कूर्ग - हिरवाईच्या विविध छटा भाग २ आणि कूर्गची parting gift "Atlas Moth"

Manish Mohile's picture
Manish Mohile in भटकंती
28 Feb 2012 - 11:35 pm

दिनांक १८ ऑगस्ट. आमच्या सहलीचा चौथा दिवस. आज भेट द्यायची होती निसर्गधाम आणि Nyingmapa Monastery ला.

निसर्गधाम. मडिकेरी गावापासून साधारण ४०-४२ कि.मी. अंतरावर एका नदीच्या प्रवाहात बनवलेले हे एक मानवनिर्मित बेट आहे. वेगवेगळ्या वनस्पती, फुले बघता येतात. आमच्या रिसॉर्टच्या बसने आम्ही साधारण एक दीड तासात आमच्या ईच्छित स्थळी पोचलो. निसर्गधाम मध्ये प्रवेश करायला एक सुरेख पूल होता.

त्या पुलावरून भवताली सगळीकडे दिसत होती हिरवाई.

समोर दिसत होता जीर्ण झालेला जुना पूल. हा वापरासाठी बंद आहे. पण त्याकडे बघून वाटले याच्या वरून जायला अधिक मजा आली असती.

पुढे गेल्यावर दिसली वेगवेगळी फुले आणि एक नेहमी दिसणारे फुलपाखरू.

निसर्गधाम बघून झाल्यावर आम्ही निघालो Nyingmapa Monastery कडे. ही भारतातील दुसरी सर्वात मोठी Monastery आहे. जवळ्पास ५००० ते ६००० तिबेटी भिक्षू राहतात. तिबेटी धर्मस्थळांची स्वच्छता, शांतता, बुद्धाच्या सुरेख मूर्ती, सोनेरी लाल रंगसंगती ही सगळी वैशिष्ट्ये येथे देखील बघायला मिळतात.

Nyingmapa Monastery चे प्रवेशद्वार आणि कळस -

आवारात असलेले Golden Temple आणि त्यातील बुद्धमूर्ती. ही मूर्ती संपूर्ण सोन्याच्या पत्र्याने मढवलेली आहे आणि तिची ऊंची आहे ६० फुट. बाजूलाच आहेत त्याच्या दोन शिष्यांच्या मूर्ती ज्या ५० फुट ऊंचीच्या आहेत.

एक विलक्षण शांती अनुभवून आम्ही त्या तिबेटी धर्मस्थळातून बाहेर पडलो आणि परत रिसॉर्टच्या दिशेने निघालो. पुन्हा एकदा हिरव्या रंगाच्या छटांची रंगपंचमी सुरू झाली.

अगदी मनःपूत हिरवाई बघायला मिळाली होती आम्हाला. नंतरच्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्टला आम्ही म्हैसूरला जाऊन तेथील राजवाडा आणि प्राणिसंग्रहालय बघून आलो. वीस तारखेचा दिवस रिसॉर्टवर आराम केला आणि बघता बघता परत जायचा दिवस ऊजाडला. आणि सामान घेऊन निघताना आमच्या रूमच्या बाहेरच दिसले "Atlas Moth".

ही Moth ची जगातील सगळ्यात मोठी प्रजाती आहे. आम्हाला दिसलेल्या Atlas Moth चा wing span होता जवळपास १५ सें.मी. त्याचा आकार, पंखांवरची नक्षी, वरच्या पंखांवरची अगदी सारखी असलेली सापाची तोंडे. निसर्ग अगाध आणि अफाट आहे हेच खरं. अधिक माहीती या दुव्यावरती.
/url?sa=t&rct=j&q=atlas+moth&source=web&cd=1&ved=0CDgQFjAA&url=http%3A%2F%2Fen.wikipedia.org%2Fwiki%2FAttacus_atlas&ei=2xJNT7raKMSmrAfV85S4Dw&usg=AFQjCNGzwzhe-B3IOwDMV6W8AQXL8YUvJg&sig2=Q5m_UupjyJMgPTxuvfCFyw

कूर्गची ही parting gift कायमची अंतःकरणावर कोरून आम्ही हिरवाईला निरोप देत परतीच्या प्रवासाला लागलो .

प्रतिक्रिया

हायला आज सगळीकडे हिरवळचे निसर्गसौंदर्यच दिसतेय!
==> "काही फोटो असे ब्लॅंक का आले अहेत?" Smiley

चिंतामणी's picture

29 Feb 2012 - 12:28 am | चिंतामणी

पण वर्णन अपुरे वाटले.

अत्रुप्त आत्मा's picture

29 Feb 2012 - 8:11 am | अत्रुप्त आत्मा

+१ चिंतामणी....पण फोटो लाजवाब....

प्रचेतस's picture

29 Feb 2012 - 8:37 am | प्रचेतस

अप्रतिम निसर्गसौंदर्य.
कूर्गला ला जायलाच हवे आता.

अन्या दातार's picture

29 Feb 2012 - 10:13 am | अन्या दातार

त्यासाठी लवकर तयारी करा

तुमच्याबरोबर आम्ही येणार नाही याची खात्री बाळगा ;)

मी-सौरभ's picture

29 Feb 2012 - 6:35 pm | मी-सौरभ

त्याला जाऊ दे की दुसर्‍या कुणाबरोबर तरी...

अन्या दातार's picture

29 Feb 2012 - 7:45 pm | अन्या दातार

तुमच्याबरोबर आम्ही येणार नाही याची खात्री बाळगा

अधोरेखित केलेला शब्द वाचला नाहीत वाटतं!

प्रचेतस's picture

29 Feb 2012 - 9:37 pm | प्रचेतस

अरे काय चाललय हे?

श्री गावसेना प्रमुख's picture

29 Feb 2012 - 9:05 am | श्री गावसेना प्रमुख

,,,

अमृत's picture

29 Feb 2012 - 10:02 am | अमृत

पण आणखी थोडं वर्णन करायला हवे होते. मी पण नक्की जाणार कुर्ग ला.

अमृत

खादाड's picture

29 Feb 2012 - 11:09 am | खादाड

वरुन ८वा फोटो खूपच छान !!!:)

मी-सौरभ's picture

29 Feb 2012 - 6:38 pm | मी-सौरभ

फोटो छानच आहेत. एकदा तरी जायला हवच.

आता एकदा या सहलीबद्दल ईतर माहीती (अंदाजे खर्च, उपलब्ध निवास व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था ई.) देणारा लेख लिहा.