कां वागतो माणूस असा?

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
3 Jan 2012 - 2:40 pm

कां वागतो माणूस असा? कां नाही जगत माणूस म्हणून?
.
आयुष्यभर सावल्यांशी खेळतो, सावल्यांमध्येच रमतो
सगळीच आंधळी कोशिंबीर, सावलीचा संसार सावलीशीच
लख्ख सूर्यासारखे सत्य डावलून सावलीचा आभास आपलासा करतो
कां? कां वागतो माणूस असा?

सत्य तरी किती खरे, कुणास ठाऊक!!
कुठेतरी मनात साठवलेले काही क्षण हे कां सत्य?
कातड्याच्या डोळ्यांनी पाहिलेले, अन मांसाच्या कानाने ऐकलेले
हे जर सत्य तर मग प्रत्येक माणूस "हरिश्चंद्र" कां नाही?
उगाचं काही माणसे सत्य शोधण्यात आयुष्य वाया कां घालवतात?
त्यांच्या आयुष्याचे हे सत्य त्यांना कळत कां नाही!!
कां? कां वागतो माणूस असा?

माणसासारखा माणूस असून
सैतानासारखे अत्याचार करतो
खर्‍याचे खोटे अन् खोट्याचे खरे करतो
जगाला फसवितो,
देवाला फसवितो,
शेवटी स्वःतालाच फसवितो
कां? कां वागतो माणूस असा?

इच्छाचे मोहोळ तयार करतो,
इच्छांना कुरवाळत बसतो,
इच्छांना महत्त्वकांक्षा म्हणतो,
महत्त्वकांक्षांचे दुराग्रह, दुराग्रहातून द्वेष,
याच दु:श्चक्रात गोल गोल फिरतो,
चकव्यात चकून आयुष्याचे वाटोळे करतो
कां? कां वागतो माणूस असा?

कोणी कृष्ण माझा म्हणतो,
कोणी राम राम जपतो,
कोणी अल्लाहचे गुणगान गातो,
कोणी येशुची करुणा भाकतो,
इतकं सगळं करुनही, पापाच्या राशीचं रचतं राहतो,
कां? कां वागतो माणूस असा?

काळ सरकतो, सरणार्‍या लाटेसारखा
अन् जग अनभिज्ञ, त्या विशाल सागरासारखे
धडधडणारे हृदय हेच सत्य, बाकी सारे आकार
स्पंदने तरंग उमटवतात, आणि पुन्हा आभास साकारतात
अन् पुन्हा माणूस अडकतो, सावल्यांच्या जाळ्यात
खरचं कां वागतो माणूस असा?

|-मिसळलेला काव्यप्रेमी -|
(०३/०१/२०१२)

करुणशांतरसमुक्तकसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमि साहेब

अप्रतिम तुमच्या कवितेला माझा सलाम

कवितेचा आशय विचार करायला लावतो कि खरच माणस अशि का वागतात

अप्रतिम तुमच्या कवितेला माझा सलाम

फिझा's picture

3 Jan 2012 - 3:15 pm | फिझा

काळ सरकतो, सरणार्‍या लाटेसारखा
अन् जग अनभिज्ञ, त्या विशाल सागरासारखे
धडधडणारे हृदय हेच सत्य, बाकी सारे आकार

अप्रतिम रचना !!!!!

गवि's picture

3 Jan 2012 - 3:26 pm | गवि

ठीकठाक.