसून ते मरण पावले. या व्यतिरीक्त ५-६ कमांडोसुद्ध जखमी झाले. हे अभियान एकूण ५३ मिनीटे चालले. यात सर्व अतिरेकी ठार झालेत तसेच ४०-४५ युगांडाचे सैनिक व ११ युगांडन वायु सेनेची मिग विमाने उध्वस्त केली गेलीत. १०६ बंधकांपैकी ३ ठार झालेत, १० जखमी तर एका बंधकाला युगांडात सोडून देण्यात आले. नंतर याचा वचपा म्हणून अमीन यांनी युगांडात वस्तव्यास असलेल्य शेकडो केनियन नागरीकांची कत्तल घडविली.

जागतीक प्रतिक्रीया
चिडलेल्या युगांडने संयुक्त राष्ट्रसंघच्या सुरक्षा समितीची बैठक बोलावून इज्राएल विरूद्ध निंदाप्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला उत्तर देताना इज्राइली राजदूतानी अतिशय समर्पक व बाणेदार उत्तर दिले, " आम्ही या समितीपुढे सरळ संदेश घेउन आलो आहोत : आम्ही जे काही केलं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण आम्ही जागाला दाखवून दिलं की इज्राइल सारखा एक छोटासा देश, ज्याला या परिषदेतील सगळे सदस्य ओळखतात, त्याच्यासाठी मानवी स्वाभिमान, जीवन आणि स्वातंत्र्य ही सर्वोच्च मूल्ये आहेत. आम्हाला शेकडो स्त्री, पुरूष व बालकांचा जीव वाचविल्याचा जितका अभिमान आहे त्याहून जास्त अभिमान मानवी स्वातंत्र्यासाठी केलेल्या धाडसाचा आहे".

साहाजिकच हा प्रस्ताव पार झाला नाही. संपूर्ण पाश्चिमात्य देशांनी या धाडसी कृतीबद्दल इज्राएलची पाठराखण केली. योगायोगानी कारवाईचा दिवस ४-जुलै -१९७६ आणि अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहिरनामा प्रसिद्ध झाल्याचा २०० वा वर्धापनदीन एकाच दिवशी आलेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सचिवांनी या हल्ल्याची 'राष्ट्रसंघाच्या सदस्याच्या सार्वभौमिकतेवरील हल्ला म्हनून निर्भत्सना केली'. अरब व कम्युनिस्ट देशांनीपण या घटनेची निंदा केली.
संधी मिळूनसुद्धा विमान न सोडल्याबद्दल एअर फांसच्या वैमानिकाला सक्त ताकीद देउन सेवेतून निलंबीत केलं गेलं. या वैमानिकाला पुढे जाऊन फ्रांसचा सर्विच्च बहुमान ' National Order of the Legion of Honour' तर इतर कर्मचार्‍यांना 'French Order of Merit' ह सम्मान प्रदान केला गेला.
पुढे या धर्तीवर आधारीत कमांडोंचा एक गट अमेरिकेनीसुद्धा तयार केला. या संपूर्ण रोमहर्षक, धाडसी अभियानावर बेतलेले कित्तेक चित्रपट बनविले गेले.

आजही जगातील अत्यंत जिकरीच्या, अशक्य कोटितील साहसाची परीसीमा गाठणर्‍या अभियानांच्या यादीत 'ऑपरेशन एंटेबीला' मानाचं अढळ स्थान आहे.
**************************************************************
हा माझा भाषांतराच पहिलावहीला प्रयत्न तरी वाचकांनी झालेल्या चूका कृपया निदर्शनास आणून द्याव्यात. तसेच या विष्यावर पूर्वी लिखाण झाल्याची मला माहिती नाही, असे असल्यास निदर्शनास आणून द्यावे. या अभियानाविषयी २ वर्षांपूर्वी वाचानात आले व इतरांना पण याचा आनंद मिळावा म्हणून याच्या भाषांतराचा योग शेवटी आज आला. **************************************************************
(आभार - वरील मजकूर आंतरजालावरून साभार)
**************************************************************

इतिहासलेखभाषांतर

प्रतिक्रिया

जोशी 'ले''s picture

23 Apr 2012 - 11:47 am | जोशी 'ले'

या घडामोडी वर आधारित raid on entebbe हा Hollywood चा चित्रपट पहाण्या सारखा आहे, कुठेहि सिनेमॅटिक लिबर्टि न घेता थोड्या डाॅक्युमेंट्रि च्या वळनाने जानारा हा चित्रपट मिळाल्यास जरुर बघा.

मोदक's picture

23 Apr 2012 - 12:40 pm | मोदक

मराठी - किबुत्झ मधला डॅनी इथे आला होता
English - 90 Minutes at Entebbe.

दोन्ही वाचण्यासारखी आहेत.
त्यापैकी मराठी पुस्तकाची असंख्य पारायणे झाली आहेत. :-)

चौकटराजा's picture

23 Apr 2012 - 1:06 pm | चौकटराजा

ही घटना तारुण्यात केवळ थरारक बातमी म्हणून पेपरात वाचली होती. त्या नंतर या वर आधारीत भन्न्नाट मुव्ही चानेल वर पाहिला. आपण
केलेला प्रयत्न वि ग कानिटकर तसेच वि स वाळिंबे या लेखकांची आठवण करून देतो.

नितिन थत्ते's picture

23 Apr 2012 - 1:23 pm | नितिन थत्ते

या घटनेवरील अनुवादित पुस्तक शालेय वयात वाचले होते. चित्रपट पाहिला नाही.

आपल्या देशातल्या लोकांना हे इस्रायलचे उदाहरण नेहमी कोट करायला आवडते.

मस्त चित्रपट आहे. कुंद्याच्या सांगण्यावरुन पाहिला.
तो पहात असताना कंदहार विमान अपहरणाच्या वेळी भारताला अस एखादं पाउल का उचलता आल नाही याची राहुन राहुन लाज वाटली.

नितिन थत्ते's picture

23 Apr 2012 - 1:37 pm | नितिन थत्ते

गणपा भौ मनाला लावून घेऊ नका. इतिहासात हे एकमेव (किंवा कदाचित अजून एक) यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन असावे.

गेल्यावर्षी इस्रायलने एका अपहृत सैनिकाच्या बदल्यात १०२७ कैद्यांना सोडले होते.

त्याखेरीज वेळोवेळी अनेक कैद्यांना सोडण्यात आलेले आहे.

:)
थत्तेजी असेल हो त्यांनी सोडले असेतील कैद्यांना दुसर्‍या एखाद्या घटनेत. पण म्हणुन ह्या घटनेच महत्व कमी होत नाही. जर इस्रायलसारखा लहान देश असं एखाद ऑपरेशन राबवू शकतो तर मग महासत्ता होण्याची स्वप्न पहाणार्‍या देशाला ते का जमु नये. म्हणुन लाज वाटली असे म्हणालो.

नितिन थत्ते's picture

23 Apr 2012 - 2:03 pm | नितिन थत्ते

दुसर्‍या "एखाद्या" वेळी सोडलेले नाही. "वेळोवेळी" सोडले आहे. एण्टेबीच्या घटनेपूर्वीही आणि नंतरही.

भारत (सरकारी पातळीवर) महासत्ता होण्याची स्वप्ने भारत पहातो आहे का त्याची कल्पना नाही. मीडिया आणि पाश्चात्य देशांनी फुगवलेला बुडबुडा आहे बहुधा तो.

इतिहास - जगाचा की इस्त्रायलचा..?

"यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन" ची व्याख्या काय..? म्हणजे Acceptable Civilian Casuality Ratio वगैरे..?

नितिन थत्ते's picture

23 Apr 2012 - 8:00 pm | नितिन थत्ते

जगाच्याच (२० व्या शतकापासूनच्या) इतिहासात असेल.

तुम्हाला आणखी बरीच उदाहरणे सापडली तर कळवावी.

सांगतो... पण तुम्ही व्याख्या सांगा ना...

(हॉस्टेज रेस्क्यू या विषयावर ठरवून वाचलेले आहे म्हणून विचारले. :-))

मी येथे सांगू इच्छितो की भारताने सुद्धा कमांडो कारवाही ची तयारी केली होती. आपले कमांडोज कंदाहार ला आपल्या शिष्ट मंडळाच्या विमानातून गेलेसुद्धा होते पण तेथे पोहोचताच लक्षात आले की कंदाहारच्या विमानतळाला हजारो सशस्त्र पाठानांचा गराडा होता. खुद्द विमानाभोवती शेकडो पठाण होते आणि विमानतळाचे छावणीत रुपांतर झाले होते. अशा वेळी कारवाही न करण्याचा निर्णय घेतला गेला कारण त्याने नुकसानच झाले असते.

सुहास झेले's picture

23 Apr 2012 - 1:44 pm | सुहास झेले

पूर्ण सिनेमा इथे आहे....

अन्या दातार's picture

23 Apr 2012 - 1:46 pm | अन्या दातार

छान ओळख रे अमृत.
@ नितीन थत्ते:

आपल्या देशातल्या लोकांना हे इस्रायलचे उदाहरण नेहमी कोट करायला आवडते.

का आवडू नये हे कळल्यास बरे होईल.

नितिन थत्ते's picture

23 Apr 2012 - 1:57 pm | नितिन थत्ते

>>का आवडू नये हे कळल्यास बरे होईल.

आवडायला हरकत नाही. पण इस्रायलवर 'जेव्हाजेव्हा' असा प्रसंग येतो तेव्हा इस्रायल अशीच अ‍ॅक्शन घेते कारण इस्रायलचे सरकार कणखर आहे अशी समजूत करून घेणे योग्य नाही इतकेच.

वर गणपा भौंना दिलेला प्रतिसाद पहावा.

>> पण इस्रायलवर 'जेव्हाजेव्हा' असा प्रसंग येतो तेव्हा इस्रायल अशीच अ‍ॅक्शन घेते कारण इस्रायलचे सरकार कणखर आहे अशी समजूत करून घेणे योग्य नाही इतकेच.<<

थत्ते काका, पण आपल्या सरकारने एकदा तरी असं धाडस करायला काय हरकत होती/आहे? विशेषतः कन्दाहार प्रकरणात वाजपेयी सरकारकडून अशा धाडसाची अपेक्षा होती .... कारण वाजपेयी जेव्हा विरोधी बाकावर बसत असत तेव्हा मोठ्या राणा भीमदेवी थाटात वक्तव्य करत असत, त्यामुळे त्यांच्याबद्दल अपेक्षा उंचावल्या गेल्या होत्या. 'राष्ट्र्तेजा'चा आविष्कार दिसेल अशी आशा होती, पण .... हाय रे दैवा. संसदेवर हला झाला तेव्हा पाकिस्तानला धडा शिकवायची आणखी एक संधी आली होती ती पण त्यांनी वाया घालवली. त्यावेळचे हवाई दल प्रमुख अनिल टिपणीस ह्यांनी सरकारला तसा सल्ल देखील दिला होता आणि हवाई दलाच्या क्षमतेची खात्रीदेखील दिली होती. इतकंच काय पण कारगिल युद्धात पण लष्कराला सीमा ओलांडण्याची मोकळीक दिली नव्हती.

सामान्य जनतेने सरकारकडून कठोर कारवाईची अपेक्षा का ठेवू नये? किती काळ क्षमता असून सुद्धा शेपूट घालायचे? लेच्यापेच्या मेंगळट राष्ट्राचे नागरीक म्हणून आत्मगौरव करून घ्यायचा का? नाही म्हणायला एकदा तरी स्व. इन्दिरा गांधींनी (म्हणे) चीनला धमकावले होते की बान्ग्लादेशच्या युद्धात भारतविरोधात कारवाया केल्यास तुमचा 'लॉप नॉर्'चा अणुप्रकल्प उडवून देवू (सन्दर्भः काळे काका अनुवादित 'न्युक्लियर डिसेप्शन' ) ... तेव्हढाच काय तो आनंदाचा क्षण म्हाणायचा, कितपत खरा खोटा ते इंदिराजी आणि चीनच जाणे.

मन१'s picture

24 Apr 2012 - 7:07 pm | मन१

किती काळ क्षमता असून सुद्धा शेपूट घालायचे?
(युद्धाबद्द्ल)"क्षमता " असण्याबद्दल साशंक आहे.

लेच्यापेच्या मेंगळट राष्ट्राचे नागरीक म्हणून आत्मगौरव करून घ्यायचा का?
भावनांशी सहमत. पण भारतीय नागरिकांना (मिडियामुळे की काय )वाटतो तेवढा भारत बलाढ्य नाही असे वाटू लागले आहे.
अवांतरः-
"धाडसी" प्रयत्नांपैकी छापामार हल्ल्याचा प्रयत्न आपण केला होता. अमेरिकेने लादेनला मारला तसाच एल टी टी ई च्या प्रभाकरनला मारायचा प्लॅन होता. पण ऐनवेळी बातमी फुटली की काहीतरी झाले आणि नेमके त्याला काहिच न होता, त्याला मारायला गेलेल्या अठ्ठावीस कमांडोजनाच टिपून मारले गेले.

संजय क्षीरसागर's picture

23 Apr 2012 - 2:02 pm | संजय क्षीरसागर

विषयाची मांडणी आणि प्रयत्न उत्तम आहे, लिहीत रहा.

मूकवाचक's picture

23 Apr 2012 - 2:10 pm | मूकवाचक

पुलेशु

स्मिता.'s picture

23 Apr 2012 - 2:38 pm | स्मिता.

मला माहिती नसलेल्या एका थरारक प्रसंगाची माहिती मिळाली. चित्रपटसुद्धा डाऊनलोड करून बघेन.

हा माझा भाषांतराच पहिलावहीला प्रयत्न तरी वाचकांनी झालेल्या चूका कृपया निदर्शनास आणून द्याव्यात.

भाषांतर छानच झालेय आणि त्यातून माहितीसुद्धा सुंदर मिळाली आहे. पण काही लहानश्या सुचवण्या आहेतः काही ठिकाणी भाषांतर शब्दशः वाटतेय ते पुढच्या वेळी सुधारता येईल. तसेच लेख वाचून तो थोडासा 'रिपोर्ट' सारखा वाटतोय, त्याला थोडा ओघवत्या भाषेत आणला असला तर वाचायला आणखी मजा आली असती.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Apr 2012 - 3:12 pm | परिकथेतील राजकुमार

ऑपरेशनचा जणू आँखो देखा हाल आहे असेच वाचताना वाटत होते.

उत्तम आणि थरारक..
अजून अशाच मिशनची सीरीज येऊ दे.

भडकमकर मास्तर's picture

23 Apr 2012 - 5:06 pm | भडकमकर मास्तर

या कारवाई बद्दल अविनाश धर्माधिकारी यांचे एक तासाभराचे भाषण ऐकले आहे....

उत्तम लेखन / भाषांतर आहे...

सानिकास्वप्निल's picture

23 Apr 2012 - 5:23 pm | सानिकास्वप्निल

उत्तम लेखन
चित्रपट आजच बघेन म्हणतेय :)
ध्न्यवाद :)

इरसाल's picture

23 Apr 2012 - 5:29 pm | इरसाल

लेखन आवडले.

जोशी"ले" यांचे आभार. शिनेमा डालो. लावला आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Apr 2012 - 7:15 pm | निनाद मुक्काम प...

मोसाद च्या ह्याच जिगरबाज कमांडोज नी आपल्या ब्लेक केट कमांडोज ला अतिरेकी कारवायाच्या संधर्भात प्रशिक्षण दिले होते. मात्र कंदाहार प्रसंगी त्यांच्यावर विश्वास न टाकता वाजपेयी सरकारने दहशतवादापुढे लोटांगण घातले.
त्यांनी असे का केले ? ते दुर्बल होते का ?
खचितच नाही.
ह्या मागील कारणीमीमांसा करणारा छोटेखानी लेख ( व त्यावर प्रतिसादाच्या जिलब्या ) पाडण्याचा फार पूर्वीपासून बेत होता.
ह्या दोन्ही अपहरण नाट्य व त्यामागील नाट्य लवकरच लिहीन.

सदर लेख निव्वळ अप्रतिम
असे दर्जेदार लेख आपण अजून लिहावेत हि सदिच्छा.

नाहीतर दुसरे काय?

आता बरेच विचारवंत काही ना काही कारणमीमांसा बनवतील पण शेवटी सत्य एवढेच की असा धाडसी निर्णय घेण्यापेक्षा बुश आणि क्लिंटन काय म्हणतील ह्याचीच धास्ती अधिक असणार.

तुमच्या घरात घुसून शेजार्‍याचे लाडावलेले कार्टं जर रोजच क्रोकरी फोडत असेल आणि तक्रार केल्यावर शेजारी त्याला पाठीशी घालत असेल तर एकदा शेजार्‍याच्याच कानाखाली अशी एक वाजवून द्यावी की जागच्या जागी तो आणि ते लाडावलेले कार्टं मुतले पाहिजेत. का तुम्ही वाट बघत बसणार की कधीतरी त्या कार्ट्याला अक्कल सुचेल आणि तोपर्यंत तुम्ही रोज नुकसान सोसत राहणार?

आत्ता सर्वांना हे उदाहरण बालिश वाटेल, पण एकदा अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडले की पुढे हेच पाकिस्तानी आणि तालिबानी भारतात काय उच्छाद मांडतील ते पहालच. तेव्हा जर आपले राजकीय नेतृत्व कणखर नसेल तर आपले भयंकर हाल होतील. त्याहीवेळी हे अमेरिका आणि ब्रिटन आपल्याला शहाजोगपणे नसते सल्ले देतच राहणार आहेत आणि दबावतंत्राचा प्रयोगही करणारच आहेत. तेव्हा आपल्याला त्यांचे दबाव झुगारून एकदाच पाकिस्तानला कायमची अद्दल घडवावीच लागणार आहे .... पण तशी हिम्मत दाखवणारे राजकीय नेतृत्व सध्यातरी दूर दूरपर्यंत दृष्टीपथात नाहीये हीच आपली शोकांतिका आहे.

विकास's picture

24 Apr 2012 - 12:37 am | विकास

क्लिंटन काय म्हणतील ह्याचीच धास्ती अधिक असणार

ती आम्हाला य संकेतस्थळावर देखील असते. ;)

असो जोक्स अपार्ट, केवळ बुश-क्लिंटन (पक्षी: अमेरीके) मुळे काही झाले असावे असे वाटत तरी नाही... कुठेतरी असे वाटते की आपल्याला सोव्हिएट रशिया संपल्यावर अजून कोणी आंतर्राष्ट्रीय मित्र करता आलेला नाही, जो आपण एखादा पवित्रा घेतल्यास विरोध करणार नाही. ह्या एकटेपणाची ही मर्यादा आहे असे वाटते... तरीदेखील, कणखर राज्यकर्ते असल्याचे सिद्ध करण्याची संधी मात्र गमावली हे वास्तव शिल्लक राहतेच.

बाकी मूळ लेख चांगला आहे. तो चित्रपट देखील बघण्यासारखा आहे. ह्या घटनेचा (आधारीत नाही पण) चित्रकरणात उल्लेख असलेला "लास्ट किंग ऑफ स्कॉटलंड" हा चित्रपटपण बघण्यासारखा आहे.

अर्धवटराव's picture

24 Apr 2012 - 4:27 am | अर्धवटराव

एक घाव दोन तुकडे करण्यासारखी परिस्थिती, तयारी, संधी... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्यवहार्यता नाहि. विमान अपहरण नाट्याच्या वेळी (,सुदैवान,) विचार करुन काम करणारे नेतृत्व पीठासीन होते... रेस्क्यु ऑपरेशनची शक्यता नक्कीच पडताळुन बघितली असणार... आणि त्यात विजयाची पूर्ण खात्री पटली असती तर कदाचीत तसं झालही असतं... शेवटी कटु पण अपरिहार्य निर्णय घ्यावाच लागला.

अर्धवटराव

५० फक्त's picture

24 Apr 2012 - 7:01 am | ५० फक्त

+१,
बाकी लेख मस्त झालाय, इथं मिळालेल्या सगळ्या लिंकावरच्या फिल्म पाहेन आता.

मराठी_माणूस's picture

24 Apr 2012 - 10:24 pm | मराठी_माणूस

तेव्हा जर आपले राजकीय नेतृत्व कणखर नसेल तर .......

कणखर नसण्या बद्दल अजुनही शंका ?

रेवती's picture

23 Apr 2012 - 7:18 pm | रेवती

भाषांतर छान झाले आहे.

स्वाती दिनेश's picture

23 Apr 2012 - 7:31 pm | स्वाती दिनेश

भाषांतर चांगले जमले आहे.
ही घटनाच इतकी थरारक आहे की वाचताना अंगावर काटा आला.
स्वाती

प्रथमच अनुवाद केला असला तरी खूप चांगल्याप्रकारे केला आहे.
घटनाक्रमही व्यवस्‍थित रंगला आहे.
असाच दम धरुन अनुवाद करीत राहिल्यास निश्चित सफाइदारपणा येईल.
-------------------------------------------------------------------------------
आता मुभा आहे, आणि मी याच व्यवसायात आहे म्हणून हा थोडासा छिद्रान्वेष:

उड्डाण संख्या = फ्लाइट नंबर (असे शब्द आल्यास इंग्रजी शब्द असले तरी सर्वदूर प्रचलित शब्दांनाच प्राधान्य द्यावे )
'रिएंफोर्समेंट = रिइन्‍फोर्समेंट (किंवा आशयानुसार, राखीव धडक कृतीदल )
बंधक = ओलीस (बंधकवर हिंदीची छाप जाणवते)
विमानानी = विमानाने
इतर कर्मचार्‍यांनी सुद्धा त्याला अनुमोदन दिले = अनुमोदन हा धूळीची पुटं चढलेला ऑफिशियल शब्द वाटतो, त्याऐवजी 'इतर कर्मचार्‍यांनीही यासाठी होकार दिला'
राहिलेत = राहिले
हे तीन दिवस अतिशय महत्वपूर्ण ठरलेत = हे तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरले.
न्हवता = नव्हता
याला सडेतोड प्रत्यत्तर देण्यात आले पण असे करताना योनातन नेतन्याहू यांच्या छतीत गोळी घुसून ते मरण पावले = लेखाच्या वर्ण्यविषयावर अवधान ठेऊन त्यानुसार शब्दांची विविध रुपे वापरल्यास अनुवाद उठावदार होतो. मरण पावले ऐवजी 'त्यांना वीरमरण आले', किंवा 'लढता-लढताच गतप्राण झाले '

आम्ही जे काही केलं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण आम्ही जागाला दाखवून दिलं की इज्राइल सारखा एक छोटासा देश, ज्याला या परिषदेतील सगळे सदस्य ओळखतात, त्याच्यासाठी मानवी स्वाभिमान, जीवन आणि स्वातंत्र्य ही सर्वोच्च मूल्ये आहेत. आम्हाला शेकडो स्त्री, पुरूष व बालकांचा जीव वाचविल्याचा जितका अभिमान आहे त्याहून जास्त अभिमान मानवी स्वातंत्र्यासाठी केलेल्या धाडसाचा आहे" =

अशी पल्लेदार वाक्ये आल्यास ‍ती मराठीत करताना आशयाचे भान राखून बिनदिक्कत गरज असेल ‍तिथे पूर्णविरामाने तोडावीत.

आम्ही केलेल्या कारवाईबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. इस्‍त्राएल या छोट्याशा देशाला या परिषदेतील सर्व सदस्य देश चांगलेच ओळखतात. स्‍वाभिमान, जीवनरक्षण आणि स्वातंत्र्य ही मूल्ये इस्‍त्राएल सर्वोपरि मानतो. ओलीस पकडलेल्या शेकडो स्‍त्री-पुरुष, अबालवृद्धांचे प्राण वाचवण्‍यासाठी गाजवलेल्या पराक्रमापेक्षाही, आम्हाला मानवी स्‍वातंत्र्य अबाधित राखण्‍यासाठी केलेल्या धाडसाचा जास्त अभिमान वाटतो.

सोत्रि's picture

24 Apr 2012 - 12:10 am | सोत्रि

आता मुभा आहे, आणि मी याच व्यवसायात आहे म्हणून हा थोडासा छिद्रान्वेष:

छिद्रान्वेषी यकुंचा विजय असो !!!

- (छिद्रान्वेषी गटाचा छुपा कार्यकर्ता) सोकाजी

>>(छिद्रान्वेषी गटाचा छुपा कार्यकर्ता)

--- छुपा कार्यकर्ता की अध्‍यक्ष? ;-) ;-)

कुंदन's picture

25 Apr 2012 - 11:51 am | कुंदन

सुधलेखनाचे काम यकु ला औट्सोर्स करावे काय?

मन१'s picture

24 Apr 2012 - 7:09 pm | मन१

प्रतिसाद मननीय व त्याची भाषा प्रभावी आहे.

स्वगतः- शिकवणी लावावी काय ह्या यक्कुकडे?

विजय_आंग्रे's picture

23 Apr 2012 - 7:54 pm | विजय_आंग्रे

सदर लेख छान लिहलाय अगदि थरारक! :smile:
या कारवाईवरची एक अप्रतिम डॉक्युमेंटरी फिल्म इथे पहाता येईल.

मोदक's picture

23 Apr 2012 - 8:01 pm | मोदक

>>>>>>>>>>एका बंधकाला युगांडात सोडून देण्यात आले. नंतर याचा वचपा म्हणून अमीन यांनी युगांडात वस्तव्यास असलेल्य शेकडो केनियन नागरीकांची कत्तल घडविली.

>>>एका बंधकाला युगांडात सोडून देण्यात आले

एका बंधक - डोरा ब्लॉश नावाच्या आजीबाई आदल्याच दिवशी घशात अन्नाचा घास अडकल्याने युगांडातील हॉस्पीटल मध्ये होत्या केवळ त्या इतर ओलीसांमध्ये नसल्याने त्यांची सुटका होवू शकली नाही.. नंतर डोरा ब्लॉश ना इदी अमीनच्या सांगण्यावरून ठार केले गेले. (डोरा ब्लॉश यांचा मुलगा इलान हारतुव्ह हा शेवटच्या क्षणापर्यंत जुन्या टर्मीनल बिल्डींगमध्ये थांबला होता. वाट बघत आणि ओलीसांमध्ये अगदी शेवटी विमानात बसणार्‍यांपैकी तो एक होता.)

>>>>याचा वचपा म्हणून अमीन यांनी युगांडात वस्तव्यास असलेल्य शेकडो केनियन नागरीकांची कत्तल घडविली.

इस्रायलच्या विमानांना परतीच्या प्रवासासाठी नैरोबी च्या विमानतळावर इंधन देण्यात आले. याचा बदला म्हणून अमीन ने युगांडात वस्तव्यास असलेल्या शेकडो केनियन नागरीकांची कत्तल घडविली.

पैसा's picture

23 Apr 2012 - 8:08 pm | पैसा

मूळ कोणत्या लेखाचं भाषांतर आहे हे? ही कारवाई प्रचंड थरारक होती हे नक्कीच!

खेडूत's picture

24 Apr 2012 - 12:23 am | खेडूत

फारच छान !
प्रचंड आवडले आहे. अजून बारकाव्यांसहित तीन चार भाग व्हायला हवे होते.
उदा. ''या मुदतीत अमीनचा मॉरीशसला जाउन 'Organisation of African Unity' या संघटनेच्या अध्यक्षपदाची सूत्रं सिवसागर रामगुलाम यांना सोपविण्याचा मनसुबा होता. ''
यामागची आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी समजली असती तर अजून मजा आली असती.

पाषाणभेद's picture

24 Apr 2012 - 5:20 am | पाषाणभेद

थरारकतेचा कळस!

अमृत's picture

24 Apr 2012 - 8:55 am | अमृत

प्रोत्साहन, प्रतिक्रीया व सूचनांबद्दल सर्वांचा आभारी आहे. पुढिल भाग लिहिताना यांचा नक्किच उपयोग होइल. परत एकदा धन्यवाद.

अमृत

चौकटराजा's picture

24 Apr 2012 - 11:16 am | चौकटराजा

मजकुरापासून शुद्धलेखनापर्यंत काहीनी व्यवसाय असताना व काहीनी नसताना चुकांची दुरूस्ती सुचविली आहे. आपण ती होकारात्मक रितीने
स्वीकारली म्हणून माझा "जोहार" स्विकारावा.

प्यारे१'s picture

25 Apr 2012 - 9:42 am | प्यारे१

उगी उगी.... नका रडू!

गणामास्तर's picture

24 Apr 2012 - 12:46 pm | गणामास्तर

छान ओळख करून दिलीत. अशाच घटनांवरची मालिका होऊन जाऊ देत.
१९७२ म्युनिक ऑलिम्पिक च्या वेळी पॅलेस्तिनी अतिरेक्यांनी इस्रायलच्या ११ खेळाडूंची हत्या केली होती.
त्या अतिरेक्यांना मोसाद ने शोधून शोधून मारले होते.
त्या ऑपरेशन "wrath of god " बद्दल सुद्धा लिहा काही तरी.

मन१'s picture

24 Apr 2012 - 7:12 pm | मन१

युद्धाच्या कथा रम्य असतातच.
लेखन थरारक आहे

यशोधरा's picture

24 Apr 2012 - 8:35 pm | यशोधरा

मस्त लिहिले आहे, आवडले.

भाषांतर छान झाले आहे.
बाकी श्री. थत्तेंशी सहमत

मन१'s picture

19 Jul 2012 - 6:16 pm | मन१

इस्राइल (की ज्यू) ह्यांनी एकदा कुणाला शत्रू मानले तर ते त्याला "सोडून देत" नाहीत असे म्हणण्यासाठी अजून एक दुवा मिळाला:-
http://www.esakal.com/esakal/20120719/5546115063312842368.htm
अटक खरे तर लंडन मध्ये झालेली आहे, पण ह्यामागे अदृश्य इस्राइली हात असणारच.
दुसर्‍या महायुद्धात ज्यूंचा छळ करुन , कत्तली करुन काही नाझी कार्यकर्ते/नेते दुसर्‍या महायुद्धात जर्मनीचा पराभव होताच ओळख बदलून सटकले, जगभर विखुरले. ते आता सहा-सात दशकानंतरही जिवंत असलेच तरी आयुष्याच्या शेवटच्या टाप्प्यात, वार्धक्यात असतील म्हणून त्यांना पकडायला पाच सात वर्षांपूर्वी इस्राइलने operation last chance सुरु केले होते. हा त्याचाच बहग असू शकतो.

गणामास्तर's picture

19 Jul 2012 - 8:39 pm | गणामास्तर

मला वाटते जर तो इस्राइल ला सापडला असता तर अटक (लंडन मध्ये का होईना) करण्यासाठी जिवंत
नसता राहिला.