पैंजणवाले जप जरा

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
21 Apr 2012 - 6:25 pm

लचकत मुरडत चाले कामिनी
दिपवत चमकत चपळ दामिनी
वो बावळी ओ सावळी अगं ए चंचल
क्षणभर थांब ना थांब ना थांब ना

पैंजणवाले जप जरा, इथेच कुठे मन आहे,
पायतळी येवो ना

जशी दामिनी ती, मेघांतून उडे
थोडी चाले पुढे, हलकेच वळे
उचल ए, नयन तव काळे
पण एवढे समज की, कुणाची लागो हाय ना

कुठे जाशी अशी मदिराशी पिऊन
मदमस्त पवन पदरात भरून
आहे सारे जगच मस्तीभरे
पाहा पण कधी, ऋतुआधी, रात काळी, येवो ना

कधी ऐसे न हो, काही गोष्ट घडे
फिरकी ही माझी, तुझा नाच बने
नाच ना, ना बनून चकोरी
घुंगरू कधी, स्पंदन माझे, होवोत ना

एक राज की बात, सांगत आहेत किशोरदा. मात्र त्यांना शब्द कुणी पुरवले आहेत? तेच तर ओळखायचे आहे.

हा मराठीतील आविष्कार मात्र माझाच आहे.

http://anuvad-ranjan.blogspot.in/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

शृंगारकलानृत्यकवितामौजमजाचित्रपट

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

22 Apr 2012 - 3:55 pm | चौकटराजा

नरेंद्र जी , भावानुवाद पटला . किशोरदाना अशा पद्द्नतीची गीते कमी गायला मिळाली. आनंद बक्शी नी लिहलेय व संगीत मेलोडियस चित्रगुप्त .
जय मारू बिहाग !
आभारी आहे.