✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दत्त दत्त बोलत गेलो

प — पाषाणभेद, Wed, 12/28/2011 - 04:13
दत्त दत्त बोलत गेलो दत्त दत्त बोलत गेलो गेलो गेलो दत्त दत्त बोलत गेलो दत्ताला भजूनी धन्य झालो झालो झालो दत्ताला भजूनी धन्य झालो || दत्तनाम सदा राहे माझ्या मुखी जगामधे मीच आहे सर्व सुखी नकळे मला मी कोण होतो दत्ता समोर प्रत्यक्ष शरण आलो || गुरूदत्तावरी माझा राही विश्वास दत्त दत्त सदा घेई अंतरी श्वास विस्मये आश्चर्ये असे दत्त किर्ती वेळीअवेळी दत्ताला आठवित गेलो || चिंता क्लेश उणीवा असती माझ्यात प्रयत्न करणे केवळ असे हातात मागणे माझे काही नसता दत्तगुरू प्रसाद नित्य मुखी मिळो || - पाभे

प्रतिक्रिया द्या
1956 वाचन

💬 प्रतिसाद (9)

श्री गुरूदेव दत्त !

लीलाधर
Wed, 12/28/2011 - 08:16 नवीन
पाभे गुरूब्रह्मा गुरूर्विष्णू, गुरूर्देवो महेश्वरा: ! गुरू:साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ! श्री गुरूदेव दत्त !
  • Log in or register to post comments

नेहमी सारखं जमलं नाही

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/28/2011 - 09:40 नवीन
नेहमी सारखं जमलं नाही पा.भे.... कापड चांगलं होतं, बेतलं बी चांगलं, पण अंगाला नाही आलं...!
  • Log in or register to post comments

-

अमोल केळकर
Wed, 12/28/2011 - 09:44 नवीन
सुंदर रचना ! गुरुदेव दत्त ! अमोल
  • Log in or register to post comments

अवधूतचिन्तन श्री गुरुदेव

मृगनयनी
Wed, 12/28/2011 - 10:14 नवीन
अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त! :) शब्दाशब्दातून दत्त-भक्ती ओसंडून वाहते आहे..... :) आणि भक्तीरूप शब्दांना विभक्ती,मात्रा, वृत्त इ. गोष्टींची गरज भासत नसते. त्यामुळे जास्त आवडली! :)
  • Log in or register to post comments

गुरूदत्तावरी माझा राही

मदनबाण
Wed, 12/28/2011 - 10:19 नवीन
गुरूदत्तावरी माझा राही विश्वास दत्त दत्त सदा घेई अंतरी श्वास विस्मये आश्चर्ये असे दत्त किर्ती वेळीअवेळी दत्ताला आठवित गेलो || सुंदर रचना... ही रचना वाचुन मला अजित कडकड्यांनी गायलेले हे गीत आठवले... दत्त दत्त मुखे म्हणा दत्त दत्त मुखे म्हणा दत्त गोविंद हो...
  • Log in or register to post comments

पाभेंचं वेगळं रुप पहायला

प्यारे१
Wed, 12/28/2011 - 10:33 नवीन
पाभेंचं वेगळं रुप पहायला मिळालं. :) छान जमलीये रचना.
  • Log in or register to post comments

+१

मूकवाचक
गुरुवार, 12/29/2011 - 13:37 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मस्त

निश
Wed, 12/28/2011 - 10:59 नवीन
छान जमलीये रचना सुंदर रचना... मस्त
  • Log in or register to post comments

मस्त

गणेशा
Wed, 12/28/2011 - 13:41 नवीन
मस्त प्रार्थना/आरती/कविता. असेच लिहित रहा... वाचत आहे.......
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा