ए माझे संजीवनी,
तुला माहीत नाही
अजूनही तू रुचिरा,
आणि मी युवा
तुझ्यावर वाहिले
कधीच मी जिवा
ते कटाक्ष, ती चपळाई अन्
जी तुझ्यात असे, नसे कुठे
ती कला मनास मोहवी
जी तुझ्यात असे, नसे कुठे
मी तुझ्या, मी तुझ्या,
डोळ्यात पावलो सर्व जगा
तू मधुर जे बोल बोलशी
हसून जराही सुंदरी
तर अजूनही स्पंदने
नशेत धुंद रंगती
ए परी, ए परी,
मी तुझा कायमच ग खुळा
वक्त चित्रपटात बलराज सहानी असा दावा करतात की वय झाले तर काय झाले,
अजूनही सारे कसे शाबूत आहे. तसेच. पूर्वीसारखे. शब्द पुरवले आहेत साहिर लुधियानवी ह्यांनी.
अर्थातच हे गीत माझे नाही.
हा आविष्कार मात्र माझाच आहे.
प्रतिक्रिया
30 Mar 2012 - 8:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वैर अनुवाद आला की मला आपण दिलेलं गीत कोणतं असेल त्याची उत्कंठा लागते.
'तु मीठे बोल ए जानेमन.........'.'तू मधुर जे बोल बोलशी'
शेवटच्या ओळी आवडल्या. :)
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
31 Mar 2012 - 8:52 am | प्रचेतस
सुंदर.
31 Mar 2012 - 11:01 am | रुमानी
मस्तच !
31 Mar 2012 - 11:10 am | सांजसंध्या
मस्त
31 Mar 2012 - 11:15 am | मदनबाण
मस्त ! :)
31 Mar 2012 - 11:19 am | अत्रुप्त आत्मा
भावानुवाद अवडला :-)
31 Mar 2012 - 11:21 am | प्रकाश घाटपांडे
मस्तच अविष्कार गोळे साहेब!
31 Mar 2012 - 3:34 pm | चौकटराजा
अनुवादाने तुझ्या
भो कवे , झालो खूळा
रोज वाट पाहण्याचा
आता मला लागे लळा
ओ गोळे, ओ गोळे
अनुवादाचा
फुलवा मळा !
कवि - चौकीर रुजयानवी
31 Mar 2012 - 3:38 pm | पैसा
मस्त!
31 Mar 2012 - 3:43 pm | नरेंद्र गोळे
बिरुटे सर, वल्ली, श्रुती, सांजसंध्या, मदनबाण, अतृप्त आत्मा, प्रकाश घाटपांडे, चौकट राजा आणि पैसा,
सगळ्यांना प्रतिसादाखातर मन:पूर्वक धन्यवाद!