जशी रंग बोटांवर ठेवून... - १
जशी रंग बोटांवर ठेवून... - २
पुण्याला श्रेयाच्या घरी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर तीन चार दिवस खुपच छान गेले अश्विनचे. अगदी कोल्हापूरच्या कुण्या कुलकर्ण्याने आपल्या सुमार अकलेने एखादया टीपिकल लव्ह स्टोरीचे प्रेडीक्शन करताना म्हटल्याप्रमाणे त्याला अगदी अंगावर मोरपीस फिरवल्यासारखे वाटत होते.
त्याने श्रेयाला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तिनेही ती लगेच अॅक्सेप्ट केली. त्याने अगदी अधाशासारखे तिच्या फोटो अल्बममधले सारे फोटो पाहून घेतले. अर्थात त्याची काही गरज नव्हती. तो जेव्हा श्रेयाला पाहायला पुण्याला गेला होता तेव्हा ती कुठल्याही प्रकारचा नट्टापट्टा न करता समोर आली होती. पण ती वेगवेगळ्या मुडमध्ये असताना कशी दिसते हे त्याला पाहायचे होते. आणि त्यासाठी तिचे फेसबुकवरचे फोटो पाहणे हा उत्तम मार्ग होता. कारण ते अगदी नॅचरल फोटो असणार होते.
दोन दिवस गेले. तिसर्या दिवशी सकाळीच त्याने तिला गुड मॉर्निंगचा मेसेज केला. खरं तर आपण चारोळ्या पाडतो हे लक्षात आल्यापासून त्याने चारोळ्या करणे बंद केले होते. पण आपल्या आयुष्याचा जोडीदार होऊ शकणार्या मुलीला चारोळी पाठवण्याची ऊर्मी शांत बसू देईना. त्याने त्या गुड मॉर्निंग मेसेजमध्येच एक चारोळी पाठवली. बराच वेळ वाट पाहूनही श्रेयाचा काहीच रीप्लाय न आल्याने तो जरासा खट्टूच झाला होता. तो दिवस पुर्ण गेल्यानंतरही तिचा रीप्लाय न आल्याने तो नाराज झाला. कामाच्या गडबडीत असेल, वेळ नसेल मिळाला मेसेजला उत्तर द्यायला अशी तो स्वतःचीच समजूत घालू लागला. माणुस कितीही कामात असला तरी दोन मिनिटे नक्कीच काढू शकतो एखाद्या मेसेजला उत्तर द्यायला या प्रॅक्टीकल विचारांना त्याने बळेबळेच दाबून टाकले.
असेच चार दिवस निघून गेले. एव्हाना श्रेयाच्या घरुन पुढची बोलणी करण्यासाठी फोन यायला हवा होता. निदान त्यांचं मत तरी त्यांनी सांगायला हवं होतं की बाबा त्यांना या गोष्टी पुढे न्यायच्या आहेत की नाही. पण असं काहीच झालं नाही. अश्विनबरोबरच त्याचे बाबाही आता विचारात पडले होते. शेवटी आपणच पुढाकार घेऊया असं अश्विनने सुचवताच त्याच्या बाबांनी श्रेयाच्या घरी फोन केला. श्रेयाच्या आईने "आम्ही अजून विचार नाहीए केला. दोनेक दिवसांनी आम्ही तुम्हाला सांगू" असं गुळमुळीत उत्तर दिलं.
श्रेयाच्या घरुन मिळालेल्या उत्तराने अश्विनच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण त्याने दोन दिवस धीर धरायचे ठरवले. मात्र पुढचे दोन दिवस गेल्यानंतरही श्रेयाच्या घरुन फोन आला नाही. आता मात्र अश्विन वैतागला होता. त्याने बाबांना श्रेयाच्या घरी फोन करुन निर्वाणीचे विचारायला सांगितले. बाबांनी पुन्हा एकदा श्रेयाच्या घरी फोन केला. यावेळी मात्र श्रेयाच्या आईने उत्तर दिले. अर्थात जे उत्तर दिले ते पटण्यासारखे नव्हतेच. ते म्हणे दिवाळीत ठाण्याला अश्विनचा फ्लॅट पाहायला येतील, जमलं तर बागमांडल्यालाही येतील त्यांचे गावातील घर पाहायला. आणि मग पुढची बोलणी करु. आता म्हणे त्यांना वेळ नाही. शाळांमध्ये गणपतीच्या सुट्टीच्या आधी परीक्षा असतील. त्यानंतर गणपतीचे दहा पंधरा दिवस गडबडीत जातील. नंतर पितृपक्ष असेल. त्यामुळे एकदम दिवाळीलाच भेटू आपण.
अर्थातच हे उत्तर अश्विन आणि त्याच्या घरच्यांना पटण्यासारखे नव्हते. कुणी कितीही कामात असला तरीही जी गोष्ट आपल्या मुलीच्या आयुष्यातील एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे त्या गोष्टीसाठी माणसे एक दोन दिवसांचा वेळ काढू शकत नाही म्हणजे काय. अश्विन बर्यापैकी चिडला होता. हे सारं वेळ काढण्यासाठी चालू आहे हे एव्हाना त्याच्या लक्षात आलं होतं. आता बाबांना फोन करायला न सांगता आपणच स्पष्टपणे विचारुन एक घाव दोन तुकडे करून टाकावेत या निष्कर्षाप्रत तो आला होता. आपण जर तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये बसलेल्या कंपनीच्या गिर्हाईकाशी बोलणी करु शकतो तर इथे ज्या मुलीबरोबर आपण लग्न करायला इच्छूक आहोत त्या मुलीच्या आई बाबांशी का बोलू शकत नाही आपण. असं कुठे लिहिलेलं आहे की लग्नाची बोलणी मुलांनी करु नयेत, आई वडीलांनीच करावीत?
बाबांनी कशीबशी अश्विनची समजूत घातली. मी पुन्हा एकदा श्रेयाच्या घरी फोन करुन अगदी स्पष्ट विचारुन घेतो असं बाबांनी सांगितल्यानंतर अश्विन शांत झाला. बाबांनी अजून दोन दिवस जावू दिले. त्यानंतर श्रेयाच्या घरी फोन केला. शक्य तितक्या सामंजस्याने बाबांनी "तुम्ही नक्की येणार आहात ना दिवाळीत आमच्याकडे?" असे श्रेयाच्या आईला विचारले. श्रेयाच्या आईनेही तितक्याच ठामपणे होकार दिला. इतकंच नव्हे तर त्यांना अगदी निश्चिंत राहण्यासा सांगितले.
एव्हढं सारं झाल्यानंतरही श्रेयाच्या घरच्यांनी "दिवाळीपर्यंतचा टाईम बाय केला आहे" ही गोष्ट काही केल्या अश्विनच्या मनातून जाईना. दिवाळीपर्यंत अजून चांगलं स्थळ मिळतंय का पाहायचं, मिळालं तर उत्तम. नाही मिळालं तर अश्विनचं स्थळ आहेच असंच काहीसं श्रेयाच्या घरच्यांचं असणार. आणि सर्वात वाईट म्हणजे श्रेयाचं स्वतःचं मत काय आहे हे कळायला काही मर्ग नव्हता. आणि आतापर्यंतची सारी बोलणी घरच्यांनी केल्यामुळे अचानक श्रेयाला कॉल करुन तिचं मत विचारणं त्याला रास्त वाटेना. पण गोष्टी जशा आहेत तशा स्विकारण्यापलिकडे दुसरा काही पर्यायच अश्विनसमोर नव्हता.
गणपतीची धामधूम संपली. श्रेयाला मनाच्या कप्प्यात थोडे दिवस बंद करुन अश्विनने आपली गणपतीची आठ दिवसांची सुट्टी गावी मनापासून एंजॉय केली. अनंत चतुर्दशीनंतर तो गावावरुन ठाण्याला परत आला. एक दिवस रात्री साडे दहा अकराच्या सुमारास सहज म्हणून त्याने मॅट्रीमोनी साईटवर लॉगिन करुन श्रेयाचे प्रोफाईल व्हिजिट केले. आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. श्रेया चक्क ऑनलाईन होती. त्याचं प्रेडीक्शन खरं ठरलं होतं. श्रेया अजूनही मुलांचे प्रोफाईल्स पाहत होती तर. दुसर्या दिवशी तेच. तिसर्या दिवशीही तेच. आता अश्विनलाही कोणत्याही वेळी मॅट्रीमोनी साईटवर लॉगिन करुन ती ऑनलाईन आहे का किंवा कधी ऑनलाईन येऊन गेली हे पाहण्याचा चाळाच लागला. अश्विन जेव्हा जेव्हा रात्री ऑनलाईन व्हायचा त्या त्या वेळी एक तर ती ऑनलाईन असायची किंवा नुकतीच ऑफलाईन झालेली असायची.
या सार्या प्रकारानंतर अश्विनने सारा मामला शांत डोक्याने घ्यायचा ठरवला. त्याने तिचे पार्टनर प्रेफरन्सेस पाहून घेतले. मुलगा जातीतलाच हवा होता. प्रोफेशनमध्ये वकील, आयएएस, डॉक्टर, इंजिनीयर, बिझिनेसमन असं बरंच काही असलं तरी तो त्या मॅट्रीमोनी पोर्टलचा डीफॉल्ट ऑप्शन होता. ती बी ई, पीजीडीएम एचआर असून आयटी कंपनीत रीक्रुटर म्हणून काम करत असल्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनीयरला प्रेफरन्स देईल. अगदीच वर्स्ट केसमध्ये एखादा गडगंज कमावणार्या डॉक्टरला हो म्हणेल. पण ती शक्यता कमीच होती. तिची उंची ५.५ होती, मुलाची ५.५ पासून ५.१० पर्यंत चालणार होती. अश्विननए हे सारा क्रायटेरीया उचलला आणि मुलाचा शोध सुरु केला. सर्च रीझल्टमध्ये आलेले प्रोफाईल्स पाहून त्याच्या चेहर्यावर हसू फुललं. जेमतेम चाळीस पंचेचाळीस प्रोफाईल आले होते सर्च मध्ये.
एखाद्या मिशनवर असल्याप्रमाणे अश्विनने रोज चार पाच असे करत ते सारे मुलांचे प्रोफाईल्स चाळून काढले. आपल्या गट फीलींगवर अजून वीसेक प्रोफाईल्स त्याने इलिमिनेट केले. आता फक्त पंचवीसेक प्रोफाईल्स उरले. विचार करता करता एक गोष्ट त्याच्या लक्षात आली की हे असं इलिमिनेशनही करायची गरज नव्हती. ज्याअर्थी श्रेया अजूनही प्रोफाईल्स सर्च करत होती त्याअर्थी एक तर या सार्या मुलांमधून एकही तिला किंवा तिच्या घरच्यांना पसंत पडला नसणार किंवा काहींना अॅप्रोच झाले असतीलही, पण ते कुठल्याच मुलाबरोबर मटेरीयलाईझ झाले नसणार.
अजूनही एक महत्वाची गोष्ट त्याने त्याच्या स्वत:च्या अनुभवावरुन विचारात घेतली होती. ती म्हणजे श्रेयाच्या क्रायटेरीयात फीट बसणारे एखादे नविन प्रोफाईल रजिस्टर होण्याची शक्यता खुपच कमी होती. जवळ जवळ नव्हती म्हणायलाही हरकत नाही. मुलं वयाच्या पंचवीस सव्वीसाव्या वर्षापासून मॅट्रीमोनी साईटवर आपले प्रोफाईल बनवतात. आणि मग सत्ताविसाव्या, अठ्ठाविसाव्या वर्षी "या वर्षी लग्न करायचंच" असं ठरलं आणि कुणी आवडली की तिचे काँटॅक्ट डीटेल्स पाहण्यासाठी पेड मेंबरशीप घेतात.
इन अदर वर्डस, श्रेयाने अगदी दिवाळीपर्यंत मुलांचे प्रोफाईल्स पाहीले तरी अश्विनपेक्षा उजवा मुलगा सापडण्याची शक्यता खुपच कमी होती. त्यामुळे दिवाळीत मुकाटयाने श्रेयाच्या घरचे दुसर्या स्थळाचा शोध थांबवून अश्विनच्या स्थळाला होकार देणार होते...
क्रमशः
प्रतिक्रिया
1 Mar 2012 - 7:29 pm | यकु
स्वयंपाक येत नाही ते मान्य.
फक्त अंडेच खाते तेही मान्य.
अरे! अरे!! अरे !!!
देख तेरे इन्सान की हालत क्या हो गई भगवान!
आपण मुंजे मरु पण लग्नाच्या भानगडीत पडणार नाही.
खरंच चांगलं लिहीलंस धन्या.
8 Mar 2012 - 4:56 am | टुकुल
हेच म्हणतो..
मुलगी आवडली म्हणुन किती तडजोड ? एकंदरीत वाटत आहे कि मुलीच्या घरच्यांना कळुन चुकले आहे कि हे स्थळ आपल्या हातातच आहे म्हणुन अजुन वेळ काढुन घेताहेत मुलाकडुन.
--टुकुल
1 Mar 2012 - 7:38 pm | मोदक
धनाजीराव टोले हाणतो... ते ही मैदानाबाहेर.. :-)
१) अगदी कोल्हापूरच्या कुण्या कुलकर्ण्याने आपल्या सुमार अकलेने एखादया टीपिकल लव्ह स्टोरीचे प्रेडीक्शन करताना म्हटल्याप्रमाणे
२) खरं तर आपण चारोळ्या पाडतो हे लक्षात आल्यापासून त्याने चारोळ्या करणे बंद केले होते
फॉर्मात आहात हो.. Keep it up..!
1 Mar 2012 - 7:47 pm | प्रचेतस
छान लिहिलंस रे. धागा उघडल्याचे सार्थक केलंस.
1 Mar 2012 - 7:52 pm | अन्या दातार
आयला, अस्सं कायतर झालं होय? लईच विंटेलिजंट हाय अश्विन ;)
1 Mar 2012 - 8:44 pm | रेवती
वाचतिये.
1 Mar 2012 - 9:48 pm | पैसा
याच्या पाठीमागे काही सत्य अनुभव असण्याची शक्यता बरीच दिसते आहे! ;)
1 Mar 2012 - 11:01 pm | रेवती
तसं काही नसल्याचा निर्वाळा दिलाय त्यानं पहिल्या भागात.;)
1 Mar 2012 - 11:05 pm | धन्या
पैसातै आणि रेवतीआज्जी, खरंच तसं काही नाही. ;)
1 Mar 2012 - 10:42 pm | रामपुरी
मालिकेतला पहिलाच भाग वाचला.
लै म्हंजे लैच इंग्रजी शब्द वापरलेत त्यामुळे आमचा जय महाराष्ट्र ( मागच्या आणि पुढच्या भागांना)
1 Mar 2012 - 11:06 pm | धन्या
आपल्या मताचा आदर आहे. :)
1 Mar 2012 - 10:47 pm | प्रास
वाचतोय बरं का.....
लगे रहो!
1 Mar 2012 - 10:58 pm | अत्रुप्त आत्मा
सध्याच्या काळातलं अपेक्षित लेखन ;-)
बाकी प्रतिक्रीया नंतर.... कृपया बुच मारु नये...ही णम्र इनंती
1 Mar 2012 - 11:14 pm | मी-सौरभ
वेग चांगला पकडलायस धन्या :)
2 Mar 2012 - 7:41 am | ५० फक्त
मस्त लिहिलंयस रे, थोडक्यात विवाहपुर्वनिष्टता चाचणी चालु आहे, चालु दे.
2 Mar 2012 - 10:22 am | पियुशा
व्वा क्या बात है !!!
काय ते प्रेडीक्शन अन काय ती " जीवाची होणारी घालमेल ," अगदी सही सही उतरवल आहेस धन्या :)
गुड ,कीप इट अप ;)
2 Mar 2012 - 10:48 am | अमृत
आणि रम्य त्या आठवणी (चहा पोह्यांच्या) :-)
हा भाग सुद्धा आवडला
अमृत
3 Mar 2012 - 1:22 pm | गणपा
वाचींग.
5 Mar 2012 - 1:29 pm | वपाडाव
मालक शिकवणीचा अर्ज भरलेला आहे... मार्गदर्शन हवंय...
'मॅट्रीमनी साईट्स कशा चाळाव्यात' ह्या विषयावर...
आपल्या सवडीप्रमाणे विथ किंवा विदौट प्रॅक्टिकल ब्याचेस घेतल्या तरी चालतील...
या क्लासमध्ये पार्टिसिपेट करणेसाठी इच्छुकांनी याखाली +१ लिहावे...
तळाटीप :: मोस्टली सगळी मंडळी आज्जीच्या भरवशावर बसुन ब्याचलरच 'मुक्त' होणार असं दिसतंय म्हणुन म्हटलं एक कौल घ्यावा...
5 Mar 2012 - 2:38 pm | धन्या
जरुर. शिकवणी वर्गास आपले नांव नोंदवण्यात आले आहे. लवकरच वर्ग सुरु होतील.
त्वरा करा. जागा मर्यादीत.
बोनस क्लासः मॅट्रीमोनी साईटस लग्नाळू तरुण- तरुणींना तसेच त्यांच्या पालकांना कसे गंडवतात हे सहा वर्षांचा वेबसाईट डेव्हलपमेंटचा अनुभव असलेल्या तज्ञाकडून ऐका. ;)
5 Mar 2012 - 2:26 pm | स्मिता.
वाचतेय... छान लिहिलंय.
पहिल्या भागात जरी लेखकाचा स्वतःचा अनुभव नसल्याचे सांगितलेले असले तरी ते पटत नाहीये. तसंच लेखकाचा मॅट्रिमनी साईट्सचा अभ्यास दांडगा दिसतोय ;)
5 Mar 2012 - 2:33 pm | धन्या
हाहाहा... मॅट्रीमोनी साईट्स खुपच चिंधी वाटाव्यात अशा गुंतागुंतीच्या "बिझनेस ट्रान्सॅक्शन्स" करणार्या वेबसाईट्सवर लेखकाने डेव्हलपर म्हणून काम केले आहे. :)
5 Mar 2012 - 2:34 pm | प्रचेतस
झैरात झैरात. :)
5 Mar 2012 - 4:47 pm | धन्या
आम्हाला झैरातीची गरज राहीलेली नाही.
पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीनुसार तुमच्यासारख्या लग्नोत्सुक तरुणांनी बोध घ्यावा यासाठी हा लेखनप्रपंच. ;)
5 Mar 2012 - 5:23 pm | प्रचेतस
योग्य तो बोध आधीच घेणेत आला आहे
5 Mar 2012 - 2:39 pm | छोटा डॉन
+१, हेच म्हणतो की.
बाकी कथा छान आहे, वाचतो आहे.
लेखकाने कितीही 'तो मी नव्हेच' असा पवित्रा घेतला तरी ते खरे वाटत नाही, असो.
पुढचा भाग लवकर येऊद्यात, जमल्यास जरा 'मॅट्रिमनी साईट'चे विश्लेषण इत्यादीही देऊद्यात ;)
- छोटा डॉन
5 Mar 2012 - 4:48 pm | धन्या
होय. प्रतिक्रिया वाचल्यानंतर मलाही तसं वाटू लागले आहे. :)
5 Mar 2012 - 4:14 pm | भिकापाटील
+१ असेच बोल्तो.
अगदी किचनतैचाच लेख वाचत आहे असे वाटले. ;)
5 Mar 2012 - 2:54 pm | मृत्युन्जय
जमतय रे धन्या.
बाकी लग्नापुर्वी अशी चालढकल बरेच जण करतात. पण इतका वेळ?
5 Mar 2012 - 3:12 pm | नगरीनिरंजन
जरा मोठे भाग टाका की राव!
किती उत्सुकता ताणणार?
5 Mar 2012 - 4:50 pm | धन्या
डोक्यात सारं चित्र तयार आहे. टंकायचा कंटाळा येतो हो. :(
असो. मोठे भाग टाकायचा नक्की प्रयत्न करेन.
5 Mar 2012 - 4:52 pm | यकु
गविंना संपर्क साध.
त्यांच्याकडे टंककुट्टीका असते म्हणें.. ;-)
5 Mar 2012 - 4:54 pm | गवि
मोठ्या रजेवर आहे ती... त्यामुळे आम्ही काही करु शकत नाही..
5 Mar 2012 - 5:28 pm | वपाडाव
गवि, इतकी कामं कशाला करवुन घेता... आठौड्यात दोन दिस रजा देत जा तिला...
असो... किती म्हैन्याची आहे सध्याची रजा...
5 Mar 2012 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा
@त्यांच्याकडे टंककुट्टीका असते म्हणें.. >>>
क्काय शब्द भायेर येतिल या माणसाकडुन याचा काही नेम नाही.... गेल्यावेळेसचा कुटिलमुनी पण असाच लक्षात राहिलेला आहे.. ;-)
5 Mar 2012 - 4:55 pm | वपाडाव
सहा-सहा वर्षे डेव्हलपर म्हणुन काम केल्यामुळे का टंकायचा कंटाळा येतो आपणांस?
मग गविंप्रमाणे एक टंचनिका ठेउन घ्या... (याचा अर्थ गविंनी जशी ठेवली आहे तशी टंचनिका... उलटे अर्थ काढु नयेत...)
6 Mar 2012 - 5:26 am | पाषाणभेद
अरे काय सुटलेत रे तुम्ही लोकं!
5 Mar 2012 - 3:14 pm | शैलेन्द्र
अरे मस्त चाल्लायेस.. लगे रहो भीडु..
5 Mar 2012 - 5:25 pm | सूड
मस्स्त !! मैदानात आल्या आल्या हाणलेले चौकार आवडले. पुभाप्र.
8 Mar 2012 - 4:58 am | रेवती
फुडं काय ल्ही ना झालेत धनाजीराव.