थंडी माघाची

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
19 Jan 2012 - 1:13 am

थंडी माघाची

थंडी पडलीया माघाची
राया माघाची
घाई करा तुमी येण्याची ||धृ||

लवकर या हो
जवळ घ्या हो
जरातरी फिकीर करा वेळेची ||

नका नका आसं करू नका
जिव माझा फुका जाळू नका
एकटेच का दुर र्‍हाता तिथं
पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची ||

थंडीनं जिव केला येडापिसा
उन उन उबेला जवळी बसा
हातावर हात आन पायावर पाय
पहा चोळून राहिलेय मी केव्हाची ||

कालचा दिस आठवा ना
रुसवा गोडीनं मिटवा ना
आणलय काय दावून जरा
मुठ उघडा हाताची ||

- पाभे

शृंगारप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Jan 2012 - 8:34 am | प्रचेतस

आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी हो पेटवा..

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jan 2012 - 8:35 am | अत्रुप्त आत्मा

@-एकटेच का दुर र्‍हाता तिथं
पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची || ....
पा.भे. त्वाडा जव्वाब नही....!
ही म्हणजे कडक थंडित मारलेली-बेधडक सिक्सर आहे...!
फाट-फुट-फट्याक येकदम...!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Jan 2012 - 11:19 am | मिसळलेला काव्यप्रेमी

शाहीर पाभेंचा जाहीर सत्कार करावा काय?
काय लिवलयं काय लिवलयं.. लय भारी राव!!

प्रकाश१११'s picture

19 Jan 2012 - 12:20 pm | प्रकाश१११

पाषाण भेदा -वा लई भारी
लवकर या हो
जवळ घ्या हो
जरातरी फिकीर करा वेळेची ||

गणेशा's picture

19 Jan 2012 - 9:27 pm | गणेशा

एकटेच का दुर र्‍हाता तिथं
पेटवा शेकोटी माझ्या ज्वानीची ||

थंडीनं जिव केला येडापिसा
उन उन उबेला जवळी बसा
हातावर हात आन पायावर पाय
पहा चोळून राहिलेय मी केव्हाची ||

लाजवाब

पक पक पक's picture

20 Jan 2012 - 6:31 pm | पक पक पक

ऐन थंडीत कानशिल गरम केलीत राव्....झक्कास.........

व्वा झकास शाहिर..

दिपक's picture

21 Jan 2012 - 9:58 am | दिपक

झकास पाभे. येऊद्या अजुन थंडी जायच्या आत :-)