1

प्रार्थना.. आता एकच...

Primary tabs

५० फक्त's picture
५० फक्त in जे न देखे रवी...
5 Apr 2012 - 11:01 pm

(*परवा एका दवाखान्यात गेलो होतो, एका मित्राला भेटायला, तिथं आयसियुच्या दरवाजाच्या काचेतुन एक आजी दिसल्या,बाजुला कॉटवर आजोबा होते, ते दृश्य डो़ळ्यासमोरुन जात नव्हतं, लेख लिहिणार होतो पण आज प्रार्थना पुन्हा वाचली अन त्यावरच लिहिलं, याला विडंबन किंवा सुडंबन म्हणण्यापेक्षा दु:(ख्)डंबन म्हणावं का ?)

कोपरापुढचे हात सुने होत नाहीत, विटत नाहीट, विरत नाहीत,
त्रासदायक माणसांची विल्हेवाट कशी लावतात ?
बोळकं झालेल्या तोंडात पेज भरवताना
दोन चमचे उकळतं पाणि टाकावंसं वाटतं आहे
माझी म्हणावी अशी अपेक्षा उरलेली नाही
माझे म्हणावे असे ' हे ' पण फार उरले नाही
गोळ्या,सुया, सलाईन ह्यांचा वरखर्च
रक्त संपत आलेल्या देहाला आज पेज पचणार की नाही ??

रात्र उलटताना पुन्हा त्याच स्क्रिनकडे लक्ष जाते
श्वासाचं पुक्क अन उश्वासाचा ट्यॅन
बाजुला लटकवलेली पिशवी अन कॉटखालचं पॅन

मरणाची भिक्षा मागतात ह्यांचे सुरकुतले हात
दिसु लागतो बाजुचा पडद्यामागं मेलेला
ऐकु येतो त्याच्या बायकोचा शोक
अशावेळेस हात कुणासमोर जोडू?
कुणासमोर मागु, स्वातंत्र्य अशा शोकाचं?

दवाखानातल्या ह्या एकविसाव्या रात्री
पुक अन ट्यॅन ऐकताना वाटते आहे
उद्याचं कोवळं उन ह्यांच्या मिटत्या डोळ्यांवर कोसळण्याआधीच
मिळाली थोडी आंतरिक शक्ती तर
तर
.
.
.
.
ती पिवळी नळी ओढावी म्हणते........

प्रेरणा -
http://misalpav.com/node/21243

बिभत्सकरुणऔषधोपचारप्रेमकाव्यजीवनमान

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Apr 2012 - 11:07 pm | प्रचेतस

मुक्तकाचं विडंबन छान.
यकुशेठच्या रसग्रहणाच्या प्रतिक्षेत.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Apr 2012 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा

मिळाली थोडी आंतरिक शक्ती तर
तर
.
.
.
.
ती पिवळी नळी ओढावी म्हणते........
>>>

@यकुशेठच्या रसग्रहणाच्या प्रतिक्षेत@+++++++१११११११११ जोरदार अनुमोदन
यक्कू लवकर या.... तुमच्या शिवाय या विषयाला मोक्ष मिळणे नाही ;-)

अ.आ.-अवांतरः- चला....कुणीतरी सुरवात केली म्हणायची ;-)

पैसा's picture

5 Apr 2012 - 11:27 pm | पैसा

जे काय आहे ते चांगलंच जमलंय. भयाण आहे. यात विडंबन म्हणून हसण्यासारखं काय आहे? की मलाच कविता कळत नाहीत हल्ली?

मलाही काही हसण्यासारखं वाटलं नाही. खरंच कविता कळत नसाव्यात.पन्नासराव पुन्हा तीच आयसीयू ची भयाण खोली, तिथल्या यंत्रांचे आवाज , आक्रोश, हुंदके, एक जीव वाचवण्याची धडपड सगळं झरझर डोळ्यासमोरुन गेलं. मी कधीपासून विचारात आहे यावर लिहीण्याच्या . कितपत जमेल माहित नाही, एक प्रयत्न करुन बघेन म्हणतो.

प्यारे१'s picture

6 Apr 2012 - 9:22 am | प्यारे१

डोकं बधिर झालं राव सकाळी सकाळी...
ही एक वेगळी 'कविता' च आहे. दुर्दैवानं वास्तवाचे चटके देणारी आहे.

यकु, काय चाललंय काय? पूर्ण वाच जरा नीट!

-(मिपा सदस्यांच्या परिपक्वतेबद्दल/ संवेदनशीलतेबद्दल साशंक आणि निराश) प्यारे

जे काय आहे ते चांगलंच जमलंय. भयाण आहे.

+१ :(

ही कविता संपादन मंडळाने जास्तीत जास्त सदस्यांनी वाचण्‍यापूर्वीच उडवावी अशी कळकळीची विनंती.
मिपा आणि 50 फक्त मुळे अनेकांचा हसून हसून जीव गेला ही बातमी निश्चितच चांगली असणार नाही ;-)
=)) =)) =)) =)) =))

मी पूर्ण वाचलेली नाहीय, पहिल्या काही ओळीतच मी खात असलेले बनाना चीप्स खोलीभर उडाले!
त्याबद्दल 50 फक्त यांचा निषेध!!!!!

मला विडंबन नाहि वाटत .
उलट खूप छान मांडणी वाटतेय एका विदारक द्रुश्याची ..
अक्षरशा समोर उभ केलत हर्शद . ह्याट्स ऑफ्फ टू यु म्यान .....

उलट खूप छान मांडणी वाटतेय एका विदारक द्रुश्याची ..

हो, 50 फक्त कुणाच्या तरी (कुणाच्या हो 50 फक्त? ) डेथबेड जवळ उभं राहून त्या मरणार्‍याच्या तोंडात उकळतं पाणी टाकत आहेत हे खरोखर विदारक दृश्‍य आहे.
याबद्दलही निषेध!
=)) =)) =)) =))
उद्या मोर्चा पक्का!

कशाला छळताओ ..त्याना \(
असुद्या कि वाटत एखाद्याला ,जिव मेटीकुटीला आल्यावर :(

पेशवा's picture

6 Apr 2012 - 12:34 am | पेशवा

दु:(ख)डंबन आवडले... तर नंतर थिपक्यांच्या ओळी रसभंग करत आहेत ...

अन्या दातार's picture

6 Apr 2012 - 9:19 am | अन्या दातार

इतक्या दु:खद घटनेबद्दल लिहिलेले स्पष्ट जाणवत असतानाही कुणाला काय दिसेल याचा खरंच नेम नाही.
हर्षद, वस्तुस्थितीचे भेदक चित्रण!
@पेशवा: तुम्ही यात (म्हणजे मुक्तकातही) रसभंग वगैरे गोष्टी करताय?? महान आहात! :(

पियुशा's picture

6 Apr 2012 - 10:14 am | पियुशा

@ यकु
यात हसु हसुन खोलिभर चिप्स उडण्यासारखे काय आहे नक्की ?
( किन्वा माझा अभ्यास कमी पडत असावा बहुतेक )
विड्म्बन वास्तवदर्शी वाटल ,मला तरी वाचल्यानन्तर भयाण वाटल :(

स्मिता.'s picture

6 Apr 2012 - 2:25 pm | स्मिता.

हे विडंबन असलं तरी यात विनोदी काय ते मात्र कळलं नाही.
मला तरी त्यात वृद्धापकाळातलं असहाय्य, भयाण, भकास दु:ख दिसलं. (माझी विनोदबुद्धी कमी पडतेय असं वाटतंय.)

मला यात गंभीर होण्यासारखं ( ठिक आहे झालात) काय आहे ते कळलेलं नाही.
मी पण गंभीर झालो होतो पण त्रासदायक माणसांची विल्हेवाट कशी लावतात, उकळत पाणी, श्वासोच्छवासाचं पुक्क आणि टॅन आणि हाईट म्हणजे 'ती पिवळी नळी ओढावी वाटते' या जागांवर तुम्हाला विनोद दिसला नाही? तुमच्या गांभिर्याचा तणाव या जागांवर फुटला नाही?

कॅय तरी बोलायचं रॅव !

अत्रुप्त आत्मा's picture

8 Apr 2012 - 6:05 pm | अत्रुप्त आत्मा

@श्वासोच्छवासाचं पुक्क आणि टॅन आणि हाईट म्हणजे 'ती पिवळी नळी ओढावी वाटते' या जागांवर तुम्हाला विनोद दिसला नाही? तुमच्या गांभिर्याचा तणाव या जागांवर फुटला नाही? +१०१

चिगो's picture

8 Apr 2012 - 9:06 pm | चिगो

हर्षदराव, अतिशय भेदक कविता..

दवाखानातल्या ह्या एकविसाव्या रात्री
पुक अन ट्यॅन ऐकताना वाटते आहे
उद्याचं कोवळं उन ह्यांच्या मिटत्या डोळ्यांवर कोसळण्याआधीच
मिळाली थोडी आंतरिक शक्ती तर
तर
.
.
.
.
ती पिवळी नळी ओढावी म्हणते.......

मला तरी ह्या ओळींमध्ये आपल्या प्रिय व्यक्तिच्या आजारपणामुळे, त्या/तिच्या दु:खामुळे आलेला अगतिकपणा जाणवला.. "त्याला इतक्या त्रासात, केविलवाणेपणे जिवंत ठेवण्यापेक्षा आपणच त्याला मृत्यु द्यावा." ही टोकाची भावना जाणवली. :-( आणखी वेगळे काही असल्यास माझी विनोदबुद्धी (आणि समज) कमी पडत असेल..

धन्यवाद चिगो,
तुम्हाला मला काय म्हणायचं होतं ते कळालं अगदी बरोबर, अर्थात यात आपल्या प्रिय व्यक्तीची सुटका ही भावना तर आहेच पण त्याचबरोबर त्याच्या बरोबर जो त्रास आपल्याला होतो आहे त्यामधुन सुटका अपेक्षित आहे. कारण वयाच्या या वळणावर प्रेमाच्या रेसिपिमधले बरेचसे पदार्थ संपलेले असतात किंवा संपत आलेले असतात.

एखाद्या लेखनावर आधारलेलं दुसरं लेखन हे विनोदीच असायला हवं का ? पहिले दोन प्रतिसाद वाचल्यावर ती वरची दोन -तीन वाक्यं पैसातै ना सांगुन अ‍ॅड केली आहेत. म्हणजे निदान माझ्या लिखाणातुन काही अस्पष्टता असेल तर ती दुर व्हावी या उद्देशानं.
पुन्हा एकदा धन्यवाद.

चिगो

अगदि हेच मलाहि जानवलं ,त्यामुळे नक्कि कशावर हसायच ते शेवटपर्यन्त कळलच नाहि :(

मी पूर्ण वाचलेली नाहीय, पहिल्या काही ओळीतच मी खात असलेले बनाना चीप्स खोलीभर उडाले!
त्याबद्दल 50 फक्त यांचा निषेध!!!!!

ஜஜ۩۩ यक्कू क्रूरसिंह ۩۩ஜஜ

आपण खोलीत एकटेच होता ना...
नाही म्हणजे ..''आय व्हीटनेस"