बासूंदी गोड गोड
तो:
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड
तुला पिवू का पिवू का पिवू का थोडं थोडं ||धृ||
ती:
तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल
तुला खावू का खावू का खावू का पोटभर ||धृ||
तो:
दुधासारखे शुभ्र तुझे ग आहे गोरं गोरं अंग
बशीमधे घेवू तुला की कपामध्ये तू जरा सांग
गरमा गरमी सहवेना ग तू हो आता थंड थोडं
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||१||
ती:
माझ्या दिलाच्या मिठाईचा तू आहे एक हलवाई
मीच तूझी कधी बर्फी झाले, कधी झाले रसमलाई
बासुंदीची धार चोखण्या तू आता तोंड उघड
तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल ||२||
तो:
सडपातळ तू काजूकतली आहे पाकातली जिलेबी
चाटून पुसूनी फस्त करील वर खाईल कुल्फी
तोंडी माझ्या लागू दे ग तुझ्या वाटीतला कलाकंद
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||३||
ती:
चाखव मला तुझा रे लाल गाजर हलवा एकदा
गाल तुझे रगगुल्ले चाखले खाल्ले मोदक अनेकदा
तिखट चिवडा भजी पकोडे खिलवूनी केलीस झोपमोड
तू माझा गुलाबजाम गुलाबजाम गुलाबजाम गोल गोल ||४||
तो:
प्रेमाची गोडी वाढली खावून गोड मिठाई
पेढा तुझा ग मी आहे तू माझी रसमलाई
पुरे मला आता नको आणखी भरले माझे पोट
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||५||
- हलवाई पाषाणभेद
प्रतिक्रिया
30 Dec 2011 - 7:53 am | अत्रुप्त आत्मा
अबाबाबाबा...हाय..!हाय...!हाय...! पा.भे. हलवाई>>> काय कडक मिठाई टाकली हो,आमची पहिली ऑर्डर घ्या कि हो १० किलोच्या :love: मिठाईची,तोंडाला पाणी सुटलं राव...वाक्यावाक्याला अतिशय ह्सू येत होतं,काही काही ओळी तर छप्पर उडवुन जातायत... या काव्याजवळ बसलं :-D तर शेकोटि शिवाय थंडी पळेल हो...
पहिल्या कडव्यातल्या निरागस श्रुंगाराला माझे १०००० फ्लाइंग किस :-) पण पुढे मात्र छप्परतोड मामला आहे... ;-)
@बासुंदीची धार चोखण्या तू आता तोंड उघड.... :-D राम राम राम मेलो
@तोंडी माझ्या लागू दे ग तुझ्या वाटीतला कलाकंद.... :-p अयायाया ठ्ठार जा-ह-लो :-D
@चाखव मला तुझा रे लाल गाजर हलवा एकदा... :bigsmile: निर्वाण...महानिर्वाण.... मोक्ष... टांगा पलटी,,,,घोडे,गाढवं,खेचर,ऊंट,हत्ती...सगळे फरार
30 Dec 2011 - 8:36 am | लीलाधर
व्वा व्वा पा. भे. हलवाई,
सकाळी सकाळी चाखवलीत की हो रसमलाई ! :-)
सडपातळ तू काजूकतली आहे पाकातली जिलेबी
चाटून पुसूनी फस्त करील वर खाईल कुल्फी
तोंडी माझ्या लागू दे ग तुझ्या वाटीतला कलाकंद
तू माझी बासूंदी बासूंदी बासूंदी गोड गोड ||३||
सकाळीच <> <> <> काजूकतली <> <> <> खाऊन बाहेर पडलोय पा.भे.
घ्या आता नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला ऑर्डर्स
गुर्जींनी दीलीच आहे १० कीलोची ऑर्डर त्यात आमचीही घ्या अजून १० कीलोची ऑर्डर
घ्या दोघांच्या आल्या आहेत तुम्हाला ऑर्डर्स,
तुमच्या शा़खांचे तेवढे द्या मात्र नंबर्स.
30 Dec 2011 - 11:16 am | निश
तुम्ही लय मस्त मिठाई पेश केलि आहेत.
लय भारी
म्हटल तर एकच शब्ब्द : अफाट
अफाट अफाट अफाट ....
3 Jan 2012 - 3:58 pm | अविनाशकुलकर्णी
,मस्त...
मधुमेही वाचकांनी दुर व्हावे..
3 Jan 2012 - 4:10 pm | दिपक
3 Jan 2012 - 5:38 pm | दादा कोंडके
छ्प्परतोड काव्य!
3 Jan 2012 - 6:30 pm | चिंतामणी
पलंगतोड बी हाय.