सुकलेला का होइना..?पण कुणीसा
गाडीला घातला होता गजरा
या निमितानी मी माझ्या..
गाडीलाच केला मुजरा
काय सालं नशिब हीचं..?
पाहिलं तरी फिदा होतात
आंम्ही कडक कपडे घालतो
तेंव्हा,कोण जाणे या कुठे जातात..?
जरी असल्या या आजुबाजुला तरी,
नळाला पाणी यावं तश्या बोलतात
आल्याच समोर तर नंतर मग,
मागे जाऊन कुजबुजतात.
''हँडसम दिसतोय गं...हम्म्म्म,
पण कपड्याचा चॉइस बरा नाहीये
दिसतोय जॉन अब्राहम सारखा..,
पण अॅटिट्यूट काही खरा नाहीये..''
''ए,,तुला काय करायचाय अॅटिट्युट..?
नुसतं नाव विचार ना..?''
''शी...!नाव काय विचारायचं..?
त्यापेक्षा डायरेक्ट फोन नंबर घे ना..!''
असे पिछाडीला संवाद घडुन
सैन्य आघाडीला येतं
आणी.''तुंम्ही काय करता..?'' असं विचारुन,
आल्या पावली निघुन जातं.
मग मला म्हणावं लागतं
आपल्या चेहेर्याचं वय झालय
जे प्रेम गच्चीवर यायचं..,
ते अता गाडीवर आलय..!
वयाबरोबर कळत जातात
प्रेमामधले सावध खेळ
म्हटलयच कुणीतरी..प्रेमाला,
जमला तर चिवडा,नायतर सगळीच भेळ..!
अता त्यांच्याच विचारण्यावर र्हायलो
तर उरलेलं वयही सरेल
इकडे पडत र्हातील कविता
आणी तिकडे गाडीच गजर्यांनी भरेल
त्यामुळे मीही आता स्त्रीपक्षात
जोरदार लॉबींग करणार आहे
यावर्षी काहिही होवो..पण
निवडणुक मात्र जिंकणार आहे.. ;-)
प्रतिक्रिया
25 Feb 2012 - 9:02 am | प्रचेतस
आता आत्म्यांमध्येही विलेक्शनचे वाहू लागले वारे,
आपापली झाडे सोडूनी एकत्रच जमा झाले सारे.
जिंकणे फड निवडणुकीचा हाच लागला त्यांना ध्यास,
अतृप्तीकडून तृप्तीकडे सुरु झाला त्यांचा प्रवास. :P
25 Feb 2012 - 9:07 am | लीलाधर
याउपर काही बोलणे नाही..... मुकवाचक केलेत :)
25 Feb 2012 - 4:17 pm | अत्रुप्त आत्मा
@अतृप्तीकडून तृप्तीकडे सुरु झाला त्यांचा प्रवास. >>> :-D
तुला माझ्या अत्रुप्तीची चव लगेच कळते रे...!
तूही अजुन तसाच आहेस,कुंडली आपली जुळते रे... :-p
25 Feb 2012 - 9:20 am | लीलाधर
एखादी स्मायली टाका डकवून कळुदे तरी तुमची निशाणी?
आणि हो येणार्या निवडणूकीसाठी हार्दिक शुभेच्छा
आणि तुमचे घोषवाक्य काय असणारे :
ताई माई अक्का विचार करा पक्का आणि भ्रष्टाचाररुपी राजकारणात असणार्या नरभक्षक आत्म्यांचा करा खात्मा.....
25 Feb 2012 - 4:20 pm | अत्रुप्त आत्मा
@आणि तुमचे घोषवाक्य काय असणारे : >>>
ताई,माई,अक्का इचार करा पक्का
अनेकांना मिळाले श्री-खंड,मला किमान द्या चक्का.. :-p
26 Feb 2012 - 10:32 pm | पक पक पक
वल्लीबाबा _____/\_____
अत्रुप्त आत्म्या _____/\_____
27 Feb 2012 - 10:22 pm | अत्रुप्त आत्मा
@वल्लीबाबा>>> ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा...!