(सावली)

प्रचेतस's picture
प्रचेतस in जे न देखे रवी...
17 Dec 2011 - 10:10 am

आमची प्रेरणा: सावली

आता ठरवलय
की कवी व्हायचं नाही,
पण तरीही येतो एक झटका
जस जशा इतरांचा कविता दिसत जातात,
कागदांच्या ढिगार्‍यात बसलेला
वेचत असतो उमटलेले
शब्द अन् शब्द,
सोबतीला असतात ताव,कलमे,
करत असतात सोबत
जुळवणार्‍या यमकांशी,
'ट' ला 'ट' जोडून
मुक्तछंदाच्या साक्षीने,
आणि लिहीत असतो
त्या कागदाच्या तुकड्यांवर
उगाच काहिही,
सोबतीला असते माझी आकांक्षा
मी प्रसिद्ध कवी होण्याची वाट पाहात.....

---
न्याहाळे कविछंद

शांतरसकविताविडंबन

प्रतिक्रिया

स्पा's picture

17 Dec 2011 - 10:39 am | स्पा

हॅ हॅ हॅ

जमलंय जमलंय :D

अन्या दातार's picture

17 Dec 2011 - 10:45 am | अन्या दातार

आजकाल लोक काय भन्नाट कविता करत सुटलेत.
विडंबकांनाही भरपूर कच्चा माल उपलब्ध होतोय त्यामुळे. वल्लीशेठ, लगे रहो.

लीलाधर's picture

17 Dec 2011 - 11:12 am | लीलाधर

व्वा व्वा वल्ली शेठ कवी (वल्ली) वर्य :) अप्रतिम चान चान जमलेय हो तोडच नाही ----^----

अत्रुप्त आत्मा's picture

17 Dec 2011 - 11:31 am | अत्रुप्त आत्मा

व्वा व्वा वल्लीमहाराज...! काय पंचनामा केलायत हो...वा..तोड नाही

५० फक्त's picture

17 Dec 2011 - 2:28 pm | ५० फक्त

एक सर्वमान्य व्यथा... याच मीटर मध्ये मांडायचा प्रयत्न केला आहे...

आता ठरवलय
की नवरा व्हायचं नाही,
पण तरीही येतो एक झटका
जस जशा इतरांच्या नव-या दिसत जातात,
साड्यांच्या ढिगार्‍यात बसलेला
शिवत असतो उसवलेले
खिसे अन वॅलेटं,
सोबतीला असतात ताव मांजरपाटाचे,
करत असतात मदत
उसवणा-या विजारींशी,
पै ला पै जोडून
क्रेडिट कार्डाच्या मदतीने,
आणि लिहीत असतो
चेक उधारी चुकवणारे,
उगाच काहिही,
सोबतीला असते माझी सॅलरी स्लिप
मी पुन्हा यावर्षी इन्किमेंट होण्याची वाट पाहात.....

पक पक पक's picture

18 Dec 2011 - 6:11 pm | पक पक पक

साहेब तोडलत ........लई झ्याक जमल हाये.....

सुहास..'s picture

17 Dec 2011 - 2:31 pm | सुहास..

जम्या रे !!

विदेश's picture

17 Dec 2011 - 2:35 pm | विदेश

प्रेरणेची सावली मस्त पडली आहे !

पैसा's picture

17 Dec 2011 - 3:52 pm | पैसा

वल्ली आणि ५० फक्त, भारी!

५० फक्त's picture

17 Dec 2011 - 4:02 pm | ५० फक्त

वल्ली आणि ५० फक्त, भारी!

वैश्विक सत्य आहे ते, अनुक्रमे ७० आणि ८५ (धन्यु टु अ‍ॅक्सिडँट प्रि अ‍ॅक्सिडँट वॉज ९२)

देविदस्खोत's picture

17 Dec 2011 - 7:40 pm | देविदस्खोत

मस्त @@@@@@@@@@@@@@@@

प्रभाकर पेठकर's picture

18 Dec 2011 - 9:23 am | प्रभाकर पेठकर

श्री. वल्ली आणि श्री. ५० फक्त.

दोन्ही विडंबने छान जमली आहेत.

मुळ 'मुक्तछंदा'लाही काही 'बंधनात' ठेवावे असे वाटायला लावणार्‍या कलाकृती.

वल्लि आता विडंबन काव्य संग्रह काढा एक........

आत्मशून्य's picture

18 Dec 2011 - 6:22 pm | आत्मशून्य

सावलीची बरोबर (वसलात) लावली....