मला डिजिटल क्यामेरा विकत घ्यायचा आहे. कृपया आपले मत सांगा.

कोल्हापुरवाले's picture
कोल्हापुरवाले in जनातलं, मनातलं
29 Feb 2012 - 5:38 pm

मला डिजिटल क्यामेरा विकत घ्यायचा आहे. कृपया आपले मत सांगा.

दोन ऑप्शन आहेत

१ . Sony Cybershot DSC-H70 Point & Shoot . ( किंमत ९८०० )

२. Nikon Coolpix L120 Point & Shoot ( किंमत १३,५३२ )

या दोन्ही पैकी कोणता घ्यावा?

फोटोग्राफी करणारे जे कोणी मीपा आहेत आणि ज्यांना खरच काही फोटोग्राफी बद्दल कळत त्यांनी कृपया सल्ला द्यावा.
किमती मधील फरक सांगू नये .. :)

खूप कन्फ्युज राव..... सल्याची नितांत गरज !!!

विज्ञानस्थिरचित्रमतप्रतिसादसल्ला

प्रतिक्रिया

jaypal's picture

29 Feb 2012 - 6:03 pm | jaypal

तुमी लै च सपश्ट हैसा (फोटोग्राफी करणारे जे कोणी मीपा आहेत आणि ज्यांना खरच काही फोटोग्राफी बद्दल कळत त्यांनी कृपया सल्ला द्यावा.) हीत तस नसतय राव. तुमी तुमचा रोग येशीला टांगल्यावर कुनीबी यील अन सल्ल्याचा पाय वर करुन जाईल, तवा जे हाय तस सोसाव लागल बघा.
असो- http://www.dpreview.com/ ही लिंक काय म्हंतीया बघा वाईस. जमतय का कळवा.
केला ईशारा जाता जाता ;-) तेवढ (बजेट वाढवुन / तानुन / खेचुन जस जमल तस) एस एल आर जमवाच लै गमजा कराल राव लै गमजा
ph

आबा's picture

29 Feb 2012 - 6:29 pm | आबा

मला फोटोग्राफी मधलं काही विशेष कळत नाही,
पण "शरद" यांची लेखमाला उपयोगी पडेल तुम्हाला !

निशदे's picture

29 Feb 2012 - 7:50 pm | निशदे

<<फोटोग्राफी करणारे जे कोणी मीपा आहेत आणि ज्यांना खरच काही फोटोग्राफी बद्दल कळत त्यांनी कृपया सल्ला द्यावा. >>
इथे तुम्ही आमच्या मतावर पहिला घाव घातलात......
<<किमती मधील फरक सांगू नये .. >>
इथे तुम्ही दुसरा आणि अखेरचा घाव घातलात......
<<खूप कन्फ्युज राव..... सल्याची नितांत गरज !<<>>
तुमचे असे हाल बघून काळीज तिळतिळ तुटत आहे पण आता नाविलाज आहे..........

चौकटराजा's picture

29 Feb 2012 - 8:29 pm | चौकटराजा

१- डिजीटल कॅमेर्‍यात नुसते मेगा पिक्सल महत्चाचे नाहीत सेन्सर साईज हा अधिक महत्वाचा.
२. मॅनन्यूअल मोड " मस्ट"
३.अ‍ॅडिशनल लेन्स बसविण्यासाठी रिंग असेल तर चांगले.
४.प्रिन्टींग करायचे नसल्यास किती मेगा पिक्सल हा आकडा महत्वाचा नाही.
५. काही व्यावसायिक फोटोग्राफर सांगतात की फार जास्त ऑप्टीकल झूम फारसा वापरलाच जात नाही. त्याला कमी महत्व द्या.
७.जादा आय एस ओ असलेला चांगला त्याने डार्क नेस मधेही फोटो येतात . पण फार ग्रेन्स येत नाहीत ना हे पाहूनच मग खरेदी करावी.
७. कमीतकमी ७२० पिक्सलस रु़दी येईल अशी फिल्म तयार करणारा कॅमेरा घ्यावा ( एच डी रेडी)
८. समजा टोटल ऑप्ट्कल झूम १० पट असेल तर तितकेच मुव्ही मोड मधेही वापरता येते का हे पाहून घ्यावे.
९. ट्रायपॉड हवाच .
बाकी आता सर्व कॅमेर्‍यात इथून तिथून सगळ्या सोयी जवळ जवळ सारख्याच असतात. तरीही नि़कॉन,कॅनन याना प्राधान्य द्यावे.

चौकटराजा's picture

29 Feb 2012 - 8:33 pm | चौकटराजा

निकॉन एल १२० बद्द्ल नेटवर रिपोर्ट चांगले आहेत.

टवाळ कार्टा's picture

29 Feb 2012 - 9:46 pm | टवाळ कार्टा

Nikon

रामपुरी's picture

1 Mar 2012 - 2:34 am | रामपुरी

सोनी

मृत्युन्जय's picture

1 Mar 2012 - 10:27 am | मृत्युन्जय

हे दोन्ही घेउ नका. Canon PowerShot SX120 IS घ्या. उत्तम कॅमेरा आहे. मी वापरतो आहे.

http://www.photographyblog.com/reviews/canon_powershot_sx120_is_review

थोडे बजेट जास्त असल्यास Canon PowerShot SX३0 IS घ्या. तो तर लै भारी आहे

चिगो's picture

1 Mar 2012 - 11:30 am | चिगो

मृत्युन्जयराव, हेच मै म्हणणेवाला था.. माझ्याकडे हा आहे. लै करामती करता येऊ शकतात ह्याने, पण माझीच अक्कल कमी पडतेय.. सध्यातरी ISO, शटर स्पीड, अ‍ॅपर्चर ह्यांच्यात अडकून भोवंडलो आहे. शिकायला लागेल..

(झैरात, झैरात म्हणून बोंबलणार्‍याना फाट्यावर मारण्यात आले आहे.. ;-))

पण माझीच अक्कल कमी पडतेय.. सध्यातरी ISO, शटर स्पीड, अ‍ॅपर्चर ह्यांच्यात अडकून भोवंडलो आहे. शिकायला लागेल..
अक्कल कमी पडण्याचे पहिले लक्शण म्हणजे वाहते पाण्यात मधाळपणा निर्माण करण्यासाठी स्लो शटर सेट करणे व नंतर ते तसेच ठेवून
ऑटोवर न येता फटाफट आपण त्या मोड मधे असल्यासारखे फोटो काढत सुटणे. फक्त पाहिला फोटो वाह ! बाकीचे आह ( राजकपूरचा सिनेमा) .
( हा अनुभव मी शालीमार बाग श्रीनगर येथे घेतला आहे) .

परिकथेतील राजकुमार's picture

1 Mar 2012 - 1:02 pm | परिकथेतील राजकुमार

फक्त दर दोन दिवसांनी त्याने काढलेले फोटो आणून इथे आमच्या डोक्यावरती आदळू नका म्हणजे झाले.

आदिजोशी's picture

1 Mar 2012 - 7:16 pm | आदिजोशी

"दिवाळ्याचा अर्ज मागवून ठेवा" ची आठवण झाली. तसंच अंतु बर्वा आणि परा ह्यांच्या वयातही फार अंतर नाही.

फक्त दर दोन दिवसांनी त्याने काढलेले फोटो आणून इथे आमच्या डोक्यावरती आदळू नका म्हणजे झाले.

हैश्शा!!!

विजुभाऊ's picture

1 Mar 2012 - 2:30 pm | विजुभाऊ

प॑रा इतके सपष्ट सांगायची जरुरी होती का?
कोणी पेन घेतले म्हणजे तो रोज कविता करेल असे असते का?
उद्या म्हणशील की एखाद्याने प्लस्टीकचा मग्गा घेतला की त्याने कम्पल्सरी सतत सं**त बसलेच पाहिजे असे कधी होते का?

परिकथेतील राजकुमार's picture

1 Mar 2012 - 2:41 pm | परिकथेतील राजकुमार

म्हातारी मेल्याचे दु:ख नाही इजुभौ, काळ सोकावतो.

>>कोणी पेन घेतले म्हणजे तो रोज कविता करेल असे असते का?
याच धर्तीवर मिपाची मेंबरशीप घेतली की लगेच कविता / लेख पाडायला बसतील असे असते का? (अम्म्म.. ऑन सेकंड थॉट.... ;-) )

च्यायला इथ प्रवेश मिळायला वेळ लागतो. मग आपल्यालाच " लै खास, लगे रहो , भन्नाट असं सारखं म्हणणारा लवाजमा जमा करायला
आणखी वेळ, मग स्माईल्या आणणे शिकण्यात वेळ मग नै कै चा अर्थ समजण्यात वेळ, मग चित्र बारक्याची मोठी दुसर्‍या कडून करून घेण्यात वेळ ,,,,,, आन शेवटी पदरात काय .... आयला काळ सोकावतो.. ? . सरपंच ,,,, आमचं सर पंक्चर व्हायची येळ आली पघा !

संडासमध्‍ये बसायची काय तयारी.. आणि काय काय..
इथल्या अप्रीसिएशनबद्दल (त्याला शिव्या घालून बरं का!) लोक एवढे तंथे का होऊलालेत कळंना ब्वा?
मारा की लाथ धाडकन आणि व्हा मोकळे एवढं कडूकडू वाटतंय तर.

आशु जोग's picture

1 Mar 2012 - 11:05 pm | आशु जोग

>> कोणी पेन घेतले म्हणजे तो रोज कविता करेल असे असते का?

या वाक्याचा कॉपीराइट घेऊन ठेवा

बादवे...
आपण हे वाक्य आता खूप वापरणार ...

चौकटराजा's picture

2 Mar 2012 - 5:54 am | चौकटराजा

@ य ए , लाथ मारायची ती कशी? ऑ ? माणसारखी मारता येते. आणखी कुणासारखी मारायची झाली तर इथे कोण शिकीवनार ?

प्रतिसादांतून छान माहिती मिळत आहे.. मात्र मूळ धाग्यात शेवटी :

फोटोग्राफी करणारे जे कोणी मीपा आहेत आणि ज्यांना खरच काही फोटोग्राफी बद्दल कळत त्यांनी कृपया सल्ला द्यावा.

अशी टिप्पणी वाचून मालमत्ताविषयक जाहिरातींच्या मजकुराशेवटी "दलाल क्षमस्व "

आणि

म्याट्रिमोनी पुरवणीतल्या जाहिरातीच्या वर-अपेक्षासूची अंती "देशस्थ/कराडे क्षमस्व"

...अशासारख्या नम्र सूचनांची आठवण झाली.

चौकटराजा's picture

4 Mar 2012 - 9:28 am | चौकटराजा

म्याट्रिमोनी पुरवणीतल्या जाहिरातीच्या वर-अपेक्षासूची अंती "देशस्थ/कराडे क्षमस्व"
गवि, मी एकेकाळी दिलेली जाहिरात आता इतक्या वर्षानी तुम्हाला कशी काय सापडली ब्वा !
प्रत्यक्ष " दे" शीच ठरलं हा भाग वेगळा ! ( इथं डोळा मिचकाविलेली लब्ब्बाड स्माईली कल्पावी ) !