दत्त दत्त बोलत गेलो

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
28 Dec 2011 - 4:13 am

दत्त दत्त बोलत गेलो

दत्त दत्त बोलत गेलो
गेलो गेलो दत्त दत्त बोलत गेलो
दत्ताला भजूनी धन्य झालो
झालो झालो दत्ताला भजूनी धन्य झालो ||

दत्तनाम सदा राहे माझ्या मुखी
जगामधे मीच आहे सर्व सुखी
नकळे मला मी कोण होतो
दत्ता समोर प्रत्यक्ष शरण आलो ||

गुरूदत्तावरी माझा राही विश्वास
दत्त दत्त सदा घेई अंतरी श्वास
विस्मये आश्चर्ये असे दत्त किर्ती
वेळीअवेळी दत्ताला आठवित गेलो ||

चिंता क्लेश उणीवा असती माझ्यात
प्रयत्न करणे केवळ असे हातात
मागणे माझे काही नसता
दत्तगुरू प्रसाद नित्य मुखी मिळो ||

- पाभे

शांतरसकविता

प्रतिक्रिया

लीलाधर's picture

28 Dec 2011 - 8:16 am | लीलाधर

पाभे

गुरूब्रह्मा गुरूर्विष्णू, गुरूर्देवो महेश्वरा: !
गुरू:साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः !

श्री गुरूदेव दत्त !

अत्रुप्त आत्मा's picture

28 Dec 2011 - 9:40 am | अत्रुप्त आत्मा

नेहमी सारखं जमलं नाही पा.भे....
कापड चांगलं होतं,
बेतलं बी चांगलं,
पण अंगाला नाही आलं...!

अमोल केळकर's picture

28 Dec 2011 - 9:44 am | अमोल केळकर

सुंदर रचना !

गुरुदेव दत्त !

अमोल

मृगनयनी's picture

28 Dec 2011 - 10:14 am | मृगनयनी

अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त! :)

शब्दाशब्दातून दत्त-भक्ती ओसंडून वाहते आहे..... :)

आणि भक्तीरूप शब्दांना विभक्ती,मात्रा, वृत्त इ. गोष्टींची गरज भासत नसते. त्यामुळे जास्त आवडली! :)

मदनबाण's picture

28 Dec 2011 - 10:19 am | मदनबाण

गुरूदत्तावरी माझा राही विश्वास
दत्त दत्त सदा घेई अंतरी श्वास
विस्मये आश्चर्ये असे दत्त किर्ती
वेळीअवेळी दत्ताला आठवित गेलो ||

सुंदर रचना...
ही रचना वाचुन मला अजित कडकड्यांनी गायलेले हे गीत आठवले...
दत्त दत्त मुखे म्हणा दत्त दत्त मुखे म्हणा दत्त गोविंद हो...

प्यारे१'s picture

28 Dec 2011 - 10:33 am | प्यारे१

पाभेंचं वेगळं रुप पहायला मिळालं. :)
छान जमलीये रचना.

मूकवाचक's picture

29 Dec 2011 - 1:37 pm | मूकवाचक

असेच म्हणतो.

निश's picture

28 Dec 2011 - 10:59 am | निश

छान जमलीये रचना
सुंदर रचना...
मस्त

गणेशा's picture

28 Dec 2011 - 1:41 pm | गणेशा

मस्त प्रार्थना/आरती/कविता.

असेच लिहित रहा... वाचत आहे.......