गुर्रुनाथ नाईक व बाबुराव अर्नाळ रांची

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
15 Jun 2008 - 9:23 am

क्रुपया गुर्रुनाथ नाईक व बाबुराव अर्नाळ रांची कादंबरि पुस्तके याबद्द्ल काहि माहीती आहे काय..

मला त्यांच्या "काळा पहाड कथा" "हर्शवर्धन कथा" विशेष भावल्या..

आपल्यापॅकी वाचक्/संग्राहक आहात काय?

वाङ्मयविचार

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

15 Jun 2008 - 11:21 am | संजय अभ्यंकर

शाळकरी वयात मी गुरुनाथ नाईकांचा फॅन होतो.
कॅप्टन दीप, गरूड, सारंग, धुरंधर, पातांजली इ. नायक असलेल्या त्यांच्या कादंबर्‍या जवळपास सर्व वाचून काढल्या होत्या.

गुरुनाथ नाईकांपासुन स्फुर्ती घेऊन त्याकाळात, अनेक लेखक ह्याच प्रकारच्या रहस्यकथा लिहू लागले.
परंतु, गुरूनाथ नाईकांची बरोबरी कोणी करु शकले नाही.

गुरुनाथ नाईकांनी नंतर स्वतःची प्रकाशन संस्था काढल्याचे स्मरते.
त्यांनी बहुदा आपली प्रवास कं. काढल्याचेही वाचनात आले.
त्यानंतर ते कोठे अंतर्धान पावले, ते आजतागायत सापडलेले नाहीत.

शाळकरी वयात ह्या कादंबर्‍या लायब्ररीतुन आणुन वाचत असल्यामूळे, त्या संग्रही नाहीत.
त्या काळात कामाठीपुर्‍याच्या नाक्यावर (अलेक्झांड्रा सिनेमाजवळ) एक टपरीवाला, ५०पैसे प्रती कादंबरी ह्या दराने, ह्या कादंबर्‍या वाचायला देत असे. त्याच्याकडूनही अनेकदा ह्या कादंबर्‍या मी आणत असे.

बाबुराव अर्नाळकरांचे माझे कधी जमले नाही. त्यांची शैली मला भावली नाही.
तसेच, ते आधीच्या पिढिचे असल्यामुळे (कदाचीत), त्यांची शैली मला रटाळ वाटत असे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

15 Jun 2008 - 6:02 pm | भडकमकर मास्तर

नादखुळा साहेब,
काळा पहाड आणि हर्षवर्धन कथा का भावल्या , हे थोडे लिहिले असते तर बरे झाले असते....
दोन तीन वाक्यांचे चर्चा प्रस्ताव शक्यतो नसावेत असे आम्हाला वाटते....,... आपण टंकायचे कष्ट घेतलेत तर लोक अजून भरभरून लिहितील....
बाकी आपली मर्जी...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

गुरूनाथ नाईक यांची ताजी मुलाखत येथे वाचा.

http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/famouswriters/0711/...

नादखुळा यांच्या छोट्याशा प्रस्तावाने (आणि संजय अभ्यंकर यांच्या उत्तराने) खूप आठवणी जाग्या झाल्या. लिहण्यासारखे बरेच आहे. ते थोडक्यात...
१. अर्नाळकरांचे नायक : काळापहाड, झुंजार (सोबत विजया, नेताजी) आणि धनंजय (सोबत छोटू) हे आठवतात.
२. गुरुनाथ नाईकांचे नायक : कॅ.दीप (सोबत ले. शे़ख), गरूड, गोलंदाज उर्फ उदयसिंग चौहान, न्यायाधीश.
३. सारंग (सारनाथ रंगराव जेंद्रगडकर) हा नायक अनिल टी. कुलकर्णी या लेखकाचा. त्यांचाच तिरंदाज हा नायकही लोकप्रिय होता.
४. पतंजली हा नायक दिवाकर नेमाडे यांचा. या कथा जादूटोणा, भूत पिशाच्च वगैरेवर आधारीत असायच्या.
५. हर्षवर्धन मात्र आठवत नाही.
६. याच काळात माया सामंत, अनंत तिबिले हे ही ले़खक दरमहा रहस्यकथा लिहायचे.
गोव्यात दरवर्षी धारगळ-पेडणे येथे शेकोटी साहित्य संमेलन भरते. २००७ च्या संमेलनात श्री. गुरुनाथ नाईक यांची मुलाखत मी आणि प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी घेतली होती. रहस्यकथा या प्रकाराला साहित्य शारदेच्या दरबारी मान नसल्याची खंत नाईकांनी व्यक्त केली. अर्नाळकरांची नोंद गिनीज बुकात आहे.
नाईकांच्या कॅ.दीप कथेतील दीप यांचा सहकारी ले. शेख याचा एका कथेत मृत्यू होतो. पण वाचकांच्या दबावाने नाईकांना त्याला पुन्हा जिवंत करावे लागले होते.

ओगले साहेब,

चुकी बद्दल क्षमस्वः. गुरुनाथ नाईकांच्या सागर कथा.

सारंग अनिल टि. कुळकर्णींचा व पातंजली दिवाकर नेमाडेंचा.
तसेच अनंत तिबिले ठाऊक नाही, परंतु ऊर्मिला तिबिले व एस. एम. काशीकर (धूमकेतू कथा) आठवले.

परंतु गुरुनाथ नाईकांच्या शैलीला तोड नव्हती.
तरुण वयात, फ्रेडरिक फोर्सिथ वाचु लागलो आणी गु. नां. वर असलेला त्याचा प्रभाव जाणवु लागला.
कथेची तपशिलवार मांडणी तसेच सेक्स बद्दल अवास्तव, अघळ पघळ न लिहीण्याचा कटाक्ष, हे फोर्सिथचे खास गुण गु. नां. मध्येही होते.

धन्यवाद!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Apr 2015 - 3:46 am | निनाद मुक्काम प...

दहावीच्या सुट्टीत गुरुनाथ सावंत विजय देवधर पंढरीनाथ सावंत धारप ; सुशी अश्या अनेक मातब्बर लेखकांची ओळख झाली ;
नाईकांचा दीप पाकिस्तानात जाऊन ज्या लीलयाने अचाट कामगिर्या पार पाडायचा ते जाम आवडायचे;
परदेशात माझ्या पाहण्यात ट्रेन मध्ये गार्डन मध्ये रहस्य भय कथा वाचणारे शेकड्याने पहिले की खूप बरे वाटते ; उगाच सध्या काय वाचतोय अश्या गर्भित उच्चभ्रू प्रश्नाचा मला तिटकारा आहे
साहित्यात सुद्धा वर्ण व्यवस्था असल्याचे पाहून वाईट वाटते