कूर्ग - हिरवाईच्या विविध छटा - भाग १.

Manish Mohile's picture
Manish Mohile in भटकंती
26 Feb 2012 - 5:07 pm

कूर्ग ऊर्फ कोडागू - कर्नाटक राज्यातील एक थंड हवेचे ठिकाण. या जागेबद्दल खूप ऐकलेलं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे की फारसं बाजारीकरण झालेलं नसल्यामुळे येथील निसर्ग सौंदर्य अजून प्रदुषित / शबलित झालेले नाही. कूर्ग हे खरंतर जिल्ह्याचं नाव आहे आणि मग त्यात अनेक छोटी गावं.

थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे एप्रिल मे हे येथे जाण्यासाठी सगळ्यात ऊत्तम महिने. पण आम्ही कूर्गचं पावसाळ्यातील सौंदर्य बघण्याचं ठरवलं. १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधी साठी Resort चं बुकींग केलं. कूर्ग ला जाण्यासाठी मंगळूरहून जाता येतं तसच म्हैसूरहूनही जाता येतं. मंगळूर साधारण १४० कि.मी. अंतरावर आहे तर म्हैसूर ११५ कि.मी. वर. आम्ही ठरवलं - जाताना मंगळूरवरून जाऊ आणि परतताना म्हैसूरवरून - कारण त्या वेळा आम्हाला सूट होत होत्या.

तर अहमदाबाद - मुंबई - मंगळूर असा विमानप्रवास करून साधारण दुपारी एक दीड च्या सुमारास आम्ही मंगळूर ला पोहोचलो. येथून कूर्ग साधरण १४० कि.मी. आहे. टॅक्सी बोलावलेलीच होती. अंतर कमी असलं तरी रस्ता घाटाचा असल्यामुळे आणि खराब असल्यामुळे पोचायला जवळपास साडेचार ते पाच तास लागले रिसॉर्टला पोचायला. हे रिसोर्ट आहे मडिकेरी गावामध्ये. सकाळी साडेचार ला ऊठून आम्ही अहमदाबाद सोडलं होते आणि बारा तास प्रवासात घालवून आता थकवा आला होता. पण रिसॉर्टचं पहिलं दर्शन झालं आणि सगळा थकवा क्षणार्धात कुठल्याकुठे पळून गेला.

Club Mahindra - Coorg

सुरेख वातावरण होतं. पाऊस रिमझिम होता पण भिजवून टाकत नव्हता तर drizzle showers ची मजा घेऊ देत होता. रिसॉर्ट मध्ये असलेली हिरवीकंच शोभा कूर्गची झलक दाखवत होती. त्या गर्द हिरवाईतूनच वळणावळणाचे दगडी रस्ते फिरवलेले होते. सामान वगैरे ने आण करण्यासाठी विजेरीवर चालणार्या गाड्या होत्या - प्रदुषण होऊ नये म्हणून.

जवळपास अर्धा कि.मी. गेल्यावर आम्ही आमच्या अपार्टमेंटपाशी पोचलो.

त्या दिवशी आम्ही आराम केला. दुसरे दिवशी आम्ही आमचे रिसॉर्ट एक्स्प्लोर करणार होतो. जवळपास ३५ एकराच्या जागेत हे रिसॉर्ट पसरलेले आहे ज्यापैकी बांधकाम फक्त ७ एकरामध्ये आहे. बाकी आहे हिरवी गर्द वनश्री. हे आहेत फोटोज रिसॉर्ट प्रिमाइसेसमधील.

पुढचे तीन चार दिवस फिरायचं होतं. सगळ्या sight seeing trips आम्ही रिसोर्ट तर्फेच करणार होतो. त्यासाठी अर्थात additional charges होते. ग्रुप मध्ये जायचे वेगळे आणि personal trips चे वेगळे.

दिवस तिसरा १७ ऑगस्ट - दुबारे एलिफंट कॅम्प - कूर्गहून साधरण ३५ कि.मी. येथे पाळीव हत्ती आहेत ज्यांना आंघोळ घालण्याची संधी तुम्हाला मिळते - रु. १०० देऊन. आमच्या मुलीमुळे आम्ही ईथे जायचं ठरवलं. सकाळी साडेआठ ला निघालो आणि साधारण तासाभरात पोचलो. मध्ये एक नदी होती. ती पार करून पलीकडे गेल्यावर गजराज दिसणार होते. नदी पार करताना सुद्धा झकास फ्रेम्स मिळत होत्या फोटो काढायला.

आणि मग दिसले गजराज - स्नानाचा आनंद लुटताना.

माझ्या मुलीने पण मग त्यांना आंघोळ घातली - अर्थात माहूत होताच. त्यानंतर हतीवरून एक फेरी मारली - पुन्हा एकदा रु. १००/-.

तेथून परत फिरलो. रिसॉर्टवर परत आलो. जेऊन परत निघायचं होतं मडिकेरी मधील sight seeing साठी.

पहिल्यांदा गेलो अ‍ॅबी फॉल्स ला. आमच्या गाईड ने सांगितल्याप्रमाणे स्थानिक भाषेत अ‍ॅबी म्हणजे धबधबा. पार्कींग पासून पायवाट होती . साधारण शंभर एक फूट ऊतरून आलो आणि अ‍ॅबी फॉल्सचं रमणीय दर्शन झालं. आजूबाजूला गर्द हिरवी झाडी आणि मध्ये सफेद पाण्याचे तुषार ऊडवणारा पाण्याचा प्रपात. फॉल्सच्या बरोबर समोर एक पुल आहे ज्यावर ऊभे राहून धबधब्याचे समोरून दर्शन घेता येते. पण तिथे कॅमेरा बाहेर काढणे अशक्य होते एवढे तुषार येतात.

तिथून निघालो ओंकारेश्वर मंदीराकडे. वाटेवर परत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

Omkareshwara Temple, Madikeree

मंदिरात दर्शन घेऊन निघालो "Raja's Seat" या मडिकेरी गावामधील सर्वात ऊंच ठिकाणी. ईथून दिसणारे दृष्य फारच विहंगम होते.

खाली हिरव्यागार झाडीत एक लाल कौलारू घर दिसलं - एकदम चित्रातल्यासारखं. माझ्या कॅमेर्याच्या 35 x optical zoom चा वापर करून मी लगेच ते घर कॅमेराबद्ध केले.

आता संध्याकाळ होत आली होती. रिसॉर्टवर परत आलो. ऊद्याचा चौथा दिवस - १८ ऑगस्ट. ऊद्याचा कार्यक्रम होता निसर्गधाम आणि Nyingmapa Monastery चा.

क्रमशः.

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Feb 2012 - 5:40 pm | पैसा

हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा बघून मन प्रसन्न झालं. सर्वच फोटो सुंदर आलेत. आणि क्रमशः लवकर पुरं करा!

गणेशा's picture

26 Feb 2012 - 5:47 pm | गणेशा

भटकंती करताना या असल्या हिरवाईच्या प्रेमातच पडतो माणुस ..
एकदम आवडेश सगळे.

सुनील's picture

26 Feb 2012 - 7:31 pm | सुनील

झकास वर्णन आणि फोटो!

तुमचे हे रिसॉर्ट म्हणजे ऑरेंज कौंटी रिसॉर्ट काय?

पावसाळ्यात गेल्यामुळे तुम्हाला मसाल्याची बागायत बघायला मिळाली किंवा नाही ते ठाऊक नाही. पण बघीतली असेल तर त्याचेही वर्णन येऊद्या.

कुठल्याही ठिकाणी गेल्यावर इतर प्रेक्षणीय स्थळांबरोबरीने चाखायच्या असतात त्या तेथील स्थानिक पाककृती. कूर्ग प्रसिद्ध आहे ते तेथील सूकरमासांच्या विविध पाककृतींसाठी! चाखले असेल तर त्याबद्दलदेखिल लिहा.

तिबेटी धर्मस्थळाबद्दल तर लिहालच.

कूर्ग ही जनरल करिअपा आणि थिमय्या यांच्यासारख्या शूर-वीरांना जन्म देणारी भूमी तर आहेच पण कूर्ग हे (केरळ प्रमाणेच) प्रसिद्ध आहे ते तेथील देखण्या रेखीव मुलींसाठी! तेव्हा "त्या" हिरवळीबद्दलदेखिल काही येऊद्या! :)

Manish Mohile's picture

27 Feb 2012 - 8:01 am | Manish Mohile

आम्ही राहीलो होतो Club Mahindra ला. कूर्ग चे त्याम्चे रिसॉर्ट ही गोल्ड कॉईन प्रकारात मोडणारी प्रॉपर्टी आहे.

स्थानिक खाद्यप्रकारांबद्दल म्हणाल तर संपूर्ण आठवडा न्याहारी, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यात इतक्या विविध प्रांतातील खाद्यप्रकार बुफे मध्ये मिळतात की काही विचारू नका. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही. त्यात विशेषकरून आठवते स्थानिक पद्धतीने केलेले चिकन आणि मटण. मत्स्याहार देखील ऊत्क्रुष्ट होता. अर्थात आम्ही आमची सगळी जेवणं रिसॉर्टलाच घेतली होती.

जनरल करिअप्पा व थिमय्या ही दोन नावे तिथे गेल्यावर निश्चितच ऐकायला मिळतात. कूर्ग ही लढवय्यांची भूमी मानली जाते. आमच्या गाईड ने सांगितल्याप्रमाणे भारतीय लष्करामध्ये सुरुवातीला कूर्ग रेजिमेंट होती.

देखण्या रेखीव मुलींबद्दल मी देखील पुष्कळ ऐकलं होतं पण त्या ऐकीव माहीतीला दुजोरा मिळेल असा भरघोस पुरावा काही बघायला मिळाला नाही.

आपण कूर्गला जाऊन आलेले दिसता. बरीच माहीती आहे आपल्याकडे. अर्थात त्यामुळे माझी स्म्रुती देखील ताजी झाली कूर्ग च्या या सगळ्या खासियतींबद्दल. मनःपूर्वक धन्यवाद.

प्रचेतस's picture

26 Feb 2012 - 9:40 pm | प्रचेतस

अप्रतिम फोटोज.

शिल्पा ब's picture

27 Feb 2012 - 2:16 am | शिल्पा ब

छान जागा दिसतेय.

सुंदर फोटोज आणि माहिती, त्या घराचा फोटो तर एकदम मस्तच आलाय. धन्यवाद.

सविता००१'s picture

27 Feb 2012 - 3:32 pm | सविता००१

मस्तच फोटो. आवडेश.

मी-सौरभ's picture

27 Feb 2012 - 8:01 pm | मी-सौरभ

आता ईथे जायचा प्लॅन बनवायला हवा..

वपाडाव's picture

27 Feb 2012 - 8:17 pm | वपाडाव

शुभमंगल कधी आहे लेका?

वपाडाव's picture

27 Feb 2012 - 8:17 pm | वपाडाव

मंगळुर-बंगळुर रस्त्यावरही दोहो बाजुंना हिरवळ आहे. या भागाची खासियत म्हणजे भारतातील जवळपास ७०% शहाळ्यांचा पुरवठा इथुनच होतो. सर्वदुर नारळाचीच झाडे दिसतात.

नि३सोलपुरकर's picture

27 Feb 2012 - 8:22 pm | नि३सोलपुरकर

मनिष शेट,
एकदम मस्त लोकेशन, आस्मादिकानी हनिमुन साठी हेच लोकेशन निवडल होत. सगळा परिसर बाईकवर फिरलो आहे...मस्त एकदम...

चिंतामणी's picture

29 Feb 2012 - 12:22 am | चिंतामणी

माझ्या एका मित्राकडुन आणि बहिणीकडून खूप ऐकले होते. पण तुझ्या फोटोग्राफ्समुळे आता जायची तीव्र इच्छा झाली.

निशदे's picture

29 Feb 2012 - 2:42 am | निशदे

कमालीची सुंदर जागा दिसते........
अजून असेच फोटो येउ द्यात