देखणी

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
1 Mar 2012 - 3:01 pm

नवी पालवी अन नवे अंतराणे
जुन्या ओळखीचे नवे तेच गाणे
उराशी किती भोवले पाहुणे हे
गळाले आता जीर्ण शीण दीनवाणे

पुन्हा पाखरे आळवीती तराणे
जरेल्या तरूंचे उभरले कणे
साद घाली कुणी देइ आमंत्रणे
बघ उषा न्हाइली सज्जली अंगणे

मनाची कुपी उलगडी आवरणे
गुंफलेल्या स्वरांशी करी भाषणे
देखणी सुप्तशी उंबराची फुले
अमृताच्या सरी द्वैत पारायणे

.......................अज्ञात

शांतरसकविता

प्रतिक्रिया

मनीषा's picture

1 Mar 2012 - 6:19 pm | मनीषा

पुन्हा पाखरे आळवीती तराणे
जरेल्या तरूंचे उभरले कणे
साद घाली कुणी देइ आमंत्रणे
बघ उषा न्हाइली सज्जली अंगणे

सुंदर कविता.

अज्ञातकुल's picture

2 Mar 2012 - 1:43 pm | अज्ञातकुल

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

सांजसंध्या's picture

2 Mar 2012 - 9:41 am | सांजसंध्या

सुंदर कविता आहे

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Mar 2012 - 11:09 am | मिसळलेला काव्यप्रेमी

मनाची कुपी उलगडी आवरणे
गुंफलेल्या स्वरांशी करी भाषणे
देखणी सुप्तशी उंबराची फुले
अमृताच्या सरी द्वैत पारायणे

क्या बात! सुंदर!

इन्दुसुता's picture

5 Mar 2012 - 6:47 am | इन्दुसुता

छान कविता. आशादायी .... आवडली.