तुला जमावे मला जमावे

सोनल कर्णिक वायकुळ's picture
सोनल कर्णिक वायकुळ in जे न देखे रवी...
23 Dec 2011 - 3:19 pm

तुला जमावे मला जमावे
त्रास जीवाचे सोडून देणे
डोळ्यामधल्या पाण्यालाही
जमून जावे वाहून जाणे

दोन मनांच्या मधले अंतर
आहे केवळ टोचत राहणे
कसे कळावे खुळ्या मनाला
निवडुंगाचे बहरून येणे

भास जगाचे खासच फसवे
त्यात जडावे दुर्धर रुसवे..
ओठांवरचे शब्द गरिबडे
श्वासागणती खडतर होणे

आठवणींचे गुलाब हळवे
नको उशाशी काटे जपणे
निर्माल्याचे प्राक्तन घेउनी
जन्मा यावे आपले जगणे

शांतरसकविता

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Dec 2011 - 3:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आठवणींचे गुलाब हळवे
नको उशाशी काटे जपणे
निर्माल्याचे प्राक्तन घेउनी
जन्मा यावे आपले जगणे

अप्रतिम!!

इन्दुसुता's picture

24 Dec 2011 - 2:37 am | इन्दुसुता

तुमच्या सगळ्या कविता मला समजतातच असे नाही ( दुर्बोध असतात असे अजिबात म्हणायचे नाही ) , पण ही कविता समजली आणि खूप आवडली

नगरीनिरंजन's picture

24 Dec 2011 - 10:21 am | नगरीनिरंजन

कविता खूप आवडली.

निवडुंगाचे बहरून येणे

वा!

सुंदर आहे कविता !!!

आठवणींचे गुलाब हळवे
नको उशाशी काटे जपणे
निर्माल्याचे प्राक्तन घेउनी
जन्मा यावे आपले जगणे

या ओळी तर खासच.

अत्रुप्त आत्मा's picture

24 Dec 2011 - 6:20 pm | अत्रुप्त आत्मा

ही कविता बरी वाटली.. :-)

छान्,सुंदर्,अप्रतिम्,खास..........संपले सगळे शब्द........

सोनल कर्णिक वायकुळ's picture

27 Dec 2011 - 11:14 am | सोनल कर्णिक वायकुळ

प्रान्जळ प्रतिसादाबद्दल सगळ्यान्चे खुप खुप आभार. :)

अविनाशकुलकर्णी's picture

27 Dec 2011 - 7:35 pm | अविनाशकुलकर्णी

आवडली

मदनबाण's picture

27 Dec 2011 - 7:43 pm | मदनबाण

वा... सुंदर कविता. :)

santosh waghmare's picture

27 Dec 2011 - 8:08 pm | santosh waghmare

छान आहे